Tuesday, June 30, 2020

भारत सरकारकडून चायनीज ए प बॅन

भारत सरकारकडून चायनीज ए प बॅन 
खालील प्रमाणे यादी आहे:-


Friday, June 26, 2020

ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून स्थानिकांना नोकऱ्या देणार ठाकरे सरकार

मुंबई – महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात कामगार कमतरतेची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारने ऑनलाइन पोर्टल सुरू केले असून यामध्ये स्थानिक तरुणांना नोकरीच्या विविध ऑफर देण्यात आल्या आहेत. या पोर्टलमध्ये सरकारी नोकऱ्यांसोबतच खासगी कंपन्यांमध्येही नोकऱ्यांची तपशीलवार माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना राज्याचे कौशल्य विभाग मंत्री नवाब मलिक म्हणाले की, स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा यासाठी कौशल्य विभागामार्फत rojgar.mahaswayam.gov.in or www.mahaswayam.gov.in हे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर उमेदवार आपल्या आवडीनुसार नोकरीसाठी नोंदणी करू शकतात. याद्वारे, बेरोजगार तरुणांना चांगली नोकरीची संधी मिळू शकते, त्याचबरोबर त्यांना राज्यातील कामगार कमतरता दूर करण्यातही यश मिळू शकेल.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मनसेने अशी मागणी केली आहे की राज्यातील 80 टक्के रोजगार स्थानिक तरुणांना देण्यात यावा आणि इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांची काटेकोरपणे नोंदणी करावी.

पालघर जिल्ह्यातील स्थलांतरित मजुरांसाठी जाहिर आवाहन

पालघर जिल्ह्यातील स्थलांतरित मजुरांसाठी जाहिर आवाहन 

जिल्ह्यातील स्थलांतरीत मजुर त्यांच्या राज्यामध्ये जाणेसाठी इच्छुक आहेत त्यांनी https://migrant.mahabocw.in/migrant/form या संकेतस्थळावर नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.
स्थलांतरीत मजुरांच्या अडचणीबाबत याचिका क्र.६/२०२० मध्ये मा. सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने स्थलांतरीत मजुरांच्या नोदणी करिता https://migrant.mahabocw.in/migrant/form हे संकेतस्थळ तयार केले आहे. तरी पालघर जिल्ह्यातील स्थलांतरीत मजुर त्यांच्या राज्यामध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी वरील संकेतस्थळावर नोंदणी करावी.

तसेच पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये स्थलांतरीत मजुरांच्या बाबतीत मदत कक्ष (Help Desk)तयार करण्यात आला असून . या मदत कक्षांचे संपर्क क्रमांक खालील प्रमाणे आहेत.
तहसील कार्यालय डहाणू : 02528-221182, 
तहसील कार्यालय तलासरी : 9637692102/9637692127, 
तहसील कार्यालय पालघर : 02525-254930, 
तहसील कार्यालय वसई : 0250-2322007, 
तहसील कार्यालय वाडा : 02526-271423, 
तहसील कार्यालय विक्रमगड : 02520-240172, 
तहसील कार्यालय जव्हार : 02526-271423, 
तहसील कार्यालय मोखाडा : 02529-256826

पालघर जिल्ह्यातील जे स्थलांतरीत मजुर त्यांच्या राज्यामध्ये जाण्यास इच्छुक आहेत त्यांनी वर नमूद केलेल्या कामगार विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी. सदर संकेतस्थळावर नोंदणी करण्यास अडचणी येत असल्यास कामगार उपायुक्त किशोर दहिफळकर, भ्र.क्र. 9822331899 वर संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, यांनी केले आहे.

Wednesday, June 24, 2020

गरजु बेरोजगार उमेदवारांनी रोजगारासाठी नाव नोंदणी करावी-जिल्हाधिकारी


पालघर दि. 24 : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हयातून मजूर व कामगार वर्ग औद्योगिक आस्थापनेवरून स्वत : च्या मुळगावी परतला आहे. त्यामुळे औद्योगिक आस्थापनांवरील मणुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गरजु बेरोजगार उमेदवारांनी रोजगारासाठी आपली नोंदणी तातडीने www.mahaswayam.gov.in या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष कौशल्य विकास कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास शिंदे यांनी केले.
केंद्र शासनाच्या CNV Act 1959 (रिक्त पदे सक्तीने अधिसुचीत करणारा कायदा) नुसार राज्य शासकीय , निमशासकिय अस्थापनांनी त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती सेवायोजन कार्यालयास (एम्प्लॉयमेंट ऑफिस) आता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र असे नामकरण करण्यात आलेल्या कार्यालयास कळविणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. सबब आपल्या आस्थापनांमध्ये रिक्त असणारे व यापुढे रिक्त होणारे पदे शासनाच्या www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर अधिसुचित केल्याशिवाय भरती करू नये तसं केल्यास कायद्याचे उल्लंघन झाल्यास सदर आस्थापना कायदेशीर कार्यवाहीस पात्र होणार आहे.असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
जिल्हयामध्ये Online Virtual Job Fair चे आयोजन तात्काळ करावयाचे असल्याने आपल्या आस्थापनेमध्ये असलेल्या रिक्त पदांचा तपशिल www.mahaswayam.gov.in वेबसाईटवर नोंदविला जाईल व ज्या बेराजगरांनी नाव नोंदणी केली आहे ते त्या पदासाठी आपला पर्याय Online नोंदविता येणार आहे. यामुळे उमेदवारांची सर्व माहिती उद्योजकांस उपलब्ध होईल त्यानुसार उद्योजक उमेदवारांची Online किंवा प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करणार आहे. तरी जिल्हयातील सर्व आस्थापनांनी आपल्या रिक्त जागा दि. २६/०६/२०२० पर्यंत नोंदणी करून या कार्यालयाच्या palgharrojgar@gmail.com या ई-मेल आयडी वर पाठविण्यात यावा असेहि आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

घरगुती वीजग्राहकांना जूनमधील वीज बिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत


ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची पत्रकार परिषदेत माहिती

मुंबई, दि. २३: लॉकडाऊनच्या कालावधीनंतर सध्या मीटर रिडींग घेऊन जून महिन्याचे वीजबिल देण्यात येत आहे. महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना या वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत उपलब्ध आहे व स्थानिक कार्यालयांकडून वीजबिलांचे सुलभ हप्ते पाडून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. महावितरणच्या फोर्ट येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Maha Info Corona Website

यावेळी डॉ. राऊत म्हणाले, महावितरणच्या ग्राहकांवर वीजबिलांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा भुर्दंड लादलेला नाही. जूनमध्ये देण्यात येत असलेली वीज बिले ही लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी वापरलेल्या युनिटप्रमाणेच आहे. या वीजबिलाची घरबसल्या पडताळणी करण्यासाठी महावितरणने विशेष लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतरही काही शंका असल्यास ग्राहक आवश्यकतेनुसार https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवरून वाढीव वीजबिलांची पडताळणी करू शकतात. तसेच महावितरणच्या कार्यालयातही जाऊन वीजबिलांची आकारणी समजून घेता येईल. तसेच ग्राहकांना मीटर रिडींग चुकल्याने किंवा अन्य कारणाने चुकीचे वीजबिल गेले असल्यास ते दुरुस्त करण्यात येईल, अशी ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिली.

डॉ. राऊत म्हणाले, लॉकडाऊनच्या कालावधीत वीज ग्राहकांकडील मीटर रिडींग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीज बिल देण्यात आले. मात्र या कालावधीत महावितरणच्या आवाहनानुसार स्वतःहून मीटर रिडींग पाठविणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिले देण्यात आली आहेत. आता जूनमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी मीटर रिडींग घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मार्चनंतर प्रथमच थेट जूनमध्ये मीटर रिडींग घेण्यात येत आहे. त्यामुळे मार्चपासून ते जूनमध्ये रिडींग घेईपर्यंत एकूण वीजवापराचे एकत्रित व अचूक बिल ग्राहकांना देण्यात येत आहे. या बिलामध्ये ग्राहकांवर एका पैशाचाही भुर्दंड बसणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीचे वीजबिल असल्याने स्लॅब बेनिफिट देण्यात येत आहे. तसेच ग्राहकांनी एप्रिल व मेमध्ये सरासरी वीजबिलांची रक्कम भरली असल्यास त्या रकमेचे समायोजन करण्यात येत आहे, चुकीच्या बिलाची दुरुस्तीसाठी तत्परतेने कार्यवाही करण्यात यावी व ग्राहकांना चुकीच्या वीजबिलांचा कोणताही त्रास होऊ नये, अशा सूचना महावितरणला देण्यात आल्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत सांगितले.

यावेळी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव (ऊर्जा) व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे आणि महावितरणचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात आज कोरोना मृत्यू 4, नवे पॉझिटीव्ह 199!


दि. 23 जून 2020: आज वसई महानगरामध्ये कोरोनाच्या संसर्गाने 4 मृत्यू झाले असून वसई तालुक्यातील मृतांची संख्या 99 झाली आहे. पालघर तालुका 4, वाडा व विक्रमगड तालुक्यातून प्रत्येकी 1 मृत्यू झालेले असल्याने पालघर जिल्ह्यातील कोरोना मृत्यूंची संख्या आता 105 वर पोहोचली आहे.

जिल्ह्यामध्ये आज नव्या 199 कोरोना पॉझिटीव्हची भर पडली असून, त्यातील विक्रमगड तालुक्यातून 15, जव्हार तालुक्यातून 12, वाडा तालुक्यातून 7, डहाणू तालुक्यातून 3, मोखाडा तालुक्यातून 2, पालघर तालुक्यातून 1 रुग्ण वाढले आहेत. उर्वरीत 159 पॉझिटीव्ह वसई तालुक्यातील आहेत.

डहाणू तालुक्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू

दि. 23 जून : डहाणू तालुक्यातील वाढवण गावच्या एका 53 वर्षीय इसमाचा कोरोनाबाधेमुळे मृत्यू ओढवला आहे. ह्या व्यक्तीवर डहाणू उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज रात्री उशीरा मृतावर डहाणूतील मल्याण स्मशानभूमीत मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ह्या घटनेमुळे वाढवण गाव प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे. मृत व्यक्ती बोईसरमध्ये रहात होती व 2/3 दिवसांपूर्वी वाढवण येथे आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान वरोर मांगेलआळी येथे एक व्यक्ती कोरोना +Ve निघाल्यामुळे हा परिसर देखील प्रतिबंधीत केला आहे.

Tuesday, June 23, 2020

स्थलांतरीत मजुरानीं त्यांच्या राज्यामध्ये जाण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करावी.-जिल्हाधिकारी

पालघर दि. 22: जिल्ह्यातील स्थलांतरीत मजुर त्यांच्या राज्यामध्ये जाणेसाठी इच्छुक आहेत त्यांनी https://migrant.mahabocw.in/migrant/form या संकेतस्थळावर नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.
स्थलांतरीत मजुरांच्या अडचणीबाबत याचिका क्र.६/२०२० मध्ये मा. सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने स्थलांतरीत मजुरांच्या नोदणी करिता https://migrant.mahabocw.in/migrant/form हे संकेतस्थळ तयार केले आहे. तरी पालघर जिल्ह्यातील स्थलांतरीत मजुर त्यांच्या राज्यामध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी वरील संकेतस्थळावर नोंदणी करावी.

तसेच पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये स्थलांतरीत मजुरांच्या बाबतीत मदत कक्ष (Help Desk) तयार करण्यात आला असून . या मदत कक्षांचे संपर्क क्रमांक खालील प्रमाणे आहेत.
तहसील कार्यालय डहाणू : 02528-221182, 
तहसील कार्यालय तलासरी : 9637692102/9637692127, 
तहसील कार्यालय पालघर : 02525-254930, 
तहसील कार्यालय वसई : 0250-2322007, 
तहसील कार्यालय वाडा : 02526-271423, 
तहसील कार्यालय विक्रमगड : 02520-240172, 
तहसील कार्यालय जव्हार : 02526-271423, 
तहसील कार्यालय मोखाडा : 02529-256826

पालघर जिल्ह्यातील जे स्थलांतरीत मजुर त्यांच्या राज्यामध्ये जाण्यास इच्छुक आहेत त्यांनी वर नमूद केलेल्या कामगार विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी. सदर संकेतस्थळावर नोंदणी करण्यास अडचणी येत असल्यास कामगार उपायुक्त किशोर दहिफळकर, भ्र.क्र. 9822331899 वर संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, यांनी केले आहे.

Monday, June 22, 2020

पालघर जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह 202 ने वाढले व कोरोना मृत्यू 101


दि. 22 जून 2020: पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात कोरोनाची आकडेवारी सतत वाढत असून, जिल्ह्याचा ग्रामीण भागही मागे राहिलेला नाही. आज वसई महानगरामध्ये कोरोनाच्या संसर्गाने 3 मृत्यू झाले असून वसई तालुक्यातील मृतांची संख्या 95 झाली आहे. पालघर तालुका 4, वाडा व विक्रमगड तालुक्यातून प्रत्येकी 1 मृत्यू झालेले असल्याने पालघर जिल्ह्यातील कोरोना मृत्यूंची संख्या आता 101 वर पोहोचली आहे.

जिल्ह्यामध्ये आज नव्या 202 कोरोना पॉझिटीव्हची भर पडली असून, त्यातील मोखाडा तालुक्यातून 8 व जव्हार आणि वाडा तालुक्यातून प्रत्येकी 5 रुग्ण वाढले आहेत. उर्वरीत 184 पॉझिटीव्ह वसई तालुक्यातील आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आज 58 कोरोना बाधीत पूर्णपणे बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

Sunday, June 21, 2020

पालघर जिल्ह्यात कोरोनाबाधीत 2629, बरे झाले 1482 मृतांची संख्या 97!


दि. 21 जून: पालघर जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या मृत्यूचा आकडा 97 वर पोहोचला असून त्यातील एकट्या वसई तालुक्यातील मृतांची संख्या 91 आहे. वसई विरार महानगरातील 85 व ग्रामीण वसईतील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. पालघर तालुक्यातून 4 व वाडा आणि विक्रमगड तालुक्यातून प्रत्येकी 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजची कोरोना बाधितांची आकडेवारी:
वसई विरार महानगर क्षेत्र – 2041 (85 मृत्यू)(1168 बरे झाले)
वसई ग्रामीण तालुका – 93 (6 मृत्यू) (65 बरे झाले)
पालघर तालुका – 168 (4 मृत्यू) (107 बरे झाले)
वाडा तालुका – 134 (1 मृत्यू) (55 बरे झाले)
विक्रमगड तालुका – 64 (1 मृत्यू) (42 बरे झाले)
डहाणू तालुका – 67 (41 बरे झाले)
जव्हार तालुका – 45 (4 बरे झाले)
मोखाडा तालुका – 9
तलासरी तालुका – 8

आज 5 नवे कोरोना पॉझिटीव्ह


दि. 21: पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण तालुक्यांमध्ये आज 5 नवे कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून त्यामध्ये, डहाणू तालुक्यातील 3 व वाडा तालुक्यातील 2 जणांचा समावेश आहे. डहाणू तालुक्यातील 3 रुग्णांपैकी 1 कासा पोलीसांच्या ताब्यातील कैदी असून तो मुंबईचा आहे. 1 दापचरी व 1 जामशेत येथील आहेत. तर वाडा तालुक्यातील 1 रुग्ण कुडूस येथील व 1 उमरोठे येथील आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन

|| आदिवासी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन ||

ऑनलाईन माध्यमातून करियर विषयी विविध शंका, संधी, प्रोत्सहन साठी मार्गदर्शन, मेंटॉरशिप, समुपदेशन इत्यादी आदिवासी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी. लिंक https://forms.gle/W4DmyLgqv8uoxZiC8 आपल्या संपर्कातील इच्छुकांना कळवावे. जोहार!

______________________________
TTSF & AYUSH Initiative for Students

Friday, June 19, 2020

मन, स्वभाव व ताणतणाव

लेख थोडा मोठा असला तरी अवश्य पूर्ण वाचा.

मन

मानवी मनाचे तीन भाग असतात
◆व्यक्त मन (Conscious Mind):- मनाच्या या भागातील विचार व भावना आपल्याला सहजी अनुभवता येतात.
◆अव्यक्त मन (Unconscious Mind):-मनाच्या या भागामधील विचार व भावना आपल्याला सहजासहजी अनुभवता येत नाहीत. अनेक प्रकारच्या मानसिक अस्वस्थता याच भागातून निर्माण होतात.
◆अर्धव्यक्त मन (Subconscious Mind):- काँशियस माइंड व अंकाँशियस माइंड या मधील ब्रिज म्हणजे सबकाँशियस माइंड. या भागामध्ये दोन्ही भागांच्या विचार व भावनांचे मिक्सर चालू असते.
मानवी मनाच्या स्वास्थ्यासाठी या तिन्ही भागांचा समतोल राखणे अतिशय महत्वाचे असते. यामधील कुठलाही असमतोल मानसिक अस्वस्थता निर्माण करतो.

स्वभाव

प्रत्येक व्यक्तीची स्वतःला व आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना हाताळण्याची विशिष्ट अशी पद्धत असते, या पद्धतीला त्या व्यक्तीचा स्वभाव असे म्हंटले जाते.
स्वभावाचे दोन भाग असतात.
◆Temperament :- नैसर्गिक रित्या आनुवंशिक भेटलेला भाग म्हणजेच टेम्परामेन्ट
◆Character:- व्यक्तीला त्याच्या जीवनात येणाऱ्या अनुभवांमधून घडणारा भाग म्हणजेच कॅरॅक्टर
जसे लहान बाळाचे टेम्परामेन्ट आपल्याला लगेच समजते उदा. काही बाळ लहान पणापासून शांत असतात तर काही चंचल तर काही अस्वस्थ व चिडचिडी असतात.
लहानपणापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर आपल्याला वेगवेगळे असे अनेक अनुभव येत असतात. या अनुभवामधून आपल्या कॅरॅक्टर मद्धे वेळोवेळी अनेक बदल घडून येत असतात.
व्यक्तीची स्वप्रतिमा, ताणतणाव हाताळण्याची पद्धत, विविध अनुभवांना सामोरे जाण्याची पद्धत, इतर लोकांशी वागण्याची पद्धत अशा सर्व गोष्टींवरून व्यक्तीचा स्वभाव ठरत असतो.
आदर्श स्वभाव वास्तवात असणे अशक्य आहे असे माझे प्रांजळ मत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावात कमी जास्त प्रमाणात दोष हा असतोच.

ताणतणाव

ताणतणाव म्हणजेच स्ट्रेस हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. स्ट्रेस म्हणजे प्राप्त परिस्थितीशी सामना करण्याची व्यक्तीची क्षमता कमी पडते , तेव्हा निर्माण होणाऱ्या परिस्थितीला ताणतणाव असे म्हणतात.
सध्या बहुतेक लोकांचे आयुष्य हे गतिमान झाले आहे व स्पर्धा ही खूप वाढली आहे. या दोन्ही गोष्टींचा स्वाभाविकच परिणाम व्यक्तीच्या मानसिक आरोग्याला होऊन ताणतणाव वाढत आहेत. तसेच कौटुंबिक ताणतणाव, भौतिक सुखाच्या मागे लागणाऱ्या सध्याच्या संस्कृतीमुळे उदभवणारे ताणतणाव व इ. अश्या अनेक प्रकारच्या ताणतणावांना बऱ्याच लोकांना सामोरे जावे लागत आहे.
प्रत्येक व्यक्तीनुसार स्ट्रेस हाताळण्याची क्षमता ही भिन्न भिन्न असते त्यामुळे प्रत्येक जण तणावग्रस्थ होत नसतो. ज्या माणसाची तणाव हाताळण्याची क्षमता मुळातच कमी असते अश्या व्यक्तीवर वरील काही गोष्टीमुळे उदभवणाऱ्या ताणतणावाची लक्षणे लगेच दिसायला सुरुवात होते.
व्यक्तीला येणारा ताण हा वाईटच असतो असे मला अजिबात वाटत नाही कारण ताण तणावात काम करायला मला स्वतःला खूप मजा येते. माझ्या सहकाऱ्यांनी व माझ्या आयुष्याशी निगडित बऱ्याच जणांनी ते अनुभवलं ही आहे व असेल. थोडा हलका तरी स्ट्रेस हा हवाच जसे कल्पना करा की परीक्षेच्या आधी किव्हा एखाद्या सामन्याच्या आधी आपल्याला ताण आलाच नाही तर?...
म्हणजेच ताण वाढला की परफॉर्मन्स ही वाढतो पण एका मर्यादेपेक्षा ताण वाढला व तो हाताळता आला नाही की परफॉर्मन्स कमी होत जातो.

So Moral Of The Story:-
शरीराचे आरोग्य कसे टिकवावे ह्या विषयी बऱ्याच जणांना माहिती आहे पण मनाचे आरोग्य हा विषय दुर्लक्षितच राहतो. अनेक छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण मनाचे आरोग्य राखू शकतो.
उदा. आपल्याला आवडणारे तसेच आधार देणारे नातेसंबंध नेहमी जोपासणे, आपल्याला ताण येणार नाही असे ध्येय व उद्दिष्ट्ये ठरवणे कारण अनेकवेळा आपण आपणच ठरवलेली ध्येय गाठण्याच्या नादात एवढा ताण वाढवतो की आपले मानसिक आरोग्य खालावते. आणि महत्वाचे म्हणजे आपल्याला आवश्यकता भासेल तेव्हा जाणीवपूर्वक आपल्या आयुष्याची गती कमी करणे कारण आयुष्याच्या वाढत्या गतिमानते मुळे आयुष्यातील अनेक लहान मोठया आनंदाना आपण मुकत असतो व त्यामधून सुद्धा मानसिक अस्वस्थतेचा जन्म होत असतो. तसेच इतर छोट्या छोट्या गोष्टी वेगळ्या सांगायची गरज नाही उदा. शारीरिक आरोग्यासाठी व्यायाम, सकस आहार, पुरेशी झोप, आवडते छंद जोपासणे, अपल्या व्यक्तित्वामधील दोष सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे व इतर.
शरीराचा व मनाचा एक अतिशय जवळचा संबंध आहे आणि तो आपल्यालाच समजून घेतला पाहिजे.
(हे लिहिल्या नंतर मला माझ्या वाचनात आलेल्या दोन पुस्तकांना धन्यवाद देणं आवश्यक वाटत आहे)
मनोविश्लेषण:-Sigmund Freud
प्रश्न मनाचे:- नरेंद्र दाभोलकर
धन्यवाद🙏🙏

उद्योगांना कुशल मनुष्यबळ तर इच्छुकांना एका क्लिकवर रोजगार संधींची माहिती

संकेतस्थळावर उपलब्ध सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन


मुंबईदि. 18 : राज्यातील उद्योगांमधील उपलब्ध रोजगारसंधींची माहिती बेरोजगार तरुणांना आता संकेतस्थळावर मिळणार आहे. याशिवाय याच संकेतस्थळावर उद्योजकांनाही राज्याच्या विविध भागात उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची माहिती मिळणार आहे. यासाठी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे उद्योजक आणि त्यांना आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळामध्ये समन्वय साधून दोघांनाही उपयोगी ठरणारे माध्यम तयार करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांनी दिली.

खाजगीशासकीय रोजगारसंधींची माहिती होते उपलब्ध

बेरोजगार तरुणांसाठी या संकेतस्थळावर विविध सुविधा उपलब्ध आहेत. यासाठी त्यांनी संकेतस्थळावर त्यांच्या शैक्षणिक आणि इतर माहितीसह नोंदणी करणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे आवश्यकतेनुसार एखाद्या उद्योग अथवा आस्थापनेकडून त्यांना जॉब ऑफर मिळू शकते. याशिवाय नोकरी साधक (नोकरी शोध) याठिकाणी क्लिक केल्यावर रोजगार यादी, क्षेत्र, स्थान व शिक्षणानूसार रोजगार संधींची माहिती मिळते. विविध माध्यमांमध्ये प्रसिध्द होणाऱ्या रिक्त पदांच्या जाहिराती पाहण्यासाठी “रिक्तपदांच्या जाहिराती” (Vacancy Advertisement) या टॅबव्‍दारे माहिती मिळू शकते. शासकीय तसेच खासगी अधिसूचीत रिक्तपदांची माहिती, त्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करणे, राज्यभरात आयोजित होणाऱ्या रोजगार मेळाव्यांची माहिती मिळवणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमात सहभागी होणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे आणि सहभाग घेणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या स्वयंरोजगारासाठी योजनांची माहिती मिळविणे व लाभ घेण्यासाठी उचित योजनेंतर्गत प्रकरण सादर करणे आदी कार्यवाही करता येते.

उद्योजकांना मिळते नोकरी इच्छुक उमेदवारांची माहिती

संकेतस्थळावर उद्योजकांसाठीही विविध सुविधा उपलब्ध आहेत. नोंदणी केलेल्या नोकरीइच्छुक उमेदवारांची माहिती, त्यांचे शिक्षण, कौशल्य, अनुभव, ठिकाण याप्रमाणे एकत्रितरित्या संकेतस्थळावर उपलब्ध होते. याशिवाय उद्योजक म्हणून नोंदणी करणे, नवीन प्लांट, शाखेची स्वतंत्र नोंद करणे, वेळोवेळी निर्माण होणारी रिक्‍तपदे अधिसूचित करणे, त्याअन्वये नोंदविलेल्या मागणीनुसार सिस्टीमद्वारे पुरस्कृत पात्र उमेदवारांची यादी मिळविणे, या पदांची विनामुल्य प्रसिद्धी करणे, ही यादी पीडीएफ किवा एक्सेलमध्ये डाऊनलोड करणे, मुलाखती आयोजित करणे, प्राथमिकरित्या निवडलेल्या उमेदवारांना सिस्टीमद्वारे विनामुल्य एसएमएस पाठविण्याची सुविधा, मुलाखत प्रक्रियेनंतर रुजू झालेल्या उमेदवारांचे प्लेसमेंट ऑनलाईन नोंदविणे आदी कार्यवाही करता येते. उद्योजकांना सीएनव्ही कायदा १९५९ अंतर्गत बंधनकारक असलेले त्रैमासिक मनुष्यबळ विवरणपत्रही या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करता येते.

