Monday, August 22, 2022
PM-KISAN Ekyc last date
Tuesday, August 16, 2022
ग्रामपंचायत- पंचायत समिती योजना- रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदान लाभासाठी अर्ज सुरू
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2022-23 अंतर्गत कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या फळबाग / फुलपिके लागवड, व्हर्मी कंपोष्ट, नाडेप कंपोष्ट व शेततळे या घटकांसाठी अनुदानाचा लाभ होण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
मागेल त्याला काम देणे व गावामध्ये आर्थिक समृध्दी आणणे हे मनरेगा योजनेचे उद्दिष्ट्य असून यासाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार जॉबकार्ड धारक असावा. अर्जदार अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, भटक्या जमाती, निरधिसुचित जमाती ( विमुक्त जमाती ), दारिद्रय रेषेखालील इतर कुटुंबे, स्त्री कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना, अनुसुचित जमातीचे व इतर पारंपारिक वनवासी या सर्वांना प्राधान्यक्रम दिल्यानंतर कृषि कर्ज माफी योजना, अल्प भूधारक व सीमांत भूधारक यांना प्राधान्य देण्यात यावे. अर्जदाराची जमिन (0.05 हेक्टर ते जास्तीत-जास्त 2 हेक्टर पर्यंत ) असणे आवश्यक.
आवश्यक कागदपत्र
7/12 व 8 अ, आधारकार्ड, बँक पासबुक व जॉब कार्ड ही कागदपत्रे आवश्यक असून अर्ज गावातील ग्रामपंचायतीमध्ये करावे.
मनरेगा अंतर्गत व्हर्मी कंपोष्ट, नाडेप कंपोष्ट, शेततळे व फळबाग/ फुलपिके ही कामे मंजुर आहेत.
अनुदान - व्हर्मी कंपोष्ट- रक्कम रुपये 11 हजार 944 प्रति युनिट, नाडेप कंपोष्ट - रक्कम रुपये 10 हजार 537 प्रति युनिट,
शेततळे -आकारमानानुसार रक्कम रुपये 60 हजार ते रक्कम रुपये 3 लाख पर्यंत
योजनेत अंतर्भुत फळपिके / वृक्ष - आंबा, काजू, चिकू, पेरु, डाळींब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, चिंच, सिताफळ, आवळा, नारळ, बोर, कवठ, जांभुळ, कोकम, फणस, अंजीर, साग, सुपारी, कडीपत्ता, कडूलींब, शेवगा, केळी, ड्रॅगनफ्रुट, करवंद, तुती, जड्रोफा, गिरीपुष्प, पानपिंपरी, द्राक्ष, चंदन, खाया, निम, चारोली, महोगनी, बाभुळ, अंजन, खैर, ताड, सुरु, रबर, महारुख, मँजियम, ऐन, शिसव, निलगिरी, गुलमोहर, महुआ, चिनार, शिरीष, बांबू व औषधी वनस्पती इत्यादी.
फुलपिके - गुलाब, मोगरा, निशीगंध व सोनचाफा
अनुदानातील अंतर्भुत बाबी -जमीन तयार करणे, खड्डे तयार करणे, कांड्या / कलमांची बीले व नांगी भरणे, खते देणे, आंतरमशागत, पीक संरक्षण व पाणी देणे इ.
अनुदान लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यावर जमा करण्यात येते. अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
Wednesday, August 10, 2022
Tuesday, August 9, 2022
जागतिक आदिवासी दिननिमित्त सर्व आदिवासी बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा
जागतिक आदिवासी दिननिमित्त सर्व आदिवासी बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा...
युट्युब चेनला वरील लोकप्रसिद्ध गाणे खालीलप्रमाणे:
१.जय जोहार जय आदिवासी
2. आला सह्याद्रीचा वाघ
१०.Hamu Aadivasi Bhaya new Song 9 August Aadivasi Divas
१४.Adivasi Nari |आदिवासी नारी | 9 August Aadiwasi Divas Song
१८. 9 August Adivasi Song |Jangal Na King Adivasioni Teem
१९.Jungle Na King | જંગલના કિંગ | Dj Timli | Adivasi New Song 2022 | 9 August |
२०.🏹आदिवासी पोरिया🧍||
Monday, August 8, 2022
मतदार नोंदणी संधर्भात निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय | voter registration 2022
मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी युवावर्गाला अधिक संधी
नाव नोंदणीकरता वर्षातून चार वेळा संधी उपलब्ध, एक जानेवारी या पात्रता तारखेसाठी प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही.
