Wednesday, July 29, 2020

२४ अभिनव स्टार्ट अप्स कल्पनांना मिळणार शासनाच्या विविध विभागातील कामे – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची घोषणा


१०० उत्कृष्ट स्टार्ट अप्सची निवड जाहीर; कृषी, आरोग्य, स्वच्छ ऊर्जा, जल, कचरा व्यवस्थापनातील विविध कल्पक स्टार्टअप तरुणांकडून विकसित

तरुणांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना वाव देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत स्टार्टअप योजना राबविण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे आयोजित केलेल्या स्पर्धेत देशभरातील १ हजार ६०० स्टार्टअप्सनी सहभाग घेतला. त्यातील उत्कृष्ट १०० स्टार्टअप्सची घोषणा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली. तरुणांनी वैशिष्ट्यपूर्ण कल्पकता दाखवत कृषी, शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य, स्वच्छ ऊर्जा, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, प्रशासन आदी विविध क्षेत्रात अभिनव बदल घडवू शकणारे स्टार्टअप सादर केले असल्याचे त्यांनी सांगितले. या कल्पनांचा वापर शासनाच्या विविध विभागांमधील कामकाजासाठी करण्यात येणार आहे.

४ ऑगस्टपासून महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह

निवड झालेल्या १०० स्टार्टअप्सची माहिती www.msins.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ४ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट २०२० दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहात या स्टार्टअप्सचे सादरीकरण केले जाणार आहे. स्टार्टअप्सना त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा यांचे सादरीकरण वरिष्ठ शासकीय अधिकारी, गुंतवणूकदार, तज्ज्ञ यांच्या समितींसमोर करण्याची संधी मिळणार आहे. सद्यस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सादरीकरणसत्रे ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. त्यातील उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सची निवड करुन त्यांना प्रत्येकी १५ लाख रुपयांपर्यंतचे विविध शासकीय कामाचे कार्यादेश देण्यात येतील. त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा संबंधित शासकीय विभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी हे कार्यादेश देण्यात येतील, अशी घोषणाही मंत्री श्री. मलिक यांनी केली.  

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्य केले जाते. याअंतर्गत महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह हा उपक्रम राबविण्यात येतो. यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. स्टार्टअप्सची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा यांचे प्रकल्प शासकीय यंत्रणेत राबवून शासनात नाविन्यता आणणे हे या सप्ताहाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या उपक्रमात उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (DPIIT) मान्यताप्राप्त देशभरातील स्टार्टअप्स भाग घेऊ शकतात. आतापर्यंत झालेल्या दोन सप्ताहामधील विजेत्या स्टार्टअप्सनी राष्ट्रीय आरोग्य मिशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महावितरण, ग्रामविकास, विविध महानगरपालिका, जिल्हा कार्यालये अशा विविध शासकीय संस्था, विभागांसोबत आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना वापरुन काम केले आहे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

दहावीच्या परीक्षेचा आज ऑनलाईन निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर बुधवार 29 जुलै 2020 रोजी दुपारी 1 वा. ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

मार्च 2020 मध्ये दहावी परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील. सदर माहितीची प्रत / प्रिंट घेता येईल. www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.orgwww.maharashtraeducation.comwww.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

या निकालाबाबत अन्य तपशील पुढीलप्रमाणे आहे. ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून दहावी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन http://verification.mh- ssc.ac.in स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय या परीक्षेपासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी गुरुवार 30 जुलै 2020 ते शनिवार 8 ऑगस्ट 2020 पर्यंत व छायाप्रतीसाठी गुरुवार 30 जुलै 2020 ते मंगळवार 18 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबिट  कार्ड, क्रिडेट कार्ड, युपीएल, नेटबँकिंगद्वारे भरता येईल.

मार्च 2020 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असे त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

मार्च 2020 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेस सर्व विषयासह प्रविष्ठ होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी / गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध राहतील, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 


पालघर तालुक्यात 75 रुग्ण पॉझिटिव्ह वाढले



  पालघर तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा रोजच वाढताना दिसत असून आज पुन्हा तालुक्यात नव्या 75 रुग्णांची भर पडली आहे. तर बोईसरमध्ये रुग्णसंख्या अधिकच वेगाने वाढत असून आज येथे तब्बल 42 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पालघर जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज, 28 जुलै रोजी जिल्ह्यात (ग्रामीण) एकूण 114 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाले आहेत. यात निम्म्याहून अधिक रुग्ण पालघर तालुक्यातील (75) आहेत. तर त्याखालोखाल वाड्यात 26 रुग्ण, डहाणूत 8, विक्रमगडमध्ये 3, तलासरीत 1 व जव्हारमध्ये 1 रुग्ण आढळून आला आहे.

बोईसरमध्ये सर्वाधिक 42 रुग्ण!
पालघर ग्रामीणमध्ये मोठा कोरोना हॉटस्पॉट म्हणून पुढे आलेल्या बोईसरमध्ये आज तब्बल 42 रुग्ण आढळून आले आहे.

Tuesday, July 28, 2020

शाळा बंद, पण शिक्षण आहे


राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्या तरी शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी विविध माध्यमांमधून प्रयत्न केले जात आहेत. ज्या शिक्षकांना कोरोना ड्युटी आहे त्या शाळांमधील मुख्याध्यापकांनी पर्यायी शिक्षकांची व्यवस्था उपलब्ध करणे, एकावेळी शाळेतील सर्वच शिक्षकांना ड्युटी न लावता शिक्षक उपलब्ध करुन देण्याच्या स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

प्रसिद्धी माध्यमातून सरकारी शाळांमधील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत अशा आशयाचे वृत्त प्रसारित होत आहे. या वृत्तामध्ये तथ्य नसून यासंदर्भात वस्तुस्थितीदर्शक सविस्तर खुलासा शालेय शिक्षण विभागाच्या मार्फत करण्यात आला आहे.
शाळा बंद पण शिक्षण आहे…

• शाळा बंद .. पण शिक्षण आहे .. या अभ्यासमालेच्या सहाय्याने दीक्षा APP आधारित विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन करण्यासाठीचा उपक्रम गेले ३ महिने सलग सुरु आहे.

• विद्यार्थ्यांसाठी स्वयंशिक्षणासाठी पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिका विकसित करण्यात आली आहे.

• जिओ टी.व्ही वर चार माध्यमांमधून विद्यार्थ्यांसाठी इ. ३ री ते इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करण्यात येत आहेत.

• जिओ सावन या रेडीओ वाहिनीवर देखील कार्यक्रम प्रसारित करण्यात येत आहेत.

• पाठ्यपुस्तके १००% विद्यार्थ्यांना पोहोच करण्यात आली आहेत.

• यु ट्यूब वाहिनीवर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे व्हिडीओ चे Channel सुरु करून त्यावर व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.

• DD सह्याद्री वाहिनीवर टीलीमिली हा शैक्षणिक कार्यक्रम इ.१ ली ते इ.८ वी साठी सुरु करण्यात आला आहे.

शिक्षकांना घरातून विद्यार्थ्यांना अध्यापन करता यावे यासाठी गूगल क्लासरूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

• स्वयंसेवक, शिक्षक वाडी वस्त्यांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत.

शाळा बंद…पण शिक्षण सुरु रहावे यासाठी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती, शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.

उद्या जाहीर होणार दहावीचा ऑनलाईन निकाल

कोरोना महामारीमुळे बारावीसह दहावीचा सुद्धा निकाल वेळेवर लागू शकला नाही. गेल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. आता दहावीचा सुद्धा निकालाची तारीख जाहीर केली आहे.

      महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा नऊ विभागात मार्च २०२० मध्ये १० वीची परीक्षा घेण्यात आली होती.

या वेब साईट वर पाहू शकता दहावीचा निकाल



Monday, July 27, 2020

डहाणू शहरात 14 कोरोना रुग्णबाधित

डहाणू शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज त्यामध्ये 14 जणांची भर पडली आहे. आता शहरातील कोरोना बाधीतांची संख्या 148 झाली आहे. आज निष्पन्न झालेल्या रुग्णांमध्ये रामवाडीतील 7 जण, वृंदावन अपार्टमेंटमधील 2 जण व सरावली, लोणीपाडा, पारनाका, डहाणू गांव, आगर येथील प्रत्येकी 1 जणाचा समावेश आहे. कोरोनाबाधीतांचा वाढता आकडा पहाता लोकांमध्ये भीती पसरली असून कोरोनाच्या प्रसाराची साखळी खंडीत करण्यासाठी लॉक डाऊनची मागणी जोर धरताना दिसते आहे.

पालघर तालुक्यात 57 नवे रुग्ण

पालघर जिल्हा माहिती कार्यालयातर्फे जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार पालघर जिल्ह्यात (ग्रामीण) आज, 27 जुलै रोजी 85 नवे कोरोना (कोविड-19) रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे यापैकी 57 रुग्ण केवळ पालघर तालुक्यातील आहेत. त्यामुळे एकट्या पालघर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1100 वर पोहोचली आहे. समाधानाची बाब म्हणजे या 1100 रुग्णांपैकी 768 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असुन उर्वरित 313 जणांवर उपचार सुरु आहेत. तर 19 रुग्ण कोरोना विषाणूला बळी पडले आहेत.

जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज पालघरमध्ये सर्वाधिक 57, त्याखालोखाल डहाणूत 17, विक्रमगडमध्ये 5, वसई ग्रामीणमध्ये 4 व वाडा तालुक्यातील 2 रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर तलासरी, जव्हार व मोखाडा तालुक्यात आज एकही नव्या रुग्णांची नोंद झालेली नाही.

पालघर तालुक्यातील एकुण रुग्णांची संख्या 1100 वर
पालघर ग्रामीणमधील इतर तालुक्यांच्या तुलनेत पालघर तालुक्यात मोठ्या संख्येने रुग्ण वाढताना दिसत आहेत. मागील एका आठवड्याची आकडेवारी पाहिल्यास काल, 26 जुलै रोजी 38 रुग्ण, 25 जुलै रोजी 33, 24 जुलै रोजी 54, 23 जुलै रोजी 50, 22 जुलै रोजी 33 अशा संख्येने येथील रुग्णांची संख्या वाढताना दिसली आहे.

बोईसरच ठरतोय मोठा हॉटस्पॉट :
पालघर तालुक्यात आज आढळलेल्या 57 रुग्णांपैकी तब्बल 23 रुग्ण केवळ बोईसर भागातच आढळून आले आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासुन बोईसर कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरतोय. तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे येथील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण असुन मोठ्या प्रमाणावर नागरीक अफवांना बळी पडताना दिसत आहेत.

भीमनगरमधील सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतले!
15 जुलै रोजी बोईसरमधील भीमनगर भागात 27 रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. हे 27 रुग्ण परिसरातील अनेकांच्या संपर्कात आल्याने येथील 104 जणांना वाडा व पालघर येथील कॉरंटाईन सेंटरमध्ये हलविण्यात आले होते. या 104 जणांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यातील आणखी 27 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. परिसरात एकुण 54 रुग्ण निष्पन्न झाल्याने व त्यात विविध अफवा पसरल्याने परिसरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोरोना रुग्णामागे दीड लाख रुपये मिळत असून व त्यामुळेच लोकांना मुद्दाम पॉझिटिव्ह दाखवले जात असल्याच्या अफवेमुळे घाबरलेली काही कुटुंबे रातोरात गावी गेल्याचेही प्रकार उघडकीस आले होते. आता या भागातील सर्व रुग्ण यशस्वी उपचार घेऊन घरी परतले असून येथील नागरीकांनी काही अंशी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Sunday, July 26, 2020

पालघर जिल्ह्यात नवे 565 कोरोना +Ve व 9 मृत्यू फक्त 2 दिवसात


पालघर जिल्ह्यात मागील 48 तासांत तब्बल 565 नव्या कोरोना पॉझिटीव्ह व्यक्ती आढळल्या असून त्यातील 385 व्यक्ती वसई महानगर क्षेत्रातील असून 180 व्यक्ती पालघरच्या ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्यात मृत्यूची संख्या 9 ने वाढली असून त्यातील 6 मृत्यू वसई महानगरातील तर 3 मृत्यू पालघर तालुक्यातील आहेत.

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पालघर तालुक्यात सर्वाधिक 71 कोरोना पॉझिटीव्ह आढळले असून त्या खालोखाल डहाणू तालुक्यातील 46 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. वाडा तालुक्यात 35, वसई ग्रामीण तालुक्यात 18, तलासरी तालुक्यात 7, विक्रमगड तालुक्यात 2 व मोखाडा तालुक्यात 1 अशी कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तींची संख्या आहे. जव्हार तालुक्यात नवा एकही रुग्ण निष्पन्न झालेला नाही.

Saturday, July 25, 2020

ई-सीमचा वापर करणाऱ्यांना महाराष्ट्र सायबरचे आवाहन


मुंबई, दि.२२ :-  ई  सिम धारकांनी सायबर गुन्हेगारांपासून सावध राहावे. त्यांच्या फसव्या फोनला बळी पडू नये. यासाठी काळजी घ्यावी,असे आवाहन महाराष्ट्र सायबर तर्फे  करण्यात येत आहे.

सध्या बाजारात नवीन प्रकारचे फोन आले आहेत त्यामध्येच e -सिम किंवा embedded सिमकार्ड असते. हे e -सिमवाले फोन जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला physical सिमकार्डची गरज नसते व तुम्ही e -सिम activate करून पाहिजे ते मोबाईल नेटवर्क योग्य शुल्क भरून वापरू शकता. सध्या सायबर गुन्हेगार या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग विशेषतः airtel मोबाईल कंपनीच्या ग्राहकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी करत आहेत.

फसवणूक

सायबर गुन्हेगार #१२१ या airtel च्या नंबरवर स्वतःचा ई-मेल id हा ग्राहकांच्या नावाने अपडेट करतात व सदर ग्राहकाच्या नावाने e -सिमकार्ड issue करून घेतात. तसेच QR कोडचा वापर करून ते e -सिम activate करून घेतात. त्यानंतर त्या ग्राहकाला एक sms येतो व लिंक असते ज्यावर क्लिक केल्यास एक फॉर्म उघडतो व त्यात तुमची सर्व आर्थिक माहिती जसे की बँक खात्याचा नंबर क्रेडिट/डेबिट कार्ड नंबर पिन नंबर सर्व विचारले जातात. सायबर भामटे त्यांच्या फोन मध्ये तुमच्या नावाचे e -सिम वापरून मग तुमची सर्व बँक खात्यातील रक्कम ट्रान्सफर करून तुमची फसवणूक करतात.

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि,

१) कृपया गरज नसल्यास हे e -सिम activate करू नका .

२) कोणताही ई-मेल id तुमचा ई-मेल id म्हणून देऊ नका .

३)शक्यतो सोशल मीडियावर तुमचा मोबाईल फोन नंबर ठेवू नका .

४) जर तुम्हाला असे e -सिम बद्दल काही फोन आले, तर कृपया लगेच कंपनीच्या कॉल सेंटरला फोन करून त्याची खातरजमा करून घ्या.

५) इंटरनेटवरील कोणत्याही फॉर्मवर तुमच्या बँक खात्याची माहिती डेबिट/क्रेडिट कार्ड नंबर,पिन नंबर देऊ नका . 

केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. कृपया घरीच थांबावे व कारण नसल्यास घराच्या बाहेर पडू नये.                 

असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभाग विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे मार्फत करण्यात आले आहे.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठीचा पाठ्यक्रम कमी – शालेय शिक्षण मंत्री


 कोविड १९ या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रचलित पद्धतीप्रमाणे शाळा सुरु झालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी  इयत्ता १ ली ते १२ वी चा इयत्ता निहाय, विषय निहाय २५% पाठ्यक्रम कमी करण्यात येत आहे, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे.


१०१ विषयांचा २५ टक्के पाठ्यक्रम कमी

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र , महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (बोर्ड) यांच्या समन्वयाने आणि अभ्यासक्रम समितीच्या निर्णयानुसार संबंधित विषयाचे सर्व अभ्यासक्रम मंडळ सदस्यांमार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अभ्यासक्रमाचा मूळ गाभा तसाच ठेवून प्राथमिक स्तरावरील २२, माध्यमिक स्तरावरील २० आणि उच्च माध्यमिक स्तरावरील ५९ असे एकूण १०१ विषयांचा इयत्ता निहाय, विषय निहाय २५% पाठ्यक्रम कमी करण्यात येत असल्याची माहिती प्रा. गायकवाड यांनी दिली आहे.

असा आहे निर्णय

·  पाठ्यक्रमातून २५ % भाग वगळत असताना भाषा विषयामध्ये काही गद्य व पद्य पाठ व त्यावर आधारित स्वाध्याय कृती वगळण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अंतर्गत मूल्यमापन आणि वार्षिक परीक्षा यामध्ये या घटकांवर कोणत्याही कृती विचारल्या जावू नयेत.

· भाषा विषयामध्ये वगळण्यात आलेल्या पाठाला जोडून आलेले व्याकरण किंवा इतर भाषिक कौशल्य वगळण्यात आलेली नाहीत.

· इतर विषयामध्ये कृतीची पुनरावृत्ती टाळणे तसेच काही भाग विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी देण्यात आला आहे.

·  शालेय श्रेणी विषयासंदर्भात परिस्थिती व त्यानुसार उपलब्ध सोयी सुविधा यांचा विचार करून उपक्रम / प्रकल्प घेण्याबाबत सूचित केले आहे.

·  प्रात्यक्षिकांवर आधारित विषयांचे प्रात्यक्षिक कार्य हे अध्ययन – अध्यापन संदर्भाने विचारात घेतलेल्या आशयास अनुसरूनच उपलब्ध परिस्थिती व सोयी सुविधा विचारात घेवून पूर्ण करणेबाबत सूचित केले आहे.

·  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या मार्फत शैक्षणिक दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे. त्या दिनदर्शिकेमधून पाठ्यक्रमातून कमी करण्यात आलेला भाग वगळण्यात येत आहे.   

·   इयत्ता १ ली ते १२ वी चा इयत्ता निहाय, विषय निहाय २५ % पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला भाग www.maa.ac.in आणि www.ebalbharati.in या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात येत आहे.

·  शाळा प्रमुखांमार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी सदर पाठ्यक्रम वगळल्याची नोंद घेवून त्याबाबत सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना अवगत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

Thursday, July 23, 2020

मी उद्योजक होणार- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम {CMEGP}


1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना

महाराष्ट्र शासन.
उद्योग संचालनालय,
जिल्ह्य उद्योग केंद्र.

राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने तरुण /तरूणींना नवीन उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी 

योजनेचे नाव :-
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम {CMEGP}
    

योजने विषयी थोडेसे

योजनेचे संकेतस्थळ :-
http://maha-cmegp.gov.in

योजनेचे कार्यक्षेत्र : महाराष्ट्र

योजनेचे निकष :-
1) वयोमर्यादा 18 ते 45    
(अ जा /अ ज/ महिला / माजी सैनिक याना 50 वर्ष )
2) शैक्षणिक पात्रता
(i) प्रकल्प रु 10 ते 25 लाखासाठी 7 वी पास
(ii) प्रकल्प रु 25 ते 50 लाखासाठी 10 वी पास
3)  उत्पादन उद्योग :-  ( कमाल प्रकल्प मर्यादा )50 लाख
4)  सेवा  उद्योग :- ( कमाल प्रकल्प मर्यादा )10 लाख

प्रकल्प अहवाल खालील विहित निकषांवर  अधारीत असणे आवश्यक आहे
(i) स्थिर भांडवल :- मशीनरी रक्कम कमीत कमी 50%
(iI) इमारत बांधकाम :- जास्तीत जास्त  20% ( iii )खेळते भांडवल :- जास्तीत जास्त  30%

5) स्वगुंतवणूक :- 5 ते 10%

6) अनुदान मर्यादा :- 15 ते 35 %
7) सदर योजना ही नवीन स्थापन होणाऱ्या उद्योगासाठी आहे

8) पात्र मालकी घटक :-  वैयक्तिक , भागीदारी, बचत गट

9) ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लागणारे विहित  कागदपत्र

1)पासपोर्ट साइज फोटो
2) आधार कार्ड
3) जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला /डोमिसीयल सर्टिफिकेट
4) शैक्षणीक पात्रता प्रमाणपत्र (आपले शिक्षण किती झाले याचा पुरावा जसे 10 वी ,12वी, पदवीचे गुणपत्रक )
5)हमीपत्र  (Undertaking Form ) वेबसाईटवर मेनू मध्ये मिळेल
6)प्रकल्प अहवाल
7) जातीचे प्रमाणपत्र ( अ जा /अ ज असेल तर )
8) विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र ( माजी सैनिक, अपंग )
9) REDP/EDP/SDP किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण झाले असेल तर प्रमाणपत्र
10) लोकसंख्याचा दाखला (20000 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर )
11) पार्टनरशिप उद्योग असेल तर i) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
Ii)अधिकार पत्र ,घटना

टीप :- वरील कागदपत्रामधील अनुक्रमांक  1 ते 4 हे 300 KB पर्यंत व  अ क्र 5 आणि 6 हे 1 MB  पर्यंत असावे .

वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ
http://maha-cmegp.gov.in
सदर संकेत स्थळाला भेट दयावी व आजच संकेतस्थळावर अर्ज दाखल करावेत
   
▪5% - 10% स्वतःचे भांडवल
▪60% - 80% बँकेचे कर्ज
▪30% सर्व महिलांसाठी अनुदान राखीव
▪20% SC/ST साठी अनुदान राखीव
एक कुटुंब एक लाभार्थी

माहितीसाठी काही उत्पादन उद्योग/सेवा उद्योगाची यादी

1. थ्रेड बॉल आणि वूलन बॉलिंग लॅचि बनविणे
2. फॅब्रिक्स उत्पादन
3. लॉन्ड्री
4. बारबर
5. प्लंबिंग
6. डिझेल इंजिन पंप्स इटीसीची दुरुस्ती
7. स्प्रेयर्ससाठी टायर व्हॅलसीनीझिंग युनिट अ‍ॅग्रीकल्चर सर्व्हिसेस
8. बॅटरी चार्जिंग
9. आर्ट बोर्ड पेन्टिंग/स्प्रे पेन्टिंग
10 सायकल दुरुस्तीची दुकाने
11 बॅन्ड पथक
12 मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती
13. इलेक्ट्रॉनिक दुरुस्ती
14. ऑफिस प्रिंटिंग आणि बांधणी
15 काटेरी तारांचे  उत्पादन
16 अनुकरण ज्वेलरी (बांगड्या) बनविण
17 स्क्रू/बॉल बीयरिंगचे मॅन्युफॅक्चरिंग
18. ENGG. वर्कशॉप
19. स्टोरेज बॅटरिजचे मॅन्युफॅक्चरिंग
20.हँडमॅड युटेंसिल्स ऑफ कॉपर  उत्पादन
21. रेडिओचे उत्पादन
22. व्होल्टेज स्टॅबिलिझरचे उत्पादन
23 कोरीव वूड आणि आर्टस्टिक फर्निचर बनविणे
24 ट्रंक आणि पेटी उत्पादन
25. ट्रान्सफॉर्मर/ELCT. मोटार पंप/जनरेटर उत्पादन
26. कॉम्प्यूटर असिंबिंग
27 वेल्डिंग वर्क
28. ​​प्लॅटफॉर्म स्केल्स/धर्मकांता यांचे मॅन्युफॅक्चरिंग
29. इलेक्ट्रॉनिक ब्लॉक आणि अलार्म टाईम पीक्सचे मॅन्युफॅक्चर
30  विविध भौतिक हाताळणी उपकरणे तयार करणे
31 मशीनरीचे सुटे भाग/बेअरिंग इत्यादींचे मॅन्युफॅक्चरिंग.
32. मिक्सर ग्रिंडर आणि इतर घराच्या वस्तू  बनविणे.
33. प्रिंटिंग प्रेस/स्क्रीन प्रिंटिंग व्हिडिओ आणि फोटो स्टुडिओ
34.  बॅग उत्पादन
35. मंडपडेकोरेशन
36. कॉटन बेड/उशा
37. कॉटन टेक्सटाईल फॅब्रिक्समध्ये स्क्रीन प्रिंटिंग
38 झेरॉक्स सेंटर
39 चहा स्टॉल
40 मिठाईचे उत्पादन
41. होजीअरी उत्पादन
42. रेडीमेड गारमेंट्सचे टेलरिंग /उत्पादन
43.  खेळणी आणि बाहुली बनविणे
44. थ्रेड बॉल्स आणि वूलन बॉलिंग बनवणे
45. डिझेल इंजिन पंप संचाची दुरुस्ती
46. मोटार रिविंडिंग
47. वायर नेट बनविण
48. हाऊसहोल्ड एल्युमिनियम युटेंसिल्सचे मॅन्युफॅक्चर
49. पेपर पिनचे मॅन्युफॅक्चर
50. सजावटीच्या बल्बांचे उत्पादन
51. हर्बल सुंदर पार्लर/आयुर्वेदिक हार्बल उत्पादने
52 केबल टीव्ही नेटवर्क/संगणक केंद्र
53. पब्लिक ट्रान्सपोर्ट/रुरल ट्रान्सपोर्ट सर्व्हिस
54 सिल्क साड्यांचे उत्पादन
55 रसवंती
56 मॅट बनविणे
57. फायबर आयटम उत्पादन
58 पिठ चक्की
59 कप बनविणे
60. वूड वर्क
61. स्टील ग्रिलचे मॅन्युफॅक्चर
62. जिम सर्विसेस
63 आयुर्वेदिक औषध उत्पादन
64 फोटो फ्रेम
65. पेप्सी युनिट/कोल्ड/सॉफ्ट ड्रिंक
66 खवा व चक्का युनिट
67 गुळ तयार करणे
69. फळ आणि व्हिजिटेबल प्रक्रिया
70 घाणी तेल उद्योग
71. कॅटल फीड
72 दाळ मिल
73. मिनी तांदूळ शिलिंग युनिट/राईस मिल
74. कॅन्डल उत्पादन
75 तेलउत्पादन
76 शैम्पू उत्पादन
77. केसांच्या तेलाची निर्मिती
78 पापड मसाला उदयोग
79. बर्फ/ICE कॅंडीचे मॅन्युफॅक्चरिंग
80 बेकरी प्रॉडक्ट्स
81. पोहा उत्पादन
82  बेदाना/मनुका उद्योग/बियाणे प्रक्रिया
83. सोन्याचे काम (ज्वेलरी वर्क)
84 चांदीचे काम
85 स्टोन क्रशर  व्यापार
86 स्टोन कटिंग पॉलिशिंग


सदर योजना अंतर्गत  आपणास महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये अर्ज करता येईल . नवीन उद्योग उभारणीसाठी आपणास हार्दिक शुभेच्छा .नवउद्योजक होणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व तरुणांना  याचा उपयोग होईल. 


अधिक माहितीसाठी आजच संपर्क
==============================
जिल्हा उद्योग केंद्र (DIC), महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र राज्यातील शासकीय योजना -2020


1). गाई-म्हशी विकत घेणे – 
प्रकल्प खर्च - ६ लाख - १० जनावरे
(शासकीय योजना - २५ % ओपन कॅटेगरी साठी ३३.३३% एस .सी./एस .टी .साठी ) 

2). शेळीपालन – 
प्रकल्प खर्च ४.५ लाख - ५० शेळ्या २ बोकड 
(शासकीय योजना - २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस. सी. –एस .टी.)

3). कुक्कुटपालन – 
प्रकल्प खर्च - ८ लाख -५००० पक्षी 
(शासकीय योजना २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस. सी. –एस. टी.) 

4). शेडनेट हाऊस –
प्रकल्प खर्च - ३.५ लाख – १० गुंठे 
(शासकीय योजना - ५० % )

5). पॉलीहाउस - 
 प्रकल्प खर्च -११ लाख - १० गुंठे
 (शासकीय योजना - ५० % )

6). मिनी डाळ मिल –
  प्रकल्प खर्च -१.८८ लाख 
  (शासकीय योजना - ५० % ) 

7). मिनी ओईल मिल – 
  प्रकल्प खर्च -५ लाख 
(शासकीय योजना - ५० % ) 

8). पॅकिंग व ग्रेडिंग सेटर- 
३५ % सर्वसाधारण क्षेत्रासाठी अनुदान (१७.५० लाख प्रती आकार ९*८ मी.

