Monday, February 27, 2023

महाराष्ट्र शासनाची बाल संगोपन योजना

शासनाची बाल संगोपन योजना
दर महा 2250 /= रु

ज्या मुलांना आई किंवा वडील नसतील व  ज्या मुलांना आई व वडील दोन्ही ही नसतील अशा बालकांना या  योजनेचा  लाभ मिळतो . 

० ते १८ वयोगटातील बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळतो. एका कुटुंबातील दोन किंवा जास्त मुलांना ही लाभ दिला जातो.
किती रक्कम मिळते ?
एका मुलांसाठी 2250 रु  प्रतिमहिना( एका वर्षाला 27000/- रु मिळतात .) वय १८ पुर्ण होई पर्यत दर महिन्याला  रक्कम मिळते.
कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
 १) योजने साठी करावयाचा अर्ज व अर्जा सोबत       
२) आधार कार्ड च्या झेराँक्स पालकांचे व बालकांचे
३) मुलांचे शाळेचे बोनाफाईड सर्टफिकेट
४) तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला.
५) पालकांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र .(मृत्युचा दाखला)
६) पालकाचा रहिवासी दाखला. 
(ग्रामपंचायत /नगरपालिका यांचा)
७) मुलांचे बॅक पासबुक झेराँक्स.
८) मृत्यूचा अहवाल - ( कोविड ने जर मृत्यु झाला असेल तर मृत्युचा अहवाल)
९) रेशन कार्ड झेराँक्स .
१०) घरा समोर पालका सोबत बालकांचा फोटो. ४ बाय ६ फोटो पोस्ट कार्ड  मापाचा फोटो ( प्रत्येक मुलासोबत पालकाचा शेफरेट फोटो )
१०) मुलांचे पासपोर्ट फोटो 2
११) पालकाचे पासपोर्ट फोटो 
सदर सर्व कागद पत्रांची पुर्तता करुन अर्ज करता येतो .
ही योजना मंजूर कोण करते ?

हा अर्ज मंजूर करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी बाल कल्याण समितीकडे सादर केला जातो व ती समिती अर्ज मंजुर करते.

जिल्हा परिषद शाळेत व  महाविदयालय शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला बोनाफाईट आत्ताच शाळेतून काढून ठेवावा .

या योजनेचा लाभ घ्या व १८ वर्षापर्यंत बालकांच्या शिक्षणाच्या खर्चा साठी  चिंता मुक्त व्हा.
 
========================================================================

सदर योजना अनेक वर्षा पासुन चालु आहे .पण अनेक पालकांना   ही योजना माहीत नाही.
म्हणुन  अनेक निराधार ,गरजु बालकांना या योजनेचा लाभ घेता येईल.
========================================================================
 
बाल संगोपन योजनेची माहीतीसाठी ,फार्म जमा करण्याठी 
                                                                          तालुका पंचायत समिती ऑफिस मध्ये
बाल संरक्षण अधिकारी यांना भेटावे.

            किंवा


जिल्ह्या च्या ठिकाणी

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय या  ठिकाणी भेटावे .

आम्ही या योजनेची जास्तीत जास्त माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. अद्याप तुम्हाला काही गोष्टींची माहिती हवी असेल किंवा काही प्रश्न असतील, तर तुम्ही खाली दिलेला शासन निर्णय GR आणि संपर्क याद्वारे तुमच्या प्रश्नांचे निरसन करू शकता.  


Tuesday, February 21, 2023

वैयक्तिक लाभाच्या योजना

वैयक्तिक लाभाच्या योजना - इतर वैयत्त्किक लाभाच्या योजना - केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना 
 केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना 
1) केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना 
 2) विशेष केंद्रीय सहाय्य योजना 
 3) आदिम जमातीचे संरक्षण तथा विकासाच्या योजना 
 4) भारतीय संविधानाचे अनुच्छेद २७५ (१) अंतर्गत योजना 
 5) आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजना 
 6) श्रेणी 3 व 4 ची बालके रुग्णालयात उपचार घेत असतांना रुग्णाला व त्यांच्या पालकास आहार व बुडित मजुरीपोटी मजुरी देणे 
 7) प्रादेशिक पातळीवर विधी सल्लागार केंद्र योजनेचे स्वरूप ज्या योजना 
आदिवासी विकास किंवा कल्याणाच्या दृष्टीने स्थलकालानुरूप आवश्यक आहेत आणि त्या योजनांचा समावेश अर्थसंकल्पात किंवा केंद्रीय निधीतून राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये नाही अशा अभिनव स्वरूपाच्या स्थानिक महत्त्वाच्या योजना, तांत्रिक औपचारिकतेमुळे दीर्घ कालावधीकरिता अडकून न पडता स्थानिक पातळीवर तातडीने आणि प्रभावीपणे कार्यान्वित करून त्यांचा लाभ गरजू आदिवासींना प्रत्यक्ष मिळवून देणे हा योजनेचा गाभा आहे. केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेचा मूळ उद्देश लक्षात घेऊन खालीलप्रमाणे 3 गट पाडण्यात आले आहेत. 

अ) उत्पन्न निर्मितीच्या किंवा उत्पन्न वाढीच्या योजना 
ब) कौशल्य विकास कार्यक्रम/ प्रशिक्षणाच्या योजना 
क) मानव साधन संपत्ती विकासाच्या व आदिवासी कल्याणात्मक योजना 

वरील गटांतर्गत खालीलप्रमाणे बाबी अंतर्भूत आहेत- 
अ) उत्पन्न निर्मितीच्या किंवा उत्पन्न वाढीच्या योजना 
• सर्वसाधारण: लाभार्थ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेती वा तत्सम व्यवसायाशी संबंधित योजना उदा. सिंचन, काटेरी तार, ताडपत्री इ. 
• जंगलात वाहणाऱ्या उपनदीवर सिमेंट बंधारा व लघुसिंचन उपसा योजना तसेच शेतमाल व गौण वन उपज प्रक्रिया उद्योगाचा या गटात समावेश राहील. 
• महिला बचत गट, संयुक्त वन व्यवस्थापन समितीद्वारे मोह, डिंक, तेंदू, हिरडा, बेहडा, मध इत्यादींचे संकलन करणे, सुरक्षित साठवणीसाठी गाव पातळीवर गोदाम बांधणे आणि प्रक्रिया करणेचे यंत्र खरेदी करणे. 
• स्वत:च्या शेत जमिनीवर चारा-कुरणे लावणे. 
• बांधावर उत्पन्न देणाऱ्या वृक्षांची लागवड करणे. (बांबू, चिंच, साग, मोह, हिरडा, बेहडा, खैर इत्यादी) 
• कोणत्या भागात कोणत्या व्यवसायास वाव आहे याचा विचार करणेसाठी जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक व आदिवासी विकास निरीक्षक यांची मदत घेवून सदरची माहिती तयार करून त्याप्रमाणे व्यवसायास सहाय्य करता येते. 
• आदिवासी युवक/युवती/महिला/पुरुष यांचे बचत गट/स्वयंरोजगार संस्था यांना स्वयंरोजगारासाठी योजना प्रस्तावित करता येतात. 
• ज्या योजनांचा समावेश अर्थसंकल्पात किंवा केंद्र शासनाच्या निधीतून राबविल्या जाणाऱ्या योजना / नियमित योजनांमध्ये आहे, अशा योजना या गटात घेता येत नाही. 

ब) कौशल्य विकास कार्यक्रम/प्रशिक्षणाच्या योजना 
• रोजगार/स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण - आदिवासी उमेदवारांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी वा रोजगार/नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक पात्रता विकसन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतात. सदर प्रशिक्षण कार्यक्रम सर्वसाधारणपणे खालील शिर्षाखाली राबविण्यात येतात - 
1. उत्पादन प्रक्रिया 
2. टेक्सटाईल्स 
3. ॲग्रोप्रोसेसिंग 
4. ऑटोमोबाईल्स 
5. रिटेल मार्केटिंग 
6. माहिती तंत्रज्ञान (आय.टी.) 
7. हॉस्पिटॅलिटी 
8. मनुष्यबळ विकास 
9. आरोग्य संवर्धन 
10. ग्रामसेभेला संयुक्त वन व्यवस्थापन समितीद्वारे सूक्ष्म नियोजनाचे प्रशिक्षण देणे, तसेच स्वयंसेवी संस्थेमार्फत ग्राम विकास, वनसंवर्धन लघु वनउपज संवर्धन, वन व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण देणे. गाव पातळीवर सुक्ष्म आराखडा तयार करण्याकरिता तांत्रिक मनुष्यबळ, ग्रामसभा/संयुक्त वन व्यवस्थापन समितीने उपलब्ध करणे. 
11. रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या योजना देखील या विभागामार्फत न्युक्लिअस बजेट अंतर्गत राबविण्यात येतात.
 • पात्रता विकसन (संभाव्य नोकरी व्यवसायासाठी) - 
1. एमएससीआयटी, सीसीसी, टंकलेखन, लघुलेखन, इत्यादी सेवापूर्ती नियमित अर्हतेची पूर्तता करणारे प्रशिक्षण इत्यादी 
2. उच्च शिक्षणासाठी होणाऱ्या पूर्व परीक्षा प्रशिक्षण 
3. वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा प्रशिक्षण 
4. बीएड प्रवेश परीक्षा प्रशिक्षण 
5. एमबीए व तत्सम पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा 
6. परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा 
7. नेटसेट प्रवेश परीक्षा 
8. वेळोवेळी शासन निश्चित करेल त्या प्रवेश परीक्षा 
नोकर भरती स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण - 
1. जिल्हा निवड समिती व स्थानिक नोकर भरती स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण 
2. स्टाफ सिलेक्शन कमिशन स्पर्धा परीक्षा 
3. रेल्वे रिक्रुटमेंट 
4. बँकिंग स‍र्व्हिस रिक्रुटमेंट 
5. महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा 
6. केंद्रीय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा 
क) मानव साधन संपत्ती विकासाच्या व आदिवासी कल्याणात्मक योजना 
• क्रीडा, कला साहित्य संस्कृती संवर्धन उपक्रम 
• गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकास, आदिवासींच्या सर्वांगीण विकास, महिला सक्षमीकरण, व्यवस्थापन कौशल्य इत्यादी दृष्टीकोन ठेऊन विकासात्मक उपक्रम 
• क्रीडास्पर्धा आयोजन, आदिवासींच्या पारंपरीक कलाकृतीचे प्रदर्शन, नृत्यकलेचे जतन व संवर्धन उपक्रम, आदिवासी उमेदवारांना राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता विकसन प्रशिक्षण, अशा प्रशिक्षणाच्या प्रशिक्षकांचे मानधन, युवा मंडळ/महिला मंडळ यांचे रचनात्मक उपक्रमांना सहाय्य अशा संकल्पनेत येणारे उपक्रम.
 • आदिवासी क्षेत्रातील व समाज उत्थानासाठी आवश्यक असलेले उपक्रम. तसेच या क्षेत्राच्या व समाजाच्या समस्यांवर आधारित व्यक्तींचे सामुहिक लाभाचे उपक्रम (उदा. घराचे विद्युतीकरण, गवती छपरावर कौले टाकणे, भजनी साहित्य, ग्रामपंचायती सामुहिक कार्यक्रमासाठी भांडी पुरवठा करणे, महिला बचत गटास स्वयंपाकासाठी भांडी पुरविणे, जातीच्या दाखल्यासाठी अर्थसहाय्य इत्यादी).
 • आदिवासींवरील आपात्कालीन किंवा अत्याचार प्रकरणी अपवादात्मक विशेष परिस्थितीत तातडीने सहाय्य देणे. 
 लाभार्थी पात्रता 

1) शेतकऱ्यांसाठी 
• लाभार्थी अनुसूचित जमाती संवर्गातील असावा 
• विधवा/परित्यक्ता महिला व दारिद्रयरेषेखालील तसेच आदिम जमातीच्या लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल
 • लाभार्थ्याच्या नावे शेती असल्याचे 7/12 असावा
• लाभार्थी हा प्रकल्पातील असावा 

2) युवकांसाठी
1. लाभार्थी अनुसूचित जमाती संवर्गातील असावा
 2. विधवा/परित्यक्ता महिला व दारिद्रयरेषेखालील तसेच आदिम जमातीच्या लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल 
3. लाभार्थी हा प्रकल्पातील असावा 
4. प्रशिक्षणार्थींची शैक्षणिक पात्रता योजनेनूसार राहील 
3) महिलांसाठी 
1. लाभार्थी अनुसूचित जमाती संवर्गातील असावा 
2. विधवा/परित्यक्ता महिला व दारिद्रयरेषेखालील तसेच आदिम जमातीच्या लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल 3. लाभार्थी हा प्रकल्पातील असावा
 4. प्रशिक्षणार्थींची शैक्षणिक पात्रता योजनेनूसार असावी 


4) वैयक्तिक लाभाच्या योजना 

1.लाभार्थी अनुसूचित जमाती संवर्गातील असावा
 2. विधवा/परित्यक्ता महिला व दारिद्रयरेषेखालील तसेच आदिम जमातीच्या लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल
3. लाभार्थ्याच्या नावे शेती असल्याचे 7/12 असावा 
4. बेरोजगार असल्याचा करारनामा 
5. गटाची नोंदणी असल्याचा पुरावा 
6. ग्रामसभेचा ठराव 
7. गटातील सदस्य अनुसूचित जमातीचे असावे आवश्यक कागदपत्रे 
अ) उत्पन्न निर्मितीच्या किंवा वाढीच्या योजना 
• शेती नावे असल्याचा 7/12 
• रहिवासीचे प्रमाणपत्र 
• सन 2002-07 च्या सर्वेनुसार ग्रामसेवक यांचा दारिद्रय रेषेचा दाखला 
• उत्पन्नाचा दाखला 
• रेशन कार्ड ची प्रत 
• पाणी परवाना दाखला 
• अपंग असल्यास अपंग असल्याचा दाखला 
• सदर योजना मिळण्याबाबतचा ग्रामसेभेचा ठराव 
• शाळा सोडल्याचा दाखला/आधार कार्ड/वयाचा दाखला/निवडणूक ओळखपत्र 
ब) प्रशिक्षणाच्या योजना 
• प्रशिक्षणार्थीची शैक्षणिक पात्रता किमान 12 वी उत्तीर्ण असावा 
• रहिवासीचे प्रमाणपत्र 
• सन 2002-07 च्या सर्वेनूसार ग्रामसेवक यांचा दारिद्रय रेषेचा दाखला 
• उत्पन्नाचा दाखला 
• रेशन कार्ड ची प्रत 
• अपंग असल्यास अपंग असल्याचा दाखला 
• शाळा सोडल्याचा दाखला/आधार कार्ड/वयाचा दाखला/निवडणूक ओळखपत्र


केंद्रवर्ती अर्थसंकल्प ( न्यूक्लियस बजेट योजना ) योजना


शासन निर्णय क्र. न्युबयो-२0११ / प्र.क्र. ८७ / का. ७ दि. २१/६/२0१३ अन्वये सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. प्रस्तुत योजना प्रामुख्याने आदिवासी व्यक्‍ती व कुटंब केंद्रबिंदू मानुन त्यांचे जीवनमान उंचविण्याच्या दृष्टीने निर्माण करण्यात आलेली आहे.
प्रस्तुत योजना प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ह्यांचे मार्फत आणि अपर आयुक्‍त, आदिवासी विकास यांचे नियंत्रणाखाली राबविण्यात येत आहे.
ज्या योजना आदिवासी विकास किंवा कल्याणाच्या दृष्टीने स्थलकालानुरूप आवश्यक आहेत आणि त्या योजनांचा समावेश अर्थसंकल्पात नाही अशा अभिनव स्वरूपाच्या स्थानिक महत्वाच्या योजना, तांत्रिक औपचारिकतेमुळे दीर्घ कालावधीकरीता अडकून न पडता स्थानिक पातळीवर तातडीने आणि प्रभावीपणे कार्यान्वित करून त्यांचा लाभ गरजू आदिवासींना प्रत्यक्ष मिळवून देणे हा योजनेचा गाभा आहे, तथापि या योजनेमध्ये लाभार्थींना कर्ज देणे अपेक्षित नाही.
या योजनेचा खरा उद्देश लक्षात घेवून या योजनांचे खालील दर्शविल्याप्रमाणे ३ प्रमुख गट पाडण्यात आलेले आहेत.


अ / उत्पन्न निर्मितीच्या किंवा उत्पन्न वाढीच्या योजना
ब॒ / प्रशिक्षणाच्या योजना / कौशल्यविकास कार्यक्रम
क / मानव साधन संपत्ती विकासाच्या व आदिवासी कल्याणात्मक योजना
उक्त नमुद गटातील योजनांना व घटकांना योग्य न्याय मिळावा व योजनेची फलनिष्पती फलद्रुप होणेसाठी आर्थिक वर्षात प्राप्त तरतुदीनुसार '*अ' ५0%, ब २५%, क २५% इतकी आहे.
न्युक्लिअस बजेट योजनेंतर्गत प्रत्येक आदिवासी व्यक्तीस / कुटुंबांस लाभाची आर्थिक मर्यादा रु. ५0,000/- असेल या योजनेंतर्गत २ किंवा ३ किंवा त्यापेक्षा अधिक आदिवासी लाभार्थी एकत्र आले तर सामूहिक प्रकल्प कार्यक्रम सुद्धा मंजुर करता येतील. परंतु अशा प्रकल्पात एकूण कमाल मर्यादा रु. ७,५0,000/- इतकी आहे.
मंजूरीचे वित्तीय अधिकार :
प्रकल्प अधिकारी रु. 0५ लाख
अपर आयुक्‍त रु. २0 लाख
आयुक्‍त आदिवासी विकास रु. ४0 लाख
सचिव, आदिवासी विकास रु. ४0 लाखापेक्षा जास्त

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख: 28/02/2023

योजनेचे सविस्तर माहिती:


Monday, February 20, 2023

Disclaimer

Disclaimer for Tumachi Mahiti

If you require any more information or have any questions about our site's disclaimer, please feel free to contact us by email at bhurkudsandesh@gmail.com. 


Disclaimers for Tumachi Mahiti तुमची माहीती

All the information on this website - https://www.tumachimahiti.co.in/ - is published in good faith and for general information purpose only. Tumachi Mahiti तुमची माहीती does not make any warranties about the completeness, reliability and accuracy of this information. Any action you take upon the information you find on this website (Tumachi Mahiti तुमची माहीती), is strictly at your own risk. Tumachi Mahiti तुमची माहीती will not be liable for any losses and/or damages in connection with the use of our website.

From our website, you can visit other websites by following hyperlinks to such external sites. While we strive to provide only quality links to useful and ethical websites, we have no control over the content and nature of these sites. These links to other websites do not imply a recommendation for all the content found on these sites. Site owners and content may change without notice and may occur before we have the opportunity to remove a link which may have gone 'bad'.

Please be also aware that when you leave our website, other sites may have different privacy policies and terms which are beyond our control. Please be sure to check the Privacy Policies of these sites as well as their "Terms of Service" before engaging in any business or uploading any information.

Consent

By using our website, you hereby consent to our disclaimer and agree to its terms.

Update

Should we update, amend or make any changes to this document, those changes will be prominently posted here.

Friday, February 17, 2023

Privacy Policy

Privacy Policy for Tumachi Mahiti

At Tumachi Mahiti तुमची माहीती, accessible from https://www.tumachimahiti.co.in/, one of our main priorities is the privacy of our visitors. This Privacy Policy document contains types of information that is collected and recorded by Tumachi Mahiti तुमची माहीती and how we use it.

If you have additional questions or require more information about our Privacy Policy, do not hesitate to contact us.

This Privacy Policy applies only to our online activities and is valid for visitors to our website with regards to the information that they shared and/or collect in Tumachi Mahiti तुमची माहीती. This policy is not applicable to any information collected offline or via channels other than this website.

Consent

By using our website, you hereby consent to our Privacy Policy and agree to its terms.

Information we collect

The personal information that you are asked to provide, and the reasons why you are asked to provide it, will be made clear to you at the point we ask you to provide your personal information.

If you contact us directly, we may receive additional information about you such as your name, email address, phone number, the contents of the message and/or attachments you may send us, and any other information you may choose to provide.

When you register for an Account, we may ask for your contact information, including items such as name, company name, address, email address, and telephone number.

How we use your information

We use the information we collect in various ways, including to:

  • Provide, operate, and maintain our website
  • Improve, personalize, and expand our website
  • Understand and analyze how you use our website
  • Develop new products, services, features, and functionality
  • Communicate with you, either directly or through one of our partners, including for customer service, to provide you with updates and other information relating to the website, and for marketing and promotional purposes
  • Send you emails
  • Find and prevent fraud

Log Files

Tumachi Mahiti तुमची माहीती follows a standard procedure of using log files. These files log visitors when they visit websites. All hosting companies do this and a part of hosting services' analytics. The information collected by log files include internet protocol (IP) addresses, browser type, Internet Service Provider (ISP), date and time stamp, referring/exit pages, and possibly the number of clicks. These are not linked to any information that is personally identifiable. The purpose of the information is for analyzing trends, administering the site, tracking users' movement on the website, and gathering demographic information.

Cookies and Web Beacons

Like any other website, Tumachi Mahiti तुमची माहीती uses 'cookies'. These cookies are used to store information including visitors' preferences, and the pages on the website that the visitor accessed or visited. The information is used to optimize the users' experience by customizing our web page content based on visitors' browser type and/or other information.

Google DoubleClick DART Cookie

Google is one of a third-party vendor on our site. It also uses cookies, known as DART cookies, to serve ads to our site visitors based upon their visit to https://www.tumachimahiti.co.in/ and other sites on the internet. However, visitors may choose to decline the use of DART cookies by visiting the Google ad and content network Privacy Policy at the following URL – https://policies.google.com/technologies/ads

Our Advertising Partners

Some of advertisers on our site may use cookies and web beacons. Our advertising partners are listed below. Each of our advertising partners has their own Privacy Policy for their policies on user data. For easier access, we hyperlinked to their Privacy Policies below.

Advertising Partners Privacy Policies

You may consult this list to find the Privacy Policy for each of the advertising partners of Tumachi Mahiti तुमची माहीती.

Third-party ad servers or ad networks uses technologies like cookies, JavaScript, or Web Beacons that are used in their respective advertisements and links that appear on Tumachi Mahiti तुमची माहीती, which are sent directly to users' browser. They automatically receive your IP address when this occurs. These technologies are used to measure the effectiveness of their advertising campaigns and/or to personalize the advertising content that you see on websites that you visit.

Note that Tumachi Mahiti तुमची माहीती has no access to or control over these cookies that are used by third-party advertisers.

Third Party Privacy Policies

Tumachi Mahiti तुमची माहीती's Privacy Policy does not apply to other advertisers or websites. Thus, we are advising you to consult the respective Privacy Policies of these third-party ad servers for more detailed information. It may include their practices and instructions about how to opt-out of certain options.

You can choose to disable cookies through your individual browser options. To know more detailed information about cookie management with specific web browsers, it can be found at the browsers' respective websites.

CCPA Privacy Rights (Do Not Sell My Personal Information)

Under the CCPA, among other rights, California consumers have the right to:

Request that a business that collects a consumer's personal data disclose the categories and specific pieces of personal data that a business has collected about consumers.

Request that a business delete any personal data about the consumer that a business has collected.

Request that a business that sells a consumer's personal data, not sell the consumer's personal data.

If you make a request, we have one month to respond to you. If you would like to exercise any of these rights, please contact us.

GDPR Data Protection Rights

We would like to make sure you are fully aware of all of your data protection rights. Every user is entitled to the following:

The right to access – You have the right to request copies of your personal data. We may charge you a small fee for this service.

The right to rectification – You have the right to request that we correct any information you believe is inaccurate. You also have the right to request that we complete the information you believe is incomplete.

The right to erasure – You have the right to request that we erase your personal data, under certain conditions.

The right to restrict processing – You have the right to request that we restrict the processing of your personal data, under certain conditions.

The right to object to processing – You have the right to object to our processing of your personal data, under certain conditions.

The right to data portability – You have the right to request that we transfer the data that we have collected to another organization, or directly to you, under certain conditions.

If you make a request, we have one month to respond to you. If you would like to exercise any of these rights, please contact us.

Children's Information

Another part of our priority is adding protection for children while using the internet. We encourage parents and guardians to observe, participate in, and/or monitor and guide their online activity.

Tumachi Mahiti तुमची माहीती does not knowingly collect any Personal Identifiable Information from children under the age of 13. If you think that your child provided this kind of information on our website, we strongly encourage you to contact us immediately and we will do our best efforts to promptly remove such information from our records.

Changes to This Privacy Policy

We may update our Privacy Policy from time to time. Thus, we advise you to review this page periodically for any changes. We will notify you of any changes by posting the new Privacy Policy on this page. These changes are effective immediately, after they are posted on this page.


Contact Us

If you have any questions or suggestions about our Privacy Policy, do not hesitate to contact us.

About Us

Hello Friends, 

www.tumachimahiti.co.in on this website Maharashtra state government scheme, central government scheme, Government job, Government Rules, technical information, New update, CSC related, Apale Sarkar, Agriculture Information, important News etc. visit to take benefits of online services.

If you have any problems or questions or information of regarding to website, Ad and any other issues, please me email at bhurkudsandesh@gmail.com 

Sandesh Bhurkud is a web developer, web designer and founder/owner of Tumachi Mahiti [तुमची माहिती]. From Talasari, Maharashtra.

Contact Us

Contact Us

Whatever your question, we’re here to help.

Don't be shy to contact us. We would love to hear from you! We are just an email away.

Please, use the form below to get in touch. You will hear back from us within one day.




Thursday, February 16, 2023

बांधकाम कामगार सेफ्टी किट वाटप योजना Bankdhkam Kamgar Yojana

बांधकाम कामगार सेफ्टी किट वाटप योजना 
Bankdhkam Kamgar Yojana:
आपल्या महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांना महाराष्ट्र राज्याच्या इमारत व इतर बांधकाम कामगार विभागाच्या मार्फत अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ देण्यात येत असतो. ज्या बांधकाम कामगारांनी नोंदणीकृत बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली आहे अशा बांधकाम कामगारांना सध्या Bankdhkam Kamgar Safety Kit म्हणजेच बांधकाम कामगार पेट्या यांचे वाटप करण्यात येत आहे. आजच्या माहिती मध्ये आपण बांधकाम कामगार सुरक्षा किट कशा मिळवायच्या या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

 

बांधकाम कामगार सेफ्टी किट चा लाभ कसा मिळवायचा?
राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र राज्याच्या इमारत व इतर बांधकाम कामगार विभाग मार्फत विविध प्रकारच्या 32 योजनांचा लाभ देण्यात येत असतो. यापैकी बांधकाम कामगारांकरिता असणारी सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे सुरक्षा संचाचे वाटप करणारी योजना. या Bankdhkam Kamgar Yojana Maharashtra अंतर्गत नोंदणी केलेल्या असलेल्या बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार सुरक्षा संच म्हणजेच बांधकाम कामगार पेट्या वितरित करण्यात येत असत 

बांधकाम कामगार सुरक्षा संच कुणाला मिळणार? Who will get Bandhkaam Kamgar safety kit?
मित्रांनो बांधकाम कामगार विभागाच्या मार्फत वितरित करण्यात येणारे सुरक्षा संच हे केवळ नोंदणीकृत असणाऱ्या बांधकाम कामगार यांनाच वितरित करण्यात येत असतात. याकरिता तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम विभाग यांच्याकडे नोंदणीकृत बांधकाम कामगार बनण्यासाठी अर्ज करावा लागेल. तुमची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही Bankhkam Kamgar Safety Kit मिळण्यास पात्र असाल.

बांधकाम कामगार सुरक्षा संच मध्ये मिळणाऱ्या वस्तू:
मित्रांनो बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या सेफ्टी किट म्हणजेच पेट्या मध्ये खालील प्रकारच्या वस्तू असतात.

1. बॅग
2. बांधकाम करण्यासाठी लागणारे जॅकेट
3. हेल्मेट
4. स्टेनलेस स्टीलचा टिफिन चा डब्बा
5. टॉर्च
6. सेफ्टी बूट
7. पाणी पिण्यासाठी बॉटल
8. चटई
9. मच्छरदाणी ची जाळी
10. सेफ्टी बेल्ट
11. हॅन्ड ग्लोज
सर्व बांधकाम उद्योग करणारे उद्योजक यांनी आपल्या कामगार लोकाना लाभ मिळवून दया 
अधिक माहिती साठी कामगार आयुक्त कार्यालय व कामगार कल्याण मंडळ येथे भेट दयावी 
आपला मित्र - संदेश 

गावातूनच करा बँक ला आधार लिंक

पीएम किसन सन्मान योजना पोस्टाने उपलब्ध करून दिली सुविधा 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास तीन हजारात दोन हजार रुपये प्रमाणे वर्षाला सहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते या योजनेच्या तेरावा हप्ता जमा करण्याची कारवाई सुरू आहे त्याचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे आयपीपी बी खात्याशी आधार क्रमांक लिंक असणे बंधनकारक आहे.

