राज्यात आणीबाणीची परिस्थिती आहे. कोरोनाचा गुणाकाराचा काळ आता सुरु झालाय. त्यासाठी जबाबदारीने वागा. घराबाहेर पडू नका. जिथे आहात तिथेच रहा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मोठी दुर्घटना घडेल अशी कोणतीही चूक करू नका, असाही सल्ला त्यांनी दिला आहे.
इतर राज्यांच्या कामगारांनी जिथे आहे तिथेच रहावे. त्यांच्या राहण्या, जेवणाची व्यवस्था केली जात आहे.
On YouTube https://youtu.be/3UnYBAwvTKw
आतापर्यंत १६३ ठिकाणी व्यवस्था सुरु केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.