Pages

▼

Pages

▼

Pages

▼

Monday, April 6, 2020

कोरोनाचा 3 रा बळी झाले पालघर जिल्ह्यात!


जिल्ह्यात आतापर्यंत 17 जणांचे तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यातील नालासोपारा येथे आणखी 1 रुग्ण दगावल्यामुळे मृत्यूंची संख्या 3 झाली आहे. यातील 2 मृत्यू वसई महानगर क्षेत्रातील आहेत, तर एक मृत्यू पालघर तालुक्यातील आहे.

142 तपासणी अहवाल निगेटिव्ह: एकूण 281 जणांचे घशाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असून, आज रोजी पर्यंत, 142 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 122 अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. 281 पैकी 30 जण परदेशात जाऊन आलेले, 188 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या निकट संपर्कात आलेले व 63 जण कोरोनाची लक्षणे दिसणारे मात्र परदेशी न गेलेले अथवा अशा व्यक्तींच्या संपर्कात न आलेले आहेत

होम क्वारन्टाईन चा भंग करणाऱ्या 175 लोकांना सक्तीचे क्वारन्टाईन: वसई तालुक्यात होम क्वारन्टाईन केलेल्या 175 जणांनी आदेश न पाळल्यामुळे त्यांना सक्तीने इंस्टीट्यूशनल क्वारन्टाईन करण्यात आले आहे.

सध्या 14 रुग्ण पुढीलप्रमाणे दाखल आहेत. कस्तुरबा रुग्णालय (मुंबई) – 3; ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालय – 1; जसलोक (मुंबई) – 1; एमजीआरएम (पवई) – 3; रहेजा हॉस्पिटल (मुंबई) – 1; बोळिंज हॉस्पिटल (वसई) – 4; डहाणू उप जिल्हा रुग्णालय – 1; रिद्धीविनायक हॉस्पिटल (नालासोपारा) 1.

No comments:

Post a Comment