Sunday, December 21, 2025
NA, N.A.-R, N.A.-Commercial या तीन शब्दात किती लोक अडकतात
Sunday, December 14, 2025
e-KYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Sunday, December 7, 2025
पीएम किसान लाभार्थीचे हफ्ते बंद होणार | Pm Kisan Ineligibility new Update
Pm Kisan Ineligibility new Update
Pm kisan प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता अर्थात २२ वा हप्ता हा फक्त Agristack scheme Farmer ID असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.
यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप Farmer ID काढलेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपले Farmer Id काढून घ्यावेत असे आवाहन शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.
एकंदरीत pm kisan 20th installment वितरीत करत असताना Farmer ID बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तशा शासन स्तरावर हालचाली सुरू देखील करण्यात आल्या होत्या.
मात्र यामध्ये काही वेळ सूट देण्यात आली.
आता pm kisan 22th installment वितरण होत असताना मात्र Farmer ID बंधनकारक करण्यात येत आहे.
Pm kisan योजनेत पात्र असलेले लाभार्थी हे नमो शेतकरी महासमान निधी योजनेत पात्र होतात पर्यायाने या दोन्ही योजनाचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांकडे Farmer ID असणे गरजेचे असणार आहे.
शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या जवळच्या CSC केंद्रावर भेटून किंवा Agristack maharashtra च्या पोर्टल वरून Farmer ID साठी नोंदणी करावी.
Saturday, December 6, 2025
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 3.0 || PMUY 3.0 || ऑनलाईन अर्ज सुरु
Friday, October 24, 2025
लाडकी बहीण e-KYC साठी शेवटची संधी! पडताळणीची अंतिम तारीख जाहीर – आजच करा प्रक्रिया पूर्ण!
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ही महिलांसाठी खूप मोठी आणि उपयुक्त योजना आहे. या योजनेत पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० ची थेट आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. पण ही मदत नियमितपणे मिळत राहावी, यासाठी e-KYC (इलेक्ट्रॉनिक पडताळणी) प्रक्रिया पूर्ण करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे.
सरकारने यासाठी अंतिम तारीख (Last Date) देखील जाहीर केली आहे.
e-KYC पूर्ण करण्याची अंतिम तारीख (Last Date):
सर्व पात्र महिलांनी आपली e-KYC प्रक्रिया नोव्हेंबर २०२५ च्या शेवटपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.
जर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही, तर पुढील महिन्याचा ₹१५०० चा हप्ता थांबवला जाईल, असे महिला आणि बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच, उशीर झाल्यास तुमचे नाव कायमचे यादीतून वगळले जाऊ शकते.
पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी विशेष सवलत:
पूराचा फटका बसलेल्या २९ जिल्ह्यांतील महिलांना १५ दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ मिळणार आहे.
e-KYC का करावी लागते?
या प्रक्रियेमुळे सरकारला हे समजते की, खऱ्या पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळत आहे.
e-KYC करताना आधार पडताळणीद्वारे बनावट किंवा अपात्र नावे यादीतून वगळली जातात.
तसेच, पती किंवा वडिलांच्या आधारद्वारे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२,५०,००० पेक्षा जास्त नसावे हे तपासले जाते.
e-KYC करण्याची सोपी पद्धत
तुम्ही ही प्रक्रिया मोबाईलवर किंवा जवळच्या सेवा केंद्रात जाऊन सहज करू शकता.
टप्पा १ – लाभार्थी महिलेची आधार पडताळणी:
- वेबसाइट उघडा ladakibahin.maharashtra.gov.in
- “e-KYC” बॅनरवर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा.
- ‘Send OTP’ वर क्लिक करा आणि मोबाईलवर आलेला OTP टाका.
- OTP योग्य भरल्यानंतर पडताळणी यशस्वी झाल्याचा संदेश दिसेल.
टप्पा २ – पती/वडिलांची आधार पडताळणी:
तुमच्या वैवाहिक स्थितीनुसार खालीलप्रमाणे आधार क्रमांक टाका:
- विवाहित महिला → पतीचा आधार
- अविवाहित महिला → वडिलांचा आधार
- विधवा किंवा घटस्फोटित → वडिलांचा आधार
त्या व्यक्तीच्या मोबाईलवर आलेला OTP टाकून पुढे जा.
टप्पा ३ – घोषणापत्र (Declaration):
तुमचा जात प्रवर्ग निवडा.
दोन प्रश्नांची उत्तरे द्या (होय/नाही).
शेवटी ‘Submit’ क्लिक करा.
“तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसल्यावर प्रक्रिया पूर्ण होते.
e-KYC करताना येणाऱ्या अडचणी आणि उपाय:
कधी कधी वेबसाइटवर Server Error किंवा OTP न मिळणे अशा समस्या येतात.
सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत किंवा रात्री १० नंतर साइट वापरल्यास प्रक्रिया सोपी होते.
जर अडचण कायम राहिली, तर जवळच्या अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सेतु सुविधा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रात मदत घ्या.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक मोठी आर्थिक मदत योजना आहे.
ही मदत नोव्हेंबर २०२५ नंतरही मिळत राहावी, यासाठी e-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.
म्हणून सर्व लाडक्या बहिणींनी उशीर न करता आजच आपली e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी.