Showing posts with label Palghar Covid19. Show all posts
Showing posts with label Palghar Covid19. Show all posts

Friday, June 18, 2021

पालघर जिल्हा पुन्हा लेव्हल 3 मध्ये; 21 जूनपासुन निर्बंध वाढणार


जिल्ह्याचा मागील आठवडाभरातील करोना पॉझिटिव्ही दर 5 पेक्षा अधिक (5.18) व ऑक्सीजन बेड्सची ऑक्युपन्सी 18.24 टक्के झाल्याने जिल्ह्याचा पुन्हा तिसर्‍या लेव्हलमध्ये समावेश करण्यात आहे. त्यामुळे आता निर्बंधात पुन्हा वाढ होणार असुन सोमवार, 21 जूनपासुन पूर्वीचेच निर्बंध लागू होणार आहेत. पालघर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी आज, शुक्रवारी याबाबतचे नवीन आदेश जारी केले आहेत.

काय होते पुर्वीचे नियम :

  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने व आस्थापने सोमवार ते रविवार सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील.
  • अत्यावश्यक सेवा नसलेली दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. तर शनिवार व रविवार बंद राहतील.
  • मॉल्स, सिनेमागृहे व नाट्यगृहे पुर्णपणे बंद राहतील.
  • रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. 4 वाजेनंतर पार्सल, टेक अवे (घेवून जाणे) व होम डिलिव्हरी सेवा सुरु राहील.
  • सार्वजनिक उद्याने, मैदाने, चालणे व सायकलिंगसाठी सोमवार ते रविवार सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत परवानगी राहिल.
  • खाजगी आस्थापना व कार्यालये कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. 
    8) बाह्य मैदानी खेळ सोमवार ते रविवार पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत व संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु राहतील.
  • सामाजिक, सांस्कृतीक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांना सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने परवानगी असेल.
  • विवाह समारंभास केवळ 50 व्यक्तींना परवानगी असेल.
  • अंत्यविधीला केवळ 20 व्यक्तींना परवानगी असेल.
  • संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी राहील. तर 5 वाजेनंतर संचारबंदी लागू असेल.
  • वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये (स्थानिक संस्था/सहकारी संस्था) हॉलच्या 50 टक्के उपस्थिती राहिल.
  • बांधकाम केवळ बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी राहणार्‍या मजुरांवर सुरु राहिल. किंवा कामगारांना संध्याकाळी 4 वाजता सोडणे बंधकारक राहिल.
  • कृषी संबंधित दुकाने सोमवार ते रविवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील.
  • ई-कॉमर्स नियमितपणे सुरु राहील.
  • सार्वजनिक वाहतूक 100 टक्के आसन क्षमतेने सुरु राहिल. मात्र उभ्याने प्रवास करता येणार नाही.
  • जिम, सलुन ब्यटी पार्लर स्पा व वेलनेस सेंटर्स सोमवार ते रविवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. ग्राहकांना पुर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल. तसेच एसीचा वापर करता येणार नाही.
  • आंतरजिल्हा प्रवार नियमितपणे सुरु राहील. परंतू 5 व्या स्तरातील जिल्ह्यामध्ये प्रवास करण्यासाठी ई-पास आवश्यक असेल.
  • अत्यावश्यक कारणा व्यतिरिक्त नागरिकांना सायंकाळी 05.00 वाजेनंतर मुक्तपणे संचार करण्यास मनाई राहील.

दरम्यान, मागील आठवड्यात जाहीर झालेल्या आकडवारीनुसार जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांपेक्षा खाली व ऑक्सीजन बेड्सची ऑक्युपन्सी 27.66 टक्के असल्याने जिल्ह्याचा लेव्हल 3 मधुन लेव्हल 2 मध्ये समावेश करण्यात आला होता. त्यामुळे 14 जूनपासुन अनेक निर्बंध पूर्णपणे शिथिल झाले होते. विशेष म्हणजे सर्वच दुकानांना नियमितपणे दुकाने सुरु ठेवण्याची सवलत मिळाली होती.

Saturday, May 1, 2021

वसई-विरार मध्ये प्रत्येक दुसरी व्यक्ती कोविड बाधित ?

वसई-विरारमध्ये प्रत्येक दुसरी व्यक्ती कोविड बाधित असल्याचे आढळत आहे. कोविड चाचण्या होणाऱ्यांपैकी निम्म्या व्यक्तींना कोविडची बाधा असल्याचे आढळत आहे, तर या महानगर पालिकेच्या हद्दीत मुंबई महानगर पालिकेच्या तुलनेने अवघ्या तीन टक्क्यांच्या आसपास चाचण्या होत आहेत. महामुंबईतील उल्हास नगर महानगर पालिकेकडून सर्वात कमी कोविड चाचण्या होत आहेत. मुंबईच्या अवघ्या दोन टक्के चाचण्या या महानगर पालिकेत होत आहेत.

नागरीक चाचण्या करायलाच तयार होत नाही असे कारणही आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले. या बाबत आरोग्य विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉ.जुईली वनमाळी यांना विचारले असता त्या म्हणाल्या,‘रुग्ण शहराचा निवासी असल्याने त्यांची नोंद महानगर पालिकेच्या अहवालात करण्यात आली आहे. मात्र,काही बाधितांची चाचणी दुसऱ्या शहरांमध्येही झालेली असते, असा दावा त्यांनी केला. चाचण्या करण्यास नागरीकांकडून टाळाटाळ केली जाते.

मात्र, आता चाचण्याची संख्या वाढवली आहे. संचार बंदीत फिरणाऱ्यांची चाचणी केली जाते, तर शहराच्या हद्दीतील तिन्ही रेल्वे स्थानकांवरही चाचण्या केल्या जात आहेत, असेही डॉ. वनमाळी यांनी सांगितले. मुंबईत शुक्रवारी 43 हजारावर चाचण्या झाल्या होत्या. तेव्हा वसई विरार महानगर पालिकेच्या हद्दीत 1 हजार 382 चाचण्या आणि उल्हास नगर महानगर पालिकेच्या हद्दीत 1 हजार 2 चाचण्या झाल्या होत्या.

कॉन्टक्ट ट्रेसिंगची बोंब

मुंबईत बाधीत आढळल्यानंतर त्यांच्या निकटच्या संपर्कातील किमान पाच ते सहा जणांच्या चाचण्या केल्या जातात. मात्र,वसई विरार महानगर पालिकेच्या आकडेवारी लक्ष टाकल्यास असे कॉन्टक्ट ट्रेसिंगही होताना दिसत नाही. तशीच परीस्थीती उल्हास महानगर पालिकेची आहे.


Friday, April 30, 2021

करोना रुग्णांवर तात्पुरता उपचार करणार्‍या खाजगी रुग्णालयांना जिल्हाधिकार्‍यांच्या विविध सुचना!


पालघर, दि. 30 : सर्दी, ताप, खोकल्यासारखी लक्षणे असलेल्या रुग्णांना करोना चाचणीबाबत मार्गदर्शन न करता त्यांच्यावर तात्पुरते उपचार करुन वेळ मारुन नेणार्‍या खाजगी रुग्णालयांना जिल्हाधिकार्‍यांनी विविध सुचना करत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच ज्या करोना रुग्णांचा चाचणी न करता मृत्यू झाला आहे. अशा रुग्णांनी ज्या खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते, त्याचा शोध घेऊन संबंधित रुग्णालयावर कारवाईचा इशारा देखील दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांसाठी जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, काही खाजगी रुग्णालये कोव्हीड-19 ची लक्षणे असलेल्या रुग्णांची आवश्यक तपासणी न करता उपचार करत आहेत. या तात्पुरत्या उपचारामुळे रुग्णाला 2-4 दिवस बरे वाटते, मात्र त्यानंतर त्याच्या शरीरातली ऑक्सिजन पातळी कमी होते व त्याला रुग्णालयात दाखल करावे लागते. अशा अनेक रुग्णांचा आताच्या कालावधीत मृत्यू झालेला आहे. त्यामुळे याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सदर खाजगी रुग्णालये जबाबदार असल्याचे निदर्शनास येते.

त्यामुळे खाजगी रुग्णालयांनी ताप, सर्दी, खोकला यांसारखी लक्षणे असलेला रुग्ण आपल्याकडे उपचारासाठी आल्यास त्याला नजीकच्या आरोग्य केंद्रामधून रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यास सूचित करावे. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यास आरटीपीसीआर चाचणी करण्यास सांगून या चाचणीचा अहवाल येईपर्यंत त्याला घरातील इतर व्यक्तींपासून दूर राहण्याबाबत स्पष्टपणे कल्पना द्यावी, जेणेकरुन कुटूंबातील इतर व्यक्तींना संसर्ग होणार नाही. त्याचबरोबर तसे न केल्यास भविष्यात होणार्‍या गंभीर परिणामांची संबंधितांना जाणीव करुन द्यावी.

रुग्णाचा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्याला नजीकच्या कोव्हीड काळजी केंद्रा (कोव्हिड केअर सेंटर) मध्ये दाखल होण्याबाबत सूचित करावे. तेथे राहणे, भोजन व औषधोपचार सुविधा मोफत करण्यात आली आहे. लक्षणे नसलेले रुग्ण होम क्वारंटाईन असल्यास त्यांना दोन वेळा ऑक्सिजन तपासणी करण्याचे मार्गदर्शन करावे. यासाठी गावातील आशा स्वयंसेविकांकडे पल्स ऑक्सिमिटर देण्यात आले आहेत. तसेच 6 मिनिट वॉक टेस्ट करावी व त्यानंतरही ऑक्सिजन पातळी खाली गेल्यास त्वरीत रुग्णालयात दाखल होण्याच्या सुचना द्याव्यात, असे परिपत्रकात म्हटले आहे.

लक्षणे असलेल्या व्यक्तींनी पहिल्याच दिवशी चाचणी केल्यास व उपचार सुरु केल्यास पुढे त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत नाही. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनची गरजही कमी होते. त्यामुळे रुग्णांना लवकरात लवकर चाचणी करण्याचा सल्ला देण्याचे पत्रकात म्हटले आहे.

Friday, April 16, 2021

डहाणू: सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची धडक कारवाई


डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी कोव्हीड प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग असलेल्या शासनाच्या ” ब्रेक द चेन ” आदेशाचा भंग करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई आरंभली आहे. काल आशिमा यांनी तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक किराणा मालाचे दुकान व लग्नसमारंभात धाड टाकून कारवाई केली.


15 एप्रिल रोजी, सायंकाळी साडे आठच्या दरम्यान धुंदलवाडी ग्रामपंचायत हद्दीमधील राजेश गणपत बसरा यांचे दुकान सायंकाळी आठ वाजतानंतर चालू होते व सामानाची विक्री देखील करण्यात येत होती. ही बाब आशिमा यांच्या नेतृत्वाखालील पथकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी दुकानमालक बसरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन संबंधीत दुकान सील केले आहे.

अन्य घटनेमध्ये 15 एप्रिल रोजी रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान बहारे – बामणवाडी (तालुका डहाणू) येथे रहात्या घरी, देवराम महादेव दांडेकर यांच्या कन्येचा विवाह सोहळा व हळदी समारंभ आयोजित करण्यात आला होता. सदर ठिकाणी आशिमा मित्तल यांनी भेट दिली असता, अंदाजे 400 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. दांडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दांडेकर हे उधवा आश्रम शाळेमध्ये शिक्षक आहेत. अशा जबाबदार पेशातील व्यक्तीने बेजबाबदारपणे वर्तन केल्यामुळे आशिमा यांनी गुरुजींची शाळा घेऊन त्यांना चांगलेच धारेवर धरले. दांडेकर गुरुजींवर विभागीय कारवाई देखील होण्याची शक्यता आहे

Friday, April 9, 2021

कोविडसाठी घ्यावयाची काळजी .


लक्षण

१)    जेवण कडू लागायला लागणे

२)   वास पूर्णपणे जाणे

३)   चव पूर्णपणे जाणे

४)   सातत्य पूर्ण खोकला येणे

वरील पैकी काही लक्षणे इतर आजारातही दिसतात मात्र तरीही सध्याची गंभीर परिस्थिती लक्ष्यात घेता यापैकी कोणतही लक्षण दोन दिवस दिसल्यास त्वरित स्वताला आपल्या कुटुंबापासून पूर्णपणे विलग करून घ्या ….संपूर्णपणे विलागीकरणात जा .

पुढे त्वरित करावयाच्या गोष्टी

१)    लगेच जावून महानगर पालिकेच्या दवाखान्यात ANTIGEN TEST ( एका तासात रीझलट मिळणारी टेस्ट ) करून घ्या .

२)   हि टेस्ट positive आली तर त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

३)   हि टेस्ट NEGATIVE आली तर लगेच RCPTR ( हि चोवीस तासांनी result मिळणारी टेस्ट करून घ्या ) कारण कधी कधी antigen negative आली तरी RCPTR मध्ये टेस्ट positive येते

४)   व्यक्ती साठ वर्षावरील असेल तर antigen चा result positive आल्यास त्वरित आपल्या सगळ्या रक्त चाचण्या करून घ्या ( डॉक्टरांच्या सल्ल्याने )

५)   आपली antigen positive आल्यास रक्त चाचण्या नंतर आपली kovid infection चा CTSCAN करून घ्या , शक्यतो आपल्या जवळचे CT स्कॅन center आधीच  बघून ठेवा जिथे ३ ते ४ तासात report मिळेल . जर आपली antigen negative आली असेल तर RCPTER टेस्ट चा result येण्याची वाट बघा आणि तो positive आल्यास रक्तचाचण्या आणि CT स्कॅन त्वरित करून घ्या.

६)   CT स्कॅन मध्ये severity score येतो हा score out of 25 असतो २५ पैकी आपल्याला किती मार्क मिळाले आहेत ते जाणून घ्या हे मार्क १ ते ४ असतील तर ते कमी आहेत आणि घरीच आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून घेता येतील मात्र आपल्याला इतर आजार असतील आणि आपल वय जास्त असेल admit व्हा हा score ५ ते ८ असेल तर आपल्याला mild कोविड infection आहे ८ ते १२ हे moderate आहे १३ ते १६ हे जरा तीव्र आणि १७ ते २५ म्हणजे अति तीव्र अश्या स्वरूपाचे असते .

कधी कधी CTSCAN मध्ये score ५ असले तरी रक्त चाचण्या मध्ये infection value वाढल्यास डॉक्टरांच्या सल्याने safer side म्हणून admit होणे गरजेचे ठरते .

 

७)  काही जण लक्षणे दिसूनही कॉविड च्या भीतीने त्याची टेस्ट करणे टाळतात तर काही जणांना पहिल्या तीन दिवसात टेस्ट positive येवून देखील काहीच त्रास जाणवत नाही म्हणून ते relax होतात आणि पुढील टेस्ट रक्त चाचण्या आणि CTSCAN करणे टाळतात मात्र याने आपल्या हातातून उपचाराच्या साठीचा महत्वपूर्ण वेळ आपल्या हातातून निघून जातो हे लक्ष्यात घेवून या टेस्ट दोन्ही ( कॉविडची आणि त्यानंतर रक्त चाचण्या आणि CTSCAN वेळेवर करून घ्यावी ) याने या आजाराविरुद्ध लढायला आपल्याला बळ मिळेल

 

८)   कोविड साठी जे लोक तरुण आहेत आणि healthy आहेत त्यांना प्रोटीन tablet चा course करून बर होता येत मात्र ज्यांना infection आहे त्यांना fabi फ्लू या गोळीद्वारे उपचार सुरु करतात ( हि गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी ) आणि ज्यांना मध्यम किवा जास्त infection असते त्यांना remdisivir हे injection दिले जाते.

 

९)   Fabi फ्लू गोळ्या डॉक्टरांच्या सल्याने घ्याव्या या गोळ्या घेतल्यावर suger लेवल काही काळासाठी वाढते मात्र डॉक्टर इतर गोळ्या द्वारे टी कंट्रोल करतात त्यामुळे घाबरून जावू नये

 

१०)                  Remdisivir हे ५ इंजेक्शन चा course मध्ये दिले जाते ( डॉक्टर याबाबतचा निर्णय घेतात ) गरज लागल्यास अधिक २ किंवा अधिक ५ अश्या स्वरूपात हे इंजेक्शन रुग्णांना दिले जाते .

 

११)  या आजारात रुग्ण एकदा हॉस्पिटल मध्ये admit झाल्या नंतर त्यांना त्यांच्या आप्तस्वकीयांना भेटता येत नाही अश्या वेळी फोन वरून संपर्कात राहून रुग्णांच मनोधैर्य वाढवत राहणे हे नातेवाईकांच काम आहे

Friday, April 2, 2021

जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा व खाजगी क्लासेस 5 एप्रिलपासुन बंद!

जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्‍वभुमीवर जिल्हाधिकार्‍यांनी पुन्हा एकदा नविन आदेश काढून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा व खाजगी क्लासेस 5 एप्रिलपासुन पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पारित केला आहे. तर 10 व 12 वीचे वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय ऐच्छिक असुन शाळा व्यवस्थापनाने याबाबत निर्णय घ्यावयाचा आहे.

राज्य शासनाने यापुर्वी राज्यातील 5 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता देताना शिक्षकांनी स्वत:ची राहण्याची व्यवस्था ते ज्या गावात शाळेवर नियुक्त आहेत त्या गावातच करावी असे निर्देश दिले होते. मात्र काही शिक्षक बाहेर गावातून शाळेत ये-जा करीत असल्याचे तसेच यामुळे काही शिक्षक कोविड-19 ने बाधित झाल्याने विद्यार्थ्यांना सुध्दा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. असा प्रकार जिल्ह्यात घडू नये तसेच जिल्ह्यातील कोविड-19 चा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी शाळा, जिल्हा परिषद शाळा, अनुदानित/विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, निवासी आश्रमशाळा, खाजगी कोचिंग क्लासेस बंद ठेवणे आवश्यक असुन येत्या 5 एप्रिलपासुन पुढील आदेशापर्यंत बंदीचा आदेश लागू होणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

तर 10 व 12 वी चे वर्ग सुरु ठेवणे शाळा व्यवस्थापनांना ऐच्छिक असणार आहे. मात्र आजारी विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालक, कर्मचारी शाळेत प्रवेश करणार नाहीत तसेच आजारी असलेल्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जाईल, याची खबरदारी मुख्याध्यापकांनी घ्यावी, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील 51(ब), भारतीय दंड संहिते (45 ऑफ 1860) च्या कलम 188 व साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 आणि या संदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी 26 मार्च रोजी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये व खाजगी क्लासेस 5 एप्रिलपासुन बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र 31 मार्च रोजी हा निर्णय मागे घेण्यात आला होता.

Saturday, March 27, 2021

राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी

रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना

मुंबई, दि. 26 : राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारपासून (दि. 28 मार्च 2021) रात्रीची जमावबंदी आदेश लागू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत, असेही ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कोविड स्थिती, करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणुन घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे तर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जर्‍हाड, मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी वर्षा निवासस्थानी बैठकीस उपस्थित होते.

लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही पण…
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही, परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्याप्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होतांना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेडस व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

  • धोका टळला नाही उलट वाढला!
    ब्रिटनसारख्या देशात दुसरी लाट आल्यानंतर त्यांनी दोन अडीच महिन्याच्या लॉकडाऊननंतर आता हळुहळु पुन्हा काही गोष्टी खुल्या करण्यास सुरुवात केली आहे. हीच परिस्थिती आता आपल्याकडे निर्माण होताना दिसत आहे. धोका टळला नाही, उलट तो अधिक वाढला आहे हे जनतेनेही लक्षात घेण्याची गरज आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे, येत्या काळात ती आणखी किती वाढेल हे सांगता येत नाही. अशावेळी कडक उपाययोजनांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लावताना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणे सांगून लॉकडाऊन लावा, अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिल्या.
  • कडक निर्बंधांचे संकेत!
    जनतेनेही कोविड नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावे, असे आवाहन करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की आपण बेडस, आरोग्य सुविधा वाढवू परंतु डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी कसे वाढवणार, हे लक्षात घेतले पाहिजे. खासगी आस्थापनांना त्यांच्या कर्मचार्‍यांच्या उपस्थितीसंदर्भात तसेच कार्यालयीन वेळेसंदर्भात बदल करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचनांचे आदेश निर्गमित केले आहेत. ते याचे पालन करत आहेत की नाही याची काटेकोरपणे पाहणी केली जावी तसेच मॉल्स, बार, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या एस.ओ.पीची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, मॉल्स रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत ते बंद राहतील याची काळजी घ्यावी, गर्दी होणार नाही हे पहावे, सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Friday, March 26, 2021

पालघर जिल्ह्यात 5 एप्रिलपासुन पुन्हा निर्बंध; शाळा, महाविद्यालये, खाजगी क्लासेस तसेच सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम पुर्णपणे बंद!


दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली राहणार

पालघर, दि. 26 : पालघर जिल्ह्यात (वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्र वगळून) मागील काही दिवसांपासुन करोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली मोठी वाढ लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले असुन येत्या पाच एप्रिलपासुन जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, खाजगी क्लासेस तसेच सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुकाने, मॉल्स, हातगाडी व ठेल्यांवरील खाद्य पदार्थ विके्रत्यांसह अनेक बाबींवर वेळेचे व नागरीक क्षमतेचे बंधन लादण्यात आले आहे.

आज, 26 मार्च रोजी पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची जिल्ह्यातील कोविड परिस्थितीबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी चर्चा होऊन याबाबत रुपरेषा निश्‍चित करण्यात आली. त्यानुसार येत्या 5 एप्रिलपासुन विविध बाबींवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पाच एप्रिलपासुन जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजेस व कोचिंग क्लासेस पुढील आदेशापर्यंत पुर्णपणे बंद करण्यात येणार आहेत. चालू शैक्षणिक वर्षातील 10 वी व 12 वी इयत्तेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने उपस्थिती ऐच्छिक राहील. तसेच या संस्थांद्वारे ऑनलाईन स्वरुपात कामकाज सूरु ठेवता येईल. तर राष्ट्रीय, राज्य, विद्यापीठ, शासन किंवा शिक्षण मंडळ स्तरावरील यापुर्वीच घोषित झालेल्या परीक्षा कोविड-19 विषयक सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व दुकाने 5 एप्रिलपासुन सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतच सुरु राहतील. मात्र हे निर्बंध अत्यावश्यक सेवा, मनुष्य व प्राणीमात्रांसाठी जिवनावश्यक वस्तू, दूध, पेट्रोल पंप व औषधांच्या दुकानांना लागू राहणार नाही. 15 एप्रिलपर्यंत पुर्वनियोजित असलेल्या लग्न व इतर समारंभांच्या बाबतीत स्थानिक प्रशासन व संबंधित पोलीस स्टेशनकडून परवानगी घेऊन कोविड-19 च्या सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आयोजित करण्यास परवानगी असणार आहे. 15 एप्रिलनंतर मात्र लॉन्स, मंगल कार्यालये, हॉल्स व तत्सम ठिकाणी लग्न व इतर समारंभ आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अत्यंविधी कार्यक्रमामध्ये देखील 20 पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही.

खाद्यगृहे व बारमध्ये ग्राहकांचे आगमन व निर्गमन नियंत्रित करण्यात आले आहे. तसेच ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ सेवन करण्यासाठी टेबलाची व्यवस्था असते, अशीच खाद्यगृहे व बार सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत सूरु राहतील. होम डिलिव्हरीचे किचन रात्री 10 वाजेपर्यंत सूरु ठेवण्यास परवानगी असणार आहे. तर हातगाडी, ठेले व स्टॉल ज्यावर खाद्य पदार्थ सेवन केले जाते व वितरण केले जाते अशी ठिकाणे सकाळी 7 ते संध्याकाळी 8 या कालावधीतच कोविडचे सर्व नियम पाळून सुरु राहतील.

दरम्यान, जिम, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, स्विमिंग टँक हे वैयक्तीक सरावासाठी सूरु राहतील. तर सामूहिक स्पर्धा व इतर कार्यक्रम बंद राहतील. सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांवर पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सर्व प्रकारची धार्मिक स्थळे देखील संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सूरु राहतील.

भाजी मंडई 50% क्षमतेने सूरु राहतील आणि एका-आड-एक या प्रमाणे ओटे सूरु राहतील. सिनेमा हॉल, हॉटेल, रेस्टॉरंट यामध्ये क्षमतेच्या 50% व्यक्तींनाच उपस्थिती बंधनकारक राहील. प्रवेश देतांना प्रत्येक व्यक्तीस विना मास्क प्रवेश देण्यास मनाई असेल. अशा ठिकाणी प्रवेश द्वारावर थर्मल स्क्रिनिंग घेण बंधनकारक राहील. ताप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश मिळणार नाही याची खात्री करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या तापमान मोजण्याचे उपकरण वापरावे लागले.

या निर्बंधाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास सिनेमा हॉल, हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाजगी आस्थापना केंद्र शासन जो पर्यंत कोविड-19 च्या आजारास आपत्ती म्हणून घोषित ठेवत आहे, त्या कालावधीपर्यंत बंद करण्यात येतील व संबंधित धारकांविरुध्द दंडात्मक कार्यवाही देखील करण्यात येईल. शॉपिंग मॉल्सना देखील करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार असुन सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच सुरु ठेवता येणार आहे.

ज्या व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी झाली आहे त्यांनी चाचणी अहवाल प्राप्त होईपर्यंत गृह अलगीकरणमध्ये राहणे आवश्यक राहील. अशा व्यक्ती घराबाहेर आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. होम आयोसोलेशनमध्ये असल्यास याबाबतची माहिती स्थानिक अधिकार्‍यांना तसेच वैद्यकीय अधिकारी यांना द्यावी लागेल. रुग्ण बाधित झाल्याच्या दिवसापासून दरवाज्यावर होम आयोसोलेशन सुस्पष्ट ठिकाणी बोर्ड लावण्यात येईल. बाधित रुग्णावर होम क्वांरटाईनचा शिक्का मारुन कुटुंबातील व्यक्तींनी देखील बाधित रुग्णाच्या हालचालीवर लक्ष देणे तसेच त्यांनी नियमित मास्क वापरणे बंधनकारक राहील. अलगीकरणाचे कोणतेही उल्लंघन केल्यास नियुक्त केलेले स्थानिक अधिकारी संबंधित इसमाला जवळच्या कोविड सेंटरमध्ये तात्काळ दाखल करतील.

दरम्यान, या निर्बंधाचे उल्लघंन करणार्‍या संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विविध कलमां

Wednesday, March 17, 2021

जिल्ह्यातील शासकिय आश्रमशाळा व वसतीगृहे बंद ठेवण्याचे आदेश!

करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आता जिल्ह्यातील सर्व शासकिय व अनुदानित आश्रमशाळा तसेच इतर शासकीय विभागांची वसतीगृहे व खाजगी वसतीगृहे 22 मार्चपासुन पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिले आहेत. 10 व 12 वीच्या विद्यार्थ्यांना मात्र वसतीगृहात राहणे ऐच्छिक करण्यात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आज, बुधवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

Monday, March 8, 2021

पालघर जिल्ह्यात आता यात्रा, उत्सव, बोहाडा व उरुसवर बंदी

 
पालघर जिल्हाधिकार्‍यांनी काही दिवसांपुर्वीच करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पालघर तालुक्यातील आठवडा बाजारांवर बंदी घालण्याचा व आठवडाभरातच ही बंदी उठविण्याचा आदेश पारित केला होता. व्यवसाय, रोजगार व ग्रामीण अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याने आठवडा बाजारांवरील बंदी उठवण्यात येत असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी आपल्या आदेशात म्हटले होते. मात्र जिल्ह्यातील करोना रुग्णांचा संख्या वाढतच असल्याचे उपाययोजनांचा भाग म्हणून आता जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार्‍या यात्रा, उत्सव, बोहाडा व उरुसवर आज, 8 मार्चपासुन पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली असुन जिल्ह्यात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी ही बंदी घालण्यात येत असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

Sunday, February 21, 2021

पालघरकरांनो सावधान; करोना नियमांचे पालन न केल्यास होणार दंडात्मक कारवाई

 दि. 21 : मागील काही दिवसांपासुन राज्यभरासह पालघर जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असुन शासनाने घालून दिलेल्या करोना नियमांचे पालन न करणार्‍या नागरीकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. पालघर जिल्हाधिकार्‍यांनी देखील नियमांचे पालन न करणार्‍या नागरीकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले असुन आतापर्यंत 190 हून अधिक जणांवर जिल्ह्यातील विविध भागात कारवाई करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासुन पालघर जिल्ह्यातील दररोज करोना रुग्ण आढळून येण्याची संख्या एक अंकी असतानाच 19 फेबु्रवारी रोजी पालघर तालुक्यात 10, डहाणू तालुक्यात 1 व तलासरी तालुक्यात 1 असे 12 रुग्ण आढळून आले. तर त्यापुर्वी 18 फेबु्रवारी रोजी डहाणूत 11, पालघरमध्ये 3 व विक्रमगडमध्ये 1 असे 15 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे करोनाचा वाढता संसर्ग आणि रुग्णांची वाढती संख्या विचाराता घेता जिल्ह्यात सर्व उपविभागीय दंडाधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक व मुख्याधिकारी यांच्यामार्फत सार्वजनिक ठिकाणी भेटी देऊन करोना नियमांचा भंग होणार्‍या सार्वजनिक ठिकाणांवर कारवाया करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉ. माणिक गुरसळ यांनी दिले आहेत.

त्यानुसार जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांत 66 सार्वजनिक ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये दुकानदार, रिक्षाचालकांसह विनामास्क असलेल्या 189 हून अधिक लोकांवरती कारवाया करुन 42 हजार 750 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. दरम्यान, नागरीकांनी करोना नियमांचे पालन करावे आणि करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.

Wednesday, September 30, 2020

डहाणूतील वैद्यकीय व्यावसाईकांबद्दल गैरसमज करुन घेऊ नका! – इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डहाणू शाखेचे आवाहन


दि. 30 सप्टेंबर 2020:- कोरोना साथरोगाच्या काळात डहाणूतील खाजगी डॉक्टर आणि रुग्णालयांचे कर्मचारी जीवाची बाजी लावून लढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने एखादे नर्सिंग होम सील झाल्यामुळे बंद केल्याचा अपवाद वगळला तर नर्सिंग होम्स पूर्वीप्रमाणे निरंतर रुग्णसेवा देतच आहेत. त्यामुळे डहाणूतील वैद्यकीय व्यावसाईकांबद्दल गैरसमज करुन घेऊ नका व गैरसमज पसरवू नका असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डहाणू शाखेतर्फे करण्यात आले आहे. शाखेच्या मानद सचिव डॉ. ज्योती बापट यांनी जारी केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे हे आवाहन केले आहे.

लॉकडाऊनच्या काळापासून डहाणूतील सर्व खाजगी डॉक्टर आपली जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडत आहेत. आजच्या घडीला सुद्धा २-३ रुग्णालये वगळता बाकी सर्व रुग्णालये खुली आहेत व डॉक्टर रुग्ण तपासत आहेत. जी रुग्णालये बंद आहेत, त्या रुग्णालयांचे डॉक्टर, स्वतः कोरोना बाधित झाले आहेत व ह्यातील काही डॉक्टर तर आजच्या घडीला मुंबईच्या रुग्णालयात दाखल असून उपचार घेत आहेत. डहाणूतील निदान १५ डॉक्टरांना कोरोनाची बाधा ही रुग्णसेवा करतांनाच झाली आहे. अशा डॉक्टरांचे कुटुंबीय देखील संक्रमित झाल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात दिली असून 55 वर्षा वरील डॉक्टर व हेल्थ केअर वर्कर्स नी कोरोना काळात काम करू नये अशा सरकारची सूचना असताना डहाणूतील बहुतांश ज्येष्ठ डॉक्टर, सतत रुग्णसेवा करीत असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.

प्रसिद्धीपत्रकातील अन्य ठळक मुद्दे:

 • काही प्रकारचे रुग्ण ( उदा. पूर्वनियोजित शस्त्रक्रिया ठरविलेले रुग्ण, गर्भारपणातील शेवटच्या आठवड्यातील स्त्रिया ) दाखल करताना कोरोना चाचणी करून दाखल केले जाणे ICMR GUIDELINES प्रमाणे आवश्यक असते. ह्या मार्गदर्शक तत्वांचेच पालन आम्ही रुग्णालयात सेवा देताना करीत आहोत.

 • आम्हाला उप जिल्हा रुग्णालय, डहाणू येथून सूचना मिळाल्यानुसार, दाखवायला आलेल्या रुग्णाला जर ताप, खोकला, श्वासाला त्रास, अर्थात कोरोना सदृश्य लक्षणे असल्यास, त्यांना RT-PCR अथवा रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट करायला पाठवणे व अशा रुग्णांची पूर्ण माहिती, सरकारी अधिकाऱ्यांना कळविणे बंधनकारक आहे.

 • कोरोनासंदर्भात सुचनांचे उल्लंघन केल्यास, आम्हा खाजगी डॉक्टरांविरुद्ध, सध्या लागू असलेल्या साथरोग प्रतिबंधक कायदा (Pandemic Act) अंतर्गत, गुन्हा दाखल होऊ शकतो.

 • डहाणू परिसरातल्या खाजगी रुग्णालयांमधे कोरोनाग्रस्त रुग्णांना दाखल करून घेणे व उपचार करणे ह्याला मनाई आहे. जर कधी कोरोनाचा रुग्ण आढळला, तर तो दवाखाना अथवा रुग्णालय सील केले जाते. अश्याने कोरोनाची बाधा नसलेले सर्वसाधारण रुग्णांना उपचार देता येत नाही व त्यांचे हाल होतात.

 • कोरोनाचा फैलाव नियंत्रणात आणण्यासाठी, सरकारी यंत्रणेस आम्ही खाजगी डॉक्टर्स आमच्या परीने हातभार लावित आहोत. या दरम्यान काही रुग्ण दिलेला सल्ला मानत नाहीत व ‘त्यांना उपचार दिले जात नाही’ असा गैरसमज करून घेतात.

 • कोरोनाच्या विळख्यातून जनतेस वाचविण्यासाठी लोकांमधील आजाराबद्दलच्या गैरसमजांचे निरसन करणे व लोकांना चाचण्यांसाठी अधिक प्रवृत्त करणे याची नितांत गरज आहे. या बाबी आम्ही खाजगी डॉक्टर समजून आहोत व रुग्णांना समजाऊन देत आहोत.

Monday, August 31, 2020

पालघर जिल्ह्यात 14 दिवसांत 86 मृत्यू

पालघर जिल्ह्यात मागील 14 दिवसांत कोरोनामुळे तब्बल 86 मृत्यू झाले असून त्यातील 60 मृत्यू एकट्या वसई (वसई विरार महानगरपालिका क्षेत्र 46 + वसई ग्रामीण क्षेत्र 14) तालुक्यात झाले आहेत. त्या खालोखाल पालघर तालुक्यात 18 व डहाणू तालुक्यात 6 मृत्यू झाले आहेत. वाडा तालुक्यात 2 व विक्रमगड आणि तलासरी तालुक्यात प्रत्येकी 1 मृत्यू वाढला आहे. जव्हार व मोखाडा तालुक्यात मृत्यू वाढलेले नाहीत.

जिल्ह्यात आतापर्यंत 23 हजार 879 जणांना कोरोना संसर्ग झाला असून त्यातील 20 हजार 213 (84.65%) जण पूर्णत: बरे झाले आहेत. 3 हजार 181 रुग्णांवर उपचार चालू असून 485 (2%) जणांचा मृत्यू झाला आहे.

मृत्यूचा दर: वसई तालुक्याचा मृत्यूदर सर्वाधिक ठरला आहे. येथे निष्पन्न झालेल्या 17 हजार 119 जणांपैकी 380 (2.22%) जणांचा मृत्यू झाला आहे. पालघर तालुक्यात निष्पन्न झालेल्या 4 हजार 171 रुग्णांपैकी 69 (1.65%) जणांचा मृत्यू झाला आहे. डहाणू तालुक्यात निष्पन्न झालेल्या 1070 जणांपैकी 21 (1.96%) जणांचा मृत्यू झाला आहे. वाडा तालुक्यात निष्पन्न झालेल्या 759 रुग्णांपैकी 6 (0.79%) जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य तालुक्यांचा मृत्यू दर पुढीलप्रमाणे आहे. विक्रमगड 5/250 (2%); जव्हार 2/236 (0.85%); तलासरी 2/165 (1.21%); मोखाडा तालुका 0/109 (0%)

जिल्ह्यात आतापर्यंत 1 लक्ष 36 हजार 393 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यातील 23 हजार 879 जणांचे (17.51%) कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून 1 हजार 195 जणांचे अहवाल अजून प्राप्त होणे बाकी आहे.

कोरोना संसर्ग झालेल्यां 23 हजार 879 जणांपैकी 17 हजार 119 रुग्ण (71.69%) वसई तालुक्यातील आहेत. त्या खालोखाल 4 हजार 171 (17.47%) रुग्ण पालघर तालुक्यातील आहेत. डहाणू तालुक्यात 1070 (4.48%) रुग्ण तर वाडा तालुक्यात 759 (3.18%) रुग्ण निष्पन्न झाले आहेत. विक्रमगड 250, जव्हार 236, तलासरी 165 व मोखाडा 109 अशी उर्वरीत 4 तालुक्यांची एकूण रुग्णसंख्या 760 (3.18%) इतकी आहे.

Thursday, August 27, 2020

बोईसरमध्ये 200 बेडचे कोव्हिड हेल्थ सेंटर उभे राहणार

जिल्हाधिकार्‍यांच्या संबंधितांना सुचना

पालघर, दि. 26 : पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून जिल्ह्यांमधून बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये औद्योगिक व्यवस्थापनाच्या मदतीने बोईसर व परिसरामध्ये 200 बेडचे डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर निर्माण करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी संबंधितांना केली आहे. त्याचबरोबर पालघरमधील कांबळगाव येथील कोव्हिड केअर सेंटरचे मजबुतीकरण करणे व टिमा रुग्णालयातील संपूर्ण 40 बेड आयसीयूत रुपांतरीत करण्यात यावे, अशा सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

विषयास अनुसरून जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी काल, 25 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

वर नमुद सुविधा निर्माण करण्यासाठी उपविभागीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औद्योगिक व्यवस्थापनाने या सुविधा निर्माण करावयाच्या असून त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे. त्याचबरोबर औद्योगिक व्यवस्थापनाकडे असणार्‍या अ‍ॅम्बुलन्स कोव्हिड रुग्णांच्या सेवेसाठी बोईसर येथे उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केल्या.

यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक कांचन वानेरे व इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Wednesday, August 19, 2020

पालघर तालुक्यातील आजची रुग्णसंख्या 200 पार; बोईसरमध्ये 81, तर पालघरमध्ये 53 रुग्ण आढळले


नुकत्याच एका वृत्तपत्राने आपल्या वृत्तात आरोग्य अधिकाऱ्याच्या हवाल्याने बोईसरमध्ये 40 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. हा आकडा जरी अधिकृत नसला तरी बोईसरची दैनंदिन वाढत जाणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनत चालली आहे. आज पुन्हा बोईसरमधील दैनंदिन रुग्णांच्या आकड्याने नवीन उचांक गाठला असून 81 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पाच दिवसांचा लॉकडाऊन राबवलेल्या पालघर परिसरातही 53 रुग्ण आढळले आहेत.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज दिलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यात (ग्रामीण) एकूण 255 नवे कोरोना रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यातील 219 रुग्ण केवळ पालघर तालुक्यात आढळले आहेत. पालघर तालुक्यातील मोठ्या शहरांमध्ये रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यानुसार 134 रुग्ण बोईसर (81) व पालघर (53) मध्ये तर उर्वरित 85 रुग्ण इतर 27 गावांमधील आहेत. पालघर पाठोपाठ डहाणू तालुक्यात आज 12 रुग्ण, वसई ग्रामीण व वाड्यात प्रत्येकी 8, जव्हारमध्ये 4, विक्रमगडात 3 तर मोखाड्यात एक रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

बोईसरमध्ये उपाययोजना वाऱ्यावर?

पालघर तालुक्यातील मोठी औद्योगिक नगरी असलेले बोईसर शहर कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट म्हणून पुढे आले आहे. येथिल दररोजची रुग्ण वाढीची संख्या 30 ते 70 च्या आसपास आहे. येथे आढळणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत निम्मे रुग्ण कमी असताना पालघर व डहाणू तालुका प्रशासनाने लॉकडाऊन लागू करून वाढत्या रुग्ण संख्येला रोखण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच या भागांमध्ये प्रशासनातर्फे कोरोनाबाबत आवश्यक जनजागृती व सार्वजनिक सूचना देखील देताना पहावयास मिळते. मात्र बोईसर शहरात साधी जनजागृती देखील केलेली पाहायला मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने बोईसर शहराला वाऱ्यावर सोडून दिले की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Wednesday, August 12, 2020

बोईसरमध्ये आज रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ!

पालघर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज, 11 ऑगस्ट रोजी 130 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत. विशेष म्हणजे एकट्या बोईसरमध्ये तब्बल 71 नवे रुग्ण आढळून आले असून ही विक्रमी वाढ मानली जात आहे.

पालघर जिल्ह्यात (ग्रामीण) आज एकूण 178 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालया तर्फे देण्यात आली आहे. यात पालघर मधील 130, डहाणूमधील 23, वसई ग्रामीणमधील 13, तर उर्वरित तालुक्यातील 12 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान पालघर तालुक्यातील बोईसर भागातील रुग्ण वाढीची संख्या गंभीर बनत चालली असून आज या भागात 71 नवे रुग्ण निष्पन्न झाले आहेत.

Friday, August 7, 2020

डहाणू शहरात मृत्यूंची संख्या 1 ने वाढून 7


डहाणू शहरात प्रथमच कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या उपचार चालू असलेल्या रुग्णांपेक्षा वाढली आहे. 6 ऑगस्ट पर्यंत निष्पन्न झालेल्या 248 रुग्णांपैकी 134 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यामध्ये अतिज्येष्ठ नागरिक जयंतीलाल नागशेठ (89) यांचाही समावेश आहे. सध्या उपचार घेत असलेल्या 114 रुग्णांपैकी 92 जण कोव्हिड उपचार केंद्रात उपचार घेत असून 22 जण घरीच राहून उपचार घेत आहेत. रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे विलगीकरण केलेल्यांची संख्या 980 वर स्थिर आहे. घरीच उपचार घेण्याची व विलगीकरणाची अनुमती देण्याचे धोरण जाहीर झाल्यानंतर तपासणी करुन घेण्यासाठी लोकांकडून तुलनेने अधिक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

डहाणू शहरात 4 ऑगस्ट पासून लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर सतत 3 दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने लॉक डाऊनला हातभार लागला आहे. डहाणू नगरपरिषद क्षेत्राबाहेरील बाजारात मात्र गर्दी झालेली पहायला मिळाली.

Monday, August 3, 2020

डहाणू शहरात एका दिवसांत 3 कोरोना मृत्यू व 4 ऑगस्ट पासून 10 दिवसांचे कडक लॉक डाऊन

डहाणू शहरात आज (3 ऑगस्ट) एकाच दिवसांत 3 कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची दुख:द बातमी हाती आली आहे. डहाणूचे माजी नगराध्यक्ष शशिकांत बारी (65), भास्करभाई अमृतलाल मेहता (73) व हेमंत हसमुखलाल बाफना (66) यांचे कोरोना बाधेमुळे निधन झाले आहे. तत्पूर्वी 1 ऑगस्ट रोजी कुमुदबेन मोदी (84) यांचे निधन झाले होते. सोहन कर्णावट (70) व दत्तू धोडी (62) यांचे जुलै महिन्यात निधन झाले होते.


डहाणू शहरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दररोज सरासरी 15 जणांची भर पडत आहे. 2 जुलै पर्यंत कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 222 वर पोहोचला असून प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या 28 झाली आहे. 980 जणांना होम क्वारन्टाईन करण्यात आले आहे. 103 कोरोनाबाधीत पूर्णपणे बरे झाले असून 119 जणांवर उपचार चालू आहेत. त्यातील 32 लक्षणे न दिसणाऱ्या कोरोना पॉझिटीव्हना स्वतःच्या घरी क्वारन्टाईन करुन देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. कोरोना संसर्गातून मृतांची संख्या आता 6 झाली आहे.

उर्वरीत डहाणू तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 381 वर पोचला असून त्यातील 291 जण पूर्णपणे बरे झाले आहेत व 90 जणांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 3 मृत्यू झाले आहेत. या आकडेवारीच्या तुलनेत डहाणू शहर तालुक्यातील मोठा हॉटस्पॉट ठरला आहे.

मुख्याधिकारी विरूध्द नगराध्यक्ष वादात अडकलेले लॉकडाऊन 4 ऑगस्ट पासून! 
डहाणू शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 पेक्षा कमी व मृतांची संख्या 0 असताना एका दिवसांत 7 कोरोना पॉझिटीव्ह निष्पन्न झाल्यानंतर डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांनी 14 जुलै रोजी तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे 7 दिवसांच्या लॉक डाऊनचा प्रस्ताव ठेवला होता. 16 ते 23 जुलै दरम्यान लॉक डाऊनला तत्वत: मान्यता मिळाली होती. परंतु नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी लॉक डाऊनला विरोध केला होता असे समजते. राजपूत यांनी मुख्याधिकारी पिंपळेंवर कुरघोडी करण्याच्या भुमीकेतून विरोध केल्याचे मानले जाते.

त्यानंतर कोरोनाबाधीतांचा आकडा झपाट्याने वाढत गेला. अखेर भाजपचेच आरोग्य सभापती भाविक सोरठी (21 जुलै रोजी अर्ज) यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (विरोधी पक्ष) गटनेत्या किर्ती मेहता यांनी (22 जुलै रोजी अर्ज) लॉकडाऊनची मागणी केली. लोकांकडूनच लॉक डाऊनची मागणी जोर धरु लागली. 

नागरिकांची भावना लक्षात घेता 30 जुलै रोजी प्रभारी सहाय्यक जिल्हाधिकारी प्रजीत नायर हे तातडीने डहाणूला आले व लॉक डाऊनवर शिक्का मारुन गेले. बकरी ईद व रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन 4 ऑगस्टपासून होत आहे.

लॉक डाऊनचा निर्णय घेण्यास झालेल्या विलंब कालावधीत कोरोनाबाधीतांचा आकडा चौपटीपेक्षा जास्तीने वाढून तो 222 झाला आहे व 6 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. लॉक डाऊनवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर मात्र नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी मागणी केल्यामुळे लॉक डाऊन होणार असल्याच्या पोस्ट सोशल मिडियावर फिरु लागल्या आहेत. तथापि अधिकृत सुत्रांकडून त्यास दुजोरा मिळालेला नाही किंवा तसे पत्र रेकॉर्डला आढळून येत नाही. लॉक डाऊनवरुन आता राजकारण व श्रेयवाद सुरु झाला आहे.

  • असे असेल लॉक डाऊन 
    4 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या कालावधीत डहाणू शहरातील सर्व दुकाने, आस्थापना, व्यवसाय व कारखाने बंद ठेवले जाणार आहेत. सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 7 या वेळेस दुधविक्रीस मात्र परवानगी असेल. शहरातील शासकीय कार्यालये, दवाखाने व रुग्णालये, बँका व औषधांची दुकाने नियमित वेळेत चालू राहतील.

Wednesday, July 29, 2020

पालघर तालुक्यात 75 रुग्ण पॉझिटिव्ह वाढले



  पालघर तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा रोजच वाढताना दिसत असून आज पुन्हा तालुक्यात नव्या 75 रुग्णांची भर पडली आहे. तर बोईसरमध्ये रुग्णसंख्या अधिकच वेगाने वाढत असून आज येथे तब्बल 42 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पालघर जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज, 28 जुलै रोजी जिल्ह्यात (ग्रामीण) एकूण 114 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाले आहेत. यात निम्म्याहून अधिक रुग्ण पालघर तालुक्यातील (75) आहेत. तर त्याखालोखाल वाड्यात 26 रुग्ण, डहाणूत 8, विक्रमगडमध्ये 3, तलासरीत 1 व जव्हारमध्ये 1 रुग्ण आढळून आला आहे.

बोईसरमध्ये सर्वाधिक 42 रुग्ण!
पालघर ग्रामीणमध्ये मोठा कोरोना हॉटस्पॉट म्हणून पुढे आलेल्या बोईसरमध्ये आज तब्बल 42 रुग्ण आढळून आले आहे.