दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा नेमक्या किती तारखेला घेणार, याविषयी राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, दहावीच्या परीक्षा जूनमध्ये तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होतील. त्याअनुषंगाने नियोजन करून परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जातील, असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
Tuesday, May 21, 2024
इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या निकाल आहे आज!
Friday, April 26, 2024
RTE Admission Academic Year 2024-25 Maharashtra | महाराष्ट्र आरटीई प्रवेश ऑनलाईन अर्ज सुरु..!
Wednesday, June 14, 2023
शिष्यवृत्ती हुकलेली संधी पुन्हा मिळेलऑफलाईन अर्ज १५ जूनपर्यंत करावे
Wednesday, June 7, 2023
The chance of career in the art field कला क्षेत्रात करियरच्या संधी…
Monday, March 20, 2023
मृत्युपत्र नेमक काय असते?
Thursday, March 9, 2023
दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रवेश अर्ज
Friday, November 25, 2022
महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना
महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना
महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे तसेच शिक्षण शुल्का अभावी त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी शासनाकडून निरंतर प्रयत्न केले जातात. या उद्देशापोटी शासनातर्फे 2006-07 या शैक्षणिक वर्षापासून शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कृषी विभाग ,वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभाग या विभागांच्या अधिकाराखाली येणाऱ्या मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती करण्यासाठी निर्णय घेण्यात आला.
सदर योजना ही दिनांक 31 मार्च 2016 पासून अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती करण्यास शासनातर्फे मुदतवाढ देण्यात आली.

योजना अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले अभ्यासक्रम
- आरोग्य विज्ञान पदवी (DEGREE) अभ्यासक्रमा अंतर्गत : वैद्यकीय, दंत, होमिओपॅथी, युनानी, आयुर्वेद, भौतिकोपचार, व्यवसायोपचार व नर्सिंग अभ्यासक्रम.
- उच्च व तंत्रशिक्षण अभ्यासक्रम :
पदविका (Diploma) अभियांत्रिकी (Engineering), औषध निर्माण(Pharmacy), एच.एम.सी.टी. (Hotel Management) पदवी (Degree/Graduation) अभियांत्रिकी (Engineering), औषध निर्माण(Pharmacy), एच.एम.सी.टी. (Hotel Management) , वास्तुशास्त्र. पदव्युत्तर पदवी (Post Graduation) एम.बी.ए. / एम.एम.एस. , एम.सी.ए.
| पदविका (Diploma) | अभियांत्रिकी (Engineering), औषध निर्माण(Pharmacy), एच.एम.सी.टी. (Hotel Management) |
| पदवी (Degree/Graduation) | अभियांत्रिकी (Engineering), औषध निर्माण(Pharmacy), एच.एम.सी.टी. (Hotel Management) , वास्तुशास्त्र. |
| पदव्युत्तर पदवी (Post Graduation) | एम.बी.ए. / एम.एम.एस. , एम.सी.ए. |
- कृषी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय अभ्यासक्रमांतर्गत शासकीय कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासनाने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती खालील अभ्यासक्रमांसाठी लागू राहील.
कृषी विद्यालय – पदविका (Diploma)
दुग्धव्यवसाय विकास – पदविका (Diploma)
कृषी व संलग्न विषयांची महाविद्यालये – पदवी व पदव्युत्तर(Graduation / Post Graduation)
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालये – पदवी व पदव्युत्तर
कृषी अन्नतंत्रज्ञान महाविद्यालये – पदवी व पदव्युत्तर
- बी.एड. व डी.एड. अभ्यासक्रम
योजनेअंतर्गत पात्रता, अटी व शर्ती
- विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे गरजेचे आहे.
- विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे (दोन्ही पालकांचे एकत्र) उत्पन्न 4.50 लाखाच्या वर नसावे.प्रथम वर्ष योजनेचा लाभ घेतल्यास ही सवलत अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सुरू राहील.
- राज्यातील मान्यताप्राप्त विनाअनुदानित व कायम अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये व्यवसायिक शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क ची 100% प्रतिपूर्ती तसेच इतर मागास वर्गांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क ची 50% प्रतिपूर्ती करण्यात येईल.
- योजनेचा लाभ फक्त शासकीय कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच लागू राहील.
- आरक्षणाचा लाभ न घेता खुल्या जागांवर प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.
- तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत अभ्यासक्रमासाठी ज्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या सेन्ट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसिजर(CAP)द्वारे प्रवेश घेतला असेल त्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
- AIEEE कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.