9). ट्रॅक्टर व अवजारे – 
 प्रकार १- (शासकीय योजना-०८ ते २० PTOHP रुपये १ लाख अनुदान /३५ % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी 
प्रकार २-(शासकीय योजना-२० ते ७० PTOHP रुपये ७५ हजार अनुदान /२५  % -इतर लाभधारकांसाठी )

10). पॉवर टिलर -८ बी.एच.पी. च्या कमी 
प्रकार १- (शासकीय योजना-५००००/- अनुदान /५० % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी 
प्रकार २-(शासकीय योजना-४० हजार अनुदान /४० % -इतर लाभधारकांसाठी ) 

11). पॉवर टिलर -८ बी.एच.पी. च्या जास्त  
प्रकार १- (शासकीय योजना-७५ हजार /- अनुदान /५० % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी 
प्रकार २-(शासकीय योजना-६० हजार अनुदान /४० % -इतर लाभधारकांसाठी )

12). काढणी व बांधणी यंत्र –
शासकीय योजना –रुपये १.२५ लाख ( ५० % )

13). रोटाव्हेटर-२० बी.एच.पी. खालील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-३५ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी 
प्रकार २-(शासकीय योजना-२८ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी 
रोटाव्हेटर-२० बी.एच.पी .वरील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-४४ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी 
प्रकार २-(शासकीय योजना-३५ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी 

14). कडबा कुट्टी यंत्र/ पेरणी यंत्र-
२० बी.एच.पी. खालील चलित 
प्रकार १- (शासकीय योजना-१५ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी 
प्रकार २-(शासकीय योजना-१२ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी 
२० बी.एच.पी. वरील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-१९ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी 
प्रकार २-(शासकीय योजना-१५ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी 

15). उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका –( किमान २ ते ४ हेक्टर क्षेत्र युनिटसाठी )
अनुदान – ४०% भांडवलाच्या निगडीत २५ लाख प्रती हेक्टर 

16). छोट्या रोपवाटिका साठी -–( १ हेक्टर क्षेत्र युनिटसाठी )
अनुदान – ५०  भांडवलाच्या निगडीत १५ लाख प्रती हेक्टर

17). गोडाऊन(वेअर हाउस)-
  प्रकल्प खर्च-३५ लाख -१००० मे. टन 
  (शासकीय योजना-२५ %)

18). शीत गृह –५००० मेट्रिक टन साठी 
(शासकीय योजना-३५ % अनुदान सर्वसाधारण क्षेत्रासाठी /५०% आदिवासी आणि डोंगराळ भागासाठी )
२८०० प्रती मे .टन प्रकार १ साठी 
३५०० प्रती मे .टन प्रकार २ साठी.

19. गांडूळ खत प्रकल्प –
प्रकल्प खर्च-६०० घनफूट प्रोरीत धरतीवरती 
(शासकीय योजना-५००००/- प्रती उत्पादन प्रकल्प 

20). उसाच गुऱ्हाळ -
प्रकल्प खर्च- १४ लाख 
(शासकीय योजना- ५० %)

21). फळ प्रक्रिया उद्योग -
 प्रकल्प खर्च- २४ लाख 
(शासकीय योजना - ४० %)

22). फळबाग लागवड (एन.एच.बी.)-
  प्रकल्प खर्च- २० लाख - १० एकर 
  (शासकीय योजना- ४० %)

23). स्पिरुलीना (शेवाळ शेती)-
   प्रकल्प खर्च- ४.५ लाख 
    (शासकीय योजना - ५० % ) 

24). भाजीपाला सुकवणे-
   प्रकल्प खर्च-२४ लाख 
   (शासकीय योजना-४० %)

25). कृषि सल्ला व सेवा केंद्र –
   प्रकल्प खर्च-५ लाख 
   (शासकीय योजना-४०%)

26). सोयाबीन मिल्क व उत्पादने-
     प्रकल्प खर्च- ८ लाख 
     (शासकीय योजना- ४० %)

27). कृषी पर्यटन (अॅग्रो टूरीझम)-  प्रकल्प खर्च-१० लाख 


मुंबई, ठाण्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत गहू व तांदळाचे वाटप

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना माहे जुलै 2020 या महिन्याचे नियमित अन्नधान्याचे 71 % इतक्या शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यात आलेले आहे व त्यासोबतच प्रति व्यक्ती  3 किलो गहू व 2 किलो तांदूळ असे एकूण 5 किलो मोफत अन्नधान्याचे  वितरण करण्यात येत आहे. आतापर्यंत 2481 मे.टन गहू व 2310 मे.टन तांदूळ इतक्या अन्नधान्याचे 18 % शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई चे कैलास पगारे यांनी दिली.

अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांना तसेच निकषात बसणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना निश्चित करण्यात आलेल्या केंद्रामधून तसेच संबंधित अधिकृत शिधावाटप दुकानांतून गर्दी न करता योजनानिहाय धान्य फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करुन तसेच मास्कचा वापर करुन लवकरात लवकर धान्य प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन मुंबई ठाणे शिधावाटप यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

Wednesday, July 22, 2020

आदिवासी मुली ठरल्या अव्वल

"या" तारखेच्या आत लागणार दहावीचा निकाल

कोरोनाच्या महामारीमुळे जनजीवना पासून सर्वच गोष्टी विस्कळीत झाल्या आहेत. त्याचाच परिणाम शैक्षणिक क्षेत्रावरही झालेला दिसतो. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील बारावीचा बोर्डाचा निकाल गेल्या आठवड्यात लागला. परंतु अद्याप दहावीचा निकाल लागलेला नाही. 

       राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हिंगोलीमध्ये बोलताना 31 जुलैपूर्वी दहावीचा निकाल लागेल, असं सांगितलं होतं. परंतु, अद्याप महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

      यावर्षी दहावीची लेखी परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च या काळात घेण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. भूगोलाचा पेपर रद्द केल्या नंतर बाकीच्या विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून भुगोल पेपरच्या गुणांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. यामुळे आता दहावीच्या निकालाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागलेले आहे.

Monday, July 20, 2020

डिजिटल स्त्री शक्ती’ उपक्रमाचा उद्या ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

पाच हजार तरुणी होणार ‘सायबर सखी’

मुंबई, दि. 20 : महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजिटल स्त्री शक्ती’ उपक्रम राबविण्यात येत असून याचा शुभारंभ उद्या दि. 21 जुलै रोजी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमांतर्गत मुंबईसह राज्यभरातील 10 शहरातील 5000 महाविद्यालयीन तरुणींना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण वेबिनारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

Maha Info Corona Website

मोबाईल, इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबतच महिलांविरोधातील सायबर गुन्हे, फसवणूक यातही वाढ होत आहे. मुलींना सायबर विश्वातील सुरक्षित वापर आणि वावर याकरिता प्रशिक्षित करण्यासाठी ‘डिजिटल स्त्री शक्ती’ उपक्रम सुरु होत आहे. 16 ते 25 वयोगटातील महाविद्यालयीन तरुणींना इंटरनेटचा सुरक्षित उपयोग, गैरप्रकार झाल्यास कायदेशीर बाबी, मानसिक परिणाम, तांत्रिक फसवणूक आदीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येईल.

100 वेबिनार मधून राज्याच्या 10 शहरातील 5000 तरुणींना ‘सायबर सखी’ म्हणून प्रशिक्षित करण्यात येईल. शुभारंभाचा वेबिनार उद्या दि 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता होणार असुन यावेळी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर मार्गदर्शन करतील. घन:श्यामदास सराफ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी आयोजित वेबिनारमधे सायबर क्षेत्रातील तज्ज्ञांसह मुंबई पोलिस सायबर शाखेच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकरही उपस्थित राहणार आहेत.

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्यापासून आयोजन

मुंबई शहर जिल्ह्यातील युवकांना मिळणार लाभ

मुंबई, दि. २० : मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे २१ ते २४ जुलैदरम्यान ऑनलाईन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहर जिल्ह्यातील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यास सहाय्य मिळावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुलाखती घेण्यात येणार आहेत.

Maha Info Corona Website

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी केल्याने अनेक आस्थापना, व्यवसाय व उद्योग बंद होते. त्यामुळे अनेक परप्रांतीय कामगार/ मजूर हे त्यांच्या गावी परत गेल्याने किंवा जात असल्याने आता टाळेबंदी उठविल्यानंतर हे उद्योग सुरू करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता भासू लागली आहे. उद्योगांना मनुष्यबळाची तर युवकांना रोजगाराची गरज असल्याने नियोक्ते आणि रोजगार इच्छुक यांच्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या नामांकित १३ कंपन्या व नियोक्त्यांकडून www.rojgar.mahaswayam.gov.in  या वेबपोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात आले आहे. या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदासाठी अर्हता पात्र किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स (skype, Whatsapp, etc) द्वारे मुलाखती घेण्यात येणार आहेत. याचा लाभ घेण्यासाठी या पोर्टलवर लॉग इन करणे आवश्यक असून तसेच अॅन्ड्रॉईड मोबाईलधारकांनी mahaswayam हे पोर्टल डाऊनलोड करून शैक्षणिक पात्रतेनुसार नोंदणी करावी.

भरती इच्छुक नियोक्ते यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे या वेबपोर्टलवर अधिसूचित करण्याचे आवाहन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी ०२२-२२६२६३०३ या दूरध्वनीवर संपर्क साधावा. या मेळाव्याचा जास्तीत जास्त नियोक्ते आणि रोजगार इच्छुकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केंद्राच्या  सहायक आयुक्त छाया कुबल यांनी केले आहे

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू

मार्च 2020 मध्ये राज्यातील काही जिल्ह्यात निवडणूक जाहीर झाल्यामुळे लागू झालेली आचारसंहिता आणि त्यानंतर कोविड-19 या महामारीमुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची प्रक्रिया बंद झाली होती. काही महिन्यांच्या विसाव्यानंतर कर्जमुक्तीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 32.90 लाख पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली होती.

20 जुलै 2020 अखेर 27.38 लाख खातेदारांना 17 हजार 646 कोटी रुपयांच्या रकमेचा लाभ देण्यात आला आहे. म्हणजेच योजनेअंतर्गत एकूण प्रसिद्ध केलेल्या पात्र खातेदारांच्या यादीतील 83 टक्के खातेदारांना योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला आहे.

महात्मा जोतिराव फुले  शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कर्जमुक्तीसाठी पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ देण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

योजनेत ज्या पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्ती योजनेचा लाभ देणे बाकी आहे त्यांना लाभ देण्याची प्रक्रिया गतिमान पद्धतीने राबविली जावी, जिल्हाधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी 21 हजार 467 कोटी रुपयांची आवश्यकता होती. त्यापैकी 17 हजार 646 कोटी रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेतून देण्यात आला आहे.

योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी गावपातळीवर ग्रामपंचायतींमध्ये तसेच बँकांच्या शाखा स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यापैकी 2019-20 या आर्थिक वर्षात जवळजवळ 19 लाख खातेदारांना 11 हजार 993 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला होता तर 2020-21 या आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण 5 हजार 653 कोटी रुपयांची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत निर्गमित केलेल्या यादीतील उर्वरित 5.52 लाख खातेदारांनी त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर त्यांना योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ मिळेल व त्यांच्या कर्जखात्यावर रक्कम जमा होईल.

Saturday, July 18, 2020

कोरोना पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-गुजरात बॉर्डर सील करण्यात आले.

कोरोना पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-गुजरात बॉर्डर सील करण्यात आले. खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती आहे.

वेदांतामधून एक कोरोनाग्रस्त रुग्ण पळाला, एका रुग्णावर गुन्हा दाखल झाला

दि. 17 जुलै: डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथील वेदांता हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण दाखल होता. त्याच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता अहवाल पॉझिटीव्ह आला. हा रुग्ण वेदांतामध्ये उपचार न घेता तेथून पळून गेल्याचे निष्पन्न झाले आहे. ह्या प्रकरणी वेदांतच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने कासा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा (क्र. 121/2020) दाखल केला आहे. त्याच्या पळून जाण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही.

तलासरी तालुक्यात 48 कोरोना रूग्ण बाधित व 1 रुग्णाचा मृत्यू

तलासरी तालुक्यात 48 कोरोना रूग्ण बाधित व 1 रुग्णाचा मृत्यू झाला.

पालघर जिल्ह्यात 24 तासांत 402 नवे रुग्ण – 211 कोरोना मृत्यू !


दि. 17 जुलै: पालघर जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे मागील 6 दिवसांत 33 जणांनी आपले प्राण गमावले असून मृत्यूंची संख्या 211 झाली आहे. आतापर्यंत सर्वाधिक 184 मृत्यू वसई विरार महानगर क्षेत्रातील असून वसई ग्रामीण क्षेत्रात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पालघर तालुक्यात 3 मृत्यू वाढले असून संख्या 11 झाली आहे. जव्हार तालुक्यात 2 मृत्यू, वाडा तालुक्यात 2 मृत्यू ही संख्या कायम असून विक्रमगड तालुक्यात 1 कोरोना संसर्गामुळे 1 मृत्यू वाढून संख्या 2 झाली आहे.

जिल्ह्यामध्ये 6 दिवसांत 1731 कोरोनाग्रस्तांची भर पडली असली तरी, 986 रुग्ण पूर्णत: बरे झाले आहेत. रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या मात्र 727 ने वाढली आहे. 12 जुलै रोजी 2514 जण रुग्णालयात दाखल होते. आज ही संख्या 3231 इतकी वाढली आहे.

पालघर जिल्ह्याच्या वसई तालुका वगळता उर्वरीत भागात, 6 दिवसांत कोरोनाग्रस्तांची संख्या 242 ने वाढून 1604 झाली आहे. मृत्यूचा आकडा 4 ने वाढून 17 झाला आहे.

तालुकानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:-

पालघर तालुक्यात 6 दिवसांत 109 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 676 झाला आहे. त्यातील 489 जण बरे झाले असून 176 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 3 ने वाढून 11 झाली आहे.

वाडा तालुक्यात 6 दिवसांत 8 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 314 झाला आहे. त्यातील 252 जण बरे झाले असून 52 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 2 कायम राहिली आहे.

जव्हार तालुक्यात 6 दिवसांत 2 नवा रुग्ण आढळला असून एकूण आकडा 154 झाला आहे. त्यातील 146 जण बरे झाले असून 6 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 2 राहिली आहे.

विक्रमगड तालुक्यात 6 दिवसांत 5 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 124 झाला आहे. त्यातील 111 जण बरे झाले असून 11 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 1 ने वाढून 2 झाली आहे.

डहाणू तालुक्यात 6 दिवसांत 64 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 226 झाला आहे. त्यातील 135 जण बरे झाले असून 91 जणांवर उपचार चालू आहेत. तालुक्यात आजपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही. येथे मागील 24 तासांत नवे 27 रुग्ण निष्पन्न झाले.

मोखाडा तालुक्यात 6 दिवसांत नवा एकही रुग्ण आढळला नसून एकूण आकडा 30 कायम आहे. त्यातील सर्व जण बरे झाले आहेत. तालुक्यात आजपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही.


तलासरी तालुक्यात 6 दिवसांत 55 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 80 झाला आहे. त्यातील 22 जण बरे झाले असून 58 जणांवर उपचार चालू आहेत. तालुक्यात आजपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही. येथे मागील 24 तासांत 48 रुग्ण निष्पन्न झाले.

Friday, July 17, 2020

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना






केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी मागील वर्षी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला ६ हजार रुपये देणार आहे. दोन हजार रुपयांच्या हफ्त्याने ही रक्कम दिली जाणार आहे. या योजनेचे दोन टप्पे पार पडले आहेत. या योजनेतून मिळणारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. आपल्या खात्यात जमा होणाऱ्या पैशांची माहिती आपणास व्हावी यासाठी सरकारने ऑनलाईन सेवा प्रदान केली आहे. यातून आपण सर्व माहिती मिळवू शकता.

पंतप्रधान शेतकरी योजनेसाठी कसा कराल नोंदणी /अर्ज

या योजनेसाठी अर्ज करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सर्वप्रथम तुम्ही भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर www.pmkisan.gov.in/ जा. आणि पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी या योजनेसाठी स्वत:च्या नावाची नोंदणी करा. https://www.pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx  येथे शेतकऱ्यांची नोंदणी अर्ज भरणे आणि स्वत:ची नोंदणी करावी. याशिवाय शेतकरी महसूल अधिकारी किंवा पंतप्रधान शेतकरी योजनेसाठी राज्य सरकारद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याकडे संपर्क करु शकता. किंवा आपल्या जवळील सामान्य सेवा केंद्रा (सीएससी)वर जाऊ शकतात. आणि किमान समर्थन योजनेसाठी अर्ज करु शकता.

पंतप्रधान शेतकरी योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे

  • आधार कार्ड.
  • बँक खाते.
  • सातबारा उतारा.
  • रहिवाशी दाखला.

नोंदणी झाल्यानंतर www.pmkisan.gov.in/ या लिंकवर जाऊन अर्ज, देयक, आणि इतर तपशीलाची चौकशी करत रहावी.

पंतप्रधान किसान पोर्टलवर किसान कॉर्नर (शेतकरी कॉर्नर) या पर्यायात खालील अजून काही सुविधा आहेत.

  • नवीन शेतकरी नोंदणी.
  • आधार कार्ड रिकॉर्ड संपादित करा.
  • लाभार्थ्यांची स्थिती.
  • स्व :नोंदणी/ सीएससीची स्थिती.
  • पीएम किसान अ‍ॅप डाऊनलोड करा.

पंतप्रधान शेतकरी निधी योजनेची स्थिती आणि लाभार्थ्यांची यादीची चौकशी कशी कराल

  • पंतप्रधान शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईट - www.pmkisan.gov.in/ वर जा.
  • मेनू बार वर असलेल्या किसान कॉर्नर (शेतकरी कॉर्नर) वर क्लिक करा.
  • आता या लिंकवर क्लिक करा ज्यात लाभार्थींची स्थिती आणि लाभार्थी यादी आहे. त्यात तुम्ही चौकशी करू शकता.  
  • जर तुम्ही लाभार्थी यादीची चौकशी करत असाल तर तुम्ही आपले राज्य, जिल्हा, उप- जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव तेथे टाका.
  • मग अहवाल मिळवा वर क्लिक करा.

पंतप्रधान शेतकरी योजनेचा लाभार्थींची स्थिती येथे पहा https://bit.ly/2TvLBPi

पंतप्रधान शेतकरी योजनेचे लाभार्थ्यांची यादी येथे पहा https://bit.ly/2TvQYxV

स्वंय नोंदणी  सीएससी शेतकरीची स्थिती येथे पहा https://bit.ly/2VSYdBm

काही दिवसांपुर्वी सरकारने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी एक पंतप्रधान शेतकरी मोबाईल अ‍ॅप  लॉन्च केले होते. यात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. कोणत्याही प्रकारच्या समसा आल्यास शेतकरी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. पंतप्रधान शेतकरी हेल्पलाईन नंबर 155261/1800115526 (टोल-फ्री), 011-23381092

मिनिमम बॅलन्सच्या नियमांमध्ये ‘या’ बँकांनी केले मोठे बदल


मिनिमम बॅलन्स आणि पैशांच्या व्यवहाराच्या नियमांत देशातील काही प्रमुख बँकांनी मोठे बदल केले आहेत. 1 ऑगस्टपासून किमान शिल्लक शुल्क रक्कम न ठेवल्यास त्यावर शुल्क आकारण्याची घोषणा या बँकांनी केली आहे. बँकेने हे नियम डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी बदलल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या बँकांमध्ये तीन विनामूल्य व्यवहारानंतर शुल्कदेखील वसूल केले जाणार आहे. 1 ऑगस्टपासून बँक ऑफ महाराष्ट्र, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि आरबीएल बँकेकडून हे शुल्क लागू करण्यात येणार आहे.


किमान 2 हजार रुपये बँक ऑफ महाराष्ट्रमधील बचत खातेदारांना त्यांच्या खात्यात मेट्रो आणि शहरी भागात ठेवणे आवश्यक आहे, ज्याची मर्यादा याआधी 1,500 रुपये होती. उर्वरित रक्कम 2000 रुपयांपेक्षा कमी असल्यास बँक मेट्रो आणि शहरी भागात 75 रुपये, निम-शहरी भागात 50 रुपये आणि ग्रामीण भागात दरमहा 20 रुपये शुल्क आकारणार आहे.

100 रुपयांपर्यंत शुल्क बँक ऑफ महाराष्ट्रच्या सर्व शाखांमध्ये एका महिन्यात तीन विनामूल्य व्यवहारानंतर ठेव आणि पैसे काढण्यासाठी आकारले जाणार आहे. तसेच लॉकरसाठी ठेवीची रक्कम कमी केली गेली आहे. परंतु लॉकरवरील दंड वाढविण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना बँक ऑफ महाराष्ट्रचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एएस राजीव म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल बँकिंगला चालना देण्यासाठी, त्याचबरोबर बँकेत कमी लोक यावेत, यासाठी सध्या हे सर्व बँक करीत आहे. त्याचबरोबर बँकेच्या सेवा शुल्कातही काही बदल करण्यात आले आहेत.

तसेच अ‍ॅक्सिस बँक खातेदारांना आता ECS व्यवहारांवरील प्रत्येक व्यवहारावर 25 रुपये द्यावे लागतील. पूर्वी कोणतेही शुल्क ECS व्यवहारांवर आकारले जात नव्हते. खासगी बँकेने 10/20 रुपये आणि 50 रुपये बंडलप्रमाणे 100 रुपये प्रति बंडलसाठी हँडलिंग शुल्क आकारणार आहे.

कोटक महिंद्रा बँकेच्या ग्राहकांनी एटीएममधून महिन्याला पाच वेळा पैसे काढल्यानंतर पुढच्या व्यवहारात रोख रक्कम काढण्यावर 20 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच गैर-आर्थिक व्यवहारावर 8.5 रुपये शुल्क असेल. खात्यात शिल्लक रक्कम कमी असल्याने व्यवहार अयशस्वी झाल्यास 25 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. कोटक महिंद्रा बँकेतील खातेदारांना खाते श्रेणीनुसार किमान शिल्लक बॅलन्स न ठेवल्यास दंड भरावा लागेल. याव्यतिरिक्त प्रत्येक चौथ्या व्यवहारासाठी प्रतिव्यवहार 100 रुपये रोख पैसे काढण्याची फी सुरू केली गेली आहे.

अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी डहाणू ते चर्चगेट लोकल


अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पहाटे ४.४० वाजता डहाणू ते चर्चगेट लोकल सोडण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. शुक्रवारपासून (१७ जुलै) ही फे री सेवेत येईल. यासाठी काही लोकल फेऱ्यांच्या वेळेत व अंतिम स्थानकात बदल केले आहेत.


पश्चिम रेल्वेच्या पालघर, डहाणू, वैतरणा, बोईसर या भागांतून मुंबईच्या दिशेने पहाटेच्या सुमारास मेमू व लोकल चालवण्यात येतात. परंतु पहाटे ५ वाजताची डहाणू ते बोरीवली मेमू गाडी ही ५.४० वाजता डहाणू ते विरार लोकल म्हणून चालवण्यात येत आहे. त्यामुळे विरारला उतरुन पुन्हा मुंबईच्या दिशेने लोकल पकडावी लागते. परिणामी कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होतो. अनेक परिचारिका, वॉर्डबॉय यांनी ही वेळ आणि लोकलचे अंतिम स्थानक बदलण्याची मागणी केली होती. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही हीच मागणी उचलून धरली. त्यानुसार हा बदल करण्यात येत आहे.

१७ जुलैपासून पहाटे ४.४० वाजता डहाणू ते विरार अशी गाडी चालवली जाईल, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकू र यांनी सांगितले. त्यानंतर पहाटे ५.४० वाजता डहाणू रोड ते विरार गाडी असेल. त्याआधीही पहाटे ४.१५ वाजता विरार ते डहाणू रोड आणि सकाळी ७.४० वाजता चर्चगेट ते डहाणू रोड गाडी चालवण्यात येणार आहे. पहाटेच्या ४.४० च्या लोकलमुळे अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे खासदार सावंत यांनी सांगितले.

महाजॉब्स पोर्टल


  •    .महाजॉब्स पोर्टल वर नोंदणी कशी कराल ?
  • महाजॉब्स पोर्टल वर आपण मोफत नोंदणी करू शकता. प्रथम तुमचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी ही माहिती भरा. त्यानंतर मोबाईल किंवा ईमेल आयडीवर ओटीपी क्रमांक येईल. तो ओटीपी क्रमांक मॅच झाल्यास तुमच्या नावाने नोंदणी होईल.

 

  • महाजॉब्स काय आहे?
महाजॉबच्या रूपाने औद्योगिक रोजगार ब्युरो म्हणून कंपन्या व कुशल अर्धकुशल व अकुशल कामगारांमधील महा दुवा महाराष्ट्र शासनाने निर्माण केला आहे. जिथे महाराष्ट्रातील सर्व कुशल अर्धकुशल व अकुशल कामगारांना सतरा क्षेत्रात 950 अधिक व्यवसायामध्ये रोजगाराची एक अतिशय मोठी संधी आहे

 

  • महाजॉब्सवर नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे लागतील?
खालील कागदपत्रे सोबत ठेवावी: १. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल) अपलोड करणे अनिवार्य आहे. २. शैक्षणिक प्रमाणपत्र ३. कौशल्य प्रमाणपत्र ४. फोटो

 संकेतस्थळवर जा: https://mahajobs.maharashtra.gov.in/

महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना 2020


 


ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजने ची घोषणा महाराष्ट्रसरकारने केली आहे. ज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. राज्य सरकार महात्मा फुले कर्ज माफी योजनेंतर्गत महाराष्ट्रातील २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करेल. या शेतकरी महात्मा फुले कर्ज योजनेत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची सर्व पीक कर्जे समाविष्ट केली जातील. महात्मा फुले कर्ज माफी योजने चा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना 2020 साठी कागदपत्रांची पात्रता

  • या योजनेंतर्गत लघु व अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
  • महाराष्ट्र महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ऑनलाईन कर्ज माफी योजना २०२० अंतर्गत सरकारी नोकरी कामगार किंवा उत्पन्न कर भरणारा शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  • ऊस आणि फळांसह अन्य पारंपारिक शेती करणारे राज्यातील शेतकरीही या योजनेंतर्गत येतील
  • बँक अधिकारी केवळ त्या व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा घेईल.
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबुक
  • मोबाइल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • संकेतस्थळवर जा: http://www.mjpsky.maharashtra.gov.in

बारावी नापास विद्यार्थ्याचे अभिनंदन! ---श्रीमंत कोकाटे


                   निकालाची सर्वांनाच  विशेषतः  विद्यार्थी पालक  शिक्षक  यांना मोठी उत्सुकता असते  आपण पास होणार की नापास होणार  आपल्याला किती मार्क पडणार  वर्गात आपला कितवा नंबर येणार  याबद्दल कमालीची उत्सुकता असते नापास होणाऱ्या  विद्यार्थ्यांमध्ये  प्रचंड  प्रचंड मानसिक तणावाचे वातावरण असते

                    आज बारावीचा निकाल लागला.बारावी अनुत्तीर्ण आणि उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! असंख्य विद्यार्थ्यांना भरपूर मार्क मिळाले. 90% 95% 97% 88% 80%  75% 70 टक्के अशी मार्कस मिळवून अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!

                       पण असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना 40% 46 % 50% 55% 60% 65% मार्क्‍स मिळाले आहेत. काही विद्यार्थी नापास देखील झालेले आहेत, त्यांचेदेखील अभिनंदन! कारण मार्काचा आणि गुणवत्तेचा, मार्काचा आणि कर्तृत्वाचा जगात काहीही संबंध नाही. जगाचा इतिहास आणि वर्तमान पाहिला तर कमी मार्क पडणाऱ्या आणि नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतिहास घडवलेला आहे, त्यामुळे कमी मार्क पडणाऱ्या आणि नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये.

                       जगविख्यात शास्त्रज्ञ न्यूटन हे शिष्यवृत्तीच्या परीक्षेत नापास झाले होते. ज्यांना आफ्रिकेचे गांधी म्हटले जाते, असे नेल्सन मंडेला लॉ च्या परीक्षेत अनेकवेळा नापास झाले होते. जागतिक कीर्तीचे विद्वान, घटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 37.5 टक्के मार्क मिळवून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. अमेरिकेतील जागतिक धर्म परिषदेमध्ये जाऊन विश्वविख्यात भाषण करणारे स्वामी विवेकानंद 39 टक्के मार्क मिळवून ग्रॅज्यएट झाले होते.सहावी नापास झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जगविख्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.एक दिवस शाळा शिकलेल्या आण्णा भाऊ साठे यांनी 70 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय स्तरावरची साहित्यनिर्मिती केली. 

                       देशाचे लोकप्रिय नेते माननीय शरद पवार यांना मॅट्रिकला 35 टक्के मार्क्स होते. अभिनयाचा बादशहा अमिताभ बच्चन हे अलाहाबाद आकाशवाणी केंद्राच्या वृत्तनिवेदक परीक्षेत नापास झाले होते. महान चित्रपट अभिनेते निर्माते, शाहीर दादा कोंडके  गणित विषयात अनेक वेळा नापास झाले होते.सैराटसारखा रेकॉर्डब्रेक चित्रपट देणारे निर्माता नागराज मंजुळे दहावीच्या परीक्षेत नापास झाले होते.हिंदकेसरी मारुती माने,गायिका लता मंगेशकर, कुस्तीपट्टू खाशाबा जाधव,महान कलाकार विठाबाई नारायणगावकर यांचे शिक्षण किती? पण त्यांचा लौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आहे. अशी खूप मोठी यादी आहे की ज्यांना पास होता आले नाही, किंवा जास्त मार्क मिळाले नाहीत, पण कला,साहित्य, संगीत, क्रीडा, नाट्य, अभिनय, कृषी, उद्योग,संशोधन आणि राजकारण इत्यादी क्षेत्रात कार्य करून दाखवले. त्यामुळे मार्क म्हणजे गुणवत्ता नव्हे.

                         सुप्रसिद्ध विचारवंत प्राचार्य शिवाजीराव भोसले सर नेहमी म्हणायचे "चिमणीचे पिल्लू चाळीस दिवसाचे झाले की उंचच उंच भराऱ्या मारायला लागते, परंतु माणसाचे पिल्लू चाळीस वर्षाचे झाले तरी ते स्वतःच्या पायावर नीट उभा राहू शकत नाही,कारण पंख हे आतून फुटलेले असतात, पदव्या या बाहेरून चिटकवलेल्या असतात".  स्वामी विवेकानंद म्हणतात "मनुष्याच्या ठायी असणाऱ्या पूर्णत्वाचा विकास म्हणजे शिक्षण होय" तर जागतिक कीर्तीचे तत्त्ववेत्ते आचार्य ओशो रजनीश म्हणतात "विद्यापीठ आपल्याला गोल्ड मेडल देईल पण कर्तृत्व नाही गाजवले तर ते गोल्ड मेडल तुम्हाला मिट्टी का मेडल भी नही दे सकता". थोर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात "मेंदू मन आणि मनगट याचा समतोल विकास म्हणजे शिक्षण होय".  

                           परंतु दुर्दैवाने अलीकडच्या काळात शाळा, पालक, शिक्षक, विद्यार्थी मार्कांच्या पाठीमागे लागलेले आहेत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.नवनिर्मितीची क्षमता म्हणजे शिक्षण होय, असे देखील विवेकानंद म्हणाले होते, याचा सर्वानीच गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.  90%, 95% मार्क मिळविणारे विद्यार्थी केपलर, न्यूटन,आईन्स्टाईन, कोपर्निकस का होत नाहीत?.जास्त मार्क पडणारे बहुतांश विध्यार्थी नोकर होतात, तर कमी मार्क असणारे किंवा नापास होणारे विद्यार्थी उद्योजक,व्यावसायिक होतात.

                            त्यामुळे कमी मार्क पडले निराश होऊ नका, जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर मार्कांला पर्याय नाही. परंतु नापास झालात म्हणून आपण पराभूत झालो, असे समजू नका.जीवन आणि जग खूप सुंदर आहे.त्यामुळे नापास आणि पास विद्यार्थ्याचे खूप खूप अभिनंदन!

                                            -----श्रीमंत कोकाटे

   (इतिहास,शिक्षणशास्त्र,पुरातत्वशास्त्र,मानवशास्त्र,प्राच्यविद्या इत्यादी विषयाचा अभ्यासक)

Thursday, July 16, 2020

तलासरी तालुक्यातील मौजे तलासरी विकासापडा व वसा डोंगरीपाडा या गावांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र


तलासरी तालुक्यातील मौजे तलासरी विकासापडा व वसा डोंगरीपाडा  या गावांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  प्रतिबंधित क्षेत्र(containment zone) केले.

Wednesday, July 15, 2020

HSC 12th Result 2020

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्ड यांच्यातर्फे 12 वी निकाल उद्या दुपारी 1:00 वाजता जाहीर होणार आहे. बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळावर  पाहता येईल. 

असोसिएटेड कॅप्सुलचा व्यवस्थापन सदस्य पॉझिटीव्ह

दि. 14 जुलै: डहाणू तालुक्यातील असोसिएटेड कॅप्सुल ही अत्यावश्यक सेवा ह्या सदरातील कंपनी असल्याने ती लॉकडाऊन काळातही चालू राहिली. लॉकडाऊनच्या काळात अनेक कामगार कामावर येत नसल्याने कंत्राटी कामगारांच्या जोरावर कामकाज चालवण्यात आले. त्यातच कंपनीचे विस्तारीकरणाचे काम सुरु असल्याने मोठ्या संख्येने स्थलांतरित मजूर कंपनीच्या आवारात राहिले होते. काही कामगार वसईतील हॉटस्पॉटमधून ये जा करीत होते. आता, कंपनीच्या स्थलांतरित मजूरांपैकी किमान 11 जणांचे तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले असून 90 पेक्षा जास्त लोकांना क्वारन्टाईन करण्यात आले आहे. या आधीच डहाणू शहरातील कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे निवास असलेल्या इमारतीला प्रतिबंधीत करण्यात आले होते. काल (13 जुलै) रात्री डहाणू मल्याण येथील एका व्यवस्थापन सदस्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर उपचार केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्या शिवाय कंपनीच्या कंत्राटी कामगारांना कोरोनाची लागण झाली असल्यास त्याबाबतची माहिती उपलब्ध झालेली नाही.

Tuesday, July 14, 2020

दिवसभरात कोरोनाचे 405 नवे +Ve आणि 7 मृत्यू

पालघर, दि. 13 जुलै: जिल्ह्यात आज नवे 405 कोरोना बाधीत निष्पन्न झाले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले सर्व जण वसई महापालिका क्षेत्रातील आहेत. आज निष्पन्न झालेल्या कोरोना बाधीतांची आकडेवारी पुढीलप्रमाणे:- वसई विरार महापालिका क्षेत्र 372, वसई तालुका ग्रामीण क्षेत्र 7, पालघर तालुका 15, डहाणू तालुका 9, विक्रमगड तालुका 1.

Sunday, July 12, 2020

पालघर जिल्ह्यात कोरोनामुळे 7 दिवसांत 34 मृत्यू – एकूण मृत्यू 178

दि. 12 जुलै: पालघर जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे मागील 7 दिवसांत 34 जणांनी आपले प्राण गमावले असून मृत्यूंची संख्या 178 झाली आहे. आतापर्यंत सर्वाधिक 155 मृत्यू वसई विरार महानगर क्षेत्रातील असून वसई ग्रामीण क्षेत्रात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पालघर तालुक्यात 8 जण, जव्हार तालुक्यात 2 जण, वाडा तालुक्यात 2 जण व विक्रमगड तालुक्यात 1 जणाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यामध्ये 7 दिवसांत 2105 कोरोनाग्रस्तांची भर पडली असली तरी, 3228 रुग्ण पूर्णत: बरे झाले आहेत. रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या देखील 787 ने घटली आहे. 5 जुलै रोजी 3701 जण रुग्णालयात दाखल होते. आज ही संख्या 2914 इतकी घसरली आहे.

पालघर जिल्ह्याच्या वसई तालुका वगळता उर्वरीत भागात, 7 दिवसांत कोरोनाग्रस्तांची संख्या 293 ने वाढून 1362 झाली आहे. त्यापैकी 976 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून 373 जणांवर उपचार चालू आहेत. ही आकडेवारी दिलासादायक असून 7 दिवसांत मृत्यूचा आकडा 3 ने वाढून 13 झाला आहे.

तालुकानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:-

पालघर तालुक्यात 7 दिवसांत 171 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 567 झाला आहे. त्यातील 360 जण बरे झाले असून 199 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 2 ने वाढून 8 झाली आहे.

वाडा तालुक्यात 7 दिवसांत 37 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 306 झाला आहे. त्यातील 252 जण बरे झाले असून 52 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 2 कायम राहिली आहे.

जव्हार तालुक्यात 7 दिवसांत 24 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 153 झाला आहे. त्यातील 119 जण बरे झाले असून 32 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 1 ने वाढून 2 झाली आहे.

विक्रमगड तालुक्यात 7 दिवसांत 9 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 119 झाला आहे. त्यातील 104 जण बरे झाले असून 14 जणांवर उपचार चालू आहेत. मृत्यूची संख्या 1 कायम राहिली आहे.

डहाणू तालुक्यात 7 दिवसांत 43 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 162 झाला आहे. त्यातील 103 जण बरे झाले असून 59 जणांवर उपचार चालू आहेत. तालुक्यात आजपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही.

मोखाडा तालुक्यात 7 दिवसांत 7 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 30 झाला आहे. त्यातील 22 जण बरे झाले असून 8 जणांवर उपचार चालू आहेत. तालुक्यात आजपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही.

