Friday, April 7, 2023

कोतवालांच्या मानधनामध्ये वाढ

कोतवालांच्या मानधनामध्ये वाढ 



महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. तलाठीचा सहाय्यक म्हणून करणारा म्हणजेच कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च २०२३ रोजी राज्याचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील कोतवालांच्या मानधनवाढीबाबत केलेल्या घोषणेप्रमाणे महसूल विभागातील कोतवालांच्या मानधनवाढीच्या सादर करताना केलेल्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने दिनांक १७ मार्च, २०२३ रोजीच्या बैठकीत मान्यता दिलेली आहे. 



त्यानुसार सध्या सेवा कालावधीनुसार महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील कोतवालांना मिळत असलेले मानधन ७ हजार ५०० रुपयावरून १५ हजार करण्यात येणार आहे. 
महाराष्ट्र राज्यातील सर्व १२ हजार ७९३ कोतवालांना यापुढे दरमहा सरसकट १५ हजार इतके मानधन लागू करण्यात आले आहे. १५ हजार रुपये इतके मानधन दि. ०१ एप्रिल २०२३ पासून अनुज्ञेय असणार आहे.

नगरपंचायती, नगरपरिषद संबंधी कोर्टाचा निर्णय हा अनुसूचित क्षेत्रांतील बेकायदा



मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्था (नगरपंचायत / नगरपरिषद) संबंधीसी.न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अनुसुचित क्षेत्रातीलनगरपंचायत / नगरपरिषद प्रकरणी श्रीमती भारती ईस्थाम यानी दाखल केलेले सिव्हिल आहे. अप्लीकेशन न. ५२०/२०२३) ९ मार्च २०२३ रोजी स्विकारले आहे.

 श्रीमती भारती ईस्थाम यानी दाखल केलेल्या सिव्हिल अप्लीकेशनच्या पृष्ठयर्थ वकील माननीय श्री. एस. एस. तराम यांनी युक्तीवाद केला की राज्यघटनेच्या भाग IX-A मधील अनुच्छेद२४३ ZC नुसार निर्णय आवश्यक आहे;संविधान मधील - ५वी अनूसूचिच्या पैरा उप पैरा (I) नुसार राष्ट्रपती जो पर्यंत एखादे क्षेत्र अनूसूचित क्षेत्र म्हणून घोषीत करीत नाही आणि अनूसूचित क्षेत्रांतील नगरपंचायत / नगरपरिषदसाठी जो पर्यंत संसद कायदा करीत नाही तोपर्यंत राज्य सरकार ग्रामपंचायतचे रुपांतर नगरपंचायत मध्यें अनुच्छेद २४३ Q(२) नुसार करू शकत नाही. ३. वरील निर्णया नुसार अ) राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील संविधान अनुछेद २४३८ (२) नुसार गठीत खालील २५ नगर पंचायती / नगर परिषदा रद्द करुण त्या ऐवजी ग्रामपंचयतीची पुनर्स्थापनकरण्याचे आदेश देणे अनिवार्य

१) शहापूर, २) पेठ, ३) कळवण, ४) त्रिंबक, ५) सुरगाना, ६) इगतपुरी, ७) धारणी ८) चिखलदरा, ९) भामरागड, १० ) सिरोंचा, ११) अहेरी, १२) एटापल्ल १३) धानोरा, १४) कुरखेडा, १५) कोरची, १६) मोखाडा, १७) तलासरी, १८) विक्रमगड, १९) वाडा, २०) जव्हार, २१) डहाणू, २२) मल्याण, २३) अक्राणी, २४) नवापूर, २५) तळोदा. आ) वरील नगरपरीषदा, नगरपंचायती अंतर्गत येणारे क्षेत्र २डिसेबर १९८५च्या अधिसूचनेत राष्ट्रपतीनी घोषित केलेल्या अनुसुचित क्षेत्रात येत असल्याने पेसा कायदा, १९९६ नुसार कथीत नगर पंचायती / नगर परिषदा ऐवजी ग्रामपंचयतीची पुनर्स्थापना झाली पाहिजे.

Wednesday, April 5, 2023

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे मजुरी दर

 


केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे ग्रामीण क्षेत्रातील मजुरांना मजुरी दर (wage rate ) निश्चित केले आहेत. 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, 2005 (2005 चा 42) च्या कलम 6 च्या पोट- कलम (1) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयात भारत सरकार, अधिसूचना क्रमांक K.A. 463 (E), दिनांक 26 फेब्रुवारी  2013केली आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, 2005 (2005 चा 42) च्या कलम 6 च्या पोट- कलम (1)  दि. 24 मार्च 2023 या अधिसूचनेनुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील ग्रामीण क्षेत्रातील मजुरांना द्यावयाचा मजुरीचा दर प्रतिदिन हा महाराष्ट्रासाठी 273 रुपये इतका निश्चित करण्यात आलेला आहे.


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे मजुरी दर 


Sunday, April 2, 2023

नागरिकांच्या खिशावर पडणार बऱ्यापैकी ताण

काही क्षेत्रांमध्ये नव्या नियमांची अंमलबजावणी


काही क्षेत्रांमध्ये नव्या नियमांची अंमलबजावणी; तर काही क्षेत्रांमध्ये वारस नोंदवणे होणार अनिवार्य


एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. या नव्या आर्थिक वर्षात अनेक बदल होऊ घातले आहेत. अत्यावश्यक औषधे महागणार आहेत. वीज दरवाढ होऊ घातली आहे. चारचाकी गाड्यांच्या किमती वाढणार आहेत. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने यापूर्वी कॅश इक्विटी आणि फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेगमेंटमधील कोणत्याही प्रकारच्या व्यवहारांवर ६ टक्के शुल्क आकारले होते. १ एप्रिलपासून हे शुल्क मागे घेतले जाणार आहे.अनेक गोष्टी बदलणार आहेत. त्यांचा घेतलेला हा आढावा.



वैद्यकीय क्षेत्र


1) वैद्यकीय क्षेत्र:-

तब्बल ९०० औषधांच्या किमती किमान १२ टक्क्यांनी वाढणार आहेत.त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडणार आहे. या औषधांमध्ये अत्यावश्यक तसेच हृदयविकारावरील औषधांचा समावेश आहे.


कर मंडळ

2) केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ:-

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी ३० जून २०२३ पर्यंत अंतिम मुदत निश्चित केली आहे. या मुदतीत तुम्ही दोन्ही कागदपत्रे लिंक न केल्यास, पॅन निष्क्रिय केले जाणार आहे. त्याचबरोबर या काळात आधार आणि पॅन जोडण्यासाठी १ हजार रुपये शुल्क द्यावे लागेल.


✅ आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांचे लिंक करण्यास अधिक सविस्तर खालील क्लिक करा

✔️ शेवटची तारीख वाढवली पॅन- आधार लिंक करण्याची


✔️ आधर पॅन कार्ड लिंक करण्यास मुदतवाढ 30जून पर्यंत


ऑटोमोबाईल इंडस्ट्रीझ



3) ऑटोमोबाईल इंडस्ट्रीझ:-

भारत स्टेज-२ च्या अंमलबजावणीमुळे ऑटोमोबाईल कंपन्यांच्या खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, मर्सिडीज- बेंझ, बीएमडब्ल्यू, टोयोटा आणि ऑडी अशा अनेक कंपन्यांच्या वाहनांच्या किमती वाढतील.





 सोन्याचा इंडस्ट्रीझ




4) सोन्याचा इंडस्ट्रीझ:-

१ एप्रिल २०२३ पासून भारतात सोन्याच्या विक्रीच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. १ एप्रिलपासून, ज्वेलर्स ६ अंकी HUID क्रमांक नोंदणीकृत असलेल्या सोन्याची विक्री करू शकणार आहेत. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ग्राहक विभागाने हा निर्णय घेतला आहे.



