Friday, April 17, 2020

कासा पोलीस स्टेशन: चोरांच्या अफवांमुळे जमावाने 3 जणांना ठार केले व 100 लोकांना अटक


अखेर सर्वत्र पसरलेल्या चोर फिरत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे 3 वाटसरूंना जमावाने यमसदनी पाठवले आहे. मारुती इको गाडीमधून प्रवास करणारे 2 प्रवासी आणि त्यांच्या चालकावर रस्त्यावर जमलेल्या जमावाने अमानुष हल्ला चढवित तिघांना जागीच ठार केले आहे. कासा पोलिसांनी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांच्या सह घटनास्थळी जाऊन जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाला शांत करण्यात अपयश आले. लोकांनी पोलिसांच्या गाडीवर देखील हल्ला चढवला आहे. पोलिसांनी 100 लोकांना अटक केले आहेत. हे प्रवासी खानवेल येथून त्र्यंबकेश्वर येथे जात असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Thursday, April 16, 2020

दिवसभरात 6 +Ve व 45 संशयीत रुग्ण वाढले पालघर जिल्हात


(16.04.2020) आज दिवसभरात, पालघर जिल्ह्यात 6 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली असून, एकूण आकडा 75 वर पोचला आहे. हे सर्व 6 रुग्ण विरार वसई महानगर क्षेत्रातील आहेत. त्यामुळे एकट्या वसई तालुक्यातील कोरोना बाधीतांची संख्या 62 झाली आहे. जिल्ह्यातील मृत्यूंचा आकडा 5 स्थिर राहिला आहे. या व्यतिरिक्त कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या, 45 संशयीत रुग्णांची भर पडली असून, त्यांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहेत. त्यातील सर्वाधिक 30 जणांना पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 13 जणांना बोळींज येथे व 2 जण डहाणू उप जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत.

एका दिवसांत 14 वाढले, एकूण कोरोना +ve 69

 पालघर जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता पालघर जिल्ह्यातील नवे 8 व डहाणू तालुक्यातून 2 रुग्ण वाढल्यामुळे, 69 झाली आहे. त्यातील 5 जणांचा मृत्यू झाला असून, 2 जण आजारातून बरे झाले आहेत. बरे होणाऱ्यामध्ये डहाणू उप जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 3 वर्षीय मुलीचा समावेश आहे. या मुलीची टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे तीला घरी सोडण्याची शक्यता आहे.

नव्या 14 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये डहाणूतील बाधीत मुलगी पालघर तालुक्यातील काटाळे येथील ज्या वीटभट्टीवर होती, त्या परिसरातील 5 समावेश झाल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अन्य 3 पालघर तालुक्यातील सफाळे परिसरातील आहेत. डहाणू तालुक्यातील कासा ग्रामीण रुग्णालयातील 2 डॉक्टर्सचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याची धक्कादायक बाब समोर आली असून त्यातून डहाणूच्या आकडेवारीत 2 ने वाढ झाली. वसई विरार महानगर क्षेत्राचा आकडा आज 4 ने वाढला आहे.

आतापर्यंत निष्पन्न झालेल्या 69 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे:

  • विरार वसई महानगर क्षेत्र – 53 (त्यातील 4 मृत्यू)
  • वसई ग्रामीण क्षेत्र – 3
  • पालघर तालुका – 10 (त्यातील 1 मृत्यू)
  • डहाणू तालुका – 3

आतापर्यंत 980 लोकांच्या घशाचे नमुने तपासले. त्यातील 596 तपासणी अहवाल प्राप्त झाले. 247 अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.

  • 69 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह (11%)
  • 527 अहवाल कोरोना निगेटिव्ह (89%)


सध्या 82 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. एमसीजीएम रेस्ट हाऊस (अंधेरी) – 1; ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालय – 9; जसलोक (मुंबई) – 5; एमजीआरएम (पवई) – 2; रहेजा हॉस्पिटल (मुंबई) – 0 (1 रुग्ण बरा झाल्याने सुट्टी दिली); बोळिंज हॉस्पिटल (वसई) – 19 (6

पॉझिटीव्ह व 13 अहवाल बाकी); डहाणू उप जिल्हा रुग्णालय – 5 (1 पॉझिटीव्ह व 4 अहवाल प्राप्त नाही); ग्रामीण रुग्णालय (पालघर) – 2; रिद्धीविनायक हॉस्पिटल (नालासोपारा) 9 ; सेव्हन हिल्स हॉस्पिटल 8; हॉरिझोन प्राईम हॉस्पिटल (ठाणे) – 4; शताब्दी हॉस्पिटल (कांदिवली) – 1: अग्रवाल हॉस्पिटल (वालिव) – 5; टिमा हॉस्पिटल – 10 ; कोकिलाबेन हॉस्पिटल – 1; कस्तुरबा हॉस्पिटल – 1.

  • 307 जण होम क्वारन्टाईन आहेत.
  • 112 जणांना इन्स्टीट्यूशनल क्वारन्टाईन केलेले आहे.
  • 82 रुग्ण लक्षणे आढळल्यामुळे रुग्णालयात दाखल.
  • 980 जणांचे घशाचे नमुने घेतलेले आहेत.
  • 527 नमुने निगेटिव्ह.
  • 247 तपासणी अहवाल प्राप्त होणे बाकी बाकी आहे.
  • 69 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह. व त्यातील 5 पॉझिटीव्ह रुग्णांचा मृत्यू.

Wednesday, April 15, 2020

'आरोग्य सेतु' हा एप घ्यावा शासनाकडून आवाहन


भारत सरकारकडून देशातील प्रत्येक नागरिकाना आवाहन करण्यात येते की लोकांनी प्रत्येक मोबाईलमध्ये "आरोग्य सेतु" हा एप द्यावा. या ऐपमध्ये कोरोना विषाणू या रोगाबद्दल भरपूर माहिती देण्यात आले आहे. तसेच मास्क चा वापर कसा करायला पाहिजे. शासकीय सूचना, सल्ला, इ. सरकारी नियमावली देण्यात आले आहे.

या ऐपमध्ये किती रुग्ण corona virus +ve\-ve माहिती देण्यात आली आहे, तसेच self/home quanrtine चे माहिती मार्गदर्शन करण्यात आले आहे.

पालघर जिल्हातील डहाणू व तलासरी तालुक्यात रात्री चोर फिरतात अशी अफवा


गेल्या दोन-तीन दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यात एक अशी whatsapp वर text message फ़िरवली जात आहे की रात्री बेरात्री काही अनोळखी लोक चोरी करण्यास फिरत आहे, अशी अफवा फसरवली जात आहे. ग्रामपंचायतातील सदस्यांनी  या अफवाविषयी माहिती सरपंचला देऊन जनतेमधील ज्या गैरसमजाची भीती आहे, त्या अफवा आहेत असे जनतेला सांगण्यात यावे.