Tuesday, September 15, 2020
डहाणू व तलासरी: आज स. 11.39 वाजता व काल दु. 4.16 वाजता भूकंपाचे धक्के
Wednesday, September 9, 2020
तलासरीत वीज पडून दोघांचा मृत्यू!
तलासरी, दि. 9 : पालघर जिल्ह्यातील डहाणू व वाडा तालुक्यात वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज, बुधवारी संध्याकाळी तलासरी येथे वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी तलासरी तालुक्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु असतानाच कुर्झे धरण परिसरात 5 वाजेच्या सुमारास अचानक वीज कोसळली. यावेळी तेथे उपस्थित असणार्या सचिन कुवरा (वय 27) व अतुल बाबु गोवारी (वय 18, दोघे राहणार बेंडगाव, ता. डहाणू) यांचा मृत्यू झाल्याचे पालघर जिल्हा माहिती कार्यालयातर्फे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, 6 सप्टेंबर रोजी डहाणू तालुक्यातील तवा येथे वीज कोसळून नितेश हाळ्या तुंबडा या 20 वर्षी तरुणाचा तर वाडा तालुक्यात शांताराम दिवा या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Saturday, September 5, 2020
डहाणू परिसरात भूकंपाचे तीन मध्यम धक्के
डहाणू, पालघर व तलासरी तालुक्यात अनेक भूकंपाचा धक्का
डहाणू शहराच्या पूर्वेच्या भगत मध्यरात्रीच्या सुमरास भूकंपाचे दोन मध्यम झटके बसल्याने डहाणू, पालघर व तलासरी तालुक्यात अनेक भागाला कंप जाणवला.

Friday, September 4, 2020
सातबारातील बदलांमुळे सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
मुंबई, दि.4 : जवळपास आठ दशकानंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येणार असून आता सातबारामध्ये साधारण 12 प्रकारचे बदल करण्यात येणार असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. प्रत्येक गावासाठी युनिक कोड, प्रत्येक सात बारावर वॉटर मार्कसह शासनाचा लोगो आणि क्यूआर कोड हे सातबाराचे वैशिष्ट्य ठरणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
श्री.थोरात म्हणाले, राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत महाराष्ट्रातील ग्राम पातळीवरील महसुली लेखांकन पद्धतीत बदल करण्यात आला आहे. ब्रिटीश काळात एम.जी. हार्टनेल अँडरसन यांनी तयार केलेल्या मॅन्युअलमध्ये 1941 मध्ये एम.जे.देसाई यांनी सुधारणा केल्या होत्या. त्यानंतर जवळपास 8 दशकांनंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येत असून सातबारामध्ये साधारण 12 प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. यापुढे आता प्रत्येक गाव आणि खातेदाराला स्वतंत्र कोड क्रमांक देण्यासोबत गाव नमुना नंबर 7 अधिकार अभिलेख पत्रकात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
गाव नमुना नंबर 7 मध्ये गावाच्या नावासोबत एलजीडी (Local Government Directory) स्थानिक शासनाचा कोड दर्शविण्यात येणार आहेत. याशिवाय लागवडयोग्य आणि पोटखराबा क्षेत्राचे एकूण क्षेत्र यापुढे दर्शविले जाणार आहे. सध्या अनेक उताऱ्यांमध्ये त्यांचे क्षेत्र जुळत नाही मात्र आता अशी अडचण येणार नाही. हेक्टर, आरसोबत अकृषक उताऱ्यावर चौरसमीटर नोंदले जाणार आहे. इतर हक्काच्या रकान्यात खातेदारांचे क्रमांक युनिक क्रमांकासह नोंदले जातील. सातबारा उताऱ्यातील नव्या बदलामुळे राज्यातील जमीनविषयक कामकाजात पारदर्शकता येऊन जमीन महसूलविषयक वाद कमी होण्यास मदत होईल असा विश्वास श्री.थोरात यांनी व्यक्त केला.