- जर एखादा विद्यार्थी कुठल्याही अन्य योजनेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती अथवा शुल्क प्रतिपूर्ती चा लाभ घेत असेल तो विद्यार्थी या योजनेकरिता पात्र असणार नाही.
- विद्यार्थ्यांची महाविद्यालयात / कॉलेजमध्ये वर्गात उपस्थिती अनिवार्य आहे तसेच प्रत्येक सत्राची (सेमिस्टर) किंवा वार्षिक परीक्षा देणे आवश्यक आहे.
- पात्र विद्यार्थ्याने एखाद्या सत्राची (सेमिस्टर) परीक्षा दिली नसल्यास किंवा एखाद्या शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्या वर्षासाठी प्रवेश मिळाला नसल्यास पुढील वर्षाकरिता या योजनेअंतर्गत सदर विद्यार्थी तो पात्र असणार नाही. परंतु त्यानंतर जर परत तो विद्यार्थी सत्र परीक्षा किंवा किंवा वार्षिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर किंवा अंशतः पास (ATKT) झाला असल्यास त्या अभ्यासक्रमाच्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश मिळाल्यास सदर योजनेतील लाभासाठी पात्र असेल.
- जो विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या एकूण कालावधीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळी पूर्णपणे अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्या अभ्यासक्रमाच्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश मिळाला नसेल तर संबंधित विद्यार्थी त्या अभ्यासक्रमाच्या उर्वरित कालावधी साठी योजनेअंतर्गत कायमस्वरुपी अपात्र ठरविण्यात येईल.
लागणारी महत्त्वाची कागदपत्रे
- आधार कार्ड
- विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी प्रवेश घेताना पालकांचा (दोन्ही पालकांचे एकत्र) उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांच्याकडून घ्यावा लागेल.
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate).
- अनुसूचित जाती, विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सक्षम अधिकाऱ्याकडून मिळालेला जातीचा दाखला.
योजनेंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया
योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी लाभार्थी विद्यार्थ्याला वरील लागणारी संपूर्ण महत्वाची कागदपत्रे तो शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयात / कॉलेज अथवा संस्थेमध्ये जमा करावे लागतील. विद्यार्थ्यांचा अर्ज हा संस्थेमार्फत / महाविद्यालयांमार्फतच शासनाकडे मंजुरी साठी पाठविण्यात येतो.
Thursday, September 29, 2022
कॉलेज शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) फॉर्म-2022/23 ऑनलाइन प्रक्रिया सुरू
Sunday, July 31, 2022
10 वी आणि 12वी साठी 17 नंबर फॉर्म ऑनलाईन फॉर्म [Online Form]
Monday, July 25, 2022
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तर्फे पदवी, पदविका आणि उच्च पदवी चा प्रवेश प्रक्रिया
Monday, June 27, 2022
Diploma in Pharmacy Admissions Process 2022
Friday, June 24, 2022
तंत्रनिकेतन पदविका प्रवेश प्रकिया 2022
तंत्रनिकेतन पदविका प्रवेश प्रकिया 2022 च्या खालील प्रमाणे:
[ ] Mechanical Engineering
[ ] Civil Engineering
[ ] Electrical Engineering
[ ] Electronic Engineering
[ ] Electronic and Telecommunication Engineering
[ ] Information Technology
[ ] Computer Engineering
[ ] Rubber Engineering
Tuesday, June 21, 2022
ITI कसे करायचे? ऍडमिशन,फी, पात्रात, आणि नोकरीची संधी
आपण आजच्या या लेखामध्ये खाली दिल्या प्रमाणे किंवा या अनुक्रमे नुसार काही महत्वाचे मध्ये पाहणार आहोत :-
1. आयटीआय ITI म्हणजे काय?
2. आयटीआय (ITI) व डिप्लोमा इंजीनियरिंग (Polytechnic) या दोघांमध्ये काय फरक आहे?
3. आयटीआय ITI हा कोर्स किती वर्षाचा असतो?
4. आयटीआय ITI कोर्स करण्यासाठी आपली शैक्षणिक योग्यता किंवा पात्रता काय असावी? Eligibility Criteria / Qualification?
5. आयटीआय ITI कोर्स ची फी किती असते?
6. आयटीआय ITI कोर्स अभ्यासक्रमाची यादी.
7. आयटीआय ITI कोर्स नंतर काय?
8. अंतिम निष्कर्ष :-
•~ The Full Form of ITI (Industrial Training Institute) औद्योगिक प्रशिक्षण संस्था ~•
1. आयटीआय ITI म्हणजे काय?
ITI म्हणजे Industrial Training Institute औद्योगिक प्रशिक्षण संस्था होय. ITI म्हणजे शासनाची मान्यताप्राप्त असलेली अनेक विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देणारी संस्था आहे. वाढती इंडस्ट्रीज च्या गरजा लक्षात घेऊन राज्य सरकारने या कोर्सची सुरुवात केली. तर मित्रांनो आयटीआय हा एक असा कोर्स आहे जो की तुम्ही कमी वयात शिक्षण पूर्ण करून एखाद्या मोठ्या नामांकित कंपनीमध्ये काम करू शकता.
2. आयटीआय (ITI) व डिप्लोमा इंजीनियरिंग (Polytechnic) या दोघांमध्ये काय फरक आहे?
तर सर्व विद्यार्थ्यांना असे वाटते की आयटीआय (ITI) व डिप्लोमा इंजीनियरिंग (Polytechnic) हे दोन्ही कोर्स सारखे आहेत. तर तसं नाही या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. कारण आयटीआय कोर्स हा 2 वर्षाचा असतो. आणि डिप्लोमा इंजीनियरिंग (Polytechnic) हा कोर्स 3 वर्षाचा असतो. तर आयटीआय करणार्या विद्यार्थ्यांचा हा फायदा आहे की ते 2 वर्षांनंतर लगेच विद्यार्थ्यांला एखाद्या मोठ्या नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळवता येते. आणि डिप्लोमा इंजीनियरिंग करणाऱ्या विद्यार्थ्याला कोर्सच्या विषयांमध्ये त्यांना चांगला नॉलेज मिळतो आणि त्यांना हवी असेल तर पुढचा शिक्षणही घेता येतो.
3. आयटीआय ITI हा कोर्स किती वर्षाचा असतो?
तर विद्यार्थी मित्रांनो आयटीआय या कोर्सचा कालावधी 2 वर्षाचा हा कोर्स असतो. यामध्ये विद्यार्थ्यांना टेक्निकल एज्युकेशन चा शिक्षण दिला जातो. आणि काही कोर्स 6 महिना, 9 महिना व 1 वर्षाचे सुद्धा असतात. त्यामध्ये सुद्धा 2 प्रकारचे ट्रेड Trade असतात इंजीनियरिंग ट्रेड (Engineering Trade) आणि नॉन इंजीनियरिंग ट्रेड (Non Engineering Trade)
4. आयटीआय ITI कोर्स करण्यासाठी आपली शैक्षणिक योग्यता किंवा पात्रता काय असावी? Eligibility Criteria / Qualification?
तर सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो की आयटीआय कोर्स करण्यासाठी आपली योग्यता व पात्रता काय असावी लागते? तर विद्यार्थी हा कोणत्याही मान्यताप्राप्त असलेल्या विद्यालयातून किंवा शाळेतुन 8th, 10th आणि 12th पास होणे गरजेचे असते. आणि दहावी व आठवीच्या सर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण गुण मिळविणे अनिवार्य असते. किंवा आयटीआय कोर्स करण्यासाठी प्रवेश परीक्षा (Entrance Exam) सुद्धा घेतली जाते. त्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे कॉलेज अलोट होतात ते म्हणजे Government College आणि Private College त्यानुसार तुम्ही आवडते कॉलेज निवडू शकता.
5. आयटीआय ITI कोर्स ची फी किती असते?
आयटीआय कोर्स ची फी एका वर्षासाठी 5000/ वर्ष पासून सुरुवात होते. आणि काही प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये 25 हजार ते 50 हजार पासून फी असते. आणि आपणाला सरकारी कॉलेज मध्ये ॲडमिशन मिळवायचे असेल तर त्या कॉलेजची फी कमी असते. व खाजगी कॉलेज ची फी ही जास्त असते. त्यामध्ये सरकारी कॉलेज मध्ये प्रति वर्षे 7 हजार ते 10 हजार इतकी फी आकारली जाते.
6. आयटीआय ITI कोर्स अभ्यासक्रमाची यादी.
आपण पाहायला गेले तर आयटीआय कोर्स चे अभ्यासक्रम हे 100+ आहेत. त्यामध्ये आपण आपल्या आवडी चा कोणताही कोर्स निवडू शकतो. तर या लेखांमध्ये आपण काही प्रमुख कोर्सची नावे देणार आहोत ते सध्या Top Level ला आहेत.
∆ 10th नंतरचे आयटीआय ITI कोर्स अभ्यासक्रमाची यादी खालील प्रमाणे :-
| कोर्सची नावे | कालावधी | नोकरीचे प्रकार |
| फिटर (Fitter) | 2 वर्षे | Fitter, Welder, Technician, Mechanical fitter, Pipe fitter, Trainer इत्यादी. |
| इलेक्ट्रिशियन (Electrician) | 2 वर्षे | Supervisor, Technician, Wireman, Lineman, Repair Expert इत्यादी. |
| प्लंबर (Plumber) | 1 वर्ष | Plumber, Pipe Fitter, Roof Plumber इत्यादी. |
| मशीन टूल मेंटेनन्स (Machine Tool Maintenance) | 2 वर्षे | Mechanical fitter, Compressor attendant, Mechanical tool maintenance, Auto mechanical diesel, Brass finisher इत्यादी. |
| क्राफ्टस्मन फुड प्रोडक्शन (Craftsman Food Production) | 1 वर्ष | Food safety associate, Skilled knife operator, Cleaning operative इत्यादी. |
| वेल्डर (Welder) | 1 वर्ष | Welder, Tack Welder, Fabricator helper, Arc welder, Steel Welder इत्यादी. |
| पेन्ट टेक्नॉलॉजी (Paint Technology) | 2 वर्षे | Painter, Wood Painter, 3D Texturing Artist इत्यादी. |
| मेकॅनिक डिझेल (Mechanic Diesel) | 1 वर्ष | Spare parts sales assistant, Autodiesel engines mechanic, Auto fitter इत्यादी. |
| सिव्हिल (Civil Draughtsman) | 2 वर्षे | Structural droughtsman, architectural assistant इत्यादी. |
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक (Computer Operator and Programming Assistant) 7. आयटीआय ITI कोर्स नंतर काय?डिप्लोमा कोर्स म्हणजेच तांत्रिक किंवा अभियांत्रिकीय अभ्यासक्रमात आयटीआयचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारचे अभियांत्रिकी डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत ते तुम्ही करू शकता. विद्यार्थी सार्वजनिक क्षेत्रातील किंवा खाजगी क्षेत्रातील नोकरी करू शकता. किंवा विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू करू शकतात त्यामध्ये वेल्डर (Welder), इलेक्ट्रिशियन(Electrician) चे दुकान काढू शकता. 8. अंतिम निष्कर्ष :- तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना या लेखांमधून समजले असेल की आयटीआय कशी करायची? आयटीआय म्हणजे काय? आयटीआय हा कोर्स कधी करतात? व त्यासाठी आपली शैक्षणिक पात्रता किंवा योग्यता काय आहे? इत्यादी अशा अनेक गोष्टी किंवा बाबींचा तुम्हाला सर्वांना कळालेच असेल. तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आयटीआय कशी करायची? याबद्दल अजून काही माहिती हवी असेल किंवा आयटीआय बद्दल शंका असतील तर आपण कॉमेंट बॉक्स (Comment Section) मध्ये विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजच्या या लेखातून समजले असेल की आयटीआय ITI हा कोर्स कशी करायची? इत्यादी तर तुम्हाला हा लेख आवडल्यास जास्तीत जास्त तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही समजेल की आयटीआय ITI कशी करायची? किंवा आयटीआय ITI म्हणजे काय? व त्यानुसार तुम्ही आयटीआय ITI या कोर्सच्या तयारीला लागू शकाल. | 1 वर्ष | Computer operator, Data entry, Control operator, Data Capturer, Customer service operators इत्यादी. |
Sunday, June 19, 2022
Thursday, June 16, 2022
Tuesday, September 21, 2021
Saturday, May 1, 2021
शाळांना सुट्ट्या; पुढील शैक्षणिक वर्ष १४ जूनपासून सुरू होणार
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना शनिवार दि. १ मे, २०२१ पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून या सुट्टीचा कालावधी दि.१३ जून, २०२१ पर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे.
पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सोमवार दि. १४ जून २०२१ रोजी शाळा सुरू करण्यात येतील, तर जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवार दि. २८ जून, २०२१ रोजी शाळा सुरू होतील. या संदर्भात शिक्षण संचालकांनी नुकतेच सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना एका पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळ्याची व दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार सुट्यांबाबत या सूचना जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकीय-अशासकीय, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व सैनिक शाळा यांना देण्यात आल्या आहेत.
शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव किंवा नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक /माध्यमिक) यांच्या परवानगीने देण्यात येते.
माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्टया ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.
सध्या राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका व सर्व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय हे सध्या बंद आहेत. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याबाबत कोविड-१९ च्या प्रादुर्भावाची तत्कालीन परिस्थिती विचारात घेऊन शासन स्तरावरून वेळोवेळी जे आदेश निर्गमित होतील ते यथावकाश संचालनालयाकडून निर्गमित करण्यात येतील, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
Contact As: