Tuesday, September 28, 2021

गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अतिमुसळधार पावसाची शक्यता


 
नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ  यांचे आवाहन

पालघर दि. २८  : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सुचनेनुसार बंगालच्या समुद्रात वादळ (गुलाब चक्रीवादळ)  निर्माण झाल्याने दिनांक १ ऑक्टोबर २०२१ पर्यत  कोकण किनापट्टीलगतच्या जिल्हयातील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने  जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ  यांनी केले आहे.

याकाळात झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, पाणी साचणे, विजेचे खांब कोसळणे, पुरात वाहून जाणे, विज पडून मृत्यु, जनावरे वीज पडून, पाण्यात बुडन मयत होणे,  अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. तसेच संबंधित गावातील तलाठी यांना घडलेल्या घटनेचा वृतांत तात्काळ कळविणे, व तालूका नियंत्रण कक्षात फोन करणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात 8237978873 या क्रमांकावर संपर्क साधण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी केल्या.

तालुका नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक खालील प्रमाणे आहेत. 

Dahanu 9607744258
Vikamgad 8806898565
Jawhar 8552918405
Mokshada 8446335908
Wada 02526271431
Talasari 02521220036
Vasai 02502322007
Palghar 02525254930

Monday, September 27, 2021

प्राकृतिक वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा!

काळोख रात्र असावी, गगनात ढगाळ असताना काजवे इकडे तिकडे उडत असावे. काळोख कमी होताना व ढगाळ कमी होत असताना सूर्याची किरणे ढगांच्या बाजूला निघत होती. प्रकाशाची किरणे हिरवेगार रानांवर व झाडांवर पडत होता.  पाखऱयांचा चिवचिव असताना, प्रफुल्लित फुलपाखरं इकडे-तिकडे असताना आणि बागेत टवटवीत फुल्यांचा फुलले असताना माझ्या परिवारात वेगळेच आनंद झाला असावा. दि. २७ सप्टेंबर या दिवशी माझा जन्म झाला.  माझ्या आई-वडिलांना फार आनंद झाला असावा. माझ्या परिवारातील आजी-आजोबा  व इतर मंडळी फारच आनंद झालं असावे. पाहा ना आज! नैसर्गिक दुर्देवी आहे.  त्याचा जो आनंद होता, तो आज आनंद नाही आणि ते ही नाही दुर्भाग्यच? आईवडिलांची देणकी आहे की मी आहे आज. कैशालवाशी पूज्य आई-वडील यांच्या आर्शिवादाने आज माझा " जन्मदिवस" आहे. सर्व काही आज माझ्याकडे आहे आईवडिलांची देणं! जे काही घडलो आहे ते समाजामुळं. जे लिहलं गेलं वाढदिवसाच्या निमित्त ते काही एवढं मोठं नाही. प्राकृतिक वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा!

Friday, September 17, 2021

इ श्रम कार्ड महानोंदणी असंघटित कामगारांची

सरकारने असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी यासाठी या कामगारांची नोंदणी करण्याचे ठरविले आहे. 
त्यासाठी दिनांक २६ ऑगस्ट २०२१ पासून देशातील असंघटित कामगार नोंदणीचा *"महामहोत्सव"* सुरु झाला आहे. 
असंघटित कामगार म्हणजे कोण आहेत ?
१. लहान आणि सीमांत शेतकरी / शेतमजूर
२. पशुपालन करणारे
३. विडी कामगार 
४. बांधकाम कामगार
५. सेंट्रिंग कामगार
६. लेदर कामगार 
७. सुतार
८. वीटभट्टीवर काम करणारे 
९. न्हावी
१०. घरगुती कामगार 
११. भाजीपाला विक्रेते
१२. फळ विक्रेते 
१३.वृत्तपत्र विक्रेते
१४. हातगाडी ओढणारे 
१५. ऑटो रिक्षा चालक
१६. घरकाम करणारे कामगार 
१७. आशा कामगार
१८. दूध उत्पादक शेतकरी
19. सामान्य सेवा केंदरचालक
20. स्थलांतरित कामगार
यासारखे असे अनेक लोक आहेत  त्यांची शासनाकडे नोंद नाही. त्यामुळे आपत्ती आली असता. किंवा काही नुकसान झाले असता त्यांच्यासाठी शासन काहीही करू शकत नाही म्हणून शासन या नोंदणीच्या माध्यमातून अशा लोकांना एक UAN  (एक विशिष्ट नंबर ) देणार आहे. आणि त्याचे इ श्रम (E  SHRAM ) कार्ड (आधार कार्ड सारखे कार्ड ) देणार आहे.ज्यामुळे त्या लोकांना एक ओळख मिळणार असून शासनाचे अनेक लाभ मिळण्यास सोपे होणार आहे. 
*इ श्रम नोंदणी साठी निकष* 
१. ती व्यक्ती १८ ते ५९ वय असणारी असावी 
२. ती व्यक्ती इनकम टॅक्स भरणारी नसावी 
३. ती व्यक्ती EPFO  व ESIC ची सदस्य नसावी 
४. वरील कामगार श्रेत्रात काम करणारी असावी 
*इ श्रम नोंदणी साठी  लागणारी कागदपत्रे* 
१. आधार कार्ड 
२. मोबाइल नंबर 
३. बँक पासबुक 

* *असंघटीक कामगारांना हक्क मिळवून देणाऱ्या योजनेचा प्रारंभ .....**

Monday, September 13, 2021

e-Shram Card पोर्टल म्हणजे नेमके काय?, कामगारांना कसा फायदा होणार?

भारत सरकारने देशवासियांसाठी e-Shram नामक नवीन पोर्टल सुरु केले आहे. हे पोर्टल एक राष्ट्रीय डेटाबेस असून ते कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत मोदी सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे . e-Shram पोर्टलचे लक्ष्य ३८,००,००० पेक्षा जास्त कामगारांना जोडण्याचे आहे. या लोकांना ई-श्रम कार्ड उपलब्ध करून दिले जातील.

असंघटित क्षेत्राला ई-श्रमचा काय फायदा मिळणार ?

असंघटित क्षेत्राचा एक मोठा डेटाबेस तयार करण्याव्यतिरिक्त, ई-श्रम मजुरांसाठी सामाजिक सुरक्षा योजना आणण्याचे उद्दिष्ट ठेवेल. यासह, असंघटित आणि १६-५९ वयोगटातील कोणताही कामगार ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करू शकेल. या पोर्टलचा उद्देश सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि त्यांचे बँक खाते लिंक करणे आहे.


ई-श्रम पोर्टल: आवश्यक कागदपत्रे

नवीन ई-श्रम पोर्टल केवळ असंघटित क्षेत्रासाठी आहे ज्याद्वारे ते सरकारी लाभांचा दावा करण्यासाठी सादर केले गेले आहे. या पोर्टलवर नोंदणी करणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला फक्त काही कागदपत्रांची आवश्यकता असेल. सर्व प्रथम, तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर लागेल. जर कामगाराकडे आधार कार्ड नसेल तर तो त्याच्या जवळच्या CSC ला भेट देऊ शकतो आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे नोंदणी करू शकतो.


ई-श्रम पोर्टल: नोंदणी कशी करावी ?

सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईट eshram.gov.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला रजिस्टर ऑन ई-श्रम बटणावर क्लिक करावे लागेल. यानंतर एक नवीन पेज उघडेल ज्यात तुम्हाला तुमचा आधार लिंक केलेला मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि तुमच्या फोनवर OTP येईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमची नोंदणी पूर्ण होईल. नवीन ई-श्रम पोर्टलसाठी, असंघटित कामगारांसाठी चांगले इंटरनेट कनेक्शन असणे अत्यंत महत्वाचे आहे. 

प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी फोनची आवश्यकता असेल. नवीन ई-श्रम पोर्टल नोंदणीकृत आणि जवळच्या सीएससीवर सेटअप केले जाऊ शकते. तसेच, कामगारांचा आधार क्रमांक CSC मध्ये बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे सेटअप केला जाऊ शकतो. हे पूर्णपणे विनामूल्य असून कोणीही सरकारी फायद्यासाठी नोंदणी करू शकतो. मात्र, त्यांचे वय १६ ते ५९ दरम्यान असावे. तसेच, ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी त्याला आयकर भरणा करण्याची गरज नाही


ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणी करण्यास मुदतवाढ, शेतकऱ्यांना पीक पाहणी नोंदवण्याचं शासनाचं आवाहन

महाराष्ट्र शासनाच्या महसूल प्रशासनाकडून शेतकरी स्तरावरील पीक पाहणी ‌अ‌ॅपचा नोंदणी करावी यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, तलाठी स्तरावरील पीक पाहणी नोंदवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारनं यावर्षी ई-पीक पाहणी अ‌ॅप सुरु केलं आहे महसूल विभाग आणि कृषी विभागाच्यावतीनं ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे. माझी शेती, माझा सातबारा, माझा पीक पेरा या घोषवाक्याचा आधारे शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी करण्याची सुरुवात 15 ऑगस्टला झाली होती. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पीक पाहणी अ‌ॅपला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. तर काही ठिकाणी अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल प्रशासनाकडून शेतकरी स्तरावरील पीक पाहणी ‌अ‌ॅपचा नोंदणी करावी यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, तलाठी स्तरावरील पीक पाहणी नोंदवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पीक पाहणी अ‌ॅपच्या वापरासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी लागत आहे.

ई पीक पाहणी नोंदवण्यास मुदतवाढ

ई पीक पाहणी अ‌ॅपद्वारे नोंदवण्यास शेतकऱ्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. पीक पाहणी अ‌ॅपमधून नोंदणीची मुदत 15 सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती. मात्र, आता सातबारा उताऱ्यावर ऑनलाईन पद्धतीने खरीप हंगामातील पिकाच्या नोंदणीला 15 दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकरी त्यांच्या स्तरावर पीक पाहणी 30 सप्टेंबरपर्यंत करु शकतात. तर, तलाठी स्तरावरील पीक पाहणी नोंदवण्याची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती ई-पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली आहे.



उत्तर कोकणात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता