Thursday, January 23, 2025

तुमच्या नावावर जमीन असेल तर तुम्हाला मिळणार 'फार्मर आयडी'

शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती आता एका क्लिकवर मिळणार

तुमच्या नावावर जमीन असेल तर तुम्हाला मिळणार 'फार्मर आयडी'
केंद्र शासनाच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर अॅग्रिकल्चर अॅग्रिस्टॅक हा उपक्रम संपूर्ण देशात राबविण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच म्हणजेच फार्मर आयडी दिला जाणार आहे. हा आयडी ऑनलाइन उपलब्ध राहणार आहे. डिजिटल स्वरुपाच्या या आयडीमध्ये शेतकऱ्यांच्या नावासह त्याची शेतजमीन कुठे कुठे आहे, याची माहिती उपलब्ध होणार आहे.

फार्मर आयडी सादर केल्यानंतर शेतकऱ्यांना कुठलीही कागदपत्र देण्याची आवश्यकता पुढील काळात भासणार नाही.

त्यादृष्टीने शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम कृषी विभागाने सुरू केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या सातबाराला आधार नंबर लिंक केला जात आहे.

प्रत्येक शेतकऱ्याला युनिक आयडी देणार

प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आयडीच्या माध्यमातून एक स्वतंत्र क्रमांक उपलब्ध झाल्याने देशभरात हा क्रमांक त्याच शेतकऱ्याकडे असणार आहे.

बँक, आधार, पॅनचा डेटा मिळणार

या फार्मर आयडी क्रमांकाला शेतकऱ्यांचा बैंक खाते क्रमांक, आधार क्रमांक, पॅनचा डेटादेखील जोडला जाणार आहे.

या कामकाजाच्या पूर्ततेसाठी मास्टर ट्रेनर नियुक्त केले आहे. याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या पद्धतीची माहिती संकलित होत आहे

फार्मर आयडी' यासाठी ठरणार महत्त्वाचा

कुठल्याही योजनेची अमंलबजावणी, पीक कर्ज काढणे आदींसाठी फार्मर आयडी महत्त्वाचा ठरणार आहे.

काय कागदपत्रे लागणार ?

• या योजनेमध्ये शेतकऱ्यााचा आधार क्रमांक, सातबारा, आठ-अ ही कागदपत्र संकलित होणार आहेत.

 प्रत्येक तालुक्याला ही मोहीम पूर्ण  करायची आहे.

शेतकऱ्यांचा मनःस्ताप वाचणार

सध्या शेतकऱ्यांना कृषी योजनांसाठी अर्ज केल्यानंतर प्रत्येकवेळी पडताळणीला सामोरे जावे लागते. त्यात खर्च होतो. तसेच शेतकऱ्यांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. मात्र, आता हा मनःस्ताप टळणार आहे.

महसूल विभागाकडे सोपविली जबाबदारी

उपविभागीय अधिकारी हे तालुका समितीचे अध्यक्ष असून, प्रत्येक अधीनस्त तालुक्यासाठी तहसीलदार तालुका उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांची संयुक्त समिती यांच्या माध्यमातून अमंलबजावणी होत आहे.


Wednesday, November 6, 2024

Ration card ekyc करण्यास मुदतवाढ

तुमच्या राशन कार्डला आधार लिंक जर नसेल तर ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत आधार लिंक करण्याची मुदत देण्यात आली होती.
३१ तारखेपूर्वी जर तुम्ही तुमच्या राशनकार्डला आधार लिंक केले नसेल तर तुमचे राशन बंद होणार अशा आशयाच्या बातम्या वाचण्यास मिळत होत्या.

त्यामुळे ज्यांनी राशनकार्डला आधार नंबर लिंक केले नाही त्यांचा जीव टांगणीला लागला होता. परंतु आता अशा नारीकांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आता राशनकार्डला आधार लिंक करण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.

३१ डिसेंबर २०२४ हि राशनकार्डला आधार लिंक करण्याची नवीन तारीख देण्यात आली आहे. म्हणजेच तब्बल दोन महिने हि मुदतवाढ देण्यात आली आहे.
राशनला आधार लिंक केल्यास बोगस राशन कार्ड होणार बाद
सार्वजनिक वितरण प्रणालीमधील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी अन्न व नागरी विभागाकडून आधार लिंक करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

अनेक ठिकाणी बोगस राशन कार्ड समोर आल्याचे निदर्शनास आले असल्याने अनेकांना आता राशनकार्डला आधार नंबर लिंक करण्याची सूचना शासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

ज्यांचे राशनकार्डची इकेवायसी बाकी असेल त्यांनी दिलेल्या तारखेच्या आत ekyc करून घ्यावी.

