Friday, November 19, 2021

राज्यात ग्रामपंचायत पोट निवडणूका जाहीर ! | Grampanchayat Election Maharashtra 2021

राज्यात ग्रामपंचायत पोट निवडणूका  जाहीर ! 

Grampanchayat Election Maharashtra 2021 

राज्यातील  विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींमधील एकूण ७ हजार १३० सदस्य पदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार असल्याची मोठी घोषणा महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.

या जांगाची २२ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

याचबरोबर राज्यातील ११३ नगरपंचायतींमधील सदस्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या देखील प्रसिद्ध करण्यात येतील ज्यावर २६ नोव्हेंबरपर्यंत हरकती-सूचना दाखल करता येतील,तर ३० नोव्हेंबरला प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध होतील,अशी माहिती देखील राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी दिली आहे.

राज्यातील ११३ नगरपंचायतींसाठी २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या

  1. ठाणे- मुरबाड व शहापूर, 
  2. पालघर- तलासरी, विक्रमगड, मोखाडा, 
  3. रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित), 
  4. रत्नागिरी- मंडणगड, दापोली, 
  5. सिंधुदुर्ग- कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ, देवगड- जामसंडे, 
  6. पुणे- देहू (नवनिर्मित), माळेगांव (ब्रुद्रुक) (नवनिर्मित), 
  7. सातारा- लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी, 
  8. सांगली- कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ, 
  9. सोलापूर- माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित), 
  10. नाशिक- निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, 
  11. धुळे- साक्री, 
  12. नंदुरबार- धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ, 
  13. अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी, 
  14. जळगाव- बोदवड, 
  15. औरंगाबाद- सोयगाव, 
  16. जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित), 
  17. परभणी- पालम, 
  18. बीड- केज, शिरूर- कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी, 
  19. लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ, 
  20. उस्मानाबाद- वाशी, लोहारा बु., 
  21. नांदेड- हिमायतनगर, नायगाव, अर्धापूर, माहूर, 
  22. हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ, 
  23. अमरावती- भातकुली, तिवसा, धारणी, नांदगाव-खंडेश्वर, 
  24. बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा, 
  25. यवतमाळ- महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी जामणी, 
  26. वाशीम- मानोरा, मालेगाव, 
  27. नागपूर- हिंगणा, कुही, भिवापूर, 
  28. वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर, 
  29. भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर, 
  30. गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, गोरेगाव, देवरी, 
  31. चंद्रपूर- सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही, 
  32. गडचिरोली- मुलचेरा, एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड. 
एकूण- 113.
आहे.

Tuesday, November 2, 2021

New voter registration campaign maharashtra १६ नोव्हेंबरला होणार विशेष ग्रामसभा !

मतदार नोंदणीसाठी महिलांनी पुढे यावे, विशेष ग्रामसभेचे नियोजन.

संपूर्ण राज्यात १ नोव्हेंबर पासून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून या मोहिमेत महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज असून जास्तीत जास्त महिला नवमतदारांची नोंदणी व्हावी, यासाठी निवडणूक विभाग आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांनी समन्वयाने काम करावे व शेवटच्या महिलांपर्यंत पोहोचून त्यांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी उद्युक्त करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अधिकाऱ्यांना केले.

दिनांक 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राज्यात होणाऱ्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाला जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याच्या उद्देशाने ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीस महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर, सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे स्वीप सल्लागार दिलीप शिंदे आदी उपस्थित होते.
यासाठी दिनांक 16 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. या ग्रामसभेत मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे.
ग्रामविकास विभाग शासन निर्णय 


जास्तीत जास्त महिलांची मतदार नोंदणी करण्याकरिता त्यांच्यापर्यंत संदेश घेऊन जाणे आवश्यक आहे. नवविवाहितेचे नाव तिच्या सासरकडील मतदार यादीत होण्यासाठी प्रयत्न करावे, यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करण्यात यावा. मतदार यादीत महिलांना नाव नोंदणी करावयाची आहे, ही माहिती जर एका महिलेपर्यंत गेली तरी ती सर्व कुटुंबापर्यंत जाते. नाव नोंदणीची प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली आहे. दिनांक 13 व 14 नोव्हेंबर आणि 26 व 27 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरे घेण्यात येणार आहेत.
राज्यातील नवमतदार, तृतीयपंथी तसेच दिव्यांगांचे नाव मतदार यादीत समाविष्ठ होण्यासाठी आवश्यक ती लागणारी सर्व मदत उमेदमधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.वसेकर यांनी यावेळी दिली.

Tuesday, September 28, 2021

गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अतिमुसळधार पावसाची शक्यता


 
नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ  यांचे आवाहन

पालघर दि. २८  : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सुचनेनुसार बंगालच्या समुद्रात वादळ (गुलाब चक्रीवादळ)  निर्माण झाल्याने दिनांक १ ऑक्टोबर २०२१ पर्यत  कोकण किनापट्टीलगतच्या जिल्हयातील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने  जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ  यांनी केले आहे.

याकाळात झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, पाणी साचणे, विजेचे खांब कोसळणे, पुरात वाहून जाणे, विज पडून मृत्यु, जनावरे वीज पडून, पाण्यात बुडन मयत होणे,  अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. तसेच संबंधित गावातील तलाठी यांना घडलेल्या घटनेचा वृतांत तात्काळ कळविणे, व तालूका नियंत्रण कक्षात फोन करणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात 8237978873 या क्रमांकावर संपर्क साधण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी केल्या.

तालुका नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक खालील प्रमाणे आहेत. 

Dahanu 9607744258
Vikamgad 8806898565
Jawhar 8552918405
Mokshada 8446335908
Wada 02526271431
Talasari 02521220036
Vasai 02502322007
Palghar 02525254930

Monday, September 27, 2021

प्राकृतिक वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा!

काळोख रात्र असावी, गगनात ढगाळ असताना काजवे इकडे तिकडे उडत असावे. काळोख कमी होताना व ढगाळ कमी होत असताना सूर्याची किरणे ढगांच्या बाजूला निघत होती. प्रकाशाची किरणे हिरवेगार रानांवर व झाडांवर पडत होता.  पाखऱयांचा चिवचिव असताना, प्रफुल्लित फुलपाखरं इकडे-तिकडे असताना आणि बागेत टवटवीत फुल्यांचा फुलले असताना माझ्या परिवारात वेगळेच आनंद झाला असावा. दि. २७ सप्टेंबर या दिवशी माझा जन्म झाला.  माझ्या आई-वडिलांना फार आनंद झाला असावा. माझ्या परिवारातील आजी-आजोबा  व इतर मंडळी फारच आनंद झालं असावे. पाहा ना आज! नैसर्गिक दुर्देवी आहे.  त्याचा जो आनंद होता, तो आज आनंद नाही आणि ते ही नाही दुर्भाग्यच? आईवडिलांची देणकी आहे की मी आहे आज. कैशालवाशी पूज्य आई-वडील यांच्या आर्शिवादाने आज माझा " जन्मदिवस" आहे. सर्व काही आज माझ्याकडे आहे आईवडिलांची देणं! जे काही घडलो आहे ते समाजामुळं. जे लिहलं गेलं वाढदिवसाच्या निमित्त ते काही एवढं मोठं नाही. प्राकृतिक वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा!