Thursday, October 13, 2022

आर,गुंठा,एकर याबद्दल महत्वाची माहिती !


एक गुंठा म्हणजे किती स्क्वेअर फुट​


एक गुंठा 33 फूट x 33 फूट = 1089 स्क्वेअर फुटाचा असतो



'१ गुंठा' जमीन = १२१ चौरस वार = १०८९ चौरस फूट = १०१ चौरस मीटर

एक गुंठा म्हणजे 1089 स्क्वेअर फुट​

33 * 33 = 1089

''एक गुंठा'' 33 फूट x 33 फूट = 1089 स्क्वेअर फुटाचा असतो

Additional info

   १ एकर जमीन = ४८४० चौरस वार = ४३५६० चौरस फूट = ४०४७ चौरस मीटर

   १ चौ.मैल = ६४० एकर

   १ चौ.किमी = २४७ एकर



एक वार म्हणजे किती स्क्वेअर फुट


गुंठा हे ब्रिटीश मापन एकक आहे. ब्रिटीशांनी आपल्यावर राज्य केल्यामुळे त्यांची मापन पद्धती रूढ होती. स्वतंत्र भारतामधे 1955 पासून हळूहळू 1962 पर्यंत ही मापन पद्धती बदलून फ्रेंच म्हणजे मेट्रिक पद्धती आणली गेली. खरंतर त्या कायद्यानूसार भारतात फक्त ब्रिटीश एकतात मापे लिहीणे हा गुन्हा आहे. मेट्रिक मधे लिहीणे हे बंधनकारक आहे. परंतु कितीतरी वर्ष ब्रिटीश मापन पद्धती वापरली गेल्यामुळे अजूनही ती वापरली जाते, मात्र सोबत मेट्रिक पद्धतीचे माप लिहीणे बंधनकारक आहे.  'एक वार म्हणजे किती स्क्वेअर फुट'

 नमस्कार मित्रांनो मी संदेश भुरकुड आपण आज बघणार आहेत की एक वार म्हणजे किती स्क्वेअर फुट 

मित्रांनो सगळ्यात आधी आपण बघू 1 गुंठा म्हणजे किती स्क्वेअर फुट 

1 गुंठा = 33फुट 33फुट  = 1089 चवरस फुट 

१ गुंठा जमीन = १२१ चौरस वार = १०८९ चौरस फूट = १०१ चौरस मीटर

एक गुंठा म्हणजे 1089 स्क्वेअर फुट​

33 * 33 = 1089

एक गुंठा 33 फूट x 33 फूट = 1089 स्क्वेअर फुटाचा असतो

१ एकर जमीन = ४८४० चौरस वार = ४३५६० चौरस फूट = ४०४७ चौरस मीटर

१ चौ.मैल = ६४० एकर

१ चौ.किमी = २४७ एकर 


असो, 3 फुट म्हणजे 1 यार्ड. 1 चौ यार्ड म्हणजे 9 चौ फुट. 121 चौ यार्ड म्हणजे 1 गुंठा. म्हणजेच 33 फुट X 33 फुट = 1089 चौ फुट म्हणजे 1 गुंठा. '

'एक वार म्हणजे किती स्क्वेअर फुट''

1 गुंठा म्हणजे किती चौरस मीटर?
एक गुंठा म्हणजे 33 फूट बाय 33 फुट जागा म्हणजेच 1089 चौरस फूट. त्याला 10.76 ने भगिले असता उत्तर येते 101.20 चौरस मीटर. म्हणजेच एक गुंठा म्हणजे 101.20 चौरस मीटर.

एक एकर म्हणजे किती फुट × किती फुट?

एक एकर म्हणजे ४३५६० चौ. फुट. पुर्वीच्या काळी आपण जेव्हा इंग्रजांच्या अधिपत्याखाली होतो तेंव्हा आपण एफपीएस पद्धतीने ( फूट, पाऊंड, सेकंद ) मोजमापे करीत असू. जमीन मोजण्यासाठी साखळी वापरली जात असे . तिची लांबी असे ३३ फुट . १...

एक गुंठा म्हणजे किती स्क्वेअर फुट / 1 आर म्हणजे किती क्षेत्र / 1 एकर म्हणजे किती 


एक गुंठा 33 फूट x 33 फूट = 1089 स्क्वेअर फुटाचा असतो

Step-by-step explanation:

१ गुंठा जमीन = १२१ चौरस वार = १०८९ चौरस फूट = १०१ चौरस मीटर

एक गुंठा म्हणजे 1089 स्क्वेअर फुट​

33 * 33 = 1089

एक गुंठा 33 फूट x 33 फूट = 1089 स्क्वेअर फुटाचा असतो

Additional info

   १ एकर जमीन = ४८४० चौरस वार = ४३५६० चौरस फूट = ४०४७ चौरस मीटर

   १ चौ.मैल = ६४० एकर

   १ चौ.किमी = २४७ एकर


एक गुंठा म्हणजे किती स्क्वेअर फुट?


गुंठा : १ गुंठा जमीन = १२१ चौरस वार = १०८९ चौरस फूट = १०१ चौरस मीटर

एकर : १ एकर जमीन = ४८४० चौरस वार = ४३५६० चौरस फूट = ४०४७ चौरस मीटर

एर (ए.) = १०० चौरस मीटर (मी.

हेक्टर (हे.) = १०० एर = १०,००० चौरस मीटर = २.४७ एकर

चौरस मैल : १ चौ.मैल = ६४० एकर

चौरस किलोमीटर : १ चौ.किमी = २४७ एकर

एक एकर म्हणजे किती ?


एक एकर म्हणजे ४३५६० चौ. फुट. पुर्वीच्या काळी आपण जेव्हा इंग्रजांच्या अधिपत्याखाली होतो तेंव्हा आपण एफपीएस पद्धतीने ( फूट, पाऊंड, सेकंद ) मोजमापे करीत असू. जमीन मोजण्यासाठी साखळी वापरली जात असे . तिची लांबी असे ३३ फुट . १ साखळी × १ साखळी = १ गुंठा . १ एकर = ४० गुंठे

म्हणजेच १ एकर = ३३×३३×४०= ४३५६० चौ फुट .

क्ष × य = ४३५६० या त्रैराशिकात आपण किमंत टाकून एकरामध्ये क्षेत्रफळ काढू शकते . सद्ध्या मात्र आपण एमकेएस पद्धत स्विकारली आहे. ( मिटर, किलोग्रम , सेकंद ) ज्याला दशमान पद्धत संबोधले जाते . या मध्ये जमीन हेक्टर आर पद्धतीने मोजले जाते . १००मिटर × १००मिटर = १ हेक्टर .




आर म्हणजे किती जमीन



प्रश्न 1 :- आर म्हणजे किती जमीन

उत्तर:- आर हे मेट्रिक पद्धतीतील क्षेत्रफळ मोजण्याचे युनिट आहे, यामध्ये जेव्हा शंभर चौरस मीटर होतात तेव्हा एक आर तयार होतो. आता यामध्ये काय केलं जातं तर जमीनीच मोजमाप आहे ते मीटर मध्ये घेतले जातं आणि आणि थेट क्षेत्रफळाला शंभर ने भागल जात म्हणजे जर तुम्हाला तुमच्या जमिनीचा क्षेत्रफळ आर मध्ये पाहिजे असेल तर त्याला शंभर नि भागलं की तुम्हाला ते मिळेल.


प्रश्न 2 :- आर आणि गुंठा यामध्ये काय फरक आहे? 


उत्तर: आताच आपण पाहिला की आर म्हणजे शंभर चौरस मिटर. यालाच जर चौरस फुटामध्ये रूपांतरित केलं तर एक आर म्हणजे 1076.39 चौरस फूट इतका होतं. म्हणजे एक गुंठा बरोबर 1089 चौरस फूट. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरचे रूपांतर गुंठ्या मध्ये कसे करायचे

आरचे रूपांतर एकर मध्ये कसं करायचं?



यानंतर महत्त्वाचा प्रश्न येतो की आरचे रूपांतर एकर मध्ये कसं करायचं? आपण रूपांतर गुंठ्यामध्ये करताना जी पद्धत वापरली तीच तिथेही वापरायचे आहे आणि जे काही गुंठ्यात उत्तर आलेल आहे त्याला भागिले 40 करायचं आहे. अशाप्रकारे तुम्हाला आर चे रूपांतर एकर मध्ये मिळून जाईल, कारण का 1 एकर बरोबर 40 गुंठे असतात. यामध्ये काही महत्त्वाचे समीकरण आहे ते लक्षात ठेवायचे आहे.

चौरस मीटर = आर गुणिले 100 चौरस फूट = आर गुणिले 1076.39

गुंठा = आर गुणिले 1076.39/1089 एकर = आर गुणिले 1076.39/1089/40 या पद्धतीने आपण आरच रूपांतर चौरस मीटर, चौरस फूट, गुंठा आणि एकर मध्ये करू शकतो.

1 आर म्हणजे किती ? 1 आर म्हणजे 100 चौ मी

1 मी x 1 मी = 1 चौ मी

जेव्हा असे 100 चौ मी होतात त्यावेळी 1 आर तयार होतो. उदा- 10 मी x 10 मी ची जमीन यामध्ये जमिनीचे मोजमाप हे मीटरमध्ये घेतले जाते आणि त्याचे क्षेत्रफळ हे चौरस मीटर मध्ये काढून त्यास 100 ने भागले जाते.

आर मध्ये क्षेत्रफळ कसे काढायचे ?

जेवढे चौरस मीटर मधील क्षेत्रफळ असेल त्यास 100 ने भागायचे आर = चौरस मीटर / 100

यानंतर महत्वचा प्रश्न आहे आर चे गुंठ्या मध्ये कसे रुपांतर करायचे ?

1 आर म्हणजे 100 चौ मीटर जर आपण याचे चौरस फुटामध्ये रुपांतर केले तर आपल्याला 1076. 39 चौ फुट मिळतात. 1 गुंठा हा 1089 चौरस फुटाचा असतो म्हणूण आर चे गुंठ्या मध्ये रुपांतर करण्यासाठी जेवढे आर असतील त्याला 1076.39 ने गुणायचे ने आणि 1089 ने भागायच. आपल्याला आर मध्ये मोजमाप मिळेल.

गुंठा = आर x 1076.39 / 1089

जर आपल्याला एकर मध्ये पाहिजे असेल तर आर चे गुंठ्यात रुपांतर करून 40 ने भागायचे कारण 40 गुंठ्याचा एक एकर असतो.

चौरस मीटर = आर x 100

चौरस फुट आर x 1076.39

गुंठा = आर x 1076.39 / 1089

एकर = आर x 1076.39 / 1089 / 40

1 गुंठा = 1089 चौ फुट

1 आर = 1076.39 चौ फुट 1 एकर = 40 गुंठे

सरकारी जमीन मोजणी कशी करावी याची माहिती

जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे


शेतकऱ्याची शेती जमीन किती आहे हे शेतकऱ्यांना त्यांच्या असलेल्या सातबारा यावरून कळते.
परंतु बऱ्याचदा भावाभावांमधील वाटण्या झाल्यानंतर ज्या जमिनी प्रत्येकाच्या वाट्याला दिल्या जातात या एक प्रकारे अंदाजे दिल्या जातात.
कालांतराने या वाटण यावरून वाद उद्भवू शकतात. एखाद्यावेळेस सातबारावर असलेल्या नमूद असलेल्या जमिनीपैकी प्रत्यक्षात कमी जमीन आढळते.
त्यावेळेस शेतजमीनीची मोजणी करणे फायद्याचे असते. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही शेत जमिनीच्या मोजणी विषयीचा अर्ज कुठे आणि कसा करायचा याबाबत पुरेशी माहिती नसते. या लेखात आपण शेत जमिनीविषयीचा अर्ज कुठे आणि कसा करावा याबद्दलसविस्तर माहिती घेणार आहोत. 'जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे'

 

 शेतजमीन मोजणीसाठी आवश्यक अर्ज आणि लागणारी कागदपत्रे

शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीविषयी काय शंका निर्माण झाल्यास किंवा काही वाद निर्माण झाल्यास तालुकास्तरावरील भूमी अभिलेख कार्यालय किंवा उपाध्यक्ष भुमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करावा लागतो.