17+वयोगटातील तरुणांना आगाऊ नोंदणीची सुविधा
17 वर्ष पूर्ण झालेल्या युवकांना आता त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवण्यासाठी आगाऊ नोंदणीची सुविधा उपलब्ध असून त्यासाठी त्यांना 1 जानेवारी रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण असण्याच्या पात्रतेसाठी प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी, सहायक निवडणूक नोंदणी अधिकारी यांना यासंदर्भातील निर्देश दिले आहेत.
युवकांना, त्यांचे नाव नोंदणीचे अर्ज एक एप्रिल, एक जुलै आणि एक ऑक्टोबर या पात्रता तारखांच्या कालावधीत दाखल करता यावेत, त्यासाठी त्यांना एक जानेवारीची प्रतीक्षा करायला लागू नये यादृष्टीने तंत्रज्ञानावर आधारित आवश्यक उपाय योजावेत असे निर्देश देण्यात आले आहेत.
यापुढे दर तिमाहीत मतदारयाद्या अद्ययावत केल्या जातील. त्यामुळे पात्र युवक-युवतींची नाव नोंदणी त्या वर्षाच्या पुढील तिमाहीत केली जाऊ शकते ज्यामध्ये त्याने/तिने 18 वर्षे पात्रता पूर्ण केली आहे.नाव नोंदणी केल्यानंतर त्याला / तिला एक मतदार ओळखपत्र दिले जाईल.
सन 2023च्या मतदार यादीच्या वार्षिक पुनरिक्षणाच्या सध्याच्या फेरीसाठी, एक एप्रिल, एक जुलै आणि एक ऑक्टोबर 2023 पर्यंत 18 वर्षे पूर्ण करणारा कोणताही नागरिक मतदार यादीचे प्रारूप प्रकाशन प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून मतदार म्हणून नोंदणीसाठी आगाऊ अर्ज सादर करू शकतो.
भारतीय निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायदा 1950 च्या कलम 14(b) मधील कायदेशीर सुधारणांच्या अनुषंगाने आणि पर्यायाने मतदार नोंदणी नियम, 1960 मध्ये आवश्यक ते बदल करून विधानसभा किंवा संसदीय मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या तयारी/पुनरिक्षणासाठी आवश्यक बदल करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या धोरणानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये,आगामी वर्षाच्या एक जानेवारी या पात्रता तारखेच्या संदर्भात मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण किंवा पुनरीक्षण प्रत्येक वर्षाच्या उत्तरार्धात (साधारणपणे वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत) केले जात होते. जेणेकरून मतदार याद्यांचे अंतिम प्रकाशन येणाऱ्या वर्षाच्या जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात केले जात असे.
आयोगाने आता मतदार नोंदणी अर्ज अधिक सोपा आणि सुलभ केला आहे. हा नवीन सुधारित अर्ज 1 ऑगस्ट 2022 पासून लागू होईल, 1 ऑगस्ट 2022 पूर्वी प्राप्त झालेल्या जुन्या स्वरूपातील सर्व अर्ज (दावे आणि हरकती) प्रक्रिया करून त्यांचा निपटारा केला जाईल आणि अशा प्रकरणांमध्ये नव्याने अर्ज दाखल करण्याची आवश्यकता असणार नाही.
मतदार केंद्र सुसूत्रीकरण
वार्षिक आढावा सराव पद्धतीनुसार, दिलेल्या वेळापत्रकानुसार आणि मतदान केंद्रावरील मॅन्युअल, 2020 मध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे 1500 पेक्षाजा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रात प्रारूप मतदार याद्यांच्या प्रकाशनापूर्वी सुधारणा केली जाईल.
इलेक्ट्रॉनिक मतदार ओळखपत्र – आधार जोडणी
मतदार यादीतील माहिती आणि मतदाराचा आधार क्रमांक लिंक करण्यासाठी, सुधारित नोंदणी अर्जात मतदारांच्या आधार कार्डाचे तपशील नमूद करण्यासाठी माहिती विचारण्यात आली आहे. तसेच सध्याच्या मतदारांचा आधार क्रमांक कळावा या उद्देशाने 6बी हा एक नवीन अर्ज देखील सादर करण्यात आला आहे. मात्र आधार क्रमांक सादर करणे अशक्य झाल्यास किंवा तशी माहिती पुरवण्यास असमर्थ ठरलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार नाहीत किंवा आधार क्रमांकाअभावी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठीचा कोणताही अर्ज नाकारला जाणार नाही.
अचूक मतदार याद्यांसाठी क्षेत्र पडताळणी आणि अधिक काळजीपूर्वक तपासणी
अचूक आणि अद्ययावत मतदारयादी तयार करण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने बूथस्तरीय अधिकाऱ्यांकडून मतदार क्षेत्र पडताळणी करण्यावर भर दिला आहे.