Maharashtra Anganwadi Bharti – अंगणवाडी भरती महाराष्ट्र


Maharashtra Anganwadi Bharti : अंगणवाडी भरती २०२४ नुसार सेविका व मदतनीस च्या नवीन पात्रता ,अटी व शर्ती ,कागदपत्रे याची सर्व माहिती पाहणार आहोत. भारत सरकार च्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रमांत अंतर्गत अंगणवाडीकेची  स्थापना झाली. महाराष्ट्र मध्ये सन १९७५ साली अंगणवाडी सुरु करण्यात आली. या पोस्ट मध्ये आपण बघणार कि अंगणवाडी भरती २०२४ मध्ये नवीन पात्रता व काय नवीन बदल करण्यात . पूर्वी अंगणवाडी भरती पात्रता मध्ये काही बदल करण्यात आले आहेत ते बद्दल कोणते. अंगणवाडी भरतीसाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार याची नवीन बदलासह सर्व माहिती पाहणार आहोत.
अंगणवाडी भरती २०२४ या नवीन बदलासह होणार आहे. यामध्ये सेविका व मदनीस पदांच्या पात्रता जवळपास सर्व सारखे आहेत त्यामुळे यामध्ये आपण एकत्र बघणार आहे.
1.कागदपत्रे

2. अटी व शर्ती

3. पात्रता

4. वय

5. अर्ज कसा करावा

6. मानधन

7. निवड कशी होते

8. भरती प्रक्रिया

9. गुण कसे दिले जातात

 

#1. कागदपत्रे
आधार कार्ड
पासपोर्ट फोटो
रहिवासी दाखला
डोमिसाइल प्रमाणपत्र
शाळा सोडण्याचा दाखला / LC
जातीचा दाखला – विवाह झाला असेल तर विवाह अगोदर चे जातीचे प्रमाणपत्र चालेल.
12 वी मार्कशीट
विवाह प्रमाणपत्र – लग्न झाले असल्यास
विधवा असल्यास प्रमाणपत्र

#2. अटी व शर्ती 

  • Maharashtra Anganwadi Bharti 2024:उमेदवार स्थानिक रहिवासी असावा . ज्या गावातील उमेदवार रहिवासी असेल त्या गावातील उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
  • अंगणवाडी कर्मचारी कोणत्याही परीस्थितीत बदली दिली जाणार नाही. ज्या गावामध्ये अंगणवाडी मध्ये कर्मचारी म्हणून नेमणूक झाली असेल त्याच ठिकाणी राहील.
  • उमेदवार जर या अगोदर अंगणवाडी सेविका / मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका म्हणून काम केले असल्यास २ वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  • नियुक्ती झाल्यापासून ३० दिवसात रुजू होणे आवश्यक अन्यथा अपात्र करण्यात येईल.
  • पदाची संख्या किंवा ठिकाणे यामध्ये बदल होऊ शकतो.

#3. पात्रता 

  • लहान कुटुंब प्रमाणपत्र लागेल . उमेदवारास दोन पेक्षा जास्त हयात अपत्ये / मुल नसावे अन्यथा त्यास अपात्र केले जाईल. दत्तक अपत्य असल्यास तरी सुधा उमेद्वासार अपात्र केले जाईल
  • उमेदवारास मराठी भाषा येणे आवश्यक.
  • उमेदवावारस  १० वी ला मराठी भाषासह उतीर्ण असणे आवश्यक.
  •  स्थानिक रहिवासी असेन गरजेचे.
  • उमेदवार कमीत कमी 12 वी उतीर्ण असेन आवश्यक आहे.
  • विवाह झाला असेल तर विवाह प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे .
  • जर विवाह प्रमाणपत्र नसेल तर राजपत्र असणे आवश्यक.

#4. वय 

  • जाहिरात प्रसिद्ध झाल्या पासून किमान १८ वर्ष तर कमाल ३५ वर्ष दरम्यान वय असणे आवश्यक आहे .
  • जर उमेदवार विधवा महिला असेल तर वयामध्ये ५ वर्ष सुट देण्यात आली आहे. म्हणजे त्या महिलेला वयाच्या ४० वर्ष पर्यंत अर्ज करता येईल.

#5. अर्ज कसा करावा 

  • अर्ज हा तुमच्या जिल्हातील किंवा तालुक्यातील जाहिरात प्रसिद्ध झाल्या नंतर करता येईल.
  • जाहिरात तुमच्या जिल्हाच्या वेबसाईट वर प्रसिद्ध केली जाते.
  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ( जेव्हा अर्ज online सुरु होईल तेंव्हा कळवण्यात येईल )
  • अर्ज तुम्हाला जाहिराती मध्ये दिला जाईल
  • .अर्ज व्यवस्थित भरून कार्यालयात जमा करायचा आहे. पत्ता जाहिराती मध्ये दिला जातो.
  • नंतर अर्जाची छाननी केली जाते.

#6.  मानधन 

  • मदनीस पदासाठी सर्व एकत्रित मानधन दरमहा ४४२५ रुपये दिले जाते.
  • अंगणवाडी मदतनीस ला ४५०० पेक्षा जास्त मानधन दिले जाते.

#7. निवड कशी होते 

Maharashtra Anganwadi Bharti 2024

  • Maharashtra Anganwadi Bharti 2024:अंगणवाडी सेविका किंवा मदनीस यांची निवड हि त्यांच्या मार्क नुसार होते . यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतली जात नाही.

#8. भरती प्रकिया 

  • निवड प्रक्रिया हि सरळसेवा सारखी होते. सरळ नियुक्ती केली जाते.
  • फॉर्म हे सध्या तरी ऑफलाईन आहे.
  • ज्या उमेदवारास जास्त गुण असेल त्या उमेदवारास नियुक्ती दिली जाते.
  • नियुक्ती झाल्या पासून ३० दिवसात रुजू होणे आवश्यक आहे. जर रुजू झाला नाही तर प्रतीक्षा यादी तील गुणानुसार नियुक्ती दिली जाते . जी प्रतीक्षा यादी जाहीर केली जाते टी एक वर्ष पर्यंत वैध असते केंवा पण एका वर्षात प्रतीक्षा यादीतील उमेदवार पात्र होऊ शकतो.

#9. गुण कसे दिले जातात 

  • Maharashtra Anganwadi Bharti 2024:उमेदवारास गुण हे शैक्षणिक गुणपत्रिका नुसार दिले जातात. गुणपत्रिका मध्ये  मिळालेल्या गुणांच्या आधारे ७५ गुण हे दिले जातात . जसे जास्त गुण तसे मार्क .
  • आणखी २५ गुण असतात . ते गुण तुम्हाला तुमच्या पुढील शिक्षणानुसार दिले जातात. तुमचे जास्त शिक्षण असेल तर ५ गुण तुम्हाला जास्तीचे दिले जातात . या पद्धतीने गुण दिले जातात.

Aaple Sarkar Seva Kendra Registration – आपले सरकार सेवा केंद्र कसे सुरु करावे

Aaple Sarkar Seva Kendra Registration: आजच्या या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत कि आपले सरकार सेवा केंद्र/सेतू कसे सुरु करावे. आपले सरकार सेवा केंद्र ची स्थापना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 नुसार झाली आहे. सेतू केंद्र सुरु करण्यासाठी तुम्हाला काय पात्रता असणार कोणकोणती कागदपत्रे लागणार.अर्ज कसा करावा लागतो व या आपले सरकार सेवा केंद्र च्या माध्यमातून तुम्हाला रोजगाराची एक नवी संधी मिळेल व याव्दारे तुम्ही लोकांची सेवा करून चांगले पैसे कमवू शकता . या मधून तुम्ही शासकीय कामे,शासकीय प्रमाणपत्रे व आणखी बरेच कामे करू शकता. आपले सरकार सेवा केंद्र कसे सुरु करावे याची सर्व माहिती पाहूया.
सेतू केंद्र कसे सुरु करावे
आवश्यक कागदपत्रे
पात्रता
साहित्य
कोणकोणती कामे करू शकतो
#1. सेतू केंद्र कसे सुरु करावे 
Aaple Sarkar Seva Kendra Registration: सर्व प्रथम आपण सेतू केंद्र किंवा महा ई सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र हे सर्व एकाच अर्थाने वापरली जाणारे वेगवेगळी नावे आहेत म्हणजे एकच सेंटर परंतु नाव अनेक आहेत .
आपले सरकार सेवा केंद्र ची कामे स्वतः सुधा करू शकता त्यासाठी नागरिक लॉगइन देण्यात आले आहे . त्यासाठी या लिंक व क्लीक करा – https://aaplesarkar.mahaonline.gov.in/

आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यासाठी एक प्रोसेस असते या त्यानुसार तुम्ही हे सेंटर किंवा दुकान सुरु करू शकता व शासकीय कामे करू शकता .
सर्व प्रथम तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत किंवा जिल्हा सेतू समिती मार्फत जागा काढल्या जातात .
जिल्हा प्रशासन या जागांची वर्तमान पत्र किंवा ऑनलाईन जिल्हाच्या वेबसाईट वर प्रसिद्ध केली जाते.
जिल्हाची वेबसाईट पाहण्यासाठी तुमच्या जिल्हाचे नाव नंतर .gov.in किंवा .nic.in टाका लगेच वेबसाईट येईल. Ex. buldhana.nic.in , pune.gov.in 
जाहिरात हि गावानुसार दिले जाते . प्रत्येक गावामध्ये लोकसंख्या नुसार जागा निघते.
त्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागीवले जातात .
उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी साठी बोलविले जाते व काही ठिकाणी मुलाखत घेतली जाते . ( CSC चालक किंवा ग्रामपंचायत ऑपरेटर प्राधान्य दिले जाते . )
जे उमेदवार पात्र आहेत त्यांची शिक्षणा नुसार यादी प्रसिद्ध केली जाते
पात्र उमेदवारांना सेतू किंवा आपले सरकार केंद्र दिले जाते .
सेतू भेटणे म्हणजेच Maha Online ID दिला जातो त्याला VLE ID सुधा म्हणतात .
#2.आवश्यक कागदपत्रे 
आधार कार्ड
पॅन कार्ड
१० वी किंवा 12 वी मार्कशीट
शाळा सोडल्याचा दाखला
चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र
संगणक प्रमाणपत्र /MSCIT
सीएससी प्रमाणपत्र ( असल्यास )
सेंटर आतील बाहेरील फोटो ( लोकेशन सह )
भाडे करार ( जागा भाड्याने असेल तर )
#3. पात्रता  
उमेदवार ज्या गावात जागा निघाली असेल तेथील रहिवासी असावा . तेथील उमेदवार असेल तर त्याला प्राधान्य दिले जाईल .
उमेदवार शासकीय कर्मचारी नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र .
उमेदवार १० वी उतीर्ण असावा.
उमेदवाराकडे १० x १० sq जागा असावी. ( मालकीची अथवा भाडेपट्याची )
उमेदवाराकडे च्यारीत्र्य प्रमाणपत्र असेन आवश्यक .
शॉप ॲक्ट लायसेन्स किंवा ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र .
 

#4. साहित्य 
कॉम्पुटर / लॅपटॉप
बायोमेट्रिक डिव्हाइसेस
प्रिंटर
स्कॅनर
कॅमेरा
#5. कोणकोणती कामे करू शकता 
Aaple Sarkar Seva Kendra Registration: या मधून आपण शासकीय प्रमाणपत्र काढू शकतो . नैसर्गिक आपत्ती आधार प्रमाणीकरण करू शकतो .पिक विमा भरणे ,फॉर्म भरणे, अश्या प्रकारची विविध कामे करू शकता . तसेच शासकीय प्रमाणपत्रे काढू शकता . प्रमाणपत्रे थोडक्यात पाहू.
रहिवासी दाखला
उत्पन्न प्रमाणपत्र
नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र
जातीचे प्रमाणपत्र
वय, अधिवास प्रमाणपत्र
भूमिहीन प्रमाणपत्र
अल्प भूधारक प्रमाणपत्र
शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र
ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
सातबारा उतारा
लायसंस
रेशन कार्ड
पत दाखला प्रमाणपत्र
अश्या पद्धतीचे भरपूर प्रमाणपत्रे तसेच कामे या द्वारे करू शकता .



Character Certificate Online Maharashtra – असा काढा चारित्र्य दाखला

Character Certificate Online Maharashtra: चारित्र्य प्रमाणपत्र किंवा कैरेक्टर सर्टिफिकेट ( character certificate ) हे कोणत्याही व्यक्तीचे चारीत्र्य साफ आहे किंवा नाही याचे दाखला देते. यावरून समजते कि हा व्यक्ती अपराधी/ घुन्हेगार आहे किंवा नाही . या सर्टिफिकेट चे काम तुम्हाला CSC साठी ,सरकारी नोकरी साठी , शाळेसाठी ,कॉलेज साठी किंवा व्यक्तिगत कामासाठी लागते. सर्टिफिकेट कोणत्या कामासाठी पाहिजे यावर या दाखल्याचे स्वरूप असते त्यानुसार कागदपत्रांची पूर्तता करावी लागते . यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. व त्यासाठी NOC लागते ती आपण या पोस्ट मध्ये देणार आहे . कागदपत्रे कोणती लागतात ती सुधा पाहणार आहे . आपण या लेखात सोप्या भाषेत पाहणार आहे कि कश्या प्रकारे आपण च्यारीत्र्य प्रमाणपत्र /कैरेक्टर सर्टिफिकेट काढायचे .
कागदपत्रे
काढण्याची प्रोसेस
कश्यासाठी पाहिजे
असे करा ऑनलाईन अर्ज
#1. कागदपत्रे 
अर्जदाराचा पासपोर्ट फोटो
ओळखपत्र – आधार कार्ड /मतदान कार्ड /पॅन कार्ड
वयाचा पुरावा – शाळा सोडण्याचा दाखला / SSC Marksheet / जन्म प्रमाणपत्र
पत्ता पुरावा – रेशन कार्ड /लाईट बिल /भाडेकरार
NOC लेटर / कंपनी लेटर 

#2. काढण्याची प्रोसेस
Character Certificate Online Maharashtra: पोलीस व्हेरिफिकेशन काढण्यासाठी तुम्हाला कोणत्या कामासाठी पाहिजे यावर वरून त्याचे डॉक्युमेंट द्यावे लागतात . दुसरे म्हणजे ज्या ठिकाणी चारित्र्य प्रमाणपत्र द्यायचे, तेथील noc तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे तो आपण कसा करायचा समोर बघणार आहोत. आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्जामध्ये तुमची सर्व माहिती व्यवस्थित भरायची . त्यानंतर त्या फॉर्म चे पेमेंट करायचे आहे.फॉर्म ची प्रिंट तुम्हाला तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशन नेऊन सादर करायचा आहे किंवा काही ठिकाणी फिजिकल सादर करावा लागत नाही. पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट ( पीसीसी ) काढण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये तुमच गुन्हेगार रेकॉर्ड चेक केले जाते. नंतर त्याला मान्यता दिली जाते व तेथून जिल्हा पोलीस कार्यालयात मान्यता मिळते. त्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तुमचं प्रमाणपत्र मिळते. ऑनलाईन पोर्टल वर किंवा पोलीस स्टेशन मध्ये मिळेल. यासाठी साधारण तुम्हाला १५ दिवसाचा कालावधी लागतो .
3. कश्यासाठी पाहिजे 
Character Certificate Online Maharashtra: तुम्ही चारित्र्य प्रमाणपत्र काढत असाल ते कोणत्या कामासाठी पाहिजे तेथील माहिती तुम्हाला ध्यावी लागेल . तेथील पत्ता तुम्हाला फॉर्म मध्ये द्यावा लागेल. यामध्ये तुम्ही csc साठी काढू शकता किंवा नोकरी साठी काढू शकता किंवा कंपनी मध्ये देऊ शकता .

 NOC लेटर : Download
 

#4. असे करा ऑनलाईन अर्ज   
Character Certificate Online Maharashtra: तुम्हाला ज्या राज्यात काढायचे त्या प्रत्येक राज्याची प्रोसेस वेगवेगळी आहे . आपण महाराष्ट्र मध्ये कसा अर्ज करायचा हे पाहणार आहे.
सर्व प्रथम तुम्हाला या वेबसाईट यायचे आहे – https://pcs.mahaonline.gov.in/Forms/Home.aspx
Step 1. Registration
येथे तुम्हाला Service मध्ये जाऊन Character Certificate हा ऑप्शन निवडायचा आहे. यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे. तुमची वैयक्तिक माहिती व्यवस्तीत भरायची आहे.

Step 3. Login and Fill Application

Character Certificate Online Maharashtra: येथे तुम्हाला ID आणि Password टाकून लॉगइन करायचे आहे. आणि तुमची माहिती भारायची आहे . तुमचे जवळचे स्थानिक पोलीस स्टेशन निवडायचे आहे . तुमची सर्व कागदपत्रे येथे १०० kb च्या आत मध्ये अपलोड करायची आहे . फॉर्म ची फीस भरून लोकल किंवा स्थानिक पोलीस स्टेशन ला द्यायचे आहे. पोलीस स्टेशन ला मान्यता भेटल्यावर तुमचा फॉर्म जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जाईल. तेथून तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये किंवा पोर्टल वर online तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र मिळेल .