Showing posts with label Fishery Work. Show all posts
Showing posts with label Fishery Work. Show all posts

Wednesday, August 5, 2020

पालघर जिल्ह्यातील २८१ बोटींना समुद्रात मुसळधार पावसाचा तडाखा


१ ऑगस्ट पासून मासेमारी हंगाम सुरू झाले असून पालघर जिल्ह्यातील २८१ बोटी मासेमारीसाठी रवाना झाल्या आहेत. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणपट्टी व समुद्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला असून, या बोटीना खराब हवामानाला तोंड द्यावे लागत आहे. यापैकी अधिकतर बोटी परतण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली आहे.

सातपाटी मुरबे येथील २३८, वसई तालुक्यातील ३७ व डहाणू तालुक्‍यातील सहा बोटी १  व २ ऑगस्ट रोजी मासेमारीसाठी रवाना झाल्या होत्या.

हवामान विभागाकडून खराब हवामानाविषयी किंवा मुसळधार पावसाविषयी कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना मिळाली नसल्याने या बोटीना सुचित केल्या गेले नव्हते. सद्यस्थितीत या बोटी खराब हवामान व मुसळधार पावसाला तोंड देत आहेत. मात्र, कुठल्याही बोटीला धोका नसल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाची माहितीी सहाय्यक आयुक्त अजिंक्य पाटील यांनी दिली. या सर्व बोटी सुखरूप असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील ५० ते ६० मासेमारी बोटी किनाऱ्यावर परतल्या असून, इतर बोटी परतण्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांना करून देण्यात येत आहे.

Sunday, April 5, 2020

खलाशी सुमारे सतराशे गुजरातमध्ये अडकले

 
  सध्याच्या  घडीला गुजरातमध्ये महाराष्ट्रामधील  पालघर जिल्ह्यातील  तलासरी, डहाणु तालुक्यातील  सतराशे खलाशी  अडकले आहेत . काही खलाशी  उंबरगाव खाडीवर येऊन थांबले  असताना स्थानिक लोकांनी खलाशीना उतरू दिले  नाही. 
      तेथील  प्रशासनाने  वैद्यकीय अधिका-याकडून सुमारे 400 खलाशी तपासले; पण गुजरात प्रशासनाने  खलाशीना क्वारंटाइन न करता  घरी  जाण्यास सोडू दिले. केंद्र सरकाराकडून सूचना  दिले होत्या  कि क्वारंटाइन केल्याशीवाय  सोडायचं  नाही  असा आदेश  होता ; पण  गुजरात प्रशासनाने त्या  सूचनाकडे  दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्र सरकार व जनता खेद  व्यक्त  करीत आहे .

Friday, April 3, 2020

मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या पाठपुराव्याला यश


लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छिमारांसाठी विशेष पॅकेज देण्याचे केंद्र शासनाच्या विचाराधीन असून या संदर्भात राज्याकडून माहिती मागविली आहे. केंद्राने याबाबत राज्याच्या मत्स्यविभागाला पत्र लिहून झालेल्या नुकसानीची माहिती मागवली आहे. 


मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी सांगितलेलॉकडाऊनमुळे अन्य व्यवसायांबरोबरच मत्स्यव्यवसायालाही फार मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. केंद्राने मच्छिमारांना विशेष पॅकेज घोषित करावे ह्यासाठी राज्य शासनाच्या वतीने  सातत्याने पाठपुरावा केला जात होता. त्यानंतर केंद्र शासनाने राज्याकडून मच्छिमारांच्या नुकसानीची माहिती मागविली आहे. त्यानुसार राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाला त्याची पूर्तता करण्याचे निर्देश दिले आहेत. 

केंद्राचे पत्र प्राप्त झाल्यानंतर राज्याच्या मत्स्यविभागानेही सर्व जिल्ह्यांच्या सहायक मत्स्य आयुक्तांना पत्र पाठवून मच्छिमार संस्थांकडून केंद्र शासनाने सांगितलेल्या नमुन्यात माहिती मागवायला सुरुवात केली आहे.