Monday, May 4, 2020

नोकरभरती नाही, सगळी कामं स्थगित; कोरोनामुळे सरकारचे कठोर आर्थिक निर्बंध


नोकरभरती नाही, सगळी कामं स्थगित; कोरोनामुळे सरकारचे कठोर आर्थिक निर्बंध

    फक्त आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत पुर्नवसन, अन्न पुरवठा या खात्यांना प्राधान्यानं निधी जाणार असल्याचं सरकारने म्हटलं आहे.

    मुंबई 04 मे: कोरोनामुळे करण्यात आलेलं लॉकडाऊन आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेचा गाडाच बिघडल्याने राज्यरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. कोरोनाचं संकट दीर्घकाळ चालणारं असल्याने भविष्यातली तरतूद लक्षात घेऊन अर्थमंत्रालयाने सर्व विभागांवर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. यात फक्त आरोग्य, औषधी आणि अन्न पुरवढा विभागाला सुट देण्यात आली आहे.

    या निर्बंधांमध्ये सर्व विभागाला कळविण्यात आलं की त्यांनी कुठलीही नवी नोकरभरती करू नये. सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्या प्रकल्पांची गरज नाही ते प्रकल्प रद्द करण्यास आणि जे पुढे ढकलता येणं शक्य आहे असे प्रकल्प पुढे ढकलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची आर्थिक स्थिती नीट ठेवण्यासाठी ही कडक पावलं उचलण्यात आली आहेत. प्रत्येक विभागाला फक्त 33 टक्के इतकीच रक्कम दिली जाणार आहे. आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत पुर्नवसन, अन्न पुरवठा या खात्यांना प्राधान्यानं निधी जाणार

    सध्याची सर्व कामं स्थगित करण्याचे आदेश, नवीन कामांचं प्रस्तावही सादर करता येणार नाही. कुठल्याही प्रकारची नोकरभरती न करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

    सर्व कार्यक्रम, त्यावरील खर्च रद्द. आरोग्याशी सोडून कुठल्याही खात्याला बांधकाम न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावर्षी कुठल्याही कर्मचाऱ्याची तुर्तास बदली होणार नाही असेही आदेशात म्हटलं आहे.


    दरम्यान, लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. अर्थचक्रही सुरु राहिले पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोन नुसार शिथिलता आणली पण याचा अर्थ लॉकडाऊनमधून मोकळीक मिळाली असे नाही. विभागीय आयुक्त ,जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त , पोलीस यांनी  कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्स मध्ये कसे येतील ते पाहावे.


    जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप प्रसंगी योग्य तो निर्णय घ्यावा पण अंमलबजावणीत कुचराई करू नये असे स्पष्ट निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिले. आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील यात कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.

    पालघर जिल्ह्यात 48 तासांत 3 +Ve वाढले व 12 बरे झाले


    पालघर, दि. 4 मे: पालघर जिल्ह्यातील कोरोना +ve रुग्णांची एकूण संख्या 48 तासांत 3 ने वाढून 176 वर पोहोचली आहे. त्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 12 ने वाढली असून कोरोना मुक्तीकडे वाटचाल करण्यात पालघर जिल्हा यशस्वी होताना दिसत आहे. नवे 3 +Ve हे वसई महानगर क्षेत्रातील आहेत.


    आतापर्यंत निष्पन्न झालेल्या 179 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे:–

    विरार वसई महानगर क्षेत्र – 152 (त्यातील 8 मृत्यू)
    वसई ग्रामीण क्षेत्र – 2 (1 मृत्यू)
    पालघर तालुका – 16 (त्यातील 1 मृत्यू)
    डहाणू तालुका – 9

    आतापर्यंत 3302 जणांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, त्यातील 179 +Ve व 2779 +Ve निघाले आहेत. 344 अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.
    179 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह (6 %)
    2779 अहवाल कोरोना निगेटिव्ह (94 %)

    • 1477 जण होम क्वारन्टाईन आहेत.
     • 212 जणांना इन्स्टीट्यूशनल क्वारन्टाईन केलेले आहे.
     • 84 रुग्ण लक्षणे आढळल्यामुळे रुग्णालयात दाखल.
     • 84 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला.
     • 3302 जणांचे घशाचे नमुने घेतलेले आहेत.
     • 2779 नमुने निगेटिव्ह.
     • 344 तपासणी अहवाल प्राप्त होणे बाकी बाकी आहे.
     • 179 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह. व त्यातील 84 रुग्ण बरे झाले आणि 10 पॉझिटीव्ह रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

    सध्या 84 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
    ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालय – 3
    बोळींज हॉस्पिटल – 9
    रिद्धीविनायक हॉस्पिटल (नालासोपारा) – 24
    सेव्हन हिल हॉस्पिटल – 4
    टिमा (बोईसर) – 9
    अग्रवाल हॉस्पिटल (वालिव) – 10
    कौल सिटी आयसोलेशन – 1
    रिलायन्स (मुंबई) – 2
    भक्ती वेदांत (मीरा रोड) – 1
    नायर हॉस्पिटल (मुंबई) – 2
    नवनीत हॉस्पिटल (दहिसर) – 1
    फोर्टीस हॉस्पिटल (मुंबई) – 1
    भाभा हॉस्पिटल – 1
    केईएम – 1
    सायन हॉस्पिटल – 5
    बीएमसी हॉस्पिटल गोरेगांव – 7
    हॉरीझॉन (ठाणे) – 1
    रहेजा हॉस्पिटल – 1
    पालघर ग्रामीण रुग्णालय – 1

    पेट्रोल व डिझेल विक्रीवरील निर्बंध हटले


    दि. 4 मे: पालघर जिल्हाधिकारी यांनी पेट्रोल व डिझेल विक्रीवरील निर्बंध आजपासून उठवले आहेत. दिनांक 8 एप्रिल रोजीच्या आदेशान्वये अत्यावश्यक सेवांच्या पुरवठा करणाऱ्यांच्या वाहनांव्यतिरिक्त सर्वसामान्य लोकांना पेट्रोल व डिझेल विक्री करण्यास मनाई करण्यात आली होती. हे मनाई आदेश आजपासून मागे घेण्यात आलेले असून आता सर्वसामान्यांसाठी पेट्रोल व डिझेलची विक्री खूली करण्यात आली आहे.

    दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.’तर्फे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक कोटींची मदत


    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धनादेश सुपूर्द

    मुंबई, दि. 4 : ‘कोरोना’ विरुद्धच्या लढाईसाठी मदत म्हणून ‘दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.’ तर्फे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड19’साठी एक कोटींच्या मदतीचा धनादेश आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बँकेचे अध्यक्ष राजेंद्र गोपाळ पाटील यांनी सुपूर्द केला.

    Maha Info Corona Website

    महाराष्ट्र कोरोनमुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने उपाययोजना सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्यशासनाच्यावतीने उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत या लढ्यासाठी मदत म्हणून  ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड19’ साठी 1 कोटी रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आज बँकेचे अध्यक्ष राजेंद्र गोपाळ पाटील यांनी सुपूर्द केला. यावेळी आमदार राजेश पाटील, बँकेचे उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र दोंदे उपस्थित होते.

     ‘दि.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.’चे संचालक, अधिकारी-कर्मचारी, सभासद यांनी  सामाजिक बांधिलकी राखत केलेल्या या मदतीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानले आहेत. 

    Saturday, May 2, 2020

    पालघर जिल्ह्यातून इतर राज्यात व जिल्ह्यात जाण्याकरिता आणि येण्याकरिता ऑनलाइन अर्ज

    पालघर जिल्ह्यातून इतर राज्यात/जिल्ह्यात जाण्याकरिता किंवा इतर राज्यातून/जिल्ह्यातून पर्यटक / विद्यार्थी / यात्रेकरू / कामगार / इतर यांना पालघर जिल्ह्यात परत येण्याकरिता माहिती भरणेबाबत (For filling information for tourists / students / pilgrims / workers / others from other states / districts to travel from palghar district to other states / districts or return to Palghar district)
    माहिती भरण्याकरिता इथे क्लिक करा.
    http://c19trformpalghar.webstag.net/Online Application
    फॉर्म भरताना अधिक माहितीसाठी संपर्क.
    ०२५२५ २५२५२० / ०२५२५ २९७४७४