Monday, November 9, 2020

जमीन मोजणे झाले सोपे या पद्धतीने फक्त काही मिनिटांत मोजा आपली जमीन


बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा इतर व्यावसायिक लोकांना जमिनमोजणी करताना खूप त्रासाला सामोरे जावे लागते. कारण आपल्याकडे वारसाने किंवा परंपरेने आलेल्या जमिनी ह्या कशाही असतात.

म्हणजे त्या आडव्या, उभ्या, तिरक्या कशाही पसरलेल्या असतात. या जमिनीवर काही काम करताना किंवा कसताना आपली आणि शेजाऱ्याची भांडणे होतात. कारण त्यालाही माहीत नसते की नक्की त्याची जमीन केवढी आहे. पण आता जमीन मोजणे खूप सोपे झाले आहे.

तंत्रज्ञानाच्या मदतीने एक सोपा पर्याय समोर आला आहे. आता जमीन मोजण्यासाठी ना फुटपट्टीची गरज आहे ना जमीन मोजणाऱ्यांची. कारण आता आता distance and area measurement नावाचे एक ऍप्लिकेशन जमिनीची मोजणी करणार आहे.

शेती आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी हे ऍप्लिकेशन प्रचंड फायदेशीर ठरणार आहे. हे ऍप इन्स्टॉल करा आणि जीपीएस ऑन करा आपोआप जमीन मोजण्याचे काम ते अँप करेल.हे अँप उघडल्यानंतर त्यामध्ये अंतर हे फूट, यार्ड, मीटर, एकर असे काही पर्याय निवडावे लागतात.

शेतीची मोजणी करायची असेल तर एकर हा पर्याय निवडा. त्यानंतर खाली तुम्हाला स्टार्ट बटन दिसले त्याच्यावर क्लिक करा. मग स्वतःच्या जमिनीला एक फेरी मारा. तुमची जेवढी जमीन आहे तेवढ्याच जमिनीला तुम्हाला फेरी मारायची आहे.

फेरी पूर्ण झाल्यानंतर जमिनीचे माप तुम्हाला कळेल. या मोबाईल अँपद्वारे जमीन मोजण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही.


Sunday, November 8, 2020

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्षपदी कमला हॅरीस यांचा निवड


वॉशिंग्टन - अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी निर्णायक आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाल होते. आता, या निवडणुकीत जो बायडन यांनी विजय मिळवला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ते लवकरच पदभार स्विकारणार आहेत. सीएनएनने जो बायडन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडीचे वृत्त दिले आहे.


जो बायडन यांच्या विजयाची खात्री होताच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. अध्यक्षीय निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर पडल्याचे चित्र होते.


मात्र, आता या निवडणुकीचा निकाल लागला आहे. जो बायडन यांनी 270 चा मॅजिक फिगर पार केला आहे. त्यामुळे, या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्याचे दिसून येते.


दरम्यान, अमेरिकेतील निवडणुकांत मोठ्या प्रमाणात झालेल्या टपाली मतदानाची मोजणी सुरू असून ती पूर्ण झाल्याखेरीज अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल लागला, असे समजले जाऊ नये, असे ट्रम्प यांचे म्हणणे होते. मात्र, बायडेन यांनी घेतलेल्या आघाडीमुळे तेच अध्यक्ष होतील, अशी चिन्हे दिसून येते होती. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित अध्यक्षांना जी सुरक्षाव्यवस्था पुरवली जाते, तशी सुरक्षा बायडेन यांना देण्यासाठी सिक्रेट सर्व्हिसच्या अतिरिक्त तुकड्या डेलावेअरला रवानाही झाल्या आहेत. आता, बायडन यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे, उपराष्ट्राध्यक्षपदी कमला हॅरीस यांची वर्णी लागणार आहे.

Saturday, October 31, 2020

व्हाट्सअप स्टेटस ठेऊन 500 रुपये कमवण्याच्या नादात असाल तर हे वाचाच

मागील काही दिवसांपासून व्हॉटस्अॅप स्टेट्सवर एक लिंक मोठ्या प्रमाणावर अपडेट होत आहे. त्यात व्हॉटस्अॅपवर स्टेट्स ठेवून पैसे कमविण्याचे आमिष दाखविण्यात आले आहे. त्यासाठी व्यक्तिगत काही माहिती या लिंकव्दारे भरून घेतली जात आहे. विशेष म्हणजे अनेक जणांनी या लिंकवर माहिती भरून व्हॉटस्अॅप स्टेट्स ठेवल्याचे प्रकार हि समोर आले आहेत. मात्र, या बाबत सायबर सेल मात्र अनभिज्ञ आहे असल्याचे हि दिसून आले आहे.


बेरोजगारी आणि शॉटकटने पैसे कमविण्याच्या नादात नागरिकांना इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने आमिष दाखवले जाते त्यांना अनेक जण त्याला बळी पडतात त्यातच अनेकांची लूट होते. 