5) वीमा योजना:-

 २०२३ च्या अर्थसंकल्पातील घोषणेनुसार १ एप्रिल २०२३ पासून वार्षिक ५ लाख रुपयांपेक्षा जास्त प्रीमियम असलेल्या विमा योजनेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागणार आहे. यातून युलिप योजनेला वगळण्यात आले आहे.




6) डिमॅट खातेधारक:-

डिमॅट खातेधारकांनी १ एप्रिल २०२३ पूर्वी नॉमिनीचे नामांकन करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास खातेधारकांचे खाते गोठवले जाणार आहे. सेबीच्या परिपत्रकानुसार, डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यात नॉमिनी जोडणे आवश्यक आहे. नॉमिनीची प्रक्रिया कशी करावी याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.




7)म्युच्युअल फंड :-

 सेबीने सर्व म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना ३१ मार्चपूर्वी त्यांचे नॉमिनी निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. तसे न केल्यास, १ एप्रिल २०२३ पासून, पोर्टफोलिओ गोठवला जाईल. तपशील सबमिट केल्यानंतरच ते सुरू होईल.




दिव्यांग


8) दिव्यांग:-

दिव्यांगांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी १ एप्रिलपासून युनिक आयडेंटिफिकेशन कार्ड (यूडीआयडी) क्रमांक सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे यूडीआयडी नाही, त्यांना त्यांच्या यूडीआयडी नोंदणी क्रमांकाची माहिती द्यावी लागेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

खालीलप्रमाणे इतर योजना क्लिक करा👇👇👇👇


✔️ संजय गांधी अनुदान निराधार योजना


✔️  इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना


✔️ राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य लाभ योजना

फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२२-२३ व विमा कंपनीस निधी अदा करण्यासाठी वितरीत

फळपीक विमा योजना सन 2023

शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्या पासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आबाधीत राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी, त्यासाठी राज्यात प्राधान्याने पुर्नरचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकाच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते. पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. या सर्व बाबींचा विचार करुन शेतकऱ्यांना फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणुन पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना राज्यात सन २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ या तीन वर्षामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई (आंबिया बहार) या ९ फळपिकांसाठी ३० जिल्हयामध्ये महसूल मंडळ हा घटक धरुन एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि., रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि. व भारतीय कृषि विमा कंपनी लि. या विमा कंपन्यांमार्फत शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे. 


पीक विमा संदर्भात अधिक माहितीसठी इथे क्लिक करा👇👇👇👇👇

 चालू हंगामातील नोंदणी सुरु असतानाच विमा संरक्षित क्षेत्राची आकडेवारी उपलब्ध नसली तरी देखील केंद्र व राज्य शासनाचा विमा हप्ता हिस्सा अग्रीम स्वरुपात (पहिला हप्ता) कंपनीस अदा करणे आवश्यक आहे. सदर विमा हप्ता अनुदानाची रक्कम मागील हंगामाच्या अदा केलेल्या एकूण राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाच्या ८० टक्क्याच्या ५० टक्के रक्कम आगाऊ स्वरुपात कंपन्यांना द्यावी" असे नमूद आहे. त्यास  कृषि आयुक्त कार्यालयाने केलेल्या विनंतीनुसार रु. ४३,९०,७८,०००/- इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. 


पीक विमा योजना विषयी सविस्तर माहिती इथे क्लिक करा👇👇👇👇👇👇👇👇👇

फळपीक विमा योजना सन 2022

 रु.४३,९०,७८,०००/- इतकी रक्कम योजनेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे अदा करण्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

 पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२२-२३

फळ विमा

                              फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२२-२३

पीक विमाचे क्लेम चे जनजागृतीविषयी इथे क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇

पिक विमाचे क्लेमचे जनजागृती

फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२२-२३ चे शासन निर्णय(GR)