शेतजमीनीची मोजणीसाठी लागणारा अर्जचा नमुना हा भुमी अभिलेख विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

 शेतजमीन मोजणीसाठी अर्ज कसा करावा

 सर्वप्रथम भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन मोजणीसाठी असलेला अर्ज घेऊन तो तालुक्यातील कार्यालयात जमा करावा.

त्यानंतर अर्ज भरताना पहिल्यांदा तालुका आणि आपल्या जिल्ह्याचे नाव नमूद करावे. त्याच्यानंतर पर्याय पुढे अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता याविषयी माहिती भरावी.

या अर्जामध्ये आपले स्वतःचे नाव, गाव, तालुका आणि जिल्हाविषयी संपूर्ण माहिती भरावी.  त्यानंतर पुढचा तपशील येतो.

मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मुलगी प्रकाराचा तपशील या पर्यायांमध्ये मोजणी किती कालावधीत करायचे. 

त्या मोजणी मागचा उद्देश काय आहे हे नमूद करावे लागते.  यामध्ये आपल्या तालुक्याचे गावाचे नाव व्यवस्थितरित्या नमूद करावे.

आपल्या शेतजमिनीचा जो गट नंबर आहे त्याचा तपशील भरावा.

 

जमीन मोजण्याचा प्रकार

जमीन मोजणीच्या प्रकारांमध्ये साधारणतः कालावधीनुसार तीन प्रकार पडतात.

 

1 साधारणत सहा महिने कालावधी असलेली साधी मोजणी

2- तीन महिने कालावधी असलेली तातडीची मोजणी

3- दोन महिने कालावधी असलेली अति तातडीची मोजणी. हे तीन प्रकारे शेतजमीन मोजली जाते.

कालावधीनुसार एक हेक्टर जमीन मोजणीसाठी लागणारे शुल्क

 

साध्या मोजणीसाठी एक हजार रुपये लागतात. तातडीची मोजणीसाठी २ हजार रुपये आणि अति तातडीची मोजणी ३ हजार रुपये अशाप्रकारे जमीन मोजण्याचे दर आहेत. 

त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज भरताना कालावधी कॉलममध्ये किती कालावधीत नोंदणी करायची आहे ते लिहावे.

कोणत्या कारणासाठी जमीन मोजणी करायची आहे तो उद्देशही लिहावा लागतो.

 

या अर्जामध्ये तिसरा पर्याय येतो तो,  म्हणजे सरकारी खजिन्यात भरलेली मोजणी फी या पर्यायांमध्ये मोजणीसाठी लागणारे शुल्क रक्कम त्यासाठी लागणारे चलन किंवा पावती क्रमांक अथवा दिनांक लिहावा. 

या जाती चौथा पर्याय म्हणजे सातबारा उताऱ्यावर जेवढे जमिनीचेसह धारक असतात, तुमच्या सातबारामध्ये इतरांची नावे असल्यास त्यांचा तपशील आणि या सगळ्यांचे संमती असल्याच्या सह्या आवश्यक असतात.

पुढच्या पाच या पर्यायांमध्ये लगतचे जमीनधारक त्यांची नावे व पत्ता लिहिणे गरजेचे आहे.  आपल्या जमिनीच्या चहूबाजूंनी म्हणजे चतुर सीमेला कोणकोणत्या शेतकऱ्यांची जमीन आहेत, त्यांची नावे नोंद करावी.

सहाव्या पर्यायांमध्ये आपण अर्जासोबत कोणकोणते कागदपत्रे जोडली आहेत.

त्यांचे व्यवस्थित वर्णन लिहावे लागते.  त्यामध्ये मोजणी अर्ज, मोजणीची फी, चलन किंवा पावती, अलीकडील काळात काढलेला सातबारा यांचा तपशील भरावा. 

अशाप्रकारे अर्ज भरून झाल्यानंतर संबंधित कार्यालयात जमा करावा.

त्यानंतर सादर केलेल्या अर्जाची तपासणी करून मोजणीसाठी जी काही शुल्क लागत असेल त्यानुसार त्याचे चलन बनवून दिले जाते.

हे चलन घेऊन शेतकऱ्याची बँकेचे चलनाचे रक्कम भरावी लागते. ही पावती दिल्यानंतर मोजणीचा रजिस्ट्रेशन नंबर हा तयार होतो. 

आपण सादर केलेल्या अर्जाची पोच आपल्याला दिली जाते.

या पोचपावतीमध्ये आपल्या मोजणीचा दिनांक कोणता आहे.

मोजणीस कोणता कर्मचारी येणार आहे,त्यांचा मोबाईल क्रमांक, कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल क्रमांक असा तपशील दिला जातो.


कसा काढायचा शेतकरी असल्याचा दाखला!


 

शेतकरी असल्याचा दाखला कसा काढायचा

शेतकरी असल्याचा दाखला कसा काढायचा ?

देशात मोठ्या प्रमाणात लोक शेती करतात. भारत हा कृषीप्रधान देश आहे, असं म्हटलं जातं. कोरोना काळात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कृषी व कृषीपूरक व्यवसायांनी सावरल्याचं समोर आलं होते. शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र कुठे काढायचं. शेतकरी प्रमाणपत्र कायदा नेमका काय हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. कृषी शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेताना शेतकरी असल्याचा दाखला सादर केल्यास फायदा होतो. जमीन खरेदी करत असताना देखील अनेकदा शेतकरी प्रमाणपत्र सादर करावं लागते.  (How to get agriculturist certificate from Aaple Sarkar)


शेतकरी प्रमाणपत्र कुठे मिळते?

शेतकरी प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात किंवा महाराष्ट्र सरकारनं सुरु केलेल्या आपले सरकार पोर्टलवर देखील उपलब्ध होते. तुम्हाला जो पर्याय सोपा वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही हे प्रमाणपत्र मिळवू शकता. आपले सरकारच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही प्रमाणपत्र मिळवू शकता.

शेतकरी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे 
ओळखीचा पुरावा

पॅन कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रोजगार हमी योजना ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, सरकारकडून देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी एक कागदपत्रं

पत्ता दर्शवणारा पुरावा

पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पाणी बील, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, वीज बील, घरफळा पावती, सातबारा किंवा 8 अ उतारा, यापैकी एक कागदपत्रं


इतर कागदपत्रे

शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जमिनीचा सात बारा किंवा 8 अ उतारा उपलब्ध असणं आवश्यक आहे.

स्वंयघोषणापत्र

शेतकरी प्रमाणपत्र काढण्यासाठी स्वंयघोषणापत्र भरु द्यावं लागते. हे सर्वांसाठी अनिवार्य असून अर्जासोबत भरुन द्यावं लागतं.

आपले सरकार पोर्टलवर किंवा तहसीलदार कार्यालयात वरील सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर 15 दिवसांच्या कालावधी मंजूर होईल.

 आपले सरकारवरुन अर्ज कसा करायचा?

आपले सरकारवरच्या वेबसाईटवर नवीन वापरकर्ता नोंदणी या लिंकवरुन नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून तुमचं लॉगीन तयार करुन घ्या. लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्डवर विविध विभाग पाहायला मिळतील त्यातून तुम्ही महसूल विभाग निवडा. त्यातून पुढे महसूल सेवा निवडा. तिथून पुढे शेतकरी प्रमाणपत्र हा पर्याय निवडा. पुढे ओपन होणाऱ्या विंडोमध्ये आवश्यक कागदपत्रांची यादी वाचून घ्या, त्याप्रमाणं ती तयार ठेवा कारण ती वेबसाईटवर अपलोड करावे लागते.

वेबसाईटवर जाऊन वैयक्तिक माहिती, पत्ता, किती वर्षांपासून त्या पत्त्यावर राहतो ती माहिती सादर करावी.अपलोड करायची असलेली कागदपत्रे 75 केबी ते 500 केबीच्या दरम्यान असावीत.सर्व कागदपत्रे अपलोड करा. फोटो आणि सही देखील अपलोड करावेत. यानंतर अर्ज सादर करावा आणि अर्जाचं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरावा. जी पावती मिळेल ती सेव्ह करुन ठेवावी.


कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम मधील अशी शेतजमीन खरेदी / विक्री साठी जिल्हाअधिकारी यांच्या परवानगी ची गरज नाही.


15 दिवसांमध्ये शेतकरी प्रमाणपत्र

आपले सरकारवरुन अर्ज सादर केल्यानंतर 15 दिवसांपर्यंत आपल्याला शेतकरी प्रमाणपत्र मिळेल. काही अडचणीमुळे प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास 15 दिवसानंतर आपले सरकारच्या वेबसाईटवर लॉगीन करुन अपील अर्ज सादर करु शकता.


Wednesday, October 12, 2022

अन्नधान्य योजनेच्या अनुदानातून बाहेर पडा!


राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमधील लाभार्थ्यांना राज्य शासनाने अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा, असे आवाहन केले आहे. मात्र या योजनेसंदर्भात शासनाने आवाहन करूनही आर्थिक स्थिती चांगली असलेल्या नागरिकांनी त्याकडे कानाडोळा केला आहे.

शासनाने ग्रामीण भागात 44 हजार व शहरी भागात 59 हजार असे वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांनी या योजनेतून बाहेर पडा, असे आवाहन केले होते. मात्र अद्याप बहुतांश वसईकरांनी तसा अर्ज घेण्यास नकार दर्शविला आहे. त्यामुळे भविष्यात आर्थिक स्थिती चांगली असलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण झाल्यास त्यांच्याकडून 42 रुपये गहू व 32 रुपये दर तांदूळ अशा भावाने वसुली केली जाईल, असा इशारा शासनाने दिला आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्याकरिता शासनावर येणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी तसेच या योजनेचा खर्‍या अर्थाने गरज असलेल्या लाभार्थ्यांनाच लाभ व्हावा, या हेतूने गिव्ह ईट अप उपक्रम शासनाकडून अमलात आणला आहे.

शासनाने याबाबत आवाहन केल्यानंतर अद्याप तरी आर्थिक स्थिती चांगली असलेल्या वसईकरांनी या योजनेतून बाहेर पडण्यासाठी हवा तसा प्रतिसाद दर्शविलेला नाही. शासनाकडून वितरीत करण्यात आलेले अर्ज घेण्यासदेखील वसईकरांनी नकार दर्शविला आहे. याबाबत शासनाने आता अंतिम इशारा देत आर्थिक स्थिती चांगली असलेल्या लाभार्थ्यांनी स्वत:हून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ सोडला नाही तर शासनाकडून होणार्‍या सर्वेक्षणात दोषी आढळणार्‍या नागरिकांकडून गहू 42 रुपये प्रतिकिलो तर तांदूळ 32 रुपये प्रतिकिजो दराने वसुली करण्यात येईल, असा थेट इशाराच देण्यात आला आहे.

अन्नधान्य योजनेच्या अनुदानातून बाहेर पडा!

खालीलप्रमाणे नमुनानुसार तहसीलदार किंवा पुरवठा निरीक्षक किंवा पुरवठा निरीक्षण अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा.


जमीन मालक करू शकतो कुळाला बेदखल - बेदखल कुळ म्हणजे काय? - कूळ म्हणजे काय


जमीन मालकाने7/12 वर लागलेल्या कुळाला बेदखल कसे करावे ?


शेतजममनीवर जमीन मालकाचा 'प्रत्‍यक्ष ताबा' आहे असे कायद्‍याने केव्‍हा मानले जाते? 


1 . जमिनीचा मालक किंवा त्‍याचे कुटुिंबीय करीत असतील 

2 . कुळ कायद्‍यानुसार असलेले कुळ करीत असेल

 3 . उपरोक्‍त व्‍यक्‍तीशीवाय अशी इतर व्‍यक्‍ती करीत असेल, जी कायदेशीर कागदोपत्री पुराव्याद्वारे स्‍वत:च्‍या वहिवाटीचे समर्थन करू शकेल तर अशा शेतजमिनीवर जमीन  मालकाचा 'प्रत्‍यक्ष ताबा' आहे  असे कायदा मानतो.

* अनाधिकाराने अथवा  दडेलशाहीने जमिनीचा कब्‍जा घेणार्‍या इसमा वरूध्‍द महाराष्‍ट‍ जमीन महसूल अधिनियम , १९६६ चे कलम  ५९ आणी कलम २४२ अन्‍वयेकारवाई करता येते. 
'बेदखल कुळ म्हणजे काय?'

काही ठिकाणी  सातबारा उतार्‍याच्‍या इतर हक्कत 'कु .का. ४३ च्‍या बंधनास पात्र' असा शेरा लिहलेला असतो. त्‍याचा अर्थ काय?

:-महाराष्ट्र  कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम ,कलम  ४३ अन्‍वये, कुळाने कलम  ३२, ३२-फ, ३२-आय, ३२-ओ, ३३-क किंवा ४३-१-ड अन्‍वये खरेदी केलेली तसेच कलम  ३२-प किंवा ६४ अन्‍वय विक्री  केलेली जमीन जिल्हा अधिकार्‍यािंच्‍या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरित करता येणार नाही, गहाण , बक्षीस , किव्वा पट्ट्याने देता येणार नाही 

तथापि महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी 2014 मध्ये या काळामत सुधारणा केली आहे त्यानवे ज्या कुळांना कुळ कायदा कलम 32-म चे प्रमाणपत्र मिळून 10 वर्षाचा कालावधी लोटला आहे अशा जमिनीची खरेदी/विक्री/देणगी/पट्टा/गहन/आदलाबदल/अबहीहस्तांतरण करताना शासनाच्या पूर्व परावांगी ची गरज असणार नाही अशी तरतूद केली आहे. 
ज्याला कलम 32-म चे प्रमाणपत्र मिळून 10 वर्षाचा कालावधी लोटला आहे आणि त्याला सदर जमीन विकण्याची इच्‍छा आहे त्याने शेतजमीन विक्री करणीयपूर्वी  त्याचा शेतजिीन वीक्रीचा इरादा तहसील कार्यालयात लेखी कळवावा लागतो. असा अर्ज  मिळाल्यानतर दोन दिवसात  तहसील कार्यालय त्या अर्जदारास तो वीक्री करणार असलेल्या शेतजमिनीची महसुल आकारणीच्या चाळीस पट नजराणा रकमेचे लेखाशीर्ष नमूद असलेले चलन तयार करुन देते. ही चाळीस पट नजराणा रक्कम संबंधित  शेतकर्‍याने, चलनाव्दारे शासकीय कारागरत जमा करावी.  त्या नंतर तो विक्री व्यवहार करू शकतो. ''बेदखल कुळ म्हणजे काय?''

* बेदखल कुळ म्हणजे  कोण? 

महाराष्ट्र  कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम 2011 कलम  १४ अन्‍वय कुळाच्या कसुरीमूळे कुळवहिवाट समाप्‍त करण्‍याची तरतदू आहे . कुळाचा कसरूम्हणजे :

1 ) कोणत्यानी महसूल वर्षाचा खंड वर्षानुवर्षे आणि जाणूनबुजून त्या त्या वर्षाच्या 31 मे पूर्वी न भरणे. 

2 ) जमिनीची खराबी अथवा कायम स्‍वरुपी नुकसान होईल  असे कृत्य जाणूनबुजून करणे. 

3 ) जाणूनबुजून महाराष्ट्र  कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम कलम 27 चे उल्लंघन करून जमिनीची पोटविभागणी , पोटपट्टा किव्वा अभिहस्तांतरण करणे. 

4 ) स्वता : जमीन  न कसणे.

5 ) जमिनीचा उपयोग शेती किंवा शेती संलग्‍न जोडधंदासाठी   न करता इतर प्रयोजनासाठी  करणे. 

उपरोक्‍त पध्‍दतीने कुळानि  कसूर केला असता जमीन मालकाने कुळास तीन महिन्‍यािंची लेखी नोटीस दीली असल्‍यास कुळवहिवाट समाप्त करण्‍याची तरतूद आहे . अशा कुळास बेदखल कुळ म्हणतात.