हल्ली प्रत्येक जण आपल्या मोबाइलवरून ऑनलाइन पेमेंट ट्रांसफर करण्यासाठी बॅंक लिंक असलेल्या मोबाइल नंबरशी विविध अॅपची जोडणी करतात. तसेच तोच नंबर नियमित वापरात असल्याने त्यावर व्हॉटस्अॅप ही सुरू करतात. यातून आपली व्हाट्सअप सह आपली वैयक्तिक माहिती लीक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


काय आहे या लिंक मध्ये- 


"मराठी ऑनलाईन वर्क" या नावाने हि बनावट वेब साईट आहे. ही लिंक ओपन केल्यानंतर व्हॉटस्अॅप स्टेटसमधून पैसे कमवू शकता अशी जाहीरात देत स्वतःची व्यक्तिगत माहिती भरण्यासाठी सांगितले जाते. या लिंकमध्ये महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांची नावे दिलेली आहेत. स्वतःचा मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी भरल्यानंतर जिल्हा सिलेक्ट करण्यास सांगितले जाते. त्यानंतर व्हॉटस्अॅप स्टेटस शेअर करण्यासाठी एक आयकॉन येतो. शेअर केलेले स्टेटस जर तीस पेक्षा अधिक जणांनी पाहिले तर ५०० रुपयांपर्यंत कमाई करता येईल असे त्या लिंकवर नमूद केले आहे. या प्रलोभनाला आतापर्यंत हजारो जण बळी पडले आहेत. त्यामुळे हा सायबर क्राईमाची नवी पद्धती तर नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, या संदर्भात सायबर सेलच अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा लिंकवर व्यक्तिगत माहिती भरताना खात्री करा, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता अधिक आहे.


या बाबतील सत्य जाणून घेण्यासाठी "महाराष्ट्र जनभूमी"ने कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, अशा कोणत्याही गोष्टीवर कुणी विश्वास ठेऊ नये या भूलथापा असतात, अशा पद्धतीने कुणालाही पैसे मिळणार नाही. यातून तुमची बदनामी तसेच तुम्हाला ब्लॅकमिल केले जाऊ शकते. या माहिती वरून तुमच्या नावाने कर्ज काढले जाऊ शकते किंवा तुमचे बँक खाते हॅक केले जाऊ शकते यासाठी त्या माहितीचा वापर केला जाऊ शकतो, त्यामुळे कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती कुठेही देऊ नये असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

Saturday, October 24, 2020

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना व डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना




|अनुसूचित जमाती   व अनुसूचित जाति प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना|

(1) नवीन विहीर खोदकाम
(2) जुनी विहीर दुरुस्ती 
(3) ठिबक सिंचन संच 
(4) तुषार सिंचन संच
(5) पंप संच 
(6) विज जोडणी आकार
(7) पाईप लाईन

आवश्यक कागदपत्रे:-

1)७/१२
2)८ अ,
3)बॅक पासबुक,
4)आधारकार्ड,
5)फोटो
6)जात प्रमाणपत्र
7) रू. 1.50 लाख पर्यंत उत्पन्न प्रमाणपत्र-तहसिलदार यांचे स्वाक्षरीसह
8) ग्रामपंचायत चा ठराव
9) सातबारा वर ऐका पेक्षा जास्त नाव असल्यास संमती पत्र 100 स्टॅम्प पेपरवर
10) सोबत मोबाईल- OTP साठी

लाभार्थी अर्ज खालील वेबसाईटवर online करावेत.

https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login

संपर्क:-
  
कृषि अधिकारी
पंचायत समिती

Tuesday, October 20, 2020

सणासुदीला गाडी घेण्याचे स्वप्न करा पुर्ण; केवळ ७९९ रुपयांच्या EMI मध्ये मिळतेय टाटाची गाडी


tata motors offers
टाटा मोटर्सची खास ऑफर
दसरा-दिवाळीच्या मुहुर्तावर जर तुम्हाला स्वतःची गाडी घ्यायची असेल तर टाटा मोटर्सने तुमच्यासाठी अफलातून ऑफर आणली आहे. तसं सणासुदीला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आणत असतात. टाटा मोटर्सनेही विक्री वाढविण्यासाठी HDFC बँकेसोबत एक करार करुन ग्राहकांना आर्थिक साहाय्य करण्याची योजना आणली आहे. यामुळे केवळ ७९९ रुपयांचा हप्ता देऊन तुम्हाला गाडी विकत घेता येणार आहे. Gradual Step Up Scheme आणि TML Flexi Drive Scheme या दोन योजनांच्या माध्यमातून विक्री वाढविण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. नोव्हेंबर २०२० पर्यंत या योजना उपलब्ध आहेत.

टाटा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार BS6 रेंज, SUV आणि इलेक्ट्रिक गाड्यांवर या योजना लागू आहेत. Gradual Step Up Scheme या योजनेतंर्गत ७९९ रुपयांचा मासिक हप्ता असणार आहे. अर्थात ग्राहक कोणती गाडी निवडतात, त्यानुसार देखील ईएमआयची रक्कम कमी-जास्त होऊ शकते. ग्राहकांच्या क्षमतेनुसार दोन वर्षांत हळुहळु ईएमआय वाढविला जाईल.

तर TML Flexi Drive Scheme या योजनेतंर्गत ग्राहकांना वर्षातील तीन महिने निवडण्याचा पर्याय असेल, ज्यामध्ये केवळ ७८९ रुपयांचा मासिक ईएमआय भरता येणार आहे. पहिल्या योजनेसारखेच गाडीच्या प्रकारावर याची रक्कम अवलंबून असेल. या दोन्ही योजनांसोबतच टाटा मोटर्सने प्रवासी वाहनांच्या एक्स शोरुमसाठी १०० टक्के फायनान्स उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.

स्वतःच्या गाडीचे स्वप्न पुर्ण करा

टाटा मोटर्सचे मार्केटिंग विभागाचे प्रमुख विवेक श्रीवास्तव यांनी सांगितले की, टाटाच्या या दोन योजना ग्राहकांना स्वतःची गाडी घेण्याचे स्वप्न करण्यासाठी आहेत. दोन्ही योजना ईएमआय भरण्यासाठी सुट देणाऱ्या आहेत. तर एचडीएफसी बँकेचे रिटेल प्रमुख अरविंद कपिल म्हणाले की, टाटासोबत आम्ही भागीदारी केल्यामुळे ग्राहकांना याचा चांगलाच फायदा मिळेल