संकेतस्थळावर रोजगार विषयक सर्व सेवा ह्या उद्योजक आणि उमेदवार या दोघांनाही विनामुल्य उपलब्ध आहेत. सर्वांनी www.mahaswayam.gov.in या वेबसाईटद्वारे देऊ केलेल्या सुविधांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांनी केले आहे. याबाबत काही अडचणी असल्यास जिल्ह्यातील सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याशी संपर्क साधावा

पालघर जिल्हा: आज 5 मृत्यू , नवे 20 पॉझिटीव्ह


पालघर जिल्ह्यात आजच्या दिवसांत कोरोना मुळे 5 मृत्यू झाले असून त्यातील 4 वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील असून वाडा तालुक्यात पहिला मृत्यू उद्भवला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता 81 झाली आहे.

आज जिल्ह्यात 20 नवे कोरोना पॉझिटीव्ह निष्पन्न झाले असून त्यामध्ये जव्हार 6 (जव्हार शहर 4 व जांभूळ विहीर 2), वाडा 6 (वाडा नगरपंचायत 5 व चाम्बळे 1), डहाणूत 5 (डहाणू शहर 3, थर्मल पॉवर स्टेशन 1, वाणगांव- विक्रमनगर 1), पालघर 2 (बोईसर बीएआरसी 1, शिगांव 1) व विक्रमगड तालुक्यातील 1 (झडपोली) कोरोना बाधीताचा समावेश आहे.

Thursday, June 18, 2020

विद्यार्थ्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी-जिल्हाधिकारी

कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपली वैयक्तिक स्वच्छता ठेवावी तसेच गरज नसताना घराबाहेर जाऊ नये घराबाहेर जाण्याचे गरजेचे असल्यास किंवा महत्वाच्या कामासाठी घराबाहेर जाऊन परत घरी परतल्यावर संपूर्ण शरीर निर्जंतूकीकरण करून घ्यावे, कोणत्याही वस्तूला स्पर्श केल्यावर किमान वीस सेकंद हात धुवावे, सामाजिक अंतर राखावे या बाबत नागरिकांमध्ये जनजागृती असणे आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जिल्ह्यातील विद्यार्थी, प्राध्यापक, यांना केले.
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील एनसीसी, एमसीसी विद्यार्थी, प्राध्यापक यांच्याशी जिल्हाधिकारी यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा प्रशासन कोव्हीड-19 विरूद्ध लढा देत असून या युद्धात विद्यार्थी यांनी प्रशासनाला सहकार्य करावे. आपला वॉर्ड, गाव कोरोना संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा तसेच आपले कुटंबीयांना या पासून सुरक्षित ठेवण्यासाठी तरुणांनी आपली स्वतःची वैयक्तिक स्वच्छता ठेवणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी  यांनी सांगितले.

आपल्या परिसरात कोणाला लक्षणे आळल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा तसेच
ग्रामीण भागात अशा वर्कर, अंगणवाडी ताई यांच्या माध्यमातून आरोग्य सर्वे करण्यात येणार असून त्यांना या कामात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी  यांनी केले.

तलासरी नगरपंचायत - जाहीर सूचना

तलासरी नगरपंचायत जाहीर सूचना

Wednesday, June 17, 2020

🏥कोरोना अपडेट जिल्हा पालघर ग्रामीण

 दिनांक 17/6/2020 संध्याकाळ  6:00 पर्यंत चा अहवाल 

🏥रुग्ण क्रमांक 485 ते 524
*40 नवीन  रुग्ण* 

*एकूण स्त्री रुग्ण*  : 21
*एकूण पुरुष रुग्ण* : 19

*तालुका निहाय रुग्ण संख्या*

*वाडा  तालुका* :  17


🏥रुग्ण क्र. 485-492- प्रा आ केंद्र खनिविली येथील अधिकारी कर्मचारी व निवास स्थानात राहणारे त्यांचे कुटुंबिय आहेत. 

🏥रुग्ण क्र. 493-497- खारीवली  तालुका : वाडा येथील रहिवासी आहेत. 

🏥रुग्ण क्र. 498-499- खुटलपाडा तालुका : वाडा येथील रहिवासी आहेत. 

🏥रुग्ण क्र. 500-  बिलघर तालुका : वाडा  येथील रहिवासी आहे.

🏥रुग्ण क्र. 501-  भावेघर तालुका : वाडा  येथील रहिवासी आहे.

*जव्हार  तालुका* -  2

🏥रुग्ण क्र. 502-503 - केळघर तालुका: जव्हार  येथील रहिवासी आहेत. 

*विक्रमगड तालुका* - 14

🏥रुग्ण क्र. 506-517- डोल्हारी तालुका- विक्रमगड  येथील रहिवासी आहेत. 

*डहाणू तालुका* -1

🏥रुग्ण क्र. 518- वरखंडा तालुका : डहाणू  येथील रहिवासी आहे.

*तलासरी तालुका* -6

🏥रुग्ण क्र. 519-  तालुका- सावरोली पाटीलपाडा तालुका : तलासरी येथील रहिवासी आहे.


🏥रुग्ण क्र. 520-521- सुतारपाडा तलासरी येथील रहिवासी आहेत. 

🏥रुग्ण क्र. 522-523- दयानंद हॉस्पिटल  तालुका- तलासरी   येथील कर्मचारी आहेत.

🏥रुग्ण क्र. 524- दापचरी युनिट  तालुका- तलासरी   येथे पोलीस खात्यात कार्यरत आहे.

पेरणीच्या क्षेत्राचे नियोजन शेतीशाळा,बांधावर तूर लागवड,पिक विमा योजना अंतर्गत शेतकरीना मार्गदर्शन

   पालघर जिल्ह्यात कृषी विभागाने खरीप हंगामात 1.10 लाख हेक्टर पेरणीच्या क्षेत्राचे नियोजन केले असून त्यसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांची व बियाण्याचे आवंटन शासनाकडून मंजूर करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी  यांनी सांगितले.

खरीप हंगामात प्रामुख्याने भात या पिकाची लागवड केली जाते, या व्यतिरिक्त काही प्रमाणात नागली व इतर कडधान्य घेतली जातात. जिल्ह्यात भाताचे 22000 क्वी. बियाण्याची मागणी करण्यात आली असून आजरोजी बाजारात विविध कंपनीचे 24000 क्वी. (110%) बियाणे उलब्ध आहे. तसेच रासायनिक खतांची जून अखेरसाठी 8700 मेट्रिक टनाची मागणी नोंदविली असून आजरोजी बाजारात 8500 मेट्रिक टन (97%) रासायनिक खताची उपलब्धता आहे. त्यामुळे बाजारात कुठल्याही प्रकारच्या खतांची व बियाण्याची टंचाई नसल्याचे जिल्हाधिकारी  यांनी सांगितले.

शेतीशाळा :

 जिल्ह्यात मागील आठवड्यात पावसाची सुरवात झाली असून शेतकरी पूर्व मशागत व भात रोपवाटीकेच्या कामास सुरवात करत आहेत. खरीप हंगामात भात हे प्रमुख पिक असल्याने हंगामात शेतकऱ्यांना भातपिकाविषयी तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्यक कृषी सहाय्यकांच्या समवेत शेतकाऱ्यांची शेतीशाळा आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये बीज प्रक्रिया, रोपवाटिका व्यस्थापन, खत व्यस्थापन, कीड व्यस्थापन आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी  यांनी सांगितले.

बांधावर तूर लागवड : 

आदिवासी कुटुंबाच्या दैनंदिन आहारात समतोल अन्नघटकांचा समावेश व्हावा यासाठी आदिवासी विभाग आणि कृषी विभागाच्या सहकार्याने या खरीप हंगामात जिल्ह्यातील सर्व 67000 आदिवासी शेतकऱ्यांना 250 ग्राम तुरीचे बियाणे मोफत वाटप करण्यात येत आहे. एक एकर क्षेत्रासाठी पुरेल इतके बियाणे वाटप करून त्याची लागवड शेतकरी आपापल्या भाताच्या शेताच्या बांधावर करणार आहे. तुरीच्या लागवडीची पद्धत व त्याचे व्यस्थापन याचे मार्गदर्शन स्थानिक कृषी सहय्यक करणार आहे. यासाठी सर्व आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्या गावचे कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
पिक विमा योजना : 

पालघर जिल्ह्याचे प्रमुख फळपिक चिकू आहे. हवामानातील होणाऱ्या बदलामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने हवामान आधारित फळपिक विमा योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 30 जून 2020 आहे याची नोंद सर्व शेतकऱ्यांनी घ्यावी.
जव्हार व मोखाडा तालुका वगळता इतर सर्व तालुक्यासाठी हि योजना लागू करण्यात आली आहे. योजनेत एक मोठा बदल करण्यात आला असून त्यानुसार सर्व शेतकऱ्यांना आपल्या बागेचा फोटो व अक्षांस/रेखांश अर्जासोबत द्यावे लागणार आहे. तरी ज्या शेतकऱ्यांकडे मोबाईलची सोय नसेल त्यांनी आपल्या गावचे कृषी सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  यांनी केले.

कुपोषित बालके, गरोदर माता यांना उत्तम दर्जाचा सकस आहार देण्यात येणार-जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे

पालघर दि 17 : जिल्ह्यातील कुपोषित बालके तसेच गरोदर माता यांना भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत उत्तम दर्जाचा सकस आहार देण्यात येणार असून यासाठी लागणारा निधी वेळेत उपलब्ध करुन देण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी सांगितले.
पहिल्या टप्यात अमृत आहार योजनेच्या लाभार्थीची प्रकल्प निहाय मागणी जनरेट करण्यात आली असून. दुसऱ्या टप्प्या तील निधी जलद गतीने वितरणाबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. सध्यास्थितीत तालुका निहाय निधी वितरीत झाला आहे. शासन निर्णयानुसार सन 2020-21 मधील अर्थसंकल्पीय निधीच्या 33% निधी उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधकारी डॉ कैलास शिंदे यांनी सांगितले. 
 कुपोषण निर्मुलन अंतर्गत टास्क फोर्स समितीची बैठक जिल्हाधकारी कार्यालय येथे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली.
यावेळी जिल्हा परषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेन्द्र वारभुवन, सहायक जिल्हाधिकारी सौरभ कटियार, श्री. नायर, उपविभागीय अधिकारी अर्चना कदम, स्वप्नील तागडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी महिला व बालविकास अधिकारी राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
बाल उपचार केंद्र (CTC) वाढविण्याची वाढविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.
या केंद्र मध्ये आवश्यतेप्रमाणे बालकांना दाखल करण्यात येणार आहे. पावसाळ्यात सर्व्हेमध्ये आढळुन आलेल्या आजारी सॅम बालकांना सीटीसी मध्ये उपचार करण्यात यावेत अशी सूचना देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
आदिवासी भागातील कुपोषित बालके, गरोदर माता यांना पोषक आहार देण्याबाबत अंगणवाडी सेवीकांना आधुनिक पध्दतीने प्रशिक्षण देण्यात येणार असून, पालघर, वसई, डहाणु, तलासरी तालुक्यातील अंगणवाडी प्रकल्प यांचेशी संहिता संस्था, ग्राममंगल संस्था यांचा सामंजस्य करार झालेला आहे. सदर करारानुसार या तालुक्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे शैक्षणिक दृष्ट्या प्रशिक्षणआयोजित करण्यात येत आहे.
वाडा तालुक्यातील अंगणवाडी प्रकल्प यांचेशी करार झालेला आहे. सदर करारानुसार या तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे शैक्षणिक दृष्ट्या प्रशिक्षणआयोजित  करण्यात येत आहे.
विक्रमगड व जव्हार तालुक्यातील अंगणवाडी प्रकल्प यांच्याशी करार झालेला आहे. सदर करारानुसार या तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे शैक्षणिक दृष्ट्या प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे.
कोसबाड येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना प्रशिक्षण देणारे शासकीय प्रशिक्षण केंद्र आहे. तसेच येथे ग्रामसेवकांना देखील प्रशिक्षण दिले जाते.
कुपोषित बालकांचे वजन करण्याबाबतची कार्यवाही सुरु असून अंगणवाडीतील बालकांचेहि वजन उंची पालकांच्या समक्ष घेण्याबाबत जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.

Tuesday, June 16, 2020

दिवसभरात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 47 नवे पॉझिटीव्ह


आज 47 नवे कोरोना बाधीत निष्पन्न झाले आहेत. त्यामध्ये एकट्या वाडा तालुक्यातील 27 व जव्हार तालुक्यातील 14 जणांचा समावेश आहे. मोखाडा तालुक्यात 2 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून विक्रमगड येथे 1 व डहाणू तालुक्यात (वाणगांव) 1 व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

|| NIFT मध्ये *कलाकार आणि पाल्यांसाठी प्रवेश* ||

|| NIFT मध्ये *कलाकार आणि पाल्यांसाठी प्रवेश* ||

नामवंत *NIFT येथे बॅचलर ऑफ डिझाईन या कोर्स मध्ये कलाकारांसाठी किंवा त्यांच्या पाल्यांसाठी* डिझाईन क्षेत्रात शिक्षणासाठी विशेष प्रवेश राखीव जागा आणि फी मध्ये सवलत.

▪ *कोर्स* : बॅचलर ऑफ डिझाईन
▪ *शाखा* : ऍक्सेसरी डिझाईन, फॅशन कम्युनिकेशन, फॅशन डिझाईन, नीटवेअर डिझाईन, लेदर डिझाईन, टेक्सटाईल डिझाईन
▪ *पात्रता* : १२वी, किंवा डिप्लोमा
▪ *ठिकाण* : मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चेन्नई, गांधीनगर, जोधपूर, कांग्रा, कन्नूर, कोलकता, नवी दिल्ली, पटना, रायबरेली, शिलोंग, श्रीनगर, पंचकुला
▪ *जागा* : ३२ (प्रत्येकी २)
▪ *शेवट ची तारीख* : ३० जून २०२०
▪ *अर्ज, अधिक माहिती* साठी : https://applyadmission.net/nift2020Artisan/Default.aspx
▪ *संस्था* : नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी 
      (राष्ट्रीय फैशन प्रौद्योगिक संस्थान) NIFT (National Institute of Fashion Technology)

आदिवासी कलेत खूप पोटेन्शिअल संधी आहेत, कलाकारांनी या क्षेत्रात प्रोफेशनल शिक्षण घेऊन भविष्यात अधिक प्रभावी करिअर करण्यासाठी नक्कीच विचार करावा.

_जल जंगल जमीन जीव आणि आदिवासीत्व टिकवून स्वावलंबी होण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, कौशल्य, ज्ञान सोबत विविध क्षेत्रात यशस्वी तज्ज्ञांची फळी तयार करायला हवी जे समाजाच्या कामात सदैव नाळ जोडून राहतील._ Lets do it together! जोहार

_____________________________________
*आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम*

Unlock 1.0 | शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. ऑनलाईन, डिजिटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरु करणार. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Monday, June 15, 2020

पालघर जिल्हा पूर्णपणे बंद करण्याचे कुठलेही आदेश नाहीत! – जिल्हाधिकारी


पालघर, दि. 15 जून: ” पालघर जिल्हा पूर्णपणे बंद करण्याचे आदेश ” अशी हेडलाईन एका वृत्तवाहिनीवर झळकल्याचा मॅसेज सोशल मिडीयावरुन प्रसारित होत आहे. तथापि हा फेक मॅसेज असून कोणीही अफवांना बळी पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. वृत्तवाहिनीच्या बॅनरचा गैरवापर करणाऱ्यावर पोलीसांनी कारवाई करावी, तसेच संबंधित वृत्तवाहिनीने देखील तक्रार नोंदवावी असे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत.

डहाणूतील कोरोना वॉरिअरचे 11 कुटूंबीय पॉझिटीव्ह

 

 डहाणूतील नरपड येथील एका परिचारिकेच्या कुटूंबातील 11 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ही परिचारिका वसई विरार महानगर क्षेत्रातील रुग्णालयाच्या सेवेत कार्यरत आहे. तीचा 12 जून रोजी तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर निकटच्या संपर्कातील 20 जणांना क्वारन्टाईन करुन घशाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असता, 11 कुटूंबीयांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामध्ये 4 स्त्रीया व 7 पुरुषांचा समावेश आहे. डहाणू तालुक्यातील कोरोना +Ve व्यक्तींची संख्या आता 55 झाली असून, त्यातील 20 जण बरे झाले आहेत.

“ कोरोनामुक्त ग्रामपंचायत ” असा फेसबुक लाइव्ह कार्यक्रम

पालघर जिल्हा परिषदेमार्फत कोरोना महामारीचा प्रसार आणि ग्रामिण भागात ग्रामपंचायतींनी घ्यावयाची काळजी या बाबत दिनांक 16.06.2020 रोजी सकाळी 11.00 वा. “ कोरोनामुक्त ग्रामपंचायत ” असा फेसबुक लाइव्ह कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या महामारी ला तोंड देण्याकरिता करावयाच्या जनजागृतीसाठी आपला अनुभव, नाविन्यपूर्ण कल्पना, आणि सहभाग हे महत्त्वाचे असुन आपणास या चर्चेमध्ये. आंमत्रित करण्यात येत आहे. या चर्चेमध्ये मा.अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे पदाधिकारी, सरपंच याच बरोबर ग्रामिण स्तरावरील कोरोना योद्धे सहभागी होत आहेत. या कार्यक्रमात श्री भिम रासकर, रिसर्च अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट (RSCD) तसेच मा. जिल्हाधिकारी, पालघर उपरोक्त संवेदनशील विषयावर मार्गदर्शन करतील.
#चला_तर_आपला_सहभाग_नोंदवू_या!

Sunday, June 14, 2020

रक्तदान मोहिमेसाठी राज्य रक्त संक्रमण परिषद करणार आता फेसबुकचा वापर


कोरोनाच्या काळात राज्यात जाणवणाऱ्या रक्तटंचाईवर मात करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत असून रक्तदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी आता फेसबुकची मदत घेण्यात येणार आहे. समाज माध्यमांचा वापर करण्याचे पाऊल राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून उचलण्यात आले आहे.

Maha Info Corona Website

कोरोनाच्या लॉकडाऊन काळात राज्यातील रक्तसाठा कमी होत होता. गर्दी टाळणे आणि कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी रक्तदान शिबीरांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन झले नाही. काही ठिकाणी सुरक्षित अंतराचे काळजी घेत रक्तदान शिबीरे झाली. राज्यातील जनतेला संबोधताना वेळोवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आणि त्याला प्रतिसादही मिळाला.

आता राज्यातील लॉकडाऊन बऱ्याच प्रमाणात शिथील करण्यात आले आहे. कोरोना बरोबरच अन्य आजारांतील गरजू रुग्णांच्या उपचारात ज्यांना रक्ताची गरज आहे त्यांना ते वेळेवर मिळावे यासाठी सामाजिक संस्थांच्या रक्तदान शिबीरासोबतच फेसबुकच्या रक्तदान टूल या सेवेची मदत घेण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

या उपक्रमात राज्यभरातील सुमारे ७१ शासकीय रक्तपेढ्या फेसबुकच्या रक्तदान मोहिमेच्या व्यासपीठावर नोंदणी करण्यात येतील. त्यानंतर एखाद्या रक्तपेढीला रक्ताची गरज भासली तर ती पेढी फेसबुकच्या पेजवर तशी मागणी करेल. त्यानंतर फेसबुकमार्फत संबंधीत रक्तपेढीच्या विभागातील, शहरातील रक्तदात्यांना (ज्यांची आधीच फेसबुकवर नोंदणी झाली आहे) रक्तदानाबाबत संदेश दिला जाईल आणि कुठल्या रक्तपेढीत जाऊन कुठल्या गटाचे रक्त द्यायचे याची माहिती दिली जाईल. त्यामुळे वेळीच आवश्यक त्या गटाचे रक्त उपलब्ध झाल्यावर रुग्णाचे प्राण वाचू शकतात. फेसबुक सारख्या समाज माध्यमाचा वापर रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमासाठी झाल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असे डॉ. व्यास यांनी सांगितले.



















छायाचित्र दालन

Lockdown: मराठी तरुणांना रोजगार देण्यासाठी मनसे सज्ज; राज ठाकरेंच्या हस्ते वेबसाईटचं लॉन्चिंग

कोरोनामुळे गेल्या ३ महिन्यांपासून देशाबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचे आर्थिक चक्र बिघडले आहे. लॉकडाऊन जसजसा वाढत गेला तस तसं अनेकांच्या रोजगार,व्यवसाय आणि नोकऱ्यांवर संक्रांत आली.



ठळक मुद्दे
* लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून या तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न

* परराज्यातील कामगार गावी परतल्यामुळे मराठी तरुणांना रोजगार मिळवून देण्यााच उद्दिष्ट

* मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते झालं वेबसाईटचं लॉन्चिंग

 आज कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. अशा बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी मनसे डोंबिवलीने पुढाकार घेतला आहे. एमएनएस रोजगार डॉट कॉम ( https://www.mnsrojgar.com ) या वेबसाईटच्या माध्यमातून गरजूंना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या शुभहस्ते आज या वेबसाईटचे लाँचिंग करण्यात आले. मनसे आमदार राजू पाटील आणि कल्याण ग्रामीण अध्यक्ष मनोज घरत यांच्या संकल्पनेतून ही वेबसाईट बनवण्यात आली आहे.

तलासरी तालुक्यातील बाजारपेठ बंद


तहसीलदार कार्यालय तलासरी यांच्याकडून आदेश देण्यात  आले की, मा. नगराध्यक्ष/ उपाध्यक्ष / नगरसेवक यांना कळवण्यात येते की सध्या देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यास प्रतिबंध करण्यास दि. 15/06/2020 ते 17/06/2020 रोजीपर्यंत तलासरी नाक्यावरील बाजारपेठ बंद करण्यात येत आहे. तसेच तलासरी तालुक्यातील व्यापारी लोकानी व सामान्य लोकांनी सहकार्य करावे. 

जिल्हाधिकारी यांनी कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव कमी करावा असे आवाहन

जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव कमी करावा असे आवाहन केले.

पालघर जिल्ह्यात आज 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू व नवे 132 पॉझिटिव्ह

दि. 13 जून: पालघर जिल्ह्यात आज एकाच दिवसांत कोरोनाची बाधा झाल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 4 जण वसई विरार महानगर क्षेत्रातील असून तेथे मृत्यूंचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. उर्वरीत 2 जण पालघर तालुक्यातील असून, ते वसई तालुक्यातील स्टार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. जिल्ह्यातील मृतांची संख्या आता 58 झाली आहे.

Saturday, June 13, 2020

शाळा कधी सुरू होणार?

#शाळा कधी सुरू होणार?
1
2
3
4
5
6
7
8
9
#शाळा कधी सुरू होणार?

वसई विरार महानगरपालिका, पालघर

  • अंतिम  तारीख: 16 जून 2020
  • एकूण पदे: 212 पदे
  • वयोमर्यादा: 50 वर्षे
  • अधिकृत वेबसाईट : click here
  • जाहिरात पीडीएफ: Click here
  • मुलाखतीचा पत्ता: वसई विरार शहर महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग, चौथा मजला ,प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत विरार (पूर्व)

VVCMC Bharti 2020 

?Department (विभागाचे नाव) Vasai Virar Mahanagarpalika, Palghar
⚠️ Recruitment Name
Vasai Virar City Municipal Corporation Bharti 2020
? Application Mode (अर्ज कसा कराल)Walk-In-Interview
? Official Website (अधिकृत वेबसाईट) Offline Application Form

Vacancy Details Of VVCMC Recruitment 2020:

Sr. No.Name of PostQualificationsNo.Of Vacancy
01Medical Officer- PhysicianMD Medicine10
02Medical Officer – AnesthetistsMD Anesthetists10
03Medical Officer- MBBSMBBS30
04Medical Officer- BAMSBAMS30
05Medical Officer- BHMSBHMS30
06GNM12th+General Nursing and Midwife Diploma30
07ANM12th, ANM Completed50
08Pharmacist12th Science, D.Pharm10
09Laboratory  Assistant12th, DMLT07
10X-Ray Technician12th, Completed Study in X-ray Technician05

 

तलासरी व मोखाड्याने देखील खाते खोलले! मागील 24 तासांत पालघर जिल्ह्यात 117 नवे पॉझिटिव्ह!

दि. 13 जून : मागील 24 तासांत पालघर जिल्ह्यात 117 नव्या कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. सर्वाधिक 96 बाधीत एकट्या वसई विरार महानगर क्षेत्रातील आहेत. उर्वरीत 21 जण पालघरच्या ग्रामीण भागातील आहेत. त्यामध्ये पालघर तालुक्याच्या 10, जव्हार तालुक्याच्या 6, तलासरी व वाडा तालुक्यातील प्रत्येकी 2 व मोखाड्यातील 1 बाधीताचा समावेश आहे. तलासरीतील 2 व मोखाड्यातील 1 कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीमुळे पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांपर्यंत कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

Friday, June 12, 2020

आज ग्रामीण भागात 35 नवे कोरोना रुग्ण; त्यात 25 स्त्रीयांचा समावेश! कालच्या 66 रुग्णांमध्ये 38 स्त्रीया!



दि. 12 जून : काल पालघर जिल्ह्यामध्ये एका दिवसांत 108 नवे कोरोना रुग्ण निष्पन्न झाले होते. त्यातील 42 वसई विरार महानगर क्षेत्रातील तर 66 पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील होते. धक्कादायक म्हणजे ग्रामीण भागातील 66 रुग्णांमध्ये 38 स्त्रीयांचा समावेश आहे. आज वसई महानगर क्षेत्रातील कोरोनाबाधीतांची संख्या समजू शकली नसली तरी, ग्रामीण भागात 35 नवे कोरोना रुग्ण आढळले असून त्यातील तब्बल 25 स्त्रीया आहेत.

पु.ल. स्मृतिदिन

पुल स्मृतिदिन 🙏💐
पु.ल. - मला आवडणा-या अवलियांपैकी एक असा हा अवलिया.😊
पुलंच्या लिखाणाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांचं लिखाण जास्त भावत ते त्यामागे असणा-या मार्मिकपणामुळे.
पुलंकडून मी काय शिकले, "स्वतःवर विनोद करून दुस-याच्या चेह-यावर हास्य आणण...अगदी निर्विवादपणे!!"
ही कला ज्याला जमते ना तो खरा राजा माणूस... अगदी पुलंसारखा!!!
पुलंचं एक वाक्य आहे, मराठीला जी "मज्जासंस्था" वाटते ती इंग्रजीला "नर्व्हस सिस्टम" वाटते, दृष्टीकोनातला फरक दुसरं काय...!!
सतत हसत रहा!!😊