तलासरी तालुक्यात 7 दिवसांत 2 नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा 25 झाला आहे. त्यातील 16 जण बरे झाले असून 9 जणांवर उपचार चालू आहेत. तालुक्यात आजपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही.

Friday, July 10, 2020

विरार-डहाणू मार्गाचेही चौपदरीकरण, पनवेल-कर्जत, ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे मार्गाच्या कामास गती येणार

एमयुटीपी-३ सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

विरार-डहाणू मार्गाचेही चौपदरीकरण

मुंबई,  दि ९ : एमयुटीपी-३ मधील प्रकल्पांना चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन, राज्य शासन, एमएमआरडीए व सिडको यांच्या दरम्यान वर्षा येथे यासंदर्भातील सामंजस्य करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली.

याप्रसंगी नगर विकास मंत्री मंत्री एकनाथ शिंदे, अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास प्रवीण परदेशी, एमएमएमआरडीए आयुक्त आर राजीव, एमआरव्हीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर एस खुराणा, अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ.सोनिया सेठी, एमआरव्हीसीचे वित्त संचालक अजित शर्मा यांची उपस्थिती होती.

या करारामुळे खालील प्रकल्पांना वेग येईल.

पनवेल-कर्जत दरम्यान २८ किमी नवीन उपनगरीय रेल्वे मार्गिका टाकणे – २७८३ कोटी 

ऐरोली-कळवा दरम्यान ३.५ किमी उन्नत रेल्वे मार्ग बांधणे – ४७६ कोटी

विरार-डहाणू दरम्यान ६३ किमी रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण करणे (तिसरी-चौथी रेल्वे मार्गिका टाकणे) – ३५७८ कोटी

नवीन रेल्वे गाड्या खरेदी करणे (४७ रेक्स) – ३४९१ कोटी

मध्य व पश्चिम रेल्वे मार्गाच्या मध्य विभागात ट्रेस पास कंट्रोल – ५५१ कोटी

तसेच तांत्रिक सहाय्य – ६९ कोटी

मुंबई व उपनगर रेल्वे सेवेमध्ये अधिक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-३ (MUTP-III) या रु.१०,९४७ कोटी प्रकल्प पुर्णत्व किमंतीच्या प्रकल्पास रेल्वे मंत्रालयाने प्रकल्पास मंजूरी दिली होती.

राज्य शासनाने भारतीय रेल्वेच्या सहभागाने मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-१ व टप्पा- २ च्या धर्तीवर ५०:५० आर्थिक सहभागातून हा प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आली आहे.

Monday, July 6, 2020

भारताचं पहिलं सोशल मीडिया App Elyments झालं लाँच, WhatsAppला देणार टक्कर

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच 59 चिनी Appsवर बंदी घातली होती. त्यानंतर अशा प्रकारचे Apps भारतात तयार का होत नाहीत असा प्रश्न विचारला जात होता. ही चर्चा सुरू असतानाच गुरुपोर्णिमेच्या मुहूर्तावर देशाचं पहिलं सोशल मीडिया App Elyments लाँच करण्यात आलं. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (M. Venkaiah Naidu)  यांनी हे App लाँच केलं. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने टाकलेलं हे पाऊस असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या 1 हजार तत्रज्ञांनी एकत्र येत हे App तयार केलं आहे. आठ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये (Indian languages) हे App असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारीच आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेची घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे App लाँच झालं आहे.

चॅटिंग, ऑडियो-व्हिडियो कॉल त्याचबरोबर ई-कामर्सची सुविधा यात असणार आहे. या स्वदेशी Appला गुगल प्ले स्टोअर (Google Play Stores) आणि Apple App Storesमधून डाऊनलोड करता येणार आहे.

लाँचिंगच्या आधी या Appच्या अनेक महिने चाचण्या घेण्यात आल्या होत्या. आत्तापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त जणांनी हे App डाउनलोड केलं आहे. यात वापरकर्त्यांचा डेटा देशातच सुरक्षित राहणार आहे.


यात खासगी चॅटिंग ऑडियो-व्हिडियो कॉन्फरन्स कॉल, Elyments पेची सुविधा, त्याचबरोबर भारतीय ब्रँड्ससाठी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म असणार आहे.

आत्मनिर्भर भारताचा नारा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेत त्यांनी देशातल्या तरुणाईला एक चॅलेंज दिलं असून जागतिक दर्जाचे Made In India App बनविण्याचं आवाहन केलं आहे. (Aatmanirbhar Bharat App Innovation Challenge ) सध्याचं युग डिजिटलचं असून एका क्लिकवर सगळी कामं आणि व्यवहार होत आहेत. कोरोनामुळे त्याचं महत्त्व आणखी वाढलं आहे. त्यामुळे विदेशी तंत्रज्ञानावर विसंबून न राहता स्वदेशाला उत्तेजन देण्यासाठी पंतप्रधानांनी हे चॅलेंज दिलं आहे.


या चॅलेंजमध्ये पहिला क्रमांक मिळविणाऱ्याला 20 लाख, दुसऱ्या क्रमांकासाठी 15 लाख आणि तिसऱ्या क्रमांकासाठी 10 लाखांचं बक्षीस असून इतर अनेक बक्षिसही देण्यात येणार आहे. 18 जुलैपर्यंत प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख आहे.



Friday, July 3, 2020

उद्योगांची ‘महास्वयम्’ ला पसंती

मुंबई, दि. २ – लॉकडाऊनमुळे निर्माण होत असलेल्या बेरोजगारीवर मात करुन तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या  http://www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलचा वापर नोकरीइच्छुक तरुणांबरोबरच कुशल उमेदवारांची गरज असलेले उद्योगही करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात वेबपोर्टलला १ हजार ५२१ उद्योजकांनी भेट दिली असून ३८९ नवीन उद्योजकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. शिवाय या उद्योगांनी त्‍यांच्याकडे असलेल्या १ हजार ३०७ रिक्‍तपदांची भरती प्रक्रिया वेबपोर्टलच्या आधारे सुरु केली असून त्यांना त्याच वेबपोर्टलवर नोंदणीकृत असलेले पात्र कुशल उमेदवार मिळत आहेत, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

Maha Info Corona Website

महास्वयम् वेबपोर्टलवर आतापर्यंत ८४ हजार ९५१ उद्योगांनी नोंदणी केली आहे. उद्योग आणि त्यांना हवे असलेले कुशल मनुष्यबळ यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे महत्वाचे काम या वेबपोर्टलमार्फत होत आहे. वेबपोर्टलवर कुशल उमेदवार हे आपली शैक्षणिक माहिती, अनुभव, कौशल्ये यांच्या आधारे नोंदणी करतात. त्यामुळे उद्योगांना हवे असलेले कुशल मनुष्यबळ त्यांच्या गरजेनुसार या वेबपोर्टलवर सहज उपलब्ध होते. यासाठी उद्योग आणि बेरोजगार तरुण यांची वेबपोर्टलवर अधिकाधिक नोंदणी करुन दोघांमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी कौशल्य विकास विभाग प्रयत्न करीत आहे.

नोंदणी केलेले व प्रोफाईल अद्ययावत न केलेले तसेच एका जिल्‍ह्यातून दुसऱ्या जिल्‍ह्यात स्‍थलांतरित झालेल्‍या उमेदवारांना रोजगाराच्‍या संधीची माहिती होण्‍यासाठी त्‍यांना त्‍यांचे प्रोफाईल अद्ययावत करण्‍याबाबत वर्तमानपत्राच्‍या माध्‍यमातून तसेच वेबपोर्टलद्वारे जून २०२० पासून एसएमएस पाठविण्‍यात येत आहेत. तेव्हापासून आतापर्यंत लॉकडाऊनच्या काळात वेबपोर्टलला ६.३४ लाख उमेदवारांनी भेट दिली आहे. यापैकी ३ लाख ०५ हजार उमेदवार हे नव्‍याने प्रथम भेट देणारे होते. तसेच नोकरीइच्छुक ३१ हजार १५८ उमेदवारांनी नवीन नावनोंदणी केली आहे. १० हजार उमेदवारांनी प्रोफाईल अद्ययावत केले असून ६३१ उमेदवारांनी त्‍यांचे प्रोफाईल अॅक्‍टिव्‍ह केले आहे, अशी माहिती मंत्री श्री. मलिक यांनी दिली.

नोंदणी न केलेले पण मनुष्‍यबळाची आवश्‍यकता असलेले उद्योग त्‍यांना त्‍यांच्याकडे असलेल्या रिक्‍तपदांची मागणी या वेबपोर्टलवर अधिसूचित करु शकतात. तसेच रोजगार इच्छुक उमेदवारांची यादी प्राप्‍त करुन घेऊ शकतात. तथापि, त्‍यानंतर त्‍यांना वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्‍यक आहे.

जिल्‍हा कार्यालयांना त्‍यांच्‍या जिल्‍ह्यांमध्‍ये स्‍थलांतरित झालेल्‍या उमेदवारांना तसेच ज्‍या उमेदवारांनी त्‍यांचे प्रोफाईल अद्ययावत केले नाही त्‍यांना प्रोफाईल अद्ययावत करण्‍यासाठी एसएमएस पाठविण्‍याची सुविधा वेबपोर्टलवर उपलब्‍ध करुन देण्यात आली आहे.

सर्व उमेदवार व उद्योजक यांनी http://www.mahaswayam.gov.in या वेबसाईटद्वारे देऊ केलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा. याबाबत काही अडचणी असल्यास आपल्या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन मंत्री श्री. नवाब मलिक यांनी केले आहे