Tuesday, April 28, 2020

पालघर जिल्ह्यात दिवसभरात 4 कोरोना रुग्णाचे वाढ


पालघर जिल्ह्यात आजच्या दिवसांत कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 3 ने वाढून 154 झाली आहे. हे 3 रुग्ण वसई महापालिका क्षेत्रातील आहेत.

उद्यापासून 4 दिवस पालघर शहरात पूर्ण Lock Down ची अंमलबजावणी.
पालघर शहरामध्ये काल कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर आता नगरपरिषदेने 29 एप्रिल पासून 2 मे पर्यंत शहरामध्ये औषध विक्री व्यतिरिक्त सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. काल सायन येथे स्टाफ नर्स म्हणून काम करणाऱ्या पालघर येथील 56 वर्षीय महिलेला कोरोना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते.

29 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बंद.
जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे संपूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी 29 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज लोकांसाठी उपलब्ध रहाणार नाही.

सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी रहावे! जिल्हाधिकारी यांच्या सूचना
काही सरकारी अधिकारी व कर्मचारी हे पालघर जिल्ह्याबाहेर सेवेत असतात व येथून ये – जा करतात आणि काही जिल्ह्यात नेमणूकीला असताना जिल्ह्याबाहेरुन ये- जा करतात. यापुढे अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयात राहून सेवा देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. जिल्ह्याबाहेरुन येण्यास व जाण्यास आता मनाई करण्यात आली आहे.

मास्क न वापरणे, थुंकणे, सोशल डिस्टन्सींग न पाळणे याविरोधात आता दंडात्मक कारवाई.
कोव्हिड 19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नियमांचे पालन न करणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले आहे. दंडाची तरतूद पुढीलप्रमाणे:-
सार्वजनिक स्थळी मास्क न वापरणे – रु. 200
सार्वजनिक स्थळी थुंकणे – रु. 500
दुकानदारांनी सोशल डिस्टन्सींग न पाळणे :-
दुकानदाराकडून – रु. 2,000
ग्राहकाकडून – रु. 200
जीवनावश्यक वस्तुंचे दरपत्रक न लावणे – रु. 2,000

Monday, April 27, 2020

पालघर जिल्ह्यात दिवसभरात 3 +Ve बरे झाले व 7 +Ve वाढले


पालघर जिल्ह्यातील कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या आता 44 झाली आहे. आज नव्या 7 कोरोना +ve रुग्णांची भर पडून आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 146 झाली आहे. त्यातील 6 जण विरार वसई महानगर क्षेत्रातील असून 1 बोईसर येथील आहे.

आतापर्यंत निष्पन्न झालेल्या 146 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे:

  • विरार वसई महानगर क्षेत्र – 125 (त्यातील 8 मृत्यू)
  • वसई ग्रामीण क्षेत्र – 1 (1 मृत्यू)
  • पालघर तालुका – 12 (त्यातील 1 मृत्यू)
  • डहाणू तालुका – 8

आतापर्यंत 2693 लोकांच्या घशाचे नमुने तपासले. त्यातील 2434 तपासणी अहवाल प्राप्त झाले. 259 अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.

  • 146 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह (6 %)
  • 2388 अहवाल कोरोना निगेटिव्ह (94 %)
  • 2898 जण होम क्वारन्टाईन आहेत.
  • 425 जणांना इन्स्टीट्यूशनल क्वारन्टाईन केलेले आहे.
  • 92 रुग्ण लक्षणे आढळल्यामुळे रुग्णालयात दाखल.
  • 41 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला.
  • 2693 जणांचे घशाचे नमुने घेतलेले आहेत.
  • 2388 नमुने निगेटिव्ह.
  • 259 तपासणी अहवाल प्राप्त होणे बाकी बाकी आहे.
  • 146 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह. व त्यातील 10 पॉझिटीव्ह रुग्णांचा मृत्यू.

सध्या 92 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालय – 6
बोळींज हॉस्पिटल – 14
रिद्धीविनायक हॉस्पिटल (नालासोपारा) 14
सेव्हन हिल हॉस्पिटल – 6
डहाणू उप जिल्हा रुग्णालय – 1 
टिमा (बोईसर) – 14
अग्रवाल हॉस्पिटल (वालिव) – 13
कौल सिटी आयसोलेशन – 9
रिलायन्स (मुंबई) – 2
भक्ती वेदांत (मीरा रोड) – 1
ब्रीच कॅन्डी (मुंबई) – 1
नायर हॉस्पिटल (मुंबई) – 1
नवनीत हॉस्पिटल (दहिसर) – 1
फोर्टीस हॉस्पिटल (मुंबई) – 1
बॉम्बे हॉस्पिटल – 1
लिलावती हॉस्पिटल – 1
भाभा हॉस्पिटल – 1
केईएम  – 1
सायन हॉस्पिटल – 1
ग्रामीण रुग्णालय पालघर – 1
ट्रॉमा हॉस्पिटल – 1

याव्यतिरिक्त ग्रामीण रुग्णालय (पालघर) येथे 9 (1 वाढला), डहाणू उप जिल्हा रुग्णालय येथे 5 (2 वाढले) व बोळींज येथे 1 रुग्ण दाखल असून ह्या रुग्णांना कोरोना बाधेची लक्षणे आढळली आहेत.

पालघर जिल्ह्यात 41 +Ve बरे झाले व 7 नवे +Ve मिळाले


पालघर जिल्ह्यातील कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या आता 41 झाली आहे. डहाणू तालुक्यातील पहिल्या कोरोना बाधीत 3 वर्षीय मुलीच्या सलग 3 चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर आज तिला घरी सोडण्यात आले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी सौरभ कटीयार, तहसीलदार राहुल सारंग, आणि उप जिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. हिंगणे यांच्या उपस्थितीत मुलीला पुष्पगुच्छ देत व टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात आला. आज रोजी पालघर जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आता 138 असून त्यातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे व 41 जण पूर्णत: बरे झाले आहेत.

आतापर्यंत निष्पन्न झालेल्या 138 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे:

  • विरार वसई महानगर क्षेत्र – 118 (त्यातील 8 मृत्यू)
  • वसई ग्रामीण क्षेत्र – 1 (1 मृत्यू)
  • पालघर तालुका – 11 (त्यातील 1 मृत्यू)
  • डहाणू तालुका – 8

आतापर्यंत 2659 लोकांच्या घशाचे नमुने तपासले. त्यातील 2051 तपासणी अहवाल प्राप्त झाले. 508 अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.

  • 138 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह (7 %)
  • 2013 अहवाल कोरोना निगेटिव्ह (93 %)
  • 2828 जण होम क्वारन्टाईन आहेत.
  • 402 जणांना इन्स्टीट्यूशनल क्वारन्टाईन केलेले आहे.
  • 87 रुग्ण लक्षणे आढळल्यामुळे रुग्णालयात दाखल.
  • 41 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला.
  • 2659 जणांचे घशाचे नमुने घेतलेले आहेत.
  • 2013 नमुने निगेटिव्ह.
  • 508 तपासणी अहवाल प्राप्त होणे बाकी बाकी आहे.
  • 138 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह. व त्यातील 10 पॉझिटीव्ह रुग्णांचा मृत्यू.

सध्या 87 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालय – 6
बोळींज हॉस्पिटल – 15
रिद्धीविनायक हॉस्पिटल (नालासोपारा) 15
सेव्हन हिल हॉस्पिटल – 7
डहाणू उप जिल्हा रुग्णालय – 1 
टिमा (बोईसर) – 14
अग्रवाल हॉस्पिटल (वालिव) – 9
कौल सिटी आयसोलेशन – 8
रिलायन्स (मुंबई) – 2
भक्ती वेदांत (मीरा रोड) – 1
ब्रीच कॅन्डी (मुंबई) – 1
नायर हॉस्पिटल (मुंबई) – 1
नवनीत हॉस्पिटल (दहिसर) – 1
फोर्टीस हॉस्पिटल (मुंबई) – 1
बॉम्बे हॉस्पिटल – 1
लिलावती हॉस्पिटल – 1
भाभा हॉस्पिटल – 1
केईएम  – 1
सायन हॉस्पिटल – 1

याव्यतिरिक्त ग्रामीण रुग्णालय (पालघर) येथे 8, डहाणू उप जिल्हा रुग्णालय येथे 3 व बोळींज येथे 1 रुग्ण दाखल असून ह्या रुग्णांना कोरोना बाधेची लक्षणे आढळली आहेत.

Friday, April 24, 2020

पालघर जिल्ह्यात फिवर क्लिनिकची सुरवात सर्दी, खोकला, तापग्रस्त रुग्णानी या सुविधेचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे नागरिकांना आवाहन

