Wednesday, June 14, 2023

शिष्यवृत्ती हुकलेली संधी पुन्हा मिळेलऑफलाईन अर्ज १५ जूनपर्यंत करावे

 


महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, प्रवर्गातील विद्यार्यािंना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा शुलक या योजनेचा लाभ दिला जातो . सन २०१८-१९ ते २०२१-२२ या वर्षात विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती साठी अर्ज केले होते. मात्र, यावेळी काही पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ॲटो रिजेक्ट झाले होते त्यामुळे ते शिष्यवृत्ती पासून वंचित राहिले होते. या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अता प्रलंबित अर्ज ऑफलाईन पध्दतीने निकाली काढले जाणार आहेत.

पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या विविध अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्याचे विहीत मुदतीत अर्ज भरता न येणे, अर्ज ॲटो रिजेक्ट होणे, एखाद्या वर्षी अर्ज भरता न आल्यास त्यावर्षी गॅप ईयर असे पोर्टलवर नमूद होऊन पुढच्या वर्षीचा अर्ज भरताना अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नाही.

अशा विध्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज १५ जून २०२३ पर्यंत महाविद्यालयाकडे जमा करावा तसेच महाविद्यालयाने २० जून पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण, या कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त समाधान   यांनी केले आहे.


शासन आपल्या दारी उपक्रमाचा पालघर जिल्हयात


शासन आपल्या दारी उपक्रमाचा उद्देश सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे हा आहे. बर्‍याचदा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेकदा नागरिकांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.

पालघर येथे 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी गुरुवारी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी पालघर सिडको मैदानात सभामंडप उभारण्यात आला आहे. सरकारतर्फे राबवण्यात येत असलेल्या ‘शासन आपल्या दारी' कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून हा कार्यक्रम १५ एप्रिल ते १५ जूनपर्यंत राबवला जाणार आहे. या अभियानांतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागरिकांना शासकीय योजनांशी निगडित कार्यालयाचे प्रतिनिधी विविध दस्तावेज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
‘शासन आपल्या दारी' हा उपक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांपैकी एक आहे. लाभार्थीना या उपक्रमाचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. जे लाभार्थी या उपक्रमापासून वंचित होते, अशा लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विश्वास फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. पालघर तालुक्यातील सुमारे २० गावांतील पाच हजार लाभार्थीसाठी गावागावात शिबिरे आयोजित करून त्यांना या योजनेत सामावून घेण्यासाठी निःशुल्क मदत विश्वास फाऊंडेशनतर्फे करण्यात आली आहे. शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून शेतकरी, मच्छीमार, बेरोजगारांना रोजगारासाठी मार्गदर्शन करणे, महिला, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य जनता यांच्यासाठी शासनाच्या आवश्यक व पूरक योजना देण्यात येत आहे.

योजना काय काय असतील

कृषी सेवा केंद्राचे परवाने
सेवानिवृत्त लाभ
आधार कार्ड
पॅन कार्ड
पासपोर्ट
ई-श्रम कार्ड
भरती मेळावा
पीएम किसान
विवाह नोंदणी
पीएफ घरकुल योजना
मनरेगा
जॉब कार्ड
मुलींना सायकल वाटप
नवीन मतदार नोंदणी
शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ
कृषी प्रदर्शन
डिजिटल इंडिया
सखी किट वाटप
दिव्यांग साहित्य वाटप
शिकाऊ चालक परवाना
या अभियानाचा लाभ अधिकाधिक लोकांना व्हावा म्हणून आपण आता माहिती तंत्रज्ञानाची मदत घेतो आहोत. महालाभार्थी या पोर्टलवर नोंदणी करून आपण योजनांचा लाभ घेऊ शकता. जिल्ह्यातील एमएससी आयटी केंद्रे, सीएससी केंद्रे तसेच कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून तेथील स्वयंसेवकांची मदत घेऊन आपण नोंदणी करू शकता आणि Shasan Aplya Dari योजनांचा लाभ घेऊ शकतात.

Monday, June 12, 2023

चक्रीवादळ बिपरजॉय सर्व नागरिकांना जाहीर आवाहन


चक्रीवादळ- Biparjoy (बीपरजॉय)
चक्रीवादळ बिपरजॉय- बिपरजॉय हे नाव बांगलादेशाने दिले आहे. त्याचा अर्थ आपती असा आहे. IMD वेबसाइटनुसार, हे जागतिक हवामान संघटना (WMO) देशांनी स्वीकारले आहे.

चक्रीवादळची पुढील ६ दिवसाची संभावित स्थिति

दिनांक  १०.०६.२०२३    ११.०६.२०२३  १२.०६.२०२३   १३.०६.२०२३  १४.०६.२०२३  १५.०६.२०२३

वेळ (भारतीय प्रमाण वेळेनुसार) ११:३०  ११:३०   १२:३० 

२३.३० २३:३० २३.३० २३:३०
वाऱ्याची गती (प्रती कि.मी.)

-१६५.१७५ १५०-१६० २३५.१४५ ११५-१२५ १५.१०५


(भारतीय प्रमाण वेळेनुसार)  २३.३० २३:३० २३.३० २३:३०

वाऱ्याची गती (प्रती कि.मी.)

१६५-१७५ १५५-१६५ १४५-१५५ १२५.१३५ १०५-११५

चक्रीवादळची दिशा किंवा पातळी  Very Severe Cyclonic Storm -SevereCyclonic Storm

महाराष्ट्रातील किनारा भागतीलअंतर (कि.मी) दि. १०/०६/२०२ वेळ ३ १८.००

6) सिंधुदुर्ग ६७५ कि. मी

7) रत्नागिरी- ६४० कि.मी

8) रायगड ६०७ कि.मी

9) मुंबई ६०३ कि.मी

10) पालघर- ६२३ कि. मी

सूचना

मच्छीमारानी खोल समुद्रात मासेमारीसाठी जावू नये. मच्छीमारीसाठी गेले असल्यास सुरक्षित स्थळी किवा बंदरात परत यावे.

किनारी भागातील लोकांनी सतर्क बाळगावी.

स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येणाच्या सुचनांचे पालन करावे

माहिती खोत: सदरची माहिती ही भारतीय हवामान विभागाच्या प्रसिद्धी पत्रकातून तसेच संकेतस्थळावरून घेण्यात आली आहे.

Wednesday, June 7, 2023

The chance of career in the art field कला क्षेत्रात करियरच्या संधी…

आपल्याला जो छंद आहे किंवा उपजत जी कला आहे, त्यात करियर करायचा विचार फारसा रूढ नव्हता. जागतिकीकरण आणि प्रत्येक क्षेत्राची विस्तारणारी व्याप्ती पाहता आता छंद जोपासता असताना किंवा तुम्हाला उपजत असलेल्या केलेला प्रोफेशन बनवू शकता. ठराविक क्षेत्रात करियर करण्याच्या सिमारेषा पुसल्या गेल्या असून, करियरचे क्षितीज विस्तारले आहे. आपल्या आवडत्या कलेतून छंद करण्यासंदर्भातील बॅचलर इन फाईन आर्ट्स मधील काही शिक्षणक्रम पाहू -
बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स - हा चार वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. यास प्रवेश घेण्यासाठी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, साधारण 3 लाख शैक्षणिक शुल्क आहे. यामध्ये अनेक उपविभाग असून, पदवी आणि पदविका शिक्षणक्रमही उपलब्ध आहेत.
बी.एफ.ए. इन ॲनीमेशन - चार वर्षाचा पूर्ण वेळ शिक्षणक्रम आहे. यास प्रवेश घेण्यासाठी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. डिझाईन फॉर ॲनीमेशन, प्रिंट मेकींग, फॉर बिझनेस लॅग्वेज, ओपन इलेक्टीव्ह कोर्सेस हे विषय अभ्यासक्रमात असून, साधारण 3 लाख शिक्षणक्रम शुल्क आहे.

बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स + मास्टर ऑफ फाईन आर्ट्स (पेंटींग) - हा सहा वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. 12 वी मध्ये किमान 45 टक्के असणे आवश्यक आहे.
बी.एफ.ए. इन म्युसिक व्हायोलीन - हा चार वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. या प्रवेश घेण्यासाठी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

एम.फील. इन म्युझीक - एक वर्षाचा पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम आहे. पदवीला 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
बी.ए.इन. म्युझीक - हा तीन वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

एम.ए. इन इन्स्ट्रुमेंटल म्युझिक- हा दोन वर्षाचा पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम आहे. म्युझिक मधून बी.ए.पूर्ण असणे आवश्यक आहे.
बी.ए.इन पफॉर्मिंग आर्ट्स- हा तीन वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. साधारण 2 लाख शैक्षणिक शुल्क आहे.

कोर्स इन म्युझिक - हा 120 तासांचा पूर्णवेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. शिक्षणक्रम शुल्क 4 हजार रूपए आहे. टेक महिंद्रा, एशियन पेंट, विप्रो, झोमॅटो आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.
डिप्लोमा इन हिंदूस्थानी क्लासिकल व्होकल / लाईट व्होकल / सितार / तबला - हा दोन वर्षाचा पूर्णवेळ पदविका शिक्षणक्रम आहे. किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

गाणे विषयात पदविका (डिप्लोमा इन सिंगींग) - हा एक वर्षाचा पूर्णवेळ पदविका शिक्षणक्रम आहे. साधारण 4 हजार एवढे शिक्षणक्रम शुल्क आहे.
सर्टीफीकेट इन व्हाईस कल्चर / व्हाईस ओव्हर / डबिंग ॲण्ड फ्री कमेंट्री - हा तीन महिन्याचा पूर्णवेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. 10 + 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. साधारण 30 हजार एवढे शिक्षणक्रम शुल्क आहे.

नृत्यकलेत पदवी - हा चार वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. याचे एक लाख 75 हजार एवढे शिक्षणक्रम शुल्क आहे. बँक ऑफ अमेरिका, विप्रो, गुगल आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होऊ शकते.
सर्टीफीकेट इन फाउंडेशन फोटोग्राफी - हा दोन महिन्याचा अर्धवेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. 10 + 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. साधारण 13 हजार शैक्षणिक शुल्क आहे. प्राईम फोकस, रिलायन्स रिटेल, लाईफ ओके आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

डिप्लोमा इन ऑटोमोटीव्ह शिल्पकला - हा दोन वर्षाचा पदव्युत्तर पदविका शिक्षणक्रम आहे. साधारण 5 लाख रूपए शैक्षणिक शुल्क आहे. अँकर पॅनासोनिक, इंदी डिझाईन, बॉम्बे डिझाईन हाऊस, बँग डिझाईन आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.
एम.एफ.ए. इन सिरॅमिक - हा दोन वर्षाचा पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम आहे. पदवीमध्ये किमान 50 टक्के असणे आवश्यक आहे.

बी.एफ.ए. इन सिरॅमीक - चार वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम असून, 12वी मध्ये 50 टक्के असणे आवश्यक आहे.
एम.एफ.ए. इन पेंटींग (भित्तीचित्र) - हा दोन वर्षाचा पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम आहे. पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे.

सर्टीफीकेट इन ॲक्टींग - हा सहा महिन्याचा पूर्णवेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, 90 हजार रूपए शैक्षणिक शुल्क आहे.

भारतात 35 महाविद्यालयात ड्रामा (नाटक) विषयाचे प्रशिक्षण दिले जाते. शिल्पकलेचे 21 महाविद्यालय भारतात आहेत. फोटोग्राफीचे 271 महाविद्यालये आहेत. भारतात संगीताचे 113 महाविद्यालये आहेत. एम.एफ.ए. इन पेंटींगचा शिक्षणक्रम वीस्वा भारती विद्यापीठ, वेस्ट बंगाल येथे उपलब्ध आहे. ग्राफीक आर्ट कॉलेजचे 46 महाविद्यालये आहेत. नृत्य आणि नृत्य दिग्दर्शनचे भारतात 51 महाविद्यालये आहेत.

Saturday, June 3, 2023

PM Kisan Yojana च्या आधार जोडणीसाठी टपाल बँकेची विशेष मोहीम

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना १४ व्या हप्त्याची रक्कम लवकरच देण्यात येणार आहे. हा हप्ता मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी ई केवायसी तसेच बँकेचे खाते आधार क्रमांकाशी सलंग्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय टपाल बँके (आयपीपीबी) मार्फत गाव पातळीवर मोहिम राबविण्यात येत आहे.. या मोहिमेमध्ये पालघर जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या  लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहन कृषि अधिकारी  यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार प्रती हप्ता याप्रमाणे ६ हजार प्रती वर्षी लाभ देण्यात येतो. योजनेच्या १४ व्या हप्त्याचा लाभ माहे जून २०२३ मध्ये जमा होणार आहे. १४ व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. केंद्र शासनाने विकसित केलेल्या पीएम किसान अँप द्वारे मोबाईलवर चेहरा प्रमाणीकरण प्रणाली (फेस आँथेटिकेशन) द्वारे योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधेच्या माध्यमातून लाभार्थींना स्वतःचे तसेच इतर ५० लाभार्थीचे सुद्धा ई केवायसी प्रमाणीकरण करता येणार आहे.
 जिल्ह्यात सद्यस्थितीत लाभार्थ्यांची बँक खात्यांशी आधारक्रमांक जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थीच्या खात्यात १४ व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही. लाभार्थीना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्टमास्तर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांचे आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) मध्ये खाते उघडावे. सदरचे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी ४८ तासात जोडले जाईल.

सदरची पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. आयपीपीबीमध्ये बँक खाते सुख करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब् असल्याने लाभार्थीना इतरत्र जाण्या गरजही पडणार नाही.