Monday, December 5, 2022

रमाई आवास योजना

राज्यात ग्रामीण भागात १ लाख १३ हजार ५७१ व शहरी भागात २२ हजार ६७६ घरकुल उभारणीच्या उद्दिष्टास राज्य शासनाची मंजुरी 


सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारणीच्या स्वप्नाला पूरक असलेल्या रमाई आवास घरकुल या अत्यंत महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत राज्यात ग्रामीण भागात 1 लाख 13 हजार 571 व शहरी भागात 22 हजार 676 घरकुलांच्या उद्दिष्टास सन 2022 या आर्थिक वर्षासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

सामाजिक न्याय विभागाने याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.


अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील आर्थिक दुर्बल कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रमाई आवास योजनेच्या माध्यमातून पात्र असलेल्या प्रत्येकाला या योजनेचा शासनाचा।प्रयत्न आहे.



विभागनिहाय मान्यता मिळालेली आकडेवारी

  • मराठवाड्यात औरंगाबाद विभागात ग्रामीणच्या 30116   शहरी भागाच्या 7565 घरकुलांना मंजुरी

  • लातूर विभागात ग्रामीणच्या 24274 तर शहरी भागाच्या 2770 घरकुलांना मंजुरी
  • नागपूर विभागात ग्रामीणच्या 11677 तर शहरी विभागाच्या 2987 घरकुलांना मंजुरी

  • अमरावती विभागात ग्रामीणच्या 21978 तर शहरी भागातील 3210 घरकुलांना मंजुरी

  • पुणे विभागात ग्रामीणच्या 8720 तर शहरी भागातील 5792 घरकुलांना मंजुरी

  • नाशिक विभागात ग्रामीणच्या 14864 तर शहरी भागातील 346 घरकुलांना मंजुरी

  • मुंबई विभागात ग्रामीणच्या 1942 तर शहरी भागातील 86 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे, 



शबरी आवास योजना (शबरी आदिवासी घरकुल योजना)

आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घराचे 269.00 चौ.फु. चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देणे.

अटी व शर्ती:-

1. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती संवर्गातील असावा. 
2. लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षांचे असावे. 
3. लाभार्थ्यांकडे स्वत:ची किंवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक राहील. 
4. लाभार्थ्यांकडे स्वत:चे किंवा कुटुंबियांचे पक्के घर नसावे. 
5. विधवा, परित्यक्ता, निराधार, दुर्गम भागातील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. 
6. अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 



वार्षिक उत्पन्न मर्यादा खालीलप्रमाणे :-

 अ) ग्रामीण क्षेत्र - रु. 1.00 लाख 

ब) नगरपरिषद क्षेत्र - रु. 1.50 लाख 

क) महानगरपालिका क्षेत्र - रु. 2.00 लाख

घराच्या बांधकामासाठी क्षेत्रनिहाय कमाल खर्चाची मर्यादा पुढील प्रमाणे आहे.

 अ) ग्रामीण साधारण क्षेत्र : रु. 1.32 लाख नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी : रु. 1.42 लाख 

ब) नगरपरिषद क्षेत्र : रु. 1.50 लाख 

क) महानगरपालिका क्षेत्र : रु. 2.00 लाख


कागदपत्रे :-

1. अर्जदाराचे नजिकच्या काळातील दोन पासपोर्टसाईज फोटो 

2. जातीचे प्रमाणपत्र 

3. रहिवासी प्रमाणपत्र 

4. 7/12 उतारा व नमुना 8-अ 

5. शाळा सोडल्याचा दाखला/वयाचा दाखला 

6. जागा उपलब्धतेचे प्रमाणपत्र 

7. तहसिलदार यांचेकडून प्रमाणित उत्पन्नाचा दाखला 

8. शासन वेळोवेळी विहित करतील अशी कागदपत्रे 

9. ग्रामसभेचा ठराव


संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

Sunday, December 4, 2022

तलाठी भरती जिल्हानिहाय पदे


नमस्कार मित्रांनो आपण भरपूर दिवस झाले वाट पाहत होतो ते म्हणजे तलाठी भरती कधी येणार? मात्र आपली प्रतीक्षा संपलेली आहे तलाठी भरतीची जाहिरात ही आता प्रसिद्ध झालेली आहे, जिल्ह्यानुसार कोणत्या विभागात किती जागा आहेत या पोस्टमध्ये आपण पाहणार आहे तर ही पोस्ट आवडली तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.

Talathi Bharti Maharashtra 2022

विषयांकित प्रकरणी राज्यातील तलाठी (गट-क) संवर्गाची दि.३१/१२/२०२० अखेर रिक्त असलेली १०१२ पदे तसेच तलाठी संवर्गाची नव्याने निर्माण करण्यात आलेली ३११० पदे अशा एकूण – ४१२२ पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुषंगाने महसूली विभागनिहाय तलाठी (गट-क) संवर्गाच्या भरावयाचा पदांचा तपशील सोबत जोडलेल्या विवरणपत्र -अ मध्ये आहे.

विवरणपत्र अ तक्त्यातील तलाठी (गट-क) संवर्गाच्या भरावयाच्या पदांवाचत मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली प्रमाणित करुन त्यासंदर्भातील सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षणनिहाय तपशील (VACANCY MATRIX ) सोबत जोडलेल्या विवरणपत्र व प्रमाणे जिल्हानिहाय माहिती कोणत्याही परिस्थितीत १५ दिवसात शासनास पाठविण्यात यावी. 

त्याकरीता तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने आपल्या विभागाच्या अधिनस्त जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागविण्यात येणारी माहिती प्राप्त करुन ती शासनास सादर करण्याबाबत सर्व उपआयुक्त (महसूल) यांना “समन्वय अधिकारी” म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. तरी सदरची माहिती कोणत्याही परिस्थितीत विहीत कालावधीत तपासून खास दुताव्दारे शासनास पाठविण्याची दक्षता घ्यावी, ही विनंती Talathi Bharti Maharashtra 2022

जाहिरात PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

तलाठी भरती जिल्ह्यानुसार पदे

अ. क्र.जिल्हा एकूण भरवायची पदे
1.नाशिक252
2.धुळे233
3.नंदुरबार40
4.जळगाव198

5.अहमदनगर312
6.औरंगाबाद157
7.जालना95
8.परभणी84
9.हिंगोली68
10.नांदेड119
11.लातूर50
12.बीड164
13.उस्मानाबाद110
14.मुबई शहर19
15.मुंबई उपनगर39
16.ठाणे83
17.पालघर157
18.रायगड172
19.रत्नागिरी142
20.सिंधुदुर्ग119
21.नागपूर125
22.वर्धा63
23.भांडारा47
24.गोंदिया60
25.चंद्रपूर151
26.गडचिरोली134
27.अमरावती46
28.अकोला19
29.यवतमाळ77
30.वाशीम10
31.बुलढाणा31
32.पुणे339
33.सातारा77
34.सांगली90
35.सोलापूर174
36.कोल्हापूर66

Talathi Bharti Maharashtra 2022






Saturday, December 3, 2022

महारेशीम अभियान 2023

महारेशीम अभियान 2023: शेतकऱ्यांना संपर्क करण्याचे आवाहन

Mahareshim abhiyan 2023





राज्यात महारेशीम अभियान 2023 राबविण्यात येत असून या अंतर्गत नवीन तुती क्षेत्र नोंदणीचा कार्यक्रम 15 डिसेंबरपर्यंत असणार आहे. 

इच्छुक शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तुती लागवडीव्दारे रेशीम कोष उत्पादन योजना राबविण्यात येत आहे. 



यात लाभार्थी निवडताना 

१) अनुसुचित जाती
२) अनुसुचित जमाती
३) विमुक्त जमाती
४) दारिद्रय रेषेखालील कुटुंबे
५) शारीरिक अपंगत्व प्रधान कुटुंबे
६) भूसुधार योजनेचे लाभार्थी
७) कृषी कर्ज माफी योजनेनुसार अल्प भूधारक सीमांत शेतकऱ्यांना निवडण्यात येणार आहे. 



या योजनेअंतर्गत रेशीम विकास प्रकल्पासाठी तीन वर्षामध्ये अकुशल व कुशल मजुरी देण्यात येते. 

यात तुती लागवड व जोपासनेसाठी 682 मनुष्य दिवस व किटक संगोपन गृहासाठी 213 दिवस असे एकूण 895 दिवसांची मजुरी देण्यात येते. 
स्वत: मजुर म्हणून स्वत:च्या शेतात काम करणे आवश्यक आहे.


लाभार्थी निवडताना इच्छुक लाभार्थ्यांकडे मध्यम ते भारी व पाण्याची निचरा होणारी जमीन असावी. 

नवीन तुती लागवड क्षेत्रासाठी सिंचनाची पुरेशी सोय उपलब्ध असणे आवश्यक आहे. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आठमाही सिंचनाची सोय व खर्च करण्याची तयारी असलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय, येथे संपर्क साधावा,

सर्व खर्च वजा जाता एकरी वार्षिक किमान दिड लाख रुपये उत्पन्न निश्चित मिळेल. जिल्ह्यात रेशीम शेती उद्योगासाठी वाव आहे.



Thursday, December 1, 2022

(Maharashtra Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022 [मुदतवाढ]

(Maharashtra Police Bharti) महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022 [मुदतवाढ]

Total: 18331 जागा 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1पोलीस शिपाई14956
2चालक पोलीस शिपाई चालक2174
3राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF)1201
Total18331

युनिट नुसार रिक्त जागा:

अ. क्रयुनिटपद संख्या 
पोलीस शिपाईचालक पोलीस शिपाई चालक
1बृहन्मुंबई7076994
2ठाणे शहर52175
3पुणे शहर72010
4पिंपरी चिंचवड216
5मिरा भाईंदर986
6नागपूर शहर308121
7नवी मुंबई204
8अमरावती शहर2021
9सोलापूर शहर9873
10लोहमार्ग मुंबई620
11ठाणे ग्रामीण6848
12रायगड27206
13पालघर21105
14सिंधुदुर्ग9922
15रत्नागिरी131
16नाशिक ग्रामीण16415
17अहमदनगर12910
18धुळे42
19कोल्हापूर24
20पुणे ग्रामीण57990
21सातारा145
22सोलापूर ग्रामीण2628
23औरंगाबाद ग्रामीण39
24नांदेड15530
25परभणी75
26हिंगोली21
27नागपूर ग्रामीण13247
28भंडारा6156
29चंद्रपूर19481
30वर्धा9036
31गडचिरोली348160
32गोंदिया17222
33अमरावती ग्रामीण15641
34अकोला32739
35बुलढाणा51
36यवतमाळ24458
37लोहमार्ग पुणे124
38लोहमार्ग औरंगाबाद108
39औरंगाबाद शहर15
40लातूर29
41वाशिम14
42लोहमार्ग नागपूर28
राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF)
1पुणे SRPF 1119
2पुणे SRPF 246
3नागपूर SRPF 454
4दौंड SRPF 571
5धुळे SRPF 659
6दौंड SRPF 7110
7मुंबई SRPF 875
8सोलापूर  SRPF 1033
9गोंदिया SRPF 1540
10कोल्हापूर SRPF 1673
11काटोल नागपूर SRPF 18243
12कुसडगाव अहमदनगर SRPF 19278


शैक्षणिक पात्रता:

  1. पोलीस शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.
  2. पोलीस शिपाई चालक: (i) इयत्ता 12वी उत्तीर्ण.  (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV-TR)
  3. राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.


शारीरिक पात्रता: 

उंची/छाती पुरुषमहिला
उंची165 सेमी पेक्षा कमी नसावी (SRPF: 168 सेमी)158 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती  न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

शारीरिक चाचणी: 

क्रिया पुरुष महिला गुण
पोलीस शिपाई
धावणी1600 मीटर800 मीटर20
100 मीटर100 मीटर15
गोळा फेक15
Total50 गुण
पोलीस शिपाई चालक
धावणी1600 मीटर800 मीटर30
गोळा फेक20
Total50 गुण
पोलीस शिपाई SRPF
धावणी05 कि.मी50
100 मीटर25
गोळा फेक25
Total100 गुण

वयाची अट: 30 नोव्हेंबर 2022रोजी,  [मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट]

  1. पोलीस शिपाई: 18 ते 28 वर्षे.
  2. चालक पोलीस शिपाई: 19 ते 28 वर्षे.
  3. राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई: 18 ते 25 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹450/-    [मागास प्रवर्ग: ₹350/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2022  15 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा

उमेदवारांना सामान्य सूचना: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

English Post Divider

Total: 18331 Posts

Name of the Post & Details: 

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Police Constable14956
2Police Constable Driver2174
3SRPF Armed Police Constable1201
Total18331

Educational Qualification: 

  1. Constable Driver: 12th passed from recognized Board.
  2. Police Constable Driver(i) 12th passed from recognized Board.  (ii) LMV-TR
  3. SRPF Armed Police Constable: 12th passed from recognized Board.

Age Limit: as on 30 November 2022,  [Reserved Category: 05 years Relaxation]

  1. Constable Driver: 18 to 28 years
  2. Police Constable Driver: 19 to 28 years
  3. SRPF Armed Police Constable: 18 to 25