Tuesday, March 31, 2020

तातडीची प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीस मनाई.-जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे

जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीची प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांचे आगमन व प्रस्थान प्रतिबंधीत करण्यात आले आहे. त्या करीता पालघर जिल्ह्यातील कार्यक्षेत्रामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 ( 1 ) ( 3 ) प्रमाणे मनाई आदेश पारित करण्यात आलेला आहे. राज्यामध्ये लॉकडाऊन परिस्थिती लागू करण्यात आली आहे. परस्पर संपर्कामुळे या विषाणुचा संसर्ग व प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता मानवी जिविताला, आरोग्याला धोका उत्पन्न होऊ शकतो. जिल्ह्यात सर्व प्रकारच्या वाहतुकीस मनाई करण्यासाठी स्थानिक, निवासी, अभ्यांगत, वारंवार कामानिमित्त पालघर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांना मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. असे जिल्हाधिकारी डॉ शिंदे यांनी सांगितले.
कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतूकीने रस्त्यावर, गल्लोगल्ली सायकल तसेच पारंपारीक व अपारंपारीक इंधनावर चालणाऱ्या ( गिअरसह / शिवाय ), सर्व प्रकारच्या तीनचाकी वाहने, हलकी वाहने, ॲप आधारीत ओला, उबर व तत्सम वाहने मध्यम वजनाची वाहने यांचा प्रवास व वाहतूक यासाठी वापर करण्यास ( रुग्णांची वाहतूक सोडून ) या आदेशानुसार मनाई करण्यात आली आहे. परस्पर संपर्कामुळे या विषाणुचा संसर्ग व प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता मानवी जिविताला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला संकट उत्पन्न होऊ शकते. तसेच पालघर जिल्हयातील वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीमध्ये आढळून येणाऱ्या कोव्हीड -19 च्या रुग्णांची संख्या पाहता सदर आदेश लागू कारने आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
स्थानिक, निवासी, अभ्यागत, वारंवार कामानिमित्त वसई विरार शहर महानगरपालिका, पालघर नगरपरीषद, सफाळे व बोईसर ग्रामपंचायतींच्या हद्दीचा देखील समावेश करण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीला तसेच परदेशातून वसई विरार शहर महानगरपालिका, पालघर नगरपरीषद, सफाळे व बोईसर ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रामध्ये आलेल्या सर्व व्यक्तींना कोणत्याही सार्वजनिक / खाजगी ठिकाणी, परिसरातील रस्ते, हमरस्ते, सार्वजनिक मार्ग या ठिकाणी प्रवेश करणे, फिरणे, उभे राहणे, ताटकळणे, भटकणे तसेच कोणत्याही रस्त्यावर, पारंपारीक व अपारंपारीक इंधनावर चालणाऱ्या वाहनावर बंदी करण्यात आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा पुरविणाऱ्या आस्थापनांना यातून वगळण्यात आले आहे . सदर आदेश खालील बाबतीत लागू होणार नाही .
दुध, अन्न पुरवठा सेवा, अन्नधान्य, किराणा, चिकन, मटण, अंडी, मासे, फळे व भाजीपाला, पशु व पोल्ट्री खाद्य, मत्स्य खाद्य व कोलंबी खाद्य व त्याची वाहतूक (आवश्यक फलक लावून करावी ) हॉस्पीटल, मेडीसीन व फार्मास्युटीकल्स संबंधित सेवा, वैद्यकीय साहित्य (Medical Equipment) बँकींग व वित्तीय सेवा, विमान सेवा संबंधित सेवा, दुरध्वनी व संचार सेवा, बंदर संबंधित सेवा, प्रसार माध्यमे संबंधित, विज, पेट्रोलियम, ऑईल आणि एनर्जी संबंधित, पिण्याचे पाणी व पाणी पुरवठा कृषी निविष्ठा विक्री केंद्रे व त्याची वाहतूक (आवश्यक फलक लावून करावी )
वरील सर्व बाबींशी संबंधित वेअर हाऊसिंग, पुरवठा साखळी (Supply Chain) IT Services (मर्यादित मनुष्यबळासह)वस्तू, माल व त्या संबंधित मनुष्यबळाची वाहतूक करणारी वाहने, पोलीस व आरोग्य विभाग तसेच आपत्ती निवारण व्यवस्थापनाशी संबंधित वाहने (फक्त कर्तव्यार्थ), तातडीने रुग्णवाहतूक व हॉस्पीटलमधील डॉक्टर व पॅरामेडीकल स्टाफ, माझ्यावतीने व पोलीस अधीक्षक पालघर यांनी परवानगी/पासेस दिलेल्या व्यक्ती व वाहने. यांना बंदीतुन वगळण्यात आले आहे. सवलत दिलेल्या अधिकारी व कर्मचारी तसेच खाजगी व्यक्ती यांनी त्यासाठी त्यांचे ओळखपत्र व सदर विशेष कार्यासाठी नेमणूकीबाबतचे आदेश तसेच रुग्णांनी आवश्यक कागदपत्रे रुग्णांनी सोबत बाळगणे आवश्यक करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सढळ हाताने मदत करावी-जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोवीड-19 या नावाने खाते सुरु करण्यात आले आहे. जनतेंनी, दानशूर व्यक्तींनी, सेवा भावी संस्थानी तसेच विविध संघंटनांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.
खात्याचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे:-
· खात्याचे नाव-मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोवीड 19
· बँकेचे बचत खाते क्र-39239591720
· स्टेट बैंक ऑफ इंडिया ,मुंबई मुख्य शाखा,फोर्ट, मुंबई 400023
· शाखा कोड-00300
· IFSC कोड - SBIN0000300
UPI ID – cmrfmahacovid19@sbi यावर देखील आपण कोवीड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहाय्यता निधी उपलब्ध करुन देऊ शकता.
जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर स्तरावर देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच CSR फंड कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. या बाबत आपणाला काही अडचणी उद्भवल्यास पुढील क्रमांकावर 02525-252520/02525-253111 संपर्क साधावा.
जनतेच्या सोईसाठी व ऐच्छिक दात्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर व तालुका स्तरावर तहसीलदार कार्यालय व गटविकास अधिकारी कार्यालय येथे धनादेश समक्ष अथवा ड्रॉपबॉक्स द्वारे (Dropbox ) स्विकारले जाऊन पोच पावती देण्यात येईल. ऐच्छिक दात्याना आवाहन करण्यात येते की, आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पुढाकार घेऊन कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सढळ हाताने मदत करावी, असे ही जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आवाहन केले.

बेशिस्ती म्हणजे संकटाला निमंत्रण; सावध व्हा, गर्दी टाळा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील जनतेला विनम्र आवाहन


·       चाचणी केंद्रे वाढल्याने पॉझेटिव्ह रुग्ण वाढलेपण बरे होऊन घरी जाणारे रुग्णही आहेत

·       शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात नाही

·       एसी न लावण्याचे, थंड पेय आणि पाणी न पिण्याचे आवाहन

·       जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा नाही.

·       विषाणूशी लढणारे डॉक्टर योद्धेच

·       संयमजिद्द आणि आत्मविश्वासावर युद्ध जिंकण्याचाही विश्वास

 राज्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवलेली असूनही लोक विनाकारण झुंबड करून खरेदी करताना दिसत आहेत. हे अत्यंत चुकीचे असून बेशिस्ती म्हणजे संकटाला निमंत्रण आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे. सावध व्हावेगर्दी टाळावी  असे आवाहन करताना मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा जिद्दसंयम आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे युद्ध आपण नक्की जिंकू असा विश्वास राज्यातील जनतेला दिला.

आज थेट प्रसारणाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते

अन्नधान्य वितरणाची साखळी व्यवस्थित सुरु

लॉकडाऊननंतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी माणसे आणि यंत्रणा एकत्र करताना थोडा वेळ लागला त्यामुळे जनतेला थोडा त्रास झाला. त्यासाठी दिलगिरी व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले,आता ही वितरण साखळी सक्षमपणे कार्यान्वित झाली आहे. येत्या एक दोन दिवसात हा प्रश्न पूर्णपणे सुटेल. राज्यात जीवनावश्यक वस्तूंचीऔषधांची अजिबात कमी नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नयेत्यासाठी गर्दी करू नये.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात नाही

महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली नसल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणालेकोरोना संकटापाठोपाठ आर्थिक संकट येऊ नयेराज्याची आर्थिक घडी विस्कटू नये म्हणून हे वेतन टप्प्याटप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचे पगार हे पहिल्यांदा दिले जातीलत्यामुळे वेतन कपात होईल ही भीती कुणीही मनात बाळगू नयेगैरसमज करून घेऊ नये.

धोका आहेकाळजी घ्या
रुग्ण बरे होत आहेत ही समाधानाची बाब

राज्यात चाचणी केंद्र वाढले आहेत,त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. असे असले तरी अजून आपण काळजी घेतली तर विषाणूचा हल्ला परतवून लावू शकतो या स्थितीत आहोत.  धोका आहे पण त्यामुळे घाबरून जाऊ नयेगर्दीही करू नये असेही मुख्यमंत्री म्हणाले. रुग्ण बरे होऊन घरी जात असल्याचे समाधान व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या यादीत सुरुवातीला जे देश नव्हते, त्या  देशातून जे नागरिक- पर्यटक आलेत्यांनी कोणतीही माहिती न लपवता पुढे यावे. लक्षणे आढळली तर पटकन उपचार करून घ्यावेत कारण योग्य वेळी उपचार झाले तर जीव वाचू शकतो हेही या दरम्यान स्पष्ट झाल्याचे सांगितले.

थंड पेयथंड सरबत यापासून दूर राहा
मुख्यमंत्र्यांनी खाजगी डॉक्टरांना दवाखाने बंद न ठेवण्याचे आवाहन केले. सर्दी खोकला आणि तापाची लक्षणे असलेले रुग्ण सरकारी दवाखान्यात पाठवा. परंतु इतर रुग्णांना वैद्यकीय सेवा द्याघाबरून जाऊ नका असेही सांगितले. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला वातानुकूलन यंत्रणा (एसी) न लावण्याची सूचना केली. तसेच थंड पाणीथंडपेयथंड सरबत यापासून थोड्या काळासाठी दूर राहाॲलर्जी टाळासाधं पाणी प्यायामुळे नेहमीच्या पद्धतीने होणारे सर्दी पडशासारखे आजार तुम्ही दूर ठेऊ शकाल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

१ हजार केंद्रात दोन लाख स्थलांतरितांना सुविधा

संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला असल्याने  इतर राज्यातील कामगारमजूर  यांनी स्थलांतर करणे ताबडतोब थांबवावे असे सांगितले असूनही लाखो लोक स्थलांतर करताना दिसत असल्याबाबत चिंता व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घेतली असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्यासाठी राज्यात जवळपास १ हजार केंद्रे सुरु करण्यात आली आहेत, तर आजघडीला दोन- सव्वादोन लाख स्थलांतरीत लोकमजूर यांची तिथे व्यवस्था करण्यात आली आहेइतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील कामगार-मजुरांचीही ती राज्ये व्यवस्था करत आहेतप्रत्येकजण माणुसकीचा धर्म पाळत आहेत,त्यांना अन्नऔषधे याचा पुरवठा केला जात आहे हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

गणवेशधारी डॉक्टर हे योद्धेच

 नायडू रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेस शी आपण बोललो,त्यावेळी ते गणवेशधारी योद्ध्यासारखे दिसत होते. अत्यावश्यक सेवेत काम करणारे सर्व कर्मचारीबेस्टचे ड्रायव्हर,एसटीचे ड्रायव्हरडॉक्टरनर्सेस,सफाई कामगारया सगळ्यांचे मला खुप कौतुक वाटते अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कामाचा गौरव केला.

कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना बाधिताचा स्वानुभव!

माहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही 8 सहकारी अमेरिकेला गेलो होतो. कोरोना विषाणू संदर्भात भारतात (नागपुरात) परतल्यावर त्यापैकी 3सहकाऱ्यांना कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटीव्ह आली. हे ऐकून मी घरीच स्वत:ला क्वारंटाईन केलं. आणि नंतर माझ्या सेाबत आलेल्या मित्रांसोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी गेलो. मला असिम्टोटिक कोरोना झाल्याचं निदान झालं. म्हणजे कोरोनाची कोणतीही बाह्य लक्षणं मला नव्हती. तरी मला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. कोरोना असल्याचं कळलं. त्यामध्ये मला मल्टीविटामीनच्या गोळ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी देण्यात आल्या. कोरोना ट्रिटमेंटच्या प्रोटोकॉलनुसार सुरूवातीला मला आयोसलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले. खरं म्हणज सुरूवातीला थोडं टेन्शन आलं होतं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे मला बरे वाटले.
मात्र मला आयसोलेशन करण्यात आलेल्या वार्डमध्ये मी स्वत:साठी टाईमटेबल बनविला. त्यात मी वाचनरुममध्येच वॉकयु-टयूबवरील सकारात्मक व्हिडिओचा समावेश होता. या काळात मी कटाक्षाने कोरोनासंबंधित नकारात्मक बातम्या किंवा अन्य साहित्य वाचले नाही. कोरोनाचा मृत्यूदर कमी असल्याचे मी वाचले. त्यामुळे मला हॉस्पिटलमार्फत देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचनांचं मी काटेकोरपणे पालन केले. माझ्या आजारादरम्यान मला जिल्हा प्रशासनातर्फे पूर्ण सहकार्य करण्यात आले.

आयसोलेशनदरम्यान माझ्यापर्यत कोणी येत नव्हतं. साधारण 7 व्या दिवशी माझ्या घशातील स्त्रावाच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली. तो निगेटिव्ह आला. डिस्चार्जनंतरही मला घरी मास्क घालून व घरातील सदस्यापासून दूर राहण्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच या दरम्यान खोकला किंवा सर्दी वाटल्यास तात्काळ दवाखान्यात येण्याच्याही सूचना दिल्यात.

माझ्या मते कोरोनाला योग्य ती काळजी घेऊन पूर्ण हरविता येते. मी एकांतवासाचा सुयोग्य वापर केला होता. रूममध्येच व्यायाम केला. तसेच सकारात्मक विचारांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यासाठी चौरस आहारही घेणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी घरीच थांबा व सुरक्षित राहा.

मास्क कशा वापरायचा???

#mask_vapar_kasa_karava? 

कोरोनाच्या चाचण्यांची महाराष्ट्रात सर्वाधिक सुविधा; दिवसाला होऊ शकतात साडेपाच हजार चाचण्या - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्यात कोरोना चाचण्यांची सुविधा देशात महाराष्ट्रात सर्वाधिक असून १३ शासकीय आणि ८ खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज ५ हजार ५०० चाचण्या करू शकतोअशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. राज्यात आतापर्यंत ६ हजार ३२३ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून ५ हजार ९११ जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चाचण्यांची सुविधा वाढविण्यासाठी सुरूवातीपासून केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. राज्याच्या मागणीची दखल घेऊन केंद्र शासनाने तातडीने शासकीय महाविद्यालय आणि खासगी प्रयोगशाळांना चाचण्यांसाठी परवानगी देण्यात आली आहे.
सध्या राज्यात १३ शासकीय प्रयोगशाळांच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी केली जात आहे. त्याद्वारे दररोज २ हजार ३०० चाचण्या केल्या जाण्याची क्षमता आहे. आता त्यामध्ये अजून ३ शासकीय प्रयोगशाळांना मान्यता देण्यात येणार असून राज्यात शासकीय प्रयोगशाळांची संख्या १६ होईलअसे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात सध्या ८ खासगी प्रयोगशाळांमधून चाचण्या केल्या जात असून त्याद्वारे दररोज सुमारे २ हजार ८०० चाचण्या केल्या जाऊ शकतात. मात्र सध्या तरी राज्यात मोठ्या प्रमाणावर चाचण्या करण्याची आवश्यकता नसून कोरोना उपचाराच्या प्रोटोकॉलनुसार चाचण्या केल्या जात असल्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी संगितले.

राज्यात कोरोनाला सामोरे जाण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडे पुरेशी साधनसामुग्री उपलब्ध असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात सध्या दीड लाख एवढे एन ९५ मास्क उपलब्ध असून सुमारे ३५ हजार पीपीई किटस् तर २१ लाख ७० हजार ट्रीपल लेअर मास्क उपलब्ध आहेत. अजूनही ही साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेतअसेही त्यांनी सांगितले.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात येणार असून उद्यापासून राज्यात या योजनेमध्ये सुमारे एक हजार रुग्णालये सहभागी होणार आहेत त्याद्वारेही कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जातीलअसेही आरोग्यमंत्र्यांनी संगितले.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपये

  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून दानशूर व्यक्ती,संस्था आदी घटक पुढे येत आहेत. राज्यातील प्रथितयश संस्था असलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-१९ साठी एक कोटी रुपये देऊ केले आहेत.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूर या संस्थेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या एक दिवसाच्या वेतनाइतका सुमारे एक कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय एकमताने घेतल्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी म्हटले आहे. हा निधी धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन  कोरोनाच्या संकटाचा धैर्याने आणि कौशल्याने सामना करीत आहेया प्रयत्नांना साथ देण्यासाठी विवेकानंद संस्था पुढे आल्याचे त्यांनी कळविले आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत राज्यपालांनी घेतला कोरोना आव्हान तयारीचा आढावा



         कोरोना व्हायरसच्या गंभीर संकटाला तोंड देण्याचे दृष्टीने राज्य शासन करीत असलेल्या उपाययोजनांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेसह आज राजभवन येथे एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला.

स्थलांतरित लोकांसाठी सुरु करण्यात आलेल्या शिबिरांमध्ये रोगराई पसरू नये यासाठी पुरेशी स्वच्छता ठेवावीतेथील लोकांच्या निवासभोजनाची व औषधाची व्यवस्था करावी तसेच कुणीही उपाशी राहणार नाही याची विशेषत्वाने काळजी घ्यावी अशा सूचना राज्यपालांनी यावेळी केल्या. या कामी शासनास सहकार्य करणाऱ्या विविध अशासकीय तसेच सामाजिक संस्थाशी देखील समन्वय राखावा अशी सूचना त्यांनी केली. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करावी अशीही सूचना त्यांनी यावेळी केली.

कामगारांनाविशेषतः बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत कामगारांना तातडीची आर्थिक मदत देण्याबाबत राज्यपालांनी सूचना केली.
  
राज्यातील आरोग्य सेवकपोलीस तसेच स्वच्छता कर्मचारी यांच्या आरोग्य सुरक्षिततेची देखील पुरेशी खबरदारी घ्यावी असे राज्यपालांनी सांगितले.

स्थलांतरित लोकांच्या भोजन व निवासाची योग्य व्यवस्था करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. अतिरिक्त वैयक्तिक सुरक्षा कीट केंद्राकडून उपलब्ध झाल्यावर आवश्यक त्या लोकांना देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

राज्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी केलेली व्यवस्थारुग्ण तपासणीची क्षमताविलगीकरणाची सुविधाव्यक्तिगत सुरक्षेसाठी आवश्यक किट्सची उपलब्धता याबाबत राज्यपालांनी यावेळी माहिती करून घेतली.

बैठकीला पर्यावरणपर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे,मुख्य सचिव अजोय मेहता,अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) संजय कुमारअतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिकअतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) डॉ. प्रदीप व्यासअतिरिक्त मुख्य सचिव (कामगार) राजेश कुमार व पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल हे उपस्थित होते.

Monday, March 30, 2020

ज्येष्ठ नागरिकांमधील कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी

ज्येष्ठ नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असून त्यांच्यामधील या विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना आज जारी केल्या आहेत.

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या विषाणूचा भारतातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. लॉकडाऊन आणि संचारबंदीसाख्या  उपाययोजनांतून कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सोशल मीडियाद्वारे जनतेशी वारंवार संवाद साधून कोरोनाला रोखण्यासाठी घराबाहेर पडू नका असे कळकळीचे आवाहन केले आहे. 

कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रत्येकाने सहभागी होऊन शासनाने घातलेल्या निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. वयोमानानुसार कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती हे महत्त्वाचे कारण असले तरी अनेक ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीशी संबंधित आजार, दमा किंवा श्वसनाचे विकार आदी व्याधी असतात. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाचा ज्येष्ठांना असलेला अधिक धोका टाळण्यासाठी कोरोना विषाणूच्या संसर्गापासून दूर राहावे लागणार आहे. त्यासाठी आरोग्य मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. 

*कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी ज्येष्ठ नागरिकांकरिता मार्गदर्शक सूचना-*

✅ *हे करा* (DO’s)

■ घरीच रहा. घरी येणाऱ्या कोणत्याही पाहुण्यांच्या किंवा अभ्यागतांच्या भेटी घेणे टाळा. भेटणे अगदीच आवश्यक असेल तर बोलताना किमान एक मीटरचे अंतर राखा.
■ थोड्या-थोड्या वेळाने आपला चेहरा आणि हात साबणाने स्वच्छ धुवा. 
■ खोकताना किंवा शिंकताना आपल्या शर्टची बाही, हातरूमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करून तोंड झाका. खोकून किंवा शिंकून झाल्यांनतर रूमाल किंवा कपडे साबणाने स्वच्छ धुवून घ्या आणि टिश्यू पेपर झाकणबंद असलेल्या कचरा डब्यात टाका. 
 ■ घरी बनविलेला ताजा आणि पोषक आहार घ्या, या आहारातून आपल्या कुटुंबाला योग्य पोषण मिळेल याची काळजी घ्या. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी वारंवार भरपूर पाणी प्या. शरीराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ताज्या फळांचा रस प्या. 
■ व्यायाम, प्राणायाम करा. 
 ■ आपल्याला असलेली पथ्ये पाळा.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अध्यापन प्रक्रिया - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत




राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून  शिकवणीसाठी ऑनलाईन अध्यापन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे विध्यार्थ्यांनी काळजी करू नये, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

श्री. सामंत म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन असल्याने या संचारबंदीच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, याकरिता सर्व तंत्रशिक्षण संस्थांमधील कामकाज 'वर्क फ्रॉम होम' या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यात येत आहे.

हे ऑनलाईन कामकाज पुर्ण करण्यासंदर्भात तंत्रशिक्षण विभागाचे  संचालक, डॉ.अभय वाघ हे व्हॉट्सअँप समूहावर मार्गदर्शन करीत आहेत.

प्राध्यापकांनी विध्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अभ्यासक्रमांच्या अनुषंगाने माहिती पुरविणे तसेच पाठ्यक्रमानुसार व्हिडिओ तयार करून ते ईमेल, व्हॉट्सअपद्वारे उपलब्ध करून देणे, याचबरोबर ऑनलाइन संसाधनांचा (SWAYAM, NEAT, COURSERA, edX etc ) अध्ययनासाठी स्वतः प्राध्यापक आणि  विद्यार्थ्यांनी वापर करणे, Screen -o-matic सारख्या ऑनलाईन व्हिडिओ एडिटिंग प्रणालीचा वापर करून प्राध्यापकांनी विषयनिहाय व्हिडिओ क्लिप तयार करून विद्यार्थ्यांना पुरविणे, व्हॉट्सअप समूहाद्वारे नेमवून दिलेले कार्य (Assignment) पूर्ण करून घेणे, विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निरसरण करणे, पुढील सत्राचे शैक्षणिक नियोजन विभागास सादर करणे, प्रश्नावलीची बँक तयार करणे,असे अनेक ऑनलाईन पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जास्तीत जास्त  ऑनलाईन वापर करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, असे आवाहनही श्री. सामंत यांनी केले आहे.