पालघर दि 24: देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे त्याच बरोबर आपल्या जिल्ह्यात देखील कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्हा प्रशासन हा संसंर्ग रोखन्यासाठी विविध उपाययोजनेची अंमलबजावणी करत आहे. व्यक्ती कोरोना बाधित झाल्यावर जी सर्व सामान्य लक्षणें दिसून येतात जसे. ताप खोकला, सर्दी, अशा लक्षनाचे निदान करून त्यावर उपचार करणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील विविध भागात फिवर क्लिनिक स्थापन करण्यात आले असून या माध्यमातून जिल्ह्यातील विविध भागातील रुग्णावर उपचार करण्यात येत आहेत असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. 
सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे ज्या रुग्णामध्ये तीव्र प्रमाणात जाणवत असतील अशा रुग्णाचे घशातील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. या उपाययोजनेच्या माध्यमातून कोव्हीड -19 चा रुग्ण आढळून आल्यास त्या रुग्णावर योग्य उपचार करणे शक्य होणार आहे. या मुळे इतर सामान्य आरोग्य असणाऱ्या नागरिकांपर्यंत पसरनारा कोरोना विषाणूचा संसंर्ग आपण रोखू शकणार आहोत असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी व्यक्त केला
जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेले फिवर क्लिनिक पुढील प्रमाणे आहेत.
मुलांचे वसतीगृह जव्हार - डॉ.संजय कवळे -9921399242. 
मुलींचे वसतीगृह जव्हार - डॉ. संजय कवळे -9921399242. 
भारती विद्यापीठ - डॉ.संजय कवळे -9921399242. उधवा आश्रमशाळा, तलासरी – डॉ. आलोक विश्वकर्मा - 9029134385 . 
संतोषी आश्रमशाळा, डहाणू - डॉ. रूपटक - 9226180059 - 
साखरे आश्रमशाळा, विक्रमगड – डॉ. विजय काळभांडे – 9020494981. 
साजन रिसॉर्ट, विक्रमगड – डॉ. विजय काळभांडे - 9020494981 .
आय.टी.आय, मोखाडा – डॉ. दत्तात्रय शिंदे – 8806111778. 
आयडीयल वसतिगृह, वाडा – डॉ. प्रदीप जाधव - 7045272891 .
साईबाबा हौसिंग कॉलनी, पाणेरी माहीम रोड, पालघर- डॉ. मंगेश सांखे -9226108151.
तहसीलदार कार्यालय, मोखाडा – डॉ. महेश पाटील - 9922402114 .
नंडोरे आश्रमशाळा, पालघर – डॉ. दिनकर गावित - 9272688375 .
रेवेरा वसतिगृह, विक्रमगड – डॉ. रामदास मराड – 9260633361. 
जीवन विकास विद्यालय, पालघर – डॉ. दीपक वाणी - 98236611164 .
तवा आश्रमशाळा, तवा – डॉ. बालाजी हगणे - 9881269912 .
मुकबधीर विद्यालय, जव्हार- डॉ. रामदास मराड – 9260633361..
पाली आश्रमशाळा, वाडा – डॉ. प्रदीप जाधव - 7045272891 .
आय. टी. आय विक्रमगड - डॉ. काळभांडे - 8369451804 .
वेदांत संस्था वैद्यकीय महाविद्यालय द्वितीय – डॉ. अमोल – 8855869502.
दयानंद हॉस्पिटल, तलासरी - वरिष्ठ मोनिका मस्करनास - 02521 -220112 .
आयडियल रुग्णालय, वाडा - डॉ. प्रदीप जाधव - 7045272891 .
ग्रामीण रुग्णालय, पालघर - डॉ. डी.डी. गावित - 9272688375 .
ट्रॉमा केअर सेंटर, डहाणू - डॉ. बालाजी हेगणे – 9881269912. 
नागरिकांना ताप, खोकला, सर्दी अशा प्रकारची लक्षणें आढळून आली असेल तर वरील नमूद केलेल्या तापाच्या दवाखान्याच्या पत्त्याच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी त्यांच्या संपर्क क्रमांकवर संपर्क साधावा असे आवाहनहि जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.

Wednesday, April 22, 2020

वसई व पालघर तालुक्यांवर निर्बंध, जिल्ह्यातील उद्योगांना बंदीतून वगळले!


शासनाने पालघर जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले वसई व पालघर तालुके वगळून उर्वरीत डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार व मोखाडा येथील उद्योग औद्योगिक आस्थापनांना अटी व शर्तींसह मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन बंदीतून वगळले आहे. आज पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून http:/permission.midcindia.org या संकेतस्थळावर आवश्यक ती माहिती भरुन कर्मचारी/कामगार यांची वाहतूक करावयाची असल्यास ऑटो जनरेट पास उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी उद्योजकांना तहसील कार्यालयांशी email द्वारे अर्ज करण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे.

डहाणू तालुक्यासाठी नियंत्रण कक्षाचे Email व फोन नंबर पुढीलप्रमाणे आहेत. त्याद्वारे मार्गदर्शन उपलब्ध होऊ शकणार आहे.

tahdahanu@gmail.com / 9867726066
bdodahanu@gmail.com /7066672418
taodhn@rediffmail.com /9890576457
dmc.dahanu@gmail.com /9405001271
thodahanu@yahoo.in /9049286379
bdodahanu@gmail.com 
hitpin2@gmail.com /8788223249
pwddahanu@gmail.com /9422955380