Saturday, May 27, 2023

डहाणू, तलासरी तालुक्यातील गावांना भूकंपाचे धक्के ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शनिवारी (27 मे) एका पाठोपाठ दोन भूकंपाचे धक्के बसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चांगलीच घबराट पसरली आहे. सुदैवाने या भूकंपाची तीव्रता मी असल्याने कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिक घराबाहेर पडले आणि सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबले.
भूकंपाच्या धक्क्यांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू , तलासरी  तालुक्यातील काही गावं पुन्हा हादरली आहेत. मागील काही वर्षांपासून डहाणू, तलासरी तालुक्यातील गावांना भूकंपाचे धक्के बसत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून भूकंपाचे धक्के थांबले होते. मात्र, शनिवारी लागोपाठ दोन भूकंपाचे धक्के जाणवले. पहिला धक्का सकाळी 5 वाजून 16 मिनिटाला 3.5 रिस्टर स्केलचा, तर 5 वाजून 24 मिनिटांनी जाणवलेल्या दुसऱ्या भूकंपाची तीव्रता 3.3 रिस्टर स्केल एवढी करण्यात आली .
डहाणू, तलासरी परिसरातील गावांना  भूकंपाचे धक्के बसत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डहाणू, घोलवड, बोर्डी, धुदवाडी, तलासरी ही गावं भूकंपाच्या धक्क्याने हादरली आहेत. गुजरात राज्यातील उंबरगाव,  आणि दादरा-नगर हवेली येथील सिल्वासापर्यंत भूकंपाचे हादरे बसले आहेत. यात जीवितहानी झाली नसून काही घरांना मात्र तडे गेले आहेत.
मागील महिन्याभरात भूकंपाचा हा दुसरा जोरदार धक्का बसल्याच्या या घटनेने अनेक तर्कवितर्क लावले जात असून चर्चांना उधाण आले आहे. 23 नोव्हेंबर 2022 ला 3.3 रिस्टर स्केलचा धक्का बसला होता, त्यानंतर आज पुन्हा हे धक्के सुरू झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात भूकंपाची भीती वाढल्याने नागरिक चिंतेत आहेत.

Friday, May 26, 2023

पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता जून महिन्यात

PM KISAN SANMAN YOYANA



पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरीत होणार असून राज्यातील १८.४८ लाख लाभार्थीं eKYC केले नसल्याने ते लाभापासून वंचित राहणार आहेत.

यास्तव सर्वांना विनंती करण्यात येते की, प्रलंबित लाभार्थींचे eKYC करण्यासाठी खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.


१. युद्ध पातळीवर प्रलंबित लाभार्थींचे eKYC प्रमाणीकरण करावयाचे आहे.
२. Google Play Store वर उपलब्ध असलेल्या PM KISAN GOI अॅपद्वारे एका नोंदणीकृत लाभार्थींस इतर १० लाभार्थींचे eKYC करता येईल.
२. eKYC प्रलंबित लाभार्थींच्या याद्या पी. एम. किसान पोर्टलवर उपलब्ध आहेत.
३. या प्रलंबित लाभार्थींना प्रत्यक्ष संपर्क करून त्यांचे eKYC समक्ष करून घ्यावे.
४. या कामाची प्राथमिकता पाहता या शनिवारी व रविवारी गावपातळीवर आयोजित मोहिमांचे कामकाज सुरू ठेवावे.
५. या कामी CSC व IPPB यांचेही सहकार्य घेण्यात यावे.
६. कोणत्याही परिस्थितीत दिनांक ३१ मे, २०२३ पर्यंत प्रलंबित लाभार्थींचे eKYC पूर्ण करण्यात यावे.
७. उपरोक्त अॅप आधारे प्रलंबित लाभार्थींचे face authentication करून e KYC पूर्ण करावे.


खालील पीएम किसान योजनेविषयी अधिक माहितीसाठी क्लिक करा.


पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनाचे नविन नोंदणी सुरु || PM KISAN SANMAN NIDHI YOJANA NEW REGISTRATION


नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही जाहीर आणि एवढे भेटणार!!!


पोस्ट कार्यालयातच उघडा बँक खाते


तुम्ही किसान क्रेडिट कार्ड वापरता का? मग ही बातमी नक्की वाचा, नाहीतर बसेल मोठा भुर्दंड

PM किसान सन्मान निधि योजना : शेतकऱ्याना शेतीसाठी मिळाले 62 हजार करोड रुपये चा मदत
गावातूनच करा बँक ला आधार लिंक


Wednesday, May 24, 2023

होम लोन घेताना कोणत्या विषयी माहिती लक्षात ठेवावे!



home loan

मोठ्या शहरात अगदी प्राइम लोकेशनवर सर्व सोयींनी सुसज्ज असे घर असावे, असे कुणाला बरे वाटत नाही. यासाठी लोक काटकसरीने राहतात, बचत करतात, प्रसंगी कर्जही काढतात. कर्ज काढण्यासाठी लोक बँकेत जातात अथवा एखाद्या मध्यस्थाला गाठतात. घरासाठी कर्ज काढायचे असेल तर काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.
कोणते कारण ? 
घर खरेदी, घर बांधकाम, जमीन खरेदी, गृह विस्तार, गृह नूतनीकरण, टॉप-अप होम लोन (आधीच्या कर्जावर), एनआरआय गृहकर्ज
पात्रता कशी ठरते?
होम लोन घेताना वय जितके कमी असेल तितकी मंजुरी मिळण्याची शक्यता जास्त असते. पगारदार किंवा स्वतःचा रोजगार असल्यास होम लोन लवकर मिळते.
■ चांगल्या सिबिल स्कोअरमुळे मंजुरींची प्रक्रिया चटकन होते. जर स्कोअर किमान ७५० वर असेल कर्ज सहज मिळते. तुमच्यावर असलेल्या सध्याच्या इतर देण्याचे मूल्यांकन करून परतफेडीची क्षमता तपासली जाते.

किती कर्ज मिळते?
तुमच्या मासिक पगाराच्या ५० टक्के रक्कम कर्जाच्या हप्त्यापोटी भरता येईल, अशी तुमची क्षमता गृहीत धरली जाते. दर महिन्याला तुमच्या हातात जितके जास्त पैसे येतील, तितकी होम लोनची रक्कम वाढेल.
कोणती कागदपत्रे ?
आधार, पॅन कार्ड, पासपोर्ट / मतदार ओळखपत्र / चालक परवाना, नियोक्ता ओळखपत्र, सैलरी स्लिप, व्यवसाय पत्त्याचा पुरावा, व्यवसाय परवाना कागदपत्रे, पत्ता पुरावा वीज बिल, मालमत्ता कर कागदपत्रे, पोस्टपेड मोबाइल बिल, पासपोर्ट आकाराचा फोटो में १६ किंवा आयकर रिटर्नसह ६ महिन्यांचे जुने बैंक स्टेटमेंट व्याजदर कसे निवडावेत?

फिक्स्ड रेट
ठरलेल्या व्याजदरानेच गृहकर्जाची पूर्ण परतफेड होईपर्यंत असे भरावे लागतात.

फ्लोटिंग रेट
यात दर बाजारातील व्याजदरातील चढउतारानुसार बदलतात, व्याजदर वाढतो तेव्हा असेही वाढतात. कमी असेल, तेव्हा हप्त्याची रक्कम कमी होते.

घराच्या एकूण किमतीच्या ८० ते ९० टक्के रक्कम होमलोन म्हणून मिळते. यात नोंदणी, हस्तांतरण आणि मुद्रांक शुल्क यांचाही समावेश असतो.

Monday, May 15, 2023

रात्री दहापर्यंत चालेल आपला दवाखाना; पैसे न घेता तपासणी

पालघर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ तालुक्यांत दवाखाने सुरू

राज्य  सरकारने मुंबईसह राज्यभरात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सातशे दवाखाने सुरू केले जाणार असून, पालघर जिल्ह्यात आतापर्यंत आठ तालुक्यांत हे दवाखाने सुरू झालेले आहेत. मुंबईसह राज्यभरातील महापालिका आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी दिसून येते. अगदी ताप, सर्दी अशा आजारांसाठीही रुग्णांना उपचार आणि वैद्यकीय टेस्ट करण्यासाठी घरापासून दूर हॉस्पिटल गाठावे लागते. यावर उपाय म्हणून दर २५ ते ३० हजार वस्तींमागे आपला दवाखाना सुरू करण्यात आलेला आहे.



राज्यातील ग्रामीण दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना छोट्या-छोट्या आजारासाठी शहरातील हॉस्पिटलमध्ये जावं लागते, त्यामुळे वैद्यकीय उपचाराला उशीर होतो. शिवाय प्रवासाचा खर्चही होतो. त्याच्यातच राहण्याचीसुद्धा गैरसोय होत असल्याने पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला त्याचा फायदा होणार आहे.
 
"वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना"
  • मोफत तपासणी व मोफत उपचार

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात १ मे पासून 'आपला दवाखाना' सुरु करण्यात आला असून सकाळी ते रात्री दहापर्यंत हे दवाखाने सुरु राहणार असून, १४७ प्रकारच्या विविध वैद्यकीय सेवा मोफत मिळणार असल्याचे जाहीर केले आहे.


'आपला दवाखानाला उत्तम प्रतिसाद मिळत असून औषधोपचार मिळत आहेत.- एक अधिकारी. जिल्हा परिषद

  • विनामूल्य उपचार
गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण, बाह्य यंत्रणेद्वारे मोफत प्रयोगशाळा तपासणी, महिन्याच्या निश्चित दिवशी नेत्रतपासणी, मानसिक आरोग्य व समुपदेशन आवश्यकतेनुसार विशेषत संदर्भ सेवा इत्यादी सेवा देण्यात येणार आहेत.

  • "आपला दवाखाना पालघरमध्ये आठ 'आपला दवाखाना'
पालघर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे आठ आपला दवाखाना सुरु करण्यात आले आहेत.कोणत्या तालुक्यात किती?

तालुका संख्या

अ) पालघर (नवली) १

ब) डहाणू (लोणी पाडा) १

क) तलासरी (नगर पंचायत) १

ड) विक्रमगड (नगर पंचायत) १

इ) जव्हार (मांगेल वाडा) १

दुपारी दोन ते रात्री १० पर्यंत उघडा राहणार

प) मोखाडा (नगर पंचायत) १

फ) वाडा (नगर पंचायत) १

(भ) वसई (महानगरपालिका) १

पालघरमधील 'आपला दवाखाना'त दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत. येथील बहुतांश नागरिक हे शेतकरी, मजूर असल्याने सकाळच्या वेळात त्यांची कामे असतात, त्यामुळे दवाखान्याचा लाभ शेतकरी, कष्टकरी वर्गाला घेता येत आहे.

 

Sunday, May 14, 2023

कृषि विभागाने जाहिर सुचना

महाराष्ट्र शासन तर्फे कृषि विभागाने जाहिर सुचना 

MahaDBT Online Portal वर शेतकरी योजनाचे लाभ घ्यावे.
विविध योजने अंतर्गत शेतकऱ्यानी ऑनलाईन अर्ज भरणे बाबत दिनांक 15/05/2023 पर्यंत ऑनलाईन सोडत असणार आहे. तरी शेतकऱ्यानी सदरील योजनेच्या घटकासाठी ऑनलाईन अर्ज करावे व शासकीय योजनेचा लाभ घ्यावा. 

खालीलप्रमाणे घटक


ट्रैक्टर, रोटाव्हेटर, कल्टीवेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेततळे, प्लास्टीक मल्चींग, रोपवाटिका, फळबाग लागवड, फुल शेती, विदयुत मोटार पंप संच ...
15 मे 2023 नंतर जवळपास 2 ते 3 महिने ऑनलाईन शेतकरी निवड सोडत होणार नाही याची नोंद घ्यावी.