पुढील टप्प्यात सर्व संस्थांचा आढावा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाने नियोजन केले आहे. सर्व संस्था व प्राध्यापक यांना गुगल फॉर्म पाठवून त्यांनी वर्क फ्रॉम होम करताना वरीलपैकी कोणकोणते पर्याय वापरले, त्यांची परिणामकारकता काय, किती विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला याबाबी तपासण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक आणि संबंधित संस्थेचे प्राचार्य यांना जबाबदारी देण्यात आली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतनांमधील प्राध्यापक पदांना 7 वा वेतन आयोग लागू करताना शासनाने प्राध्यापकांची कामगिरी तपासण्यासाठी 360 डिग्री फीडबॅक संकल्पना अनिवार्य केली आहे. यात प्राध्यापक वर्गाचे वार्षिक गोपनीय अहवाल, आणि '360 डिग्री फीडबॅक' या बाबींचे मूल्यमापन करताना त्यांनी 'वर्क फ्रॉम होम' अंतर्गत केलेल्या कार्याचा मूल्यमापनाच्या दृष्टीने समावेश असेल अशा पद्धतीने आधुनिक तंत्रावर आधारित अध्यापन पद्धतींचा वापर करून या लॉक डाउन कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.

तसेच तंत्रशिक्षण संचालनालयाचे महत्वपूर्ण कार्यालयीन कामकाज विशेषतः मार्च अखेरची आर्थिक बाबींविषयक कामे सुद्धा दूरध्वनी, इमेल, व्हॉट्सअप च्या माध्यमातून पूर्ण करण्यात येत आहेत.असेही श्री. सामंत यांनी संगितले.      

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश

 
           
         करोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी मुंबईतील १५ तर, मुंबई बाहेरील सात रुग्णांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एका दिवसात करोनाचे २२ रुग्ण वाढले. यामध्ये सात महिन्यांच्या बाळाचा व एक वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. राज्यातील रुग्णांची एकूण संख्या १८६ झाली आहे.

        जीवघेणा कोरोना व्हायरस हैदोस घालत आहे. जगभरातील 170 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत जगभरात साडेसहा हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत 31 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक लाख 42 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत.कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. इटलीमधील मृतांचा आकडा दहा हजारांवर पोहोचला आहे. तर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 92 हजार 472 आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत 5 हजार 992 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण संसर्ग झालेल्यांचा आकडा 73 हजार 235 वर पोहोचला.

         दरम्यान, अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसमुळे 1 लाख 23 हजार 750 बाधित आहेत. ज्यापैकी 2227 लोकांता मृत्यू झाला आहे. चीनमध्ये निर्माण झालेल्या या व्हायरसने आतापर्यंत 3300 लोकांचा बळी घेतला आहे. तर 81439 लोकांना संसर्ग झाला आहे. दरम्यान, चीनमध्ये आता नव्या रूग्णांची संख्या घटली असून 40 ते 50 रूग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.

व्हायरल असलेला फॉर्म बनावट ; अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून खुलासा

 
रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात आलेला नाही. सद्या सोशल मीडिया व काही माध्यमावरून अशा प्रकारचा बनावट फॉर्म प्रसिद्ध केला जात आहे. त्यात काहीही तथ्य नसून असा कोणताही निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आलेला नसल्याने नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी असा कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आलेल्या खुलाश्यात म्हटले आहे की, सोशल मीडिया तसेच काही माध्यमातून रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत धान्य मिळण्यासाठी फॉर्म उपलब्ध करून देण्यात आल्याच्या बातम्या पसरविल्या जात आहे. सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहणार नाही यासाठी शिवभोजन तसेच विविध योजना राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभाग व इतर विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या आहेत. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्ज व चुकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. अशा खोट्या बातम्यांमधून जनतेची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी राज्यसरकारकडून कुठलीही अधिकृत माहिती आल्याशिवाय कुठलाही फॉर्म भरून देऊ नये असे आवाहन विभागाकडून करण्यात आले 

कोरोना विरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचा टप्पा सुरू; अजूनही गर्दी कमी करा अन्यथा आणखी कठोर पावले टाकावी लागतील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


       जीवनावश्यक वस्तुंची, औषधांची कमी नाही, त्यांची दुकाने बंद नाहीत तरी विनाकारण काही लोक बाहेर पडताहेत, पोलिसांशी हुज्जत घालत आहेत, कृपया असे करू नका, घराबाहेर पडू नका असे कळकळीचे आवाहन करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजूनही गर्दी थांबवा, कठोर पावले टाकायला भाग पाडू नका असे म्हटले आहे.

     आज थेट प्रसारणाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

सर्वांचे सहकार्य

       आजपर्यंत राज्यातील सर्व जनतेने संयमाचे अतुलनीय दर्शन घडवले आहे ते पुढेही काही दिवस कायम ठेवा, घरात राहा, विरंगुळ्याचे, कुटुंबियांसमवेतचे क्षण अनुभवा असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याला केंद्र सरकारचे पूर्ण सहकार्य आहे. पंतप्रधान, गृहमंत्री अमित शहा, प्रकाश जावडेकर, विरोधीपक्ष नेते, मंत्रीमंडळातील सहकारी, राज ठाकरे माझ्याशी चर्चा करत आहेत, सर्वजण या प्रश्नावर एकत्र येऊन काम करत आहेत. त्या सर्वांना मी धन्यवाद देतो असेही ते म्हणाले.

मदतीचे अनेक हात

      काल मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड १९ या नावाने स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. उदय कोटक यांनी १० कोटी रुपयांची मदत केली आहे. कंपन्या, उद्योजक पुढे येत आहेत, कुणी रुग्णालय सेटअप उभे करत आहे तर कुणी मास्क पुरवित आहे. एक चांगली टीम या निमित्ताने तयार झाली आहे, काम करत आहे.

      जिथे आहात तिथेच थांबा, तुमची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची इतर राज्यातून आलेले लोक, कामगार घरी जाण्यासाठी परत निघाल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर दिसत आहे. त्यांना विनंती आहे की, त्यांनी आहेत तिथेच थांबावे, महाराष्ट्र शासनाने त्यांची सम्पूर्ण जबाबदारी घेतली आहे. राज्यभर त्यांच्यासाठी १६३ केंद्रे सुरु झाली असून तिथे त्यांची राहण्याची आणि मोफत जेवण्याची सोय केली आहे.

तर, सीएमओशी संपर्क करावा

     तसेच महाराष्ट्रातील जे लोक इतर राज्यात अडकले असतील त्यांनी तिथेच राहावे, अडचण आल्यास मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क करावा, त्यांना संबधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून मदत उपलब्ध करून दिली जाईल.

       जीवनावश्यक वस्तू आणि सेवा सुरु कामगारांची वाहतूक पूर्णपणे बंद झाली पाहिजे हे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी जीवनावश्यक वस्तू, औषध दुकाने आणि सेवा बंद केल्या नसल्याचा पुनरुच्चार केला. यासाठी होणारी गर्दी कमी करावी, यंत्रणेवरचा ताण वाढवू नये असे आवाहनही केले.

पाच रुपयात शिवभोजन

          ही आरोग्याशी संबंधित लढाई असल्याचे सांगून एकत्रित प्रयत्नातून आपल्याला ती जिंकायची आहे, त्यासाठी जबाबदारीने वागायचे आहे. राज्यात शिवभोजन केंद्रात कार्ड असो वा नसो आता पाच रुपयात लोकांना पुढची तीन महिने जेवण देण्यात येणार असल्याची माहिती ही मुख्यमंत्र्यांनी दिली.

डॉक्टरांनीच माझे मनोधैर्य वाढवले

         कस्तूरबा आणि नायडू रुग्णालयातील डॉक्टरांशी बोलल्यानंतर माझेच मनोधैर्य वाढले इतक्या सुंदर प्रकारे आपले हे आरोग्य सेवेतील लोक काम करत आहेत. त्यांच्या मनात कुठलीही भीती नाही, हे डॉक्टर, नर्सेस, पोलीस, जीवनावश्यक सेवा देणारे सर्व लोक हे खरे शुरवीर आहेत, मला त्यांचा अभिमान वाटतो, जीवावर उदार होऊन ते काम करत आहेत हे ही आपण लक्षात घेतले पाहिजे, असे श्री. ठाकरे म्हणाले.

राज्यात चाचणी केंद्रे वाढली

         राज्यात चाचणी केंद्रे वाढवली आहेत, त्यामुळे कोरोना पॉझेटिव्हची संख्या वाढेल ही अपेक्षा आहेच परंतू अपेक्षेपलिकडे ही संख्या जाता कामा नये, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, बरेच रुग्ण बरे होऊन घरी परत जात आहेत ही समाधानाची बाब आहे. खाजगी डॉक्टरांनीही आपले दवाखाने बंद न करता त्यांच्याकडे येणाऱ्या या तसेच न्यूमोनियाची लक्षणे असलेल्या रुग्णांना सरकारी दवाखान्यात पाठवावे कारण लक्षणाची तीव्रता कमी असतांनाच आपण त्यावर विजय मिळवू शकतो.

होम क्वारंटाईन लोकांनी घराबाहेर पडू नये

         होम क्वारंटाईन लोकांनी कुटुंबियांसाठी आणि समाजासाठी स्वत:ला घरातच ठेवावे असे सांगतांना घरातील 60 वर्षावरील वयस्क माणसे, गरोदर स्त्रिया, मधुमेह, उच्चरक्तदाब असलेले माणसे यांना जपावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले

        विषाणुचा गुणाकार न होऊ देता त्याची वजाबाकी करावयाची असल्याने हा टप्पा सर्वात महत्त्वाचा आहे त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये, रविवार असला तरी घरीच बसावे विषाणुला हरवण्यासाठी संयम, जिद्द कायम ठेवावी, आपण हे युद्ध नक्की जिंकू असेही मुख्यमंत्री म्हणाले.

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या आदिवासी बांधवांसाठी अन्न व निवाऱ्याची सोय करा - आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

    
  राज्यातील लॉकडाऊनमुळे राज्यात विविध भागात अडकलेल्या तसेच अन्नावाचून हाल होत असलेल्या आदिवासी बांधवांचा शोध घेऊन त्यांच्या निवाऱ्याची तसेच जेवणाची सोय करण्याचे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी एका संदेशाद्वारे विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

      आश्रमशाळा, वसतिगृह ते आयुक्तालयापर्यंत विविध प्रकल्पांवर कार्यरत सर्व प्रकल्प अधिकारी, अतिरिक्त आदिवासी आयुक्त आणि सर्व क्षेत्रीय अधिकारी यांच्यासाठी लिहिलेल्या संदेशात ॲड. पाडवी यांनी म्हटले आहे की, आपणा सर्वांना सद्यःपरिस्थितीबद्दल माहिती आहे. त्याप्रमाणे, आपण सर्वांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. त्याच बरोबर राज्यातील आदिवासी बांधवांची काळजी घेण्याची जबाबदारीही आपल्या सर्वांवर आहे.  बरेच आदिवासी बांधव हे विविध ठिकाणाहून घरी जाताना मध्येच अडकलेले आहेत किंवा कामाच्या ठिकाणी अडकले आहेत. लॉकडाऊनमुळे आदिवासी गावकरी / पाडा रहिवाशांनाही अन्नधान्य मिळण्यास त्रास होत आहे. आदिवासी भागातील तसेच विविध शहरांमध्ये व खेड्यात अडकलेल्या गरीब, कष्टकरी आदिवासी बांधवांचा शोध घेणे आवश्यक आहे. अशा गरजू आदिवासी बांधवाना अन्न आणि निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी संदेशात म्हटले आहे.

       लॉकडाऊनमुळे अडकलेल्या आमच्या सर्व आदिवासी बांधवांसाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मदत करू शकता. कोणत्याही औपचारिक मंजुरीसाठी, ज्यांना मी मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत अशा उच्च अधिकाऱ्यांशी आपण संपर्क साधून समन्वयाने सर्व आदिवासी बंधू- भगिनींना सर्वतोपरी मदत करावी, असे आवाहनही आदिवासी विकास मंत्री ॲड.पाडवी यांनी या पत्राद्वारे केले आहे.

8 महत्वाच्या बाबी कोरोना विषाणू संबंधित किती दिवस शरीरात राहील

1) हे विषाणूबद्दल चांगलेच ज्ञात असले पाहिजे की हे अत्यंत संक्रामक आहेत म्हणजेच कोणत्याही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येऊन ते खूप वेगाने पसरतात आलम म्हणजे जेव्हा जेव्हा त्या व्यक्तीला आतून काही लक्षणे दिसत नाहीत तेव्हा त्यापासून ग्रस्त व्यक्ती त्यास पसरू लागतो म्हणूनच इतरांपासून अंतर ठेवण्याचे फायदे आहेत.
२) कोविड 19 नावाचे विषाणू जेव्हा शरीरात प्रवेश करतात तेव्हा त्याची लक्षणे 2 ते 14 दिवसात दिसतात बर्‍याच प्रकरणांमध्ये हे पाहिले गेले आहे की एखाद्या व्यक्तीस हे माहित नसते की पहिल्या 8 ते 10 दिवसांत तो शरीरात आहे पहिल्या 8 ते 10 दिवस हा विषाणू संक्रामक आहे यानंतर पीडित व्यक्तीस संसर्गाची शक्यता जवळजवळ संपुष्टात येते.

3) कोरोना विषाणूमुळे पीडित असलेल्या व्यक्तीमध्ये २२ ते 24 दिवस त्याचा प्रसार करण्याची क्षमता असते यानंतर त्यांच्या प्रसार होण्याचीशक्यता फारच कमी आहे.

4) एका अभ्यासानुसार कोरोना विषाणू मानवी शरीरात फक्त २२ दिवस जगू शकतो तथापि काही दुर्मिळ घटनांमध्ये हा कालावधी 37 दिवस असल्याचे आढळले आहे.

5) तुमच्या लक्षात आले असेल की कोरोना संशयितांना 14 दिवसांच्या कोठडीचा सल्ला देण्यात आला आहे याचे कारण असे आहे की त्याची लक्षणे दर्शविण्यास 6 दिवस लागतात तर पुढील 8 दिवस एखाद्या व्यक्तीस विषाणूचा धोकादायक प्रसार होऊ शकतो म्हणूनच 6 + 8 = 14 दिवसांच्या अलग ठेवण्याची शिफारस केली जाते.मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.

6) जेव्हा जेव्हा एखादा व्हायरस शरीरात प्रवेश करतो तेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती त्याच्या पातळीवर व्हायरस नष्ट करण्याचा प्रयत्न करते तथापि हे करण्यासाठी शरीराला 6 ते 12 दिवसांची आवश्यकता आहे त्याच वेळी ते विषाणूंविरूद्ध प्रतिपिंडे तयार करण्यास सुरवात करतात. या एन्टीबॉडीजमुळे संक्रमित व्यक्तीला कमी न होणाया इतरांपर्यंत हा संसर्ग पसरतो.जर या विषाणूची लागण झालेली व्यक्ती एकदा बरे झाली तर पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता खूपच कमी आहे. चीनमध्ये केवळ काही निवडक प्रकरणे उघडकीस आली आहेत. अशा संसर्गाची लागण होण्याचे प्रमाण एकूण संख्येच्या केवळ 0.2% आहे.

7)पॉझिटिव्हच्या टक्के घटनांमध्ये हे आढळले की संसर्ग २ डिग्री ते १० डिग्री सेल्सिअस तापमानात खूप वेगाने पसरतो म्हणूनच थंड ठिकाणी त्याच्या संसर्गाची शक्यता आणखीनच वाढते म्हणून अशी आशा आहे की उन्हाळ्याचा हंगाम जसजसा तीव्र होतो तसतसे या विषाणूचा प्रसार कमी होऊ शकतो.

पालघर जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची आकडेवारी (29.03.2020 रोजीची)

         

   पालघर जिल्ह्यामध्ये आज रोजी (29 मार्च) परदेशात प्रवास केल्याने देखरेखीखाली असलेल्या व्यक्तींची संख्या 114 ने वाढून 739 झाली आहे. त्यातील 60 वर्षे पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींची संख्या 25 इतकीच कायम आहे. यातील तब्बल 281 व्यक्तींचा देखरेखीखाली 14 दिवसांचा कार्यकाळ पुर्ण झालेला आहे.

      कोरोनाबाधेची शंका आल्यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तींची संख्या 2 ने वाढून 39 झाली आहे. त्यातील 20 जण हे विदेशवारी केलेले असून, अन्य विदेशवारी न केलेल्या 19 जणांमध्ये तीव्र श्वसन विकाराची लक्षणे आढळली असल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोरोना बाधीत रुग्णांच्या 11 निकटवर्तीयांसह (20+19+11) एकूण 50 जणांच्या घशाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
       त्यातील 43 नमुन्यांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त अहवालांपैकी 38 अहवाल निगेटिव्ह आले असून 5 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेले सर्व 5 रुग्ण वसई विरार महानगर क्षेत्रातील असून त्यांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.


• डहाणू: तालुक्यात 39 जण देखरेखीखाली असून त्यातील 3 जण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व आजाराचा पूर्वेतिहास असलेले आहेत. 21 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. 2 प्रवाशांमध्ये लक्षणे आढळल्यामुळे त्यांच्या घशाचे नमुने तपासले होते व रिपोर्ट निगेटिव्ह आले.
 • पालघर: तालुक्यात 107 जण देखरेखीखाली असून त्यातील 10 जण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व आजाराचा पूर्वेतिहास असलेले आहेत. 62 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. 13 प्रवाशांमध्ये लक्षणे आढळल्यामुळे त्यांच्या घशाचे नमुने तपासले असता, 10 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 3 रिपोर्ट प्राप्त होणे बाकी आहे.
 • वाडा: तालुक्यात 21 जण देखरेखीखाली असून त्यातील 14 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. 1 प्रवाशामध्ये लक्षणे आढळल्यामुळे त्याच्या घशाचे नमुने तपासले असता, रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
 • जव्हार: तालुक्यात श्वसन विकाराचा एक नवा रुग्ण आढळला असून त्याच्या घशाचा नमुना तपासणीसाठी पाठवला आहे. अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. या आधी 1 जण देखरेखीखाली होता. त्याचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला आहे.
 • मोखाडा: येथेही तीव्र श्वसनविकाराचा 1 रुग्ण आढळून आला असून त्याच्या घशाचा नमुना तपासणीसाठी पाठवला आहे. अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.
 • विक्रमगड: तालुक्यात 3 जण देखरेखीखाली होते. त्यांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे.
 • तलासरी: तालुक्यात 15 जण देखरेखीखाली असून त्यातील 1 जणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. 2 प्रवाशामध्ये लक्षणे आढळल्यामुळे त्याच्या घशाचे नमुने तपासले असता, रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
 • वसई: शहरीकरण झालेल्या या तालुक्यात (ग्रामीण भागात 135 + महानगर क्षेत्रात 416) 551 जण देखरेखीखाली असून त्यातील 12 जण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व आजाराचा पूर्वेतिहास असलेले आहेत. त्यातील 192 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. कोरोनाची लक्षणे आढळलेले 10, तीव्र श्वसन विकाराचे 9 व कोरोना बाधीत रुग्णांचे निकटवर्ती 11 असे 30 जणांच्या घशाचे नमुने तपासले असता, त्यापैकी 23 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 5 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेले रुग्ण आधीच मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल झालेले आहेत. अन्य 2 जणांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहेत.

       आज रोजी (दिनांक: 29 मार्च 2020) सरकारी संकेतस्थळावरील माहिती अशी आहे.
देशभरातील विमानतळांवर एकूण 15,24,266 प्रवाशांची तपासणी करण्यात आली. एकूण 1117 जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील 90 जण पूर्णत: बरे झाले असून 1010 जणांवर उपचार सुरु आहेत. 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 203 झाली असून त्यामध्ये 3 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. 25 जण पूर्णत: बरे झाले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
        नजीकच्या गुजरात राज्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 63 झाली असून 1 जण पूर्णत: बरा झाला असून 5 जणाचा मृत्यू झाला आहे.

Sunday, March 29, 2020

गरजू, गरीब आणि कामगार यांच्यासाठी निवास व भोजन व्यवस्था करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना राज्य शासनाचे निर्देश





        कोरोनाचा प्रभाव वाढू नये, यासाठी केलेल्या उपाय योजनांमुळे अडकलेल्या गरीब व गरजू नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्याचे तसेच लॉकडाऊनमुळे अडकलेल्या तसेच आपल्या मूळ गावी जाणाऱ्या राज्यातील व परराज्यातील कामगार, कष्टकऱ्यांची ते जेथे असतील त्या जवळपास तात्पुरती निवारा केंद्रे स्थापून त्यांची राहण्याची व  जेवणाची सोय करण्याचे निर्देश राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

         कोवीड १९ चा प्रसार रोखण्यासाठी केंद्र शासनाने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे अनेक कामगार हे आपल्या कामाच्या ठिकाणाहून मूळ गावी परत जाण्यासाठी निघाले आहेत. यामुळे सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे उल्लघंन होत आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची भीती वाढत आहे. त्यामुळे अशा कामगारांची व गरीब गरजू नागरिकांची निवासाची व जेवणाची सोय करण्याचे आदेश  केंद्र शासनाच्या गृह विभागाने परिपत्रकाद्वारे सर्व राज्यांना तसेच प्रत्येक शहराच्या जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख यांना दिले आहेत. या आदेशाचे काटेकोर पालन करून कामगार, कष्टकरी व गरीब गरजूंसाठी तात्पुरती निवास व्यवस्था व भोजन व्यवस्था करण्यास सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.

          त्यानुसार कामगारांसाठी ते ज्या भागात आहेत, त्या भागामध्ये राहण्याची तात्पुरती व्यवस्था तसेच गरीब व गरजूंसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात यावी. 

          तसेच लॉकडाऊन काळात गावी जाण्यास निघालेल्या कामगार, नागरिकांची ते ज्या भागात आहेत, त्याच्या जवळच्या भागातील तात्पुरत्या निवारा केंद्रात त्यांची व्यवस्था करण्यात यावी. त्यापूर्वी त्यांची योग्य प्रकारे वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. आवश्यकता वाटल्यास वैद्यकीय नियमानुसार १४ दिवस क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्याचीही सोय करावी.

          लॉकडाऊन काळात जरी काम बंद असले तरी, दुकाने, व्यावसायिक आस्थापना, उद्योग येथील कामगारांचे त्या काळातील पगार हे कोणतेही वजावट न करता देण्याच्या सूचना सर्व संबंधित आस्थापनाना व मालकांना देण्यात यावेत. कामगार तसेच स्थलांतरित नागरिक हे जर भाड्याने घर घेऊन राहत असतील तर त्यांच्या घर मालकांनी त्यांच्याकडून एक महिन्याचे घरभाडे घेऊ नये. तसेच कोणत्याही घर मालकाने विद्यार्थी अथवा कामगारांना घर किंवा परिसर सोडण्यास सांगत असेल, तर अशा घर मालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही या परिपत्रकात केल्या आहेत.

            केंद्र शासनाने आदेशित केलेल्या वरीलपैकी कोणत्याही सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा गुणाकाराचा काळ सुरु झालाय | जिथे आहात तिथेच रहा | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

   


 राज्यात आणीबाणीची परिस्थिती आहे. कोरोनाचा गुणाकाराचा काळ आता सुरु झालाय. त्यासाठी जबाबदारीने वागा. घराबाहेर पडू नका. जिथे आहात तिथेच रहा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मोठी दुर्घटना घडेल अशी कोणतीही चूक करू नका, असाही सल्ला त्यांनी दिला आहे. इतर राज्यांच्या कामगारांनी जिथे आहे तिथेच रहावे. त्यांच्या राहण्या, जेवणाची व्यवस्था केली जात आहे. 

     आतापर्यंत १६३ ठिकाणी व्यवस्था सुरु केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी ऑनलाईन ई-पासची सुविधा उपलब्ध

         सध्या देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलीस यंत्रणेमार्फत ई-पास देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन प्रणाली तयार करण्यात आली असून www.covid19.mhpolice.in या लिंकवर जाऊन संबंधितांना अर्ज करता येईल.

        सध्या लागू असलेल्या लॉकडाऊन कालावधीत भाजीपालाअन्नधान्य,औषधेदूध इत्यादी विविध प्रकारच्या जीवनावश्यक सामग्रीच्या वाहतुकीस मान्यता देण्यात आली आहे. पण यासाठी वाहतूक सुरु करण्यापूर्वी संबंधित वाहनास प्रशासनाची मान्यता घेणे आवश्यक आहे. यासाठी सध्या पोलीस,आरटीओ तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत अशा वाहनांना पास देण्यात येत आहेत. आता याबरोबरच संबंधित वाहनधारकांना ऑनलाईन प्रणालीमार्फतही ई-पास देण्यात येणार आहेत यासाठी त्यांनी www.covid19.mhpolice.in या लिंकवर जाऊन अर्ज करुन आपला ई-पास प्राप्त करुन घ्यावाअसे राज्य शासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. ऑनलाईन प्रणालीवरुन प्राप्त अर्जाची पोलिसांमार्फत पडताळणी केली जाईल. त्यानंतर वाहनधारकाला आपला ई-पास ऑनलाईन प्रणालीवरुनच डाऊनलोड करुन घेता येईल. हा पास प्राप्त झाल्यानंतर वाहनधारक वाहतूक करु शकेल. 

       सर्व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्थाव्यक्ती या प्लॅटफॉर्मवरुन ई-पाससाठी अर्ज करू शकतात. याठिकाणी सर्व आवश्यक माहिती भरुन अर्ज दाखल केल्यानंतर टोकन आयडी प्राप्त होतो. त्याचा वापर अर्जाची स्थिती तपासण्यासाठी करता येईल. पोलिस यंत्रणेच्या मान्यतेनंतर किंवा पडताळणीनंतर टोकन आयडी वापरुन ई-पास डाउनलोड करूता येईल. ई-पासमध्ये अर्जदाराची माहितीवाहन क्रमांकवैधता तारीख आणि क्यूआर कोड असेल. प्रवास करताना ई-पासची सॉफ्ट तसेच हार्ड कॉपी जवळ ठेवावी आणि विचारणा केल्यावर पोलिसांना दाखवावीअसे या पत्रकात म्हटले आहे. वैध तारखेनंतर त्याचा वापर किंवा अन्य प्रकारे गैरवापर केल्याचे आढळल्यास तो दंडनीय गुन्हा मानला जाईल.

करोनाशी लढा; शेतकऱ्यांना १५ हजार कोटी

       
        देशभरात लॉक डाऊन सुरु असून आणखी २० दिवस  अशीच स्थिती राहणार आहे. या कठिण परिस्थितीत शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. पंतप्रधान किसान (PM KISAN) योजनेत सरकारने १५००० कोटी मंजूर केले आहेत. लवकरच टप्याटप्याने ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. जवळपास साडेसात कोटी शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.

        करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने देशभर २१ दिवसांचा लॉक डाऊन घोषीत केला आहे. अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे. मात्र शेतकरी बांधवांना शेतमाल नेण्यासाठी अनके अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत दोन हजारांची मदत शेतकऱ्यांना थोडीफार दिलासा देणारी ठरणार आहे.

      येत्या १ एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा केले जाणार आहे. पीएम किसान (PM KISAN) योजनेत तीन टप्प्यात शेतकऱ्यांना सहा हजारांची मदत केली जाणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून ती संबंधित राज्य सरकारांना पाठवण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. १ एप्रिल रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजारांचा पहिला हप्ता जमा करण्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. 

       पीएम किसान (PM KISAN) योजनेत डिसेंबर २०१९ पासून ८ कोटी ७१ लाख शेतकऱ्यांना ५४ हजार कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. देशभरातून जवळपास १० कोटी शेतकऱ्यांची माहिती सरकारला प्राप्त झाली आहे. यात राज्यनिहाय शेतकरी आणि आधार जोडणी यांची छाननी केली जात असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. 

      पीएम किसान योजनेचे राज्य निहाय लाभार्थी
राज्यलाभार्थी शेतकरी
उत्तर प्रदेश१ कोटी ८४ लाख
महाराष्ट्र७७ लाख
तामिळनाडु३५ लाख
तेलंगणा३४ लाख ७० हजार
आंध्र प्रदेश५० लाख
बिहार५३ लाख ४० हजार
राजस्थान५० लाख
मध्य प्रदेश४९ लाख ३० हजार


कोरोना वायरसाविषयी माहिती

Real Time Information

जगातील नकाशा वरुन बोट ठेवा आणि पहा कोणत्या देशात कोरोना वायरस रुग्णांची संख्या. Fantastic Concept

http://www.covidvisualizer.com


 आताच्या घडीला आलेल्या जैविक समस्याच्या Corona (कोरोना) विषाणूबद्दल प्रश्नावली खालीलप्रमाणे आहेत:

प्रश्न 1. Corona (कोरोना) शब्दाचा अर्थ काय आहे?

उत्तर = Corona हा शब्द इंग्लिश नसुन लॅटिन भाषेतला आहे. याचा लॅटिन भाषेत अर्थ होतो crown (मुकुट). कारण या विषाणूला मुकुटासारखे टोकदार आवरण असते.

प्रश्न 2. Corona हे आजाराचे नाव आहे की विषाणूचे?

उत्तर = Corona हे विषाणूचे नाव आहे.याचे वैज्ञानिक नाव आहे Severe Acute Respiratory Syndrome novel Corona Virus-2 (SARS nCoV-2). novel म्हणजे नवीन.
या विषाणूपासून होणार्‍या आजाराला Covid-19 (corona virus disease-2019) असे म्हणतात.

प्रश्न 3. याचा उगम (origin) कुठे झाला?

उत्तर = हा विषाणू सर्वप्रथम वुहान (Wuhan),चिन मध्ये पाहण्यात आला.हा विषाणू वटवाघूळामधून माणसांमधे आला व नंतर पसरत राहिला.हा विषाणू कोणत्या प्रयोगशाळेत तयार केला नाही तो निसर्गतःच तयार झाला आहे.

प्रश्न 4. हा विषाणू कोणत्या-कोणत्या प्रदेशात पसरु शकतो ?

उत्तर = ज्या ज्या प्रदेशात लोक रहातात अश्या सर्वच ठिकानी हा विषाणू पसरू शकतो. थंड असो अथवा उष्ण (भारतात सुद्धा).

प्रश्न 5. भारतातील उन्हाळ्यात हा विषाणू जिवंत राहील का?

उत्तर = या विषाणूला मारण्यासाठी 55° C पेक्षा जास्त तापमान लागते. भारतातील आत्तापर्यंतचे कमाल तापमान 51°C (फालोडी,राजस्थान-2016) आहे.म्हणून अफवांवर विश्वास ठेऊ नका. उलट हवेची आर्द्रता(Humidity) कमी झाल्यामुळे हा वेगाने संक्रमित होवू शकतो.

प्रश्न 6. हा आजार कोणत्या व्यक्तींना होवू शकतो?

उत्तर = सर्वच. पण विशेषतः लहान मुलांना (10 वर्षाच्या आतील) व वयस्क व्यक्तींना (60 वर्षाच्या वरील) होण्याची शक्यता जास्त आहे. आणि जे व्यक्ति अगोदरच आजारी आहेत अश्यांनी विशेष काळजी घ्यावी. तुम्ही तरुण व ताकदवान असलात तरीही याची बाधा तुम्हाला होऊ शकते आणि तुम्ही तो घरात पसरवू शकता.

प्रश्न 7. दारु पिणाऱ्या लोकांना हा आजार होत नाही का?

उत्तर = दारूने (Ethyl alcohol/Isopropyl alcohol) हा विषाणू मरतो पण जर ती 70% असेल तर. पण पिण्याची दारू ही 8 ते 40 % असते, त्यामुळे ही अफवा देखील चुकीची आहे.उलट दारू पिनाऱ्यांची रोगपरतिकारकशक्ती कमी होते आणि ते सहज आजारी पडू शकतात.

प्रश्न 8. मांसाहार करणार्‍या व्यक्तींना हा आजार होतो का?

उत्तर = जर जेवण करण्यापुर्वी हात साबणाने स्वच्छ धुतले आणि मांस अथवा अंडी स्वच्छ धुऊन व्यवस्थित उकडून घेतले तर हा विषाणू मरतो. (पण किमान 15 दिवस मांसाहार टाळलेला बरा)

प्रश्न 9. या आजाराची लक्षणे काय आहेत?

उत्तर = 1. ताप
2. सर्दी
3. श्वास घेताना अडचण होणे
4. थकवा
5. कोरडा खोकला

प्रश्न 10. लक्षण दिसण्यास किती दिवस लागतात?

उत्तर = 2 ते 16 दिवस. पण काही जणांमधे तर लक्षणच दिसत नाहित(Asymptomatic Patients). त्यामुळेच तर हा आजार इतका विचित्र आहे, कोणाला झाला आहे हे सांगणे फारच कठीण आहे. त्या व्यक्तीची चाचणी केल्याशिवाय काहीच सांगता येत नाही. अगदी आपल्यासोबत असलेल्या व्यक्तीला देखील याची लागण झालेली असू शकते.लक्षण दिसण्या अगोदरच तो व्यक्ती व्हायरस पसरवतो(Carrier). म्हणुन तर वैज्ञानिक सांगत आहेत की एकमेकांपासून दुर रहा.

प्रश्न 11. माझ्यात जर लक्षणे जाणवली तर ?

उत्तर = काळजी करू नका. अगोदर डॉक्टर ला कळवा आणि त्यांचा सल्ला घ्या,तुमच्या प्रकृतीनुसार ते टेस्ट करायची की नाही हे ठरवतील.

प्रश्न 12. हा आजार कसा पसरतो?

उत्तर = जो व्यक्ती आजारी आहे अश्या व्यक्ती जवळ गेल्यास, त्याने बोलल्यास, खोकल्यास,शिंकल्यास त्यातून बाहेर पडणार्‍या द्रवबिंदू (droplet) मधून पसरतो. नवीन अभ्यासातून स्पष्ट झाले आहे की कोरोणा ग्रस्त व्यक्ती त्याच्या बोलण्यातून देखील (aerosol) हा विषाणू पसरवू शकतो.

प्रश्न 13. कारोणा बाधित व्यक्ती किती लोकांना बाधित करू शकतो?

उत्तर = या आजाराचा प्रजनन क्रमांक (Reproduction Number R0) हा 2.7 आहे म्हणजे एक बाधित व्यक्ती इतर 2 ते 3 जणांना बाधित करू शकतो.

प्रश्न. 14. कोरोना झाल्यास व्यक्ती मरतो का?

उत्तर = जर चिंता नाही केली आणि वेळेवर औषध घेतले तर हा आजार 100 % बरा होतो. असे खूप उदाहरण आहेत ज्यात खूप लोक बरे(recover) होताना दिसत आहेत.

प्रश्न 15. हा विषाणू किती वेळ जिवंत राहतो?

उत्तर = या विषाणूचा जीवनकाळ खालील प्रमाणे आहे
1. हवा = 3 तास
2. तांबे = 4 तास
3. कागद (नोटा,वह्या,पुस्तक) = 1 दिवस
4. स्टील = 2 ते 3 दिवस
5. प्लास्टिक(मोबाईल,कॉम्प्युटर,पेन,कीबोर्ड)=3ते4 दिवस

प्रश्न 16. या आजारावर कोणते औषध किंवा लस नाही का?

उत्तर. सध्यातरी कोणतीच लस(Vaccine) उपलब्ध नाही.लस तयार होण्यास व उपलब्ध होण्यास किमान एक ते दीड वर्ष लागू शकतात. हा विषाणू स्वतःचा आकार बदलू शकतो(Mutation) म्हणून लस शोधणे अवघड आणि किचकट काम आहे. आणि आत्तापर्यंत तरी कोणतेच औषध यावर नाही.

प्रश्न 17. गोमूत्र,लसूण,काळी मिरची,लवंग काम करते का ?

उत्तर. वरील वस्तू या आरोग्यासाठी हितकर असतात.पण यापैकी कोणतीच वस्तू कोरोना विषाणूला मारत नाही. यावर कोणतेच संशोधन झाले नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका.

प्रश्न 18.Social Distancing म्हणजे काय?याचा काय उपयोग ?

उत्तर = Social distancing (सामाजिक अंतरता) म्हणजे एकमेकांपासून किमान 5 ते 6 फूट अंतरावर राहणे जेणेकरून आपण आजारी व्यक्तींच्या संपर्कात येणार नाहीत आणि आपण जर आजारी असलात तर इतरांना संक्रमित करणार नाहीत.
जर असे आपण किमान 2 ते 3 हफ्ते केलात(जे इटलीने किंवा चीनने केले नाही) तर आपण रुग्णांची संख्या कमी करू शकतो(Flattening the curve) व आपल्या दवाखान्यातील क्षमता अगोदरच कमी आहे त्यामुळे वैद्यकीय व्यवस्था देखील सुरळीत राहील.

प्रश्न 19. मी कसे सुरक्षित राहू ? प्रतिबंध काय ?

उत्तर. = तुम्ही सुरक्षित राहण्यासाठी खालील प्रतिबंध करू शकता

1.वारंवार हात धुणे.(किमान 30 सेकंद) दर 2 ते 3 तास.
बाहेरून आल्यास सर्वात अगोदर हात-पाय धुवा.
2.तोंडाला,नाकाला,डोळ्याला न धुतलेले हात न लावणे
3.गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.

  1. अनोळखी व्यक्तिंपासून सुरक्षित अंतर बाळगा.
  2. खोकलनाऱ्या,शिकणाऱ्या व्यक्तींपासून दुर रहा.
  3. वारंवार वापरातल्या वस्तूंना स्वच्छ पुसून घ्या.

प्रश्न 20. हात कश्याने व कसे धुवावेत ?

उत्तर = हात साबणाने किंवा हॅण्डवॉशने स्वच्छ धुवावेत. किमान 30 सेकंद तरी हात धुवावेत (100 % रोगाणू मरतात).हात धुण्याची वैज्ञानिक पद्धत खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.https://youtu.be/IisgnbMfKvI

प्रश्न 21. फेस मास्क वापरावेत का ?

उत्तर = योग्य पद्धतीने वापरले तर काहीच हरकत नाही. पण नाक किंवा तोंड कुठून उघडे आहे का ? याची काळजी घ्यावी. रुमाल देखील चालतो पण तो रोज किमान दोनदा धुवा.

प्रश्न 22. प्रवास करावा की नाही ?

उत्तर = नाही अजिबात नाही…………कितीही अडचण असेल (दवाखाना व्यतिरिक्त) तरी प्रवास टाळा. आपण स्वतः तर बळी पडताल आणि सोबत इतरांना देखील घेऊन जाताल.

प्रश्न 23. जनता कर्फ्यु ने खरंच कोरोना व्हायरस मरेल का ?

उत्तर = काही प्रमाणात. पण जेंव्हा लोकं एकत्र येतील तेंव्हा हा पुन्हा वाढेल म्हणून आपले सर्वच कामे (जिवापेक्षा कमीच महत्वाची) टाळावी.उगाच मला काही होणार नाही म्हणून बाहेर पडून इतरांचा जीव धोक्यात घालू नका. कृपा करून सरकारला त्यांचे काम करुद्या.

प्रश्न 24. खरा कर्फ्यु लागण्याच्या अगोदर सर्व आवश्यक वस्तू जमा कराव्यात का ?

उत्तर = नाही. कितीही झाले तरी आवश्यक दुकानं बंद होणार नाहीत(उदा. किराणा,मेडिकल,दवाखाना).म्हणून उगीच घाई करू नका आणि वस्तूंची जमवा जमवी करू नये.

 लक्षात ठेवा : प्रतिबंध हाच उपाय