Showing posts with label Panchayat samiti. Show all posts
Showing posts with label Panchayat samiti. Show all posts

Sunday, June 30, 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
 सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सुचित करण्यात येते की आज महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना "घोषित केलेली आहे यामध्ये रुपये १५००/ महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही योजना याच महिन्यात चालू होणार आहे सदर योजना महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत राबवल्या जाणार आहे याच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे आहे.
१) 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित ,परितकत्या,विधवा ,महिला 
२) त्या महाराष्ट्रातील रहिवासी असल्याबाबतचे अधिवास सर्टिफिकेट
३) उत्पन्नाचे रू२.५० लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत असावे 
४)बँकेमध्ये सदर महिलेचे नावे खाते असावी 
५)रेशन कार्ड मध्ये सदर महिलेचे नाव अंतर्भूत असावी .

सदर योजना अंतर्गत सोमवारी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना "नारी शक्ती दुत ॲप "प्ले स्टोअर वरून आपल्याला देण्यात आलेल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यावयाचा आहे.

महत्वाचे __सर्वात पहिले अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आपली नोंदणी या योजनेअंतर्गत पुढील आठवड्यात सोमवार ते बुधवार पर्यंत १००%करून घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नोंदणी सदर "नारी शक्ती दुत ॲप" मध्ये करून घेण्याची जबाबदारी अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे नोंदणी करत असताना 
1)उत्पन्नाचा दाखला सण 2025 पर्यंत वैद्य असणारा असावा
२) जन्माचा दाखला असावा /टि.सी झेरॉक्स असावी /डोमेसाईल प्रमाणात 
३)रेशन कार्ड ची झेरॉक्स असावी
४) आधार 
५) लाभार्थी नावाने बंक पासबुक झेरॉक्स

 सर्व माहिती ॲप मध्ये अंगणवाडी सेविका यांना भरावयाची आहे सोबत आधार कार्ड असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविकेला गावातील आशा वर्कर, सर्व बचत गटाच्या महिला यांना सुद्धा या योजनेबाबत योजनेबाबत माहिती देऊन "नारी शक्ती दुत"ॲप त्यांना प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून या योजने करता अर्ज करायला सांगावे.
तसेच गावातील इतर पात्र असणाऱ्या 21 ते 60 वयोगटातील महिलांना सुद्धा आवश्यक कागदपत्र तयार करून गावातील सेतू केंद्रातून किंवा ग्रामसेवकांच्या माध्यमातून सदर योजने करता अर्ज किंवा माहिती भरणे बाबत जनजागृती अंगणवाडी केंद्रामध्ये माता सभा घेऊन उद्या पासून करावी तसेच१ ते 15 जुलै२४ या कालावधी गावातील कोणतीही 21 ते 60 वयोगटातील पात्र असणारी महिला "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत" वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी घ्यावी गावातील जेवढे ग्रुप असतील त्या सर्व ग्रुपमध्ये या योजनेबाबत माहिती टाकावी काही आवश्यकता असल्यास त्यांना बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संबंधित बीटच्या पर्यवेक्षिका यांचा मोबाईल नंबर देण्यात यावा धन्यवाद.

Tuesday, December 13, 2022

ग्रामपंचायत - माहिती अधिकार अर्ज कसा ( RTI)

एक अर्ज आणी करा आपल्या ग्रामपंचायत ची पोलखोल, माहिती अधिकार अर्ज कसा RTI Maharashtra

आपली ग्रामपंचायत काय करते विकासकामे की भ्रष्टाचार हे सर्व जाणून घेण्यासाठी एक अर्ज आणी करा आपल्या ग्रामपंचायत ची पूर्ण पोलखोल करा, 


पहा ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज कसा करावा.


Wednesday, February 17, 2021

जिल्ह्यातील 30 ग्रामंपाचायतींना सुंदर गाव पुरस्कारांचे वितरण

 


दि . 16 : राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणार्‍या एकुण 30 ग्रामपंचायतींना जिल्हा व तालुकास्तरिय आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्काराने गौरविण्यात आले.

पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर वेवजी, बोर्डी, हिरवे, जांबुगाव व कुर्झे या ग्रामपंचायतींना जिल्हास्तरीय तर अन्य 25 ग्रामपंचायतींना तालुकास्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक उर्जा आणि पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर या निकषांवर सदर ग्रामपंचायतीना हे पुरस्कार देण्यात आले.

याप्रसंगी बोलताना, कामडी म्हणाल्या की, पुरस्कार प्राप्त ग्राम पंचायतींनी चांगले कार्य केले असून तालुका स्तरावरील पुरस्कार घेतलेल्या ग्रामपंचायतींनी जिल्हास्तरीय पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच इतर ग्राम पंचायतींनी पुरस्कार प्राप्त असे काम आपल्या ग्रामपंचायतीमध्ये करावे. तर गाव सुंदर आणि स्मार्ट करण्यासाठी अनेक कल्पना आहेत, त्या प्रत्यक्षात राबवण्यात आल्या पाहिजेत. त्यासाठी प्रशासनाकडून निधीची कमतरता भासू देणार नसुन गावात सरपंचांचे प्रशिक्षण, योग्य कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्त गाव असे उपक्रम राबवणे गरजेचे आहे, असे मत यावेळी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी तालुका व जिल्हा स्तरीय पुरस्कार प्राप्त विजेते हे कधीतरी महाराष्ट्र व देश पातळीवरचा पुरस्कार मिळवतील, असा विश्‍वास व्यक्त करतानाच शासनाची प्रत्येक योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

पशु संवर्धन व कृषी समिती सभापती सुशील चुरी, बांधकाम व वित्त समिती सभापती काशिनाथ चौधरी, समाजकल्याण समिती सभापती विष्णू कडव, वाडा पंचायत समिती सभापती योगेश गवा, वसई पंचायत समिती सभापती स्नेहलता सातवी व सर्व जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) टी. ओ. चव्हाण यांनी प्रास्ताविक सादर केले.