Thursday, April 30, 2020

पालघर तिहेरी हत्याकांड: आरोपींना पुन्हा 14 दिवसांची पोलिस कोठडी



डहाणू तालुक्यातील कासा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गडचिंचले येथे 16 एप्रिल रोजी झालेल्या 2 साधू व त्यांच्या चालकाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या 101 आरोपींना डहाणू येथील न्यायालयाने आज पुन्हा 14 दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले आहे. त्या सर्वांना 17 एप्रिल रोजी अटक करण्यात आलेली आहे.

गडचिंचले हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी 110 जणांना अटक केली होती. त्यातील 9 जण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. उर्वरित 101 जणांना 18 एप्रिल रोजी डहाणू येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, त्यांना 30 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती. ही मुदत संपल्याने आज सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पुढील 14 दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. आज मृतांच्या निकटवर्तीयांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ पी. एन. ओझा यांनी वकीलपत्र दाखल केले.

मृतांच्या निकटवर्तीयांच्या वतीने वकीलपत्र दाखल करणारे ज्येष्ठ विधिज्ञ पी. एन. ओझा प्रसार माध्यमांशी बोलताना

पोलिसांनी 101 आरोपींना 18 एप्रिल रोजी खूनाच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्या प्रकरणी 12 दिवसांची पोलिस कोठडीची मुदत संपत असताना आज पोलिसांनी याच प्रकरणात दाखल केलेल्या अन्य गुन्ह्यात तपासासाठी 14 दिवसांची पुन्हा पोलिस कोठडी मागितली व न्यायालयाने मागणी मंजूर केली. पोलिसांनी गडचिंचले प्रकरणी एकूण 3 गुन्हे दाखल केले आहेत.

आज डहाणू न्यायालय परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालयाकडे जाणारे रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्यात आले होते. केवळ पोलिस, वकील व पत्रकारांना परिसरात प्रवेश देण्यात आला. पत्रकारांना न्यायालयाच्या आवारात थेट प्रवेश नाकारण्यात आला. 101 आरोपींना विविध पोलिस स्टेशनच्या कोठड्यांमध्ये 15/20 च्या गटात विभागणी करुन ठेवण्यात आलेले आहे.

Wednesday, April 29, 2020

महाराष्ट्र- आदिवासी विकास विभागाची महत्वाची सूचना विविध भागात अडकलेल्या लोकांना मदतीचे नियोजन

महाराष्ट्र- आदिवासी विकास विभागाची महत्वाची  सूचना विविध भागात अडकलेल्या लोकांना मदतीचे नियोजन  कोरोना विषाणू उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तसेच राज्याबाहेरील विविध ठिकाणी रोजगारासाठी गेलेले आदिवासी बांधव लॉकडाऊनमुळे  महाराष्ट्र राज्यात व इतर  राज्यात अडकून पडलेले आहेत. या मजुरांना आपल्या मुळ गावी आणण्याकरीता  लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. मा मंत्री.ॲड.के.सी पाडवी, आदिवासी विकास विभागाच्या नियोजनाचा पुर्वतयारीचा भाग म्हणून  अशा अडकलेल्या सर्व आदिवासी मजुर  बांधवांचा डाटाबेस(याद्या) तयार करण्याचे ठरविले आहे. तरी सर्व संबंधीताना, त्यांच्या नातेवाईकांना, माहीतगार व्यक्ती व संस्था यांना विनंती करण्यात येते की, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या व्यक्तीचे नाव पत्ता मोबाईल फोन नंबर सह यादी मा. मंत्री.ॲड.के.सी पाडवी, आदिवासी विकास विभाग यांच्या कार्यालयाचे खालील अधिकारी यांचेकडे त्वरित संपर्क साधून  याद्या देण्या बाबत आपणास विनंती करण्यात येत आहे.  परराज्यात व राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना अधिक माहिती साठी संपर्क खालील नंबरवर साधावा  1. राजू वसावे विशेष कार्य अधिकारी संपर्क- 8888631442 2. अमोल चव्हाण संपर्क- 9404449218


महाराष्ट्र- आदिवासी विकास विभागाची महत्वाची  सूचना विविध भागात अडकलेल्या लोकांना मदतीचे नियोजन



मुंबई- कोरोना विषाणू उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तसेच राज्याबाहेरील विविध ठिकाणी रोजगारासाठी गेलेले आदिवासी बांधव लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र राज्यात व इतर  राज्यात अडकून पडलेले आहेत. या मजुरांना आपल्या मुळ गावी आणण्याकरीता  लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. मा मंत्री.ॲड.के.सी पाडवी, आदिवासी विकास विभागाच्या नियोजनाचा पुर्वतयारीचा भाग म्हणून  अशा अडकलेल्या सर्व आदिवासी मजुर  बांधवांचा डाटाबेस(याद्या) तयार करण्याचे ठरविले आहे. तरी सर्व संबंधीताना, त्यांच्या नातेवाईकांना, माहीतगार व्यक्ती व संस्था यांना विनंती करण्यात येते की, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या व्यक्तीचे नाव पत्ता मोबाईल फोन नंबर सह यादी मा. मंत्री.ॲड.के.सी पाडवी, आदिवासी विकास विभाग यांच्या कार्यालयाचे खालील अधिकारी यांचेकडे त्वरित संपर्क साधून  याद्या देण्या बाबत आपणास विनंती करण्यात येत आहे.

परराज्यात व राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना अधिक माहिती साठी संपर्क खालील नंबरवर साधावा

1. राजू वसावे विशेष कार्य अधिकारी
संपर्क- 8888631442
2. अमोल चव्हाण
संपर्क- 9404449218

Tuesday, April 28, 2020

पालघर जिल्ह्यात दिवसभरात 4 कोरोना रुग्णाचे वाढ


पालघर जिल्ह्यात आजच्या दिवसांत कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 3 ने वाढून 154 झाली आहे. हे 3 रुग्ण वसई महापालिका क्षेत्रातील आहेत.

उद्यापासून 4 दिवस पालघर शहरात पूर्ण Lock Down ची अंमलबजावणी.
पालघर शहरामध्ये काल कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर आता नगरपरिषदेने 29 एप्रिल पासून 2 मे पर्यंत शहरामध्ये औषध विक्री व्यतिरिक्त सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. काल सायन येथे स्टाफ नर्स म्हणून काम करणाऱ्या पालघर येथील 56 वर्षीय महिलेला कोरोना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते.

29 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बंद.
जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे संपूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी 29 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज लोकांसाठी उपलब्ध रहाणार नाही.

सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी रहावे! जिल्हाधिकारी यांच्या सूचना
काही सरकारी अधिकारी व कर्मचारी हे पालघर जिल्ह्याबाहेर सेवेत असतात व येथून ये – जा करतात आणि काही जिल्ह्यात नेमणूकीला असताना जिल्ह्याबाहेरुन ये- जा करतात. यापुढे अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयात राहून सेवा देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. जिल्ह्याबाहेरुन येण्यास व जाण्यास आता मनाई करण्यात आली आहे.

मास्क न वापरणे, थुंकणे, सोशल डिस्टन्सींग न पाळणे याविरोधात आता दंडात्मक कारवाई.
कोव्हिड 19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नियमांचे पालन न करणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले आहे. दंडाची तरतूद पुढीलप्रमाणे:-
सार्वजनिक स्थळी मास्क न वापरणे – रु. 200
सार्वजनिक स्थळी थुंकणे – रु. 500
दुकानदारांनी सोशल डिस्टन्सींग न पाळणे :-
दुकानदाराकडून – रु. 2,000
ग्राहकाकडून – रु. 200
जीवनावश्यक वस्तुंचे दरपत्रक न लावणे – रु. 2,000

Monday, April 27, 2020

पालघर जिल्ह्यात दिवसभरात 3 +Ve बरे झाले व 7 +Ve वाढले


पालघर जिल्ह्यातील कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या आता 44 झाली आहे. आज नव्या 7 कोरोना +ve रुग्णांची भर पडून आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 146 झाली आहे. त्यातील 6 जण विरार वसई महानगर क्षेत्रातील असून 1 बोईसर येथील आहे.

आतापर्यंत निष्पन्न झालेल्या 146 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे:

  • विरार वसई महानगर क्षेत्र – 125 (त्यातील 8 मृत्यू)
  • वसई ग्रामीण क्षेत्र – 1 (1 मृत्यू)
  • पालघर तालुका – 12 (त्यातील 1 मृत्यू)
  • डहाणू तालुका – 8

आतापर्यंत 2693 लोकांच्या घशाचे नमुने तपासले. त्यातील 2434 तपासणी अहवाल प्राप्त झाले. 259 अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.

  • 146 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह (6 %)
  • 2388 अहवाल कोरोना निगेटिव्ह (94 %)
  • 2898 जण होम क्वारन्टाईन आहेत.
  • 425 जणांना इन्स्टीट्यूशनल क्वारन्टाईन केलेले आहे.
  • 92 रुग्ण लक्षणे आढळल्यामुळे रुग्णालयात दाखल.
  • 41 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला.
  • 2693 जणांचे घशाचे नमुने घेतलेले आहेत.
  • 2388 नमुने निगेटिव्ह.
  • 259 तपासणी अहवाल प्राप्त होणे बाकी बाकी आहे.
  • 146 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह. व त्यातील 10 पॉझिटीव्ह रुग्णांचा मृत्यू.

सध्या 92 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालय – 6
बोळींज हॉस्पिटल – 14
रिद्धीविनायक हॉस्पिटल (नालासोपारा) 14
सेव्हन हिल हॉस्पिटल – 6
डहाणू उप जिल्हा रुग्णालय – 1 
टिमा (बोईसर) – 14
अग्रवाल हॉस्पिटल (वालिव) – 13
कौल सिटी आयसोलेशन – 9
रिलायन्स (मुंबई) – 2
भक्ती वेदांत (मीरा रोड) – 1
ब्रीच कॅन्डी (मुंबई) – 1
नायर हॉस्पिटल (मुंबई) – 1
नवनीत हॉस्पिटल (दहिसर) – 1
फोर्टीस हॉस्पिटल (मुंबई) – 1
बॉम्बे हॉस्पिटल – 1
लिलावती हॉस्पिटल – 1
भाभा हॉस्पिटल – 1
केईएम  – 1
सायन हॉस्पिटल – 1
ग्रामीण रुग्णालय पालघर – 1
ट्रॉमा हॉस्पिटल – 1

याव्यतिरिक्त ग्रामीण रुग्णालय (पालघर) येथे 9 (1 वाढला), डहाणू उप जिल्हा रुग्णालय येथे 5 (2 वाढले) व बोळींज येथे 1 रुग्ण दाखल असून ह्या रुग्णांना कोरोना बाधेची लक्षणे आढळली आहेत.

पालघर जिल्ह्यात 41 +Ve बरे झाले व 7 नवे +Ve मिळाले


पालघर जिल्ह्यातील कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या आता 41 झाली आहे. डहाणू तालुक्यातील पहिल्या कोरोना बाधीत 3 वर्षीय मुलीच्या सलग 3 चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर आज तिला घरी सोडण्यात आले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी सौरभ कटीयार, तहसीलदार राहुल सारंग, आणि उप जिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. हिंगणे यांच्या उपस्थितीत मुलीला पुष्पगुच्छ देत व टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात आला. आज रोजी पालघर जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आता 138 असून त्यातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे व 41 जण पूर्णत: बरे झाले आहेत.

आतापर्यंत निष्पन्न झालेल्या 138 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे:

  • विरार वसई महानगर क्षेत्र – 118 (त्यातील 8 मृत्यू)
  • वसई ग्रामीण क्षेत्र – 1 (1 मृत्यू)
  • पालघर तालुका – 11 (त्यातील 1 मृत्यू)
  • डहाणू तालुका – 8

आतापर्यंत 2659 लोकांच्या घशाचे नमुने तपासले. त्यातील 2051 तपासणी अहवाल प्राप्त झाले. 508 अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.

  • 138 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह (7 %)
  • 2013 अहवाल कोरोना निगेटिव्ह (93 %)
  • 2828 जण होम क्वारन्टाईन आहेत.
  • 402 जणांना इन्स्टीट्यूशनल क्वारन्टाईन केलेले आहे.
  • 87 रुग्ण लक्षणे आढळल्यामुळे रुग्णालयात दाखल.
  • 41 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला.
  • 2659 जणांचे घशाचे नमुने घेतलेले आहेत.
  • 2013 नमुने निगेटिव्ह.
  • 508 तपासणी अहवाल प्राप्त होणे बाकी बाकी आहे.
  • 138 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह. व त्यातील 10 पॉझिटीव्ह रुग्णांचा मृत्यू.

सध्या 87 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालय – 6
बोळींज हॉस्पिटल – 15
रिद्धीविनायक हॉस्पिटल (नालासोपारा) 15
सेव्हन हिल हॉस्पिटल – 7
डहाणू उप जिल्हा रुग्णालय – 1 
टिमा (बोईसर) – 14
अग्रवाल हॉस्पिटल (वालिव) – 9
कौल सिटी आयसोलेशन – 8
रिलायन्स (मुंबई) – 2
भक्ती वेदांत (मीरा रोड) – 1
ब्रीच कॅन्डी (मुंबई) – 1
नायर हॉस्पिटल (मुंबई) – 1
नवनीत हॉस्पिटल (दहिसर) – 1
फोर्टीस हॉस्पिटल (मुंबई) – 1
बॉम्बे हॉस्पिटल – 1
लिलावती हॉस्पिटल – 1
भाभा हॉस्पिटल – 1
केईएम  – 1
सायन हॉस्पिटल – 1

याव्यतिरिक्त ग्रामीण रुग्णालय (पालघर) येथे 8, डहाणू उप जिल्हा रुग्णालय येथे 3 व बोळींज येथे 1 रुग्ण दाखल असून ह्या रुग्णांना कोरोना बाधेची लक्षणे आढळली आहेत.