 यासाठी हप्ता उचलण्याची सुविधा पोस्टमन च्या माध्यमातून गावातच उपलब्ध करून देण्यात आली आहे सद्यस्थितीत   बँकेला आधार लिंक केलेली नाही पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या वतीने सहा हजार रुपयांचे वर्षाला अनुदान दिले जाते. संबंधित अनुदान जवळपास शेतकऱ्यांना दिल्यात मिळते मात्र तेवीस हजार एकत्रित प्रशासनाकडून वारंवार सूचना करूनही आपले बँक खात्याची आधार लिंक केले नसल्याची शेतकऱ्यानी आहे.

त्यामुळे किमान गावातून सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर आधार लिंक होईल या हेतूने पोस्टाने आता ही सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करून दिली आहे 72 तासात होणार लिंक यासाठी आपले आधार कार्ड मोबाईल क्रमांक आवश्यक असणार आहे आय पी पी बी तर्फे गावात येऊन तरी ती सेवा देण्यात येणार आहे यासोबतच ज्याचे खाते उघडले गेले नाही त्याचे खाते उघडून देण्यात येणार आहे ते खाते उघडण्यास क्रमांक 48 ते 72 तासात जोडले जाणार आहे.

प्रधानमंत्री किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांना त्यांची बँक खाते आयपीपीबी मध्ये उघडून ती आधार क्रमांक जोडण्यासाठी  हा याद उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे गावातील पोस्ट मास्टर या लाभार्थ्यांना संपर्क करून आयपीपीबीमध्ये बँक खाते सुरू करावी. या योजनेच्या तेराव्या हप्ता साठी आधार लिंक संलग्न बॅंक खाते अनिवार्य असल्याने ippb मार्फत फेब्रुवारी या कालावधीत राज्यात मोहीम राबविण्यात येत आहे.

केवळ आधारची गरज


ही आधार शेडिंग पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्राशिवाय करता येणार असल्याचे अत्यंत सोपी व सुलभ आहेत सुरू करण्याची सुविधा उपलब्ध आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांना इतर जाण्याची गरज नाही.



Tuesday, February 7, 2023

माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज केल्यानंतर...

माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज केल्यानंतर...

प्रथम अपील कोणाकडे करावे हे अनेकांना माहिती नाही, त्यांच्यासाठी उपयोगी..!
आपण तक्रार कुठे करावी, का करावी आणि कोणाकडे करावी!
हे तक्रार करण्यापूर्वी माहिती असणे आवश्यक आहे अन्यथा, आपल्या तक्रारीची दखल घेतली जाईलच याची खात्री नाही!



Sunday, February 5, 2023

पोस्ट कार्यालयातच उघडा बँक खाते

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना मिळणार सुविधा.  




पोस्ट कार्यालयातच उघडा बँक खाते


           प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना बॅंक खाते उघडण्यासह ते आधार कार्ड क्रमांक जोडण्याची सुविधा आता त्यांच्या गावातील पोस्ट कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. 


    या योजनेच्या लाभासाठी खाती उघडण्याची मोहीम इंडिया पोस्ट पेमेंट बँक मार्फत 1 ते 12 फेब्रुवारी दरम्यान राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. सर्व प्रलंबित लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते उघडावे असे आव्हान कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण व विकास पाटील यांनी केले आहे.
                 केंद्र सरकार तर्फे फक्त प्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबियास दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे सहा हजार रुपये प्रति वर्ष लाभ देण्यात येतो. या योजनेच्या तेराव्या हप्त्यांचा लाभ करण्याची कारवाई सध्या सुरू असून त्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे लाभ जमा करायचे बँक खाते आधार क्रमांक जोडणे बंधकारक आहे. राज्य सद्यस्थितीत 14 लाख 32 हजार लाभार्थ्यांची बँक खाते त्यांच्या आधार क्रमांक जोडलेली नाहीत. बँक खाते आधार क्रमांकाची संलग्न करण्याची सुविधा गावातील पोस्टमास्टर यांच्या मार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. त्यासाठी कागदपत्रांच्या आधारे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्या मार्फत खाते उघडावे.

गावनिहाय याद्या उपलब्ध:-
१)ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागद पत्राशिवाय करता येणार असल्याने सोपी व सुलभ आहे.

२) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांची बॅंक खाती आयपीपीमध्ये उघडून ती आधार क्रमांकाची जोडण्यासाठी राज्याच्या आय पी पी बी कार्यालयास गावनिहाय याद उपलब्ध करून दिले आहेत.

३) गावातील पोस्टमास्टर या लाभार्थ्यांना संपर्क करून  आय पी पी बी मध्ये बँक खाते सुरू करतील.

Friday, February 3, 2023

अन्नधान्य अनुदान योजनेतून बाहेर पडा सधन लाभार्थ्यांनो


राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील ( National food security mission) पात्र शिधापत्रिकाधारकांना Ration card शासनाकडून धान्याचा लाभ देण्यात येतो.



लाभार्थ्यांना धान्य वितरित करण्यासाठी ई-पॉस मशीनवर लाभार्थ्यांचे आधार अधिप्रमाणित करुन धान्य वितरित करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यासाठी शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार सीडींग पूर्ण होणे आवश्यक आहे.

अन्नधान्य वितरण प्रणालीच्या विविध अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी 
योजनांतील लाभार्थ्यांचे आधार सीडिंग करावयाचे प्रलंबित आहे.

शासन स्तरावरून सततच 2 वर्षे पाठपुरावा करूनही १०० टक्के आधार सीडिंग होत नसल्याने रास्त भाव दुकानदारांमार्फत ई – पॉस मशीनद्वारे विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील अन्नधान्य वितरण प्रणालीचे १०० टक्के आधारचे व ई – केवायसीचे काम पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जे नागरिक रेशन धान्याचा लाभ घेतात मात्र रेशन कार्ड वरील सर्व सदस्यांचे आधार कार्ड आतापर्यंत लिंक करून घेतले नाही, अशा आधार लिंक नसलेल्या नागरिकांचे रेशन धान्य बंद करावे लागणार आहे.

रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी लाभार्थींनी स्वत: रेशन दुकानात आधार कार्डची झेरॉक्स घेऊन जाऊन जोडणी करून घ्यावी, असे अन्नधान्य वितरण पुरवठा यांनी आवाहन केले.

रेशनकार्डला आधार लिंक केलेल्या नागरिकांची संख्या लक्षणीय असली तरी सर्वांचे आधार कार्ड लिंक करण्यासाठी ही मोहीम सुरू आहे. आधार लिंकींग प्रलंबित असण्याची कारणे सबंधित लाभार्थी मयत,दुबार, स्थलांतरित असू शकतात. अशा व्यक्ती प्रत्यक्षात नसुनही त्यांना धान्य अदा केले जाते.

सुरू असलेल्या शिधापत्रिकाच्या आधार सीडींग मुळे योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ घेण्याकरिता योग्य लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. आधारसीडींग मुळे अपात्र, दुबार, स्थलांतरित व मयत इत्यादी लाभार्थ्यांना वगळण्यात आले.

तरी हे मयत,दुबार, स्थलांतरित यांची नावे कमी करून नविन गरजू,गरिब लोकांना संधी देण्यासाठी प्रशासनाने ही विशेष मोहिम सुरू केली आहे. तसेच लहान मुले, वयोवृध्द लोकांचे आधार जुळत नाही अशांसाठी तहसिल कार्यालयाद्वारे आधार अपडेशन साठी कॅम्प लावणेच्या सुचना तहसिलदारांना दिल्या आहेत. तरी सर्व शिधापत्रिकाधारकांनी त्यांचे शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांनी रेशनकार्डला आधार जोडणेचे आवाहन करणेत येत आहे.

यासाठी लाभार्थीनी सबंधित स्वस्त धान्य दुकान अथवा सबंधित तहसिल कार्यालयांना संपर्क साधावा.

25 फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहिम

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार अंत्‍योदय अन्न योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याची आवश्यकता नाही, अशा लाभार्थ्यांनी स्वेच्छेने अन्नधान्य अनुदान योजनेतून बाहेर पडण्यासाठी दि. 25 फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेत पात्र लाभार्थ्यांनी स्वेच्छेने दि. 25 फेब्रुवारीपर्यंत अन्‍नधान्‍य योजनेतुन बाहेर पडावे. याकरीता तहसील कार्यालय व रास्‍तभाव दुकानदार यांच्याकडे अर्ज करावा. त्यानंतर स्‍थानिक दक्षता समिती ग्रामपंचायत मार्फत अन्‍नधान्‍याचा लाभ घेणारे अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेवून संबंधित तहसील कार्यालयास अहवाल सादर करतील.

नोकरवर्ग, व्यवसायी व सधन शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेवू नये

शासकीय व निमशासकीय नौकरीत असणारे लाभार्थी, खाजगी नौकरी, व्यवसाय करणारे ज्यांचे उत्पन्न 60 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे असे लाभार्थी, चार चाकी वाहन असणारे लाभार्थी, पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन असणारे सधन शेतकरी व पेंशनधारक लाभार्थ्यांनी अन्नधान्य सवलतीच्या योजनाचा लाभ घेवू नये.

अपात्र लाभार्थ्यांवर होणार कार्यवाही

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार अपात्र असलेला लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असल्यास अशा लाभार्थ्यांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955चे कलम 9 अन्वये पाच मुदतीचा कारावास किंवा द्रव्यदंडासह दोन्ही शिक्षेस पात्र राहिल.

तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 420 नुसार शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल होईल. नियमशिधापत्रिका संबंधात कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी संबंधिताना दिले आहे.


Thursday, February 2, 2023

केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 (Union Budget 2023-24) ची ठळक वैशिष्ट्ये


अर्थ मंत्रालय

Posted On: 01 FEB 2023 4:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2023


केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत:

भाग अ

सुमारे 9 वर्षांमध्ये दरडोई उत्पन्न दुपटीपेक्षा जास्त होऊन ते ₹ 1.97 लाखांवर पोहोचले आहे.
गेल्या 9 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या आकारमानात वाढ झाली असून ती जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत 10व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे.
ईपीएफओ सदस्यसंख्या दुपटीपेक्षा जास्त होऊन 27 कोटींवर पोहोचली आहे.
2022 मध्ये यूपीआयच्या माध्यमातून 126 लाख कोटी रुपयांचे  7,400 कोटी डिजिटल पेमेंट्स झाले आहेत.


स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 11.7 कोटी घरगुती शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे.
उज्ज्वला अंतर्गत 9.6 कोटी एलपीजी जोडण्या देण्यात आल्या आहेत.
102 कोटी व्यक्तींचे 220 कोटी कोविड लसमात्रांनी 
लसीकरण.
47.8 कोटी पीएम जनधन बँक खाती.
पीएम सुरक्षा विमा आणि पीएम जीवन  ज्योती अंतर्गत 44.6 कोटी व्यक्तींना विमा संरक्षण.
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत 11.4 कोटी शेतकऱ्यांकडे 2.2 लाख कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित.


अर्थसंकल्पाचे सात प्राधान्यक्रम ‘सप्तर्षी’ आहेत समावेशक विकास, शेवटच्या मैलावरील व्यक्तीपर्यंत पोहोचणे, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमतेचा सुयोग्य वापर, हरित विकास, युवा ऊर्जा आणि वित्तीय क्षेत्र.


उच्च मूल्याच्या फळपिकांच्या लागवडीसाठी रोगमुक्त, दर्जेदार लागवड सामग्रीची उपलब्धता वाढवण्यासाठी 2200 कोटी रुपये खर्चाचा आत्मनिर्भर स्वच्छ रोप/लागवड कार्यक्रम.
2014 पासून स्थापन झालेल्या सध्या अस्तित्वात असलेल्या 157 वैद्यकीय महाविद्यालयाच्या जवळच्या भागात 157 नवीन परिचारिका महाविद्यालयांची स्थापना करणार.
पुढील 3 वर्षात 3.5 लाख आदिवासी विद्यार्थी शिकत असलेल्या 740 एकलव्य आदर्श निवासी शाळांमध्ये केंद्र सरकार 38,800 शिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची भरती करणार.

पीएम आवास योजनसाठीच्या खर्चाच्या आराखड्यात  66% वाढ करून तो 79,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त करण्यात येत आहे.
रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाची तरतूद करण्यात आली आहे, 2013-14 मध्ये करण्यात आलेल्या तरतुदीपेक्षा सुमारे नऊ पट जास्त आणि आतापर्यंतची सर्वोच्च तरतूद आहे.


शहरी पायाभूत सुविधा विकास निधी (UIDF) प्राधान्यक्रमाच्या कर्जातील तफावतीच्या वापराच्या माध्यमातून स्थापन करण्यात येईल, ज्याचे व्यवस्थापन राष्ट्रीय गृहनिर्माण बँक करेल आणि द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये शहरी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सार्वजनिक संस्थांकडून त्याचा वापर केला जाईल.
एमएसएमई, मोठे व्यवसाय आणि धर्मादाय संस्थांना आपली कागदपत्रे सुरक्षितपणे ऑनलाईन साठवण्यासाठी आणि देवाणघेवाण करण्यासाठी एन्टिटी डिजिलॉकरची उभारणी करणार.

नव्या संधी, व्यवसायाची मॉडेल्स आणि रोजगाराच्या क्षमता निर्माण करण्यासाठी 5जी सेवा आधारित एप्लिकेशन्स विकसित करण्यासाठी 100 प्रयोगशाळा उभारणार.
चक्राकार अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी गोबरधन( गॅल्वानायजिंग ऑरगॅनिक बायो-ऍग्रो रिसोर्सेस धन) अंतर्गत एकूण 10000 कोटी रुपये गुंतवणुकीद्वारे नवी 500 ‘ वेस्ट टू वेल्थ’ संयंत्रे उभारणार. नैसर्गिक आणि बायोगॅसचे विपणन करणाऱ्या सर्व संस्थांसाठी 5 टक्के कॉम्प्रेस्ड बायो गॅस मॅन्डेट सुरू करणार.

पुढील तीन वर्षात 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अंगिकार करण्यासाठी केंद्र सरकार सुविधा पुरवणार. यासाठी राष्ट्रीय पातळीवरील सूक्ष्म-खते आणि कीटकनाशके उत्पादन जाळे तयार करून 10,000 बायो-इनपुट संसाधन केंद्रे उभारणार, 
पुढील तीन वर्षात कोडिंग, एआय, रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स, आयओटी, थ्रीडी प्रिंटिंग, ड्रोन्स आणि सॉफ्ट स्किल्स यांसारख्या नव्या युगातील अभ्यासक्रमांचा समावेश असलेली प्रधानमंत्री कौशल विकास योजना 4.0 सुरू करण्यात येणार.
युवा वर्गाला आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध राज्यांमध्ये 30 स्किल इंडिया आंतरराष्ट्रीय केंद्रांची स्थापना करण्यात येणार.



कोषामध्ये 9000 कोटी रुपयांची भर घालून एमएसएमईसाठी नव्याने तयार केलेली पत हमी योजना सुरू करणार जी योजना एक एप्रिल 2023 पासून लागू होईल. या योजनेमुळे 2 लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त तारणविरहित कर्ज उपलब्ध होईल आणि आणि कर्जाच्या खर्चात देखील सुमारे 1 टक्क्याने कपात होईल.
कंपनी कायद्यांतर्गत  क्षेत्र अधिकाऱ्याकडे भरलेल्या विविध फॉर्म्सच्या केंद्रीय हाताळणीच्या माध्यमातून कंपन्यांना जलद प्रतिसाद मिळावा या उद्देशाने सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर स्थापन करण्यात येणार.


 ज्येष्ठ नागरिकांना ठेवी जमा करण्याच्या कमाल मर्यादेत वाढ करून ही मर्यादा 15 लाख रुपयांवरून 30 लाख रुपये करण्यात येणार.
लक्ष्यनिर्धारित वित्तीय तूट 2025-26 पर्यंत 4.5% च्या खाली राहील.
ग्रामीण भागातील युवा उद्योजकांना कृषी स्टार्ट अप्स सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता ऍग्रीकल्चर ऍक्सलरेटर फंडची स्थापना करणार.
भारताला 'श्री अन्न' चे जागतिक केंद्र बनवण्यासाठी हैदराबादच्या भारतीय भरडधान्य संशोधन संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम पद्धती, संशोधन आणि तंत्रज्ञान सामायिक करण्यासाठीचे केंद्र म्हणून तयार करण्यासाठी सहाय्य केले जाईल.


पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायासाठी 20 लाख कोटी रूपये कृषी कर्जाचे लक्ष्य
मच्छीमार, मासे विक्रेते आणि सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या उपक्रमांच्या अधिकाधिक सक्षमीकरणासाठी, मूल्य साखळी कार्यक्षमता सुधारणे आणि बाजारपेठेचा विस्तार करणे यासाठी 6,000 कोटी रूपयांच्या लक्ष्यित गुंतवणुकीसह पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेची नवीन उप-योजना सुरू केली जाईल.
शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा खुली संसाधने, खुली मानके आणि इंटरऑपरेबल पब्लिक गुड म्हणून तयार केल्या जातील, त्यामुळे शेतकरी केंद्रित समावेशक उपाय आणि कृषी तंत्रज्ञान उद्योग आणि स्टार्ट-अपच्या वाढीला पाठबळ मिळेल.


2,516 कोटी रूपयांच्या गुंतवणुकीसह 63,000 प्राथमिक कृषी पतसंस्था (पॅक्स) चे संगणकीकरण सुरू केले.
शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन साठवून ठेवण्यासाठी आणि योग्य वेळी विक्रीद्वारे किफायतशीर किमती मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकेंद्रित साठवण क्षमता तयार केली जाईल.
सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम सुरू करण्यात येणार आहे.


संयुक्त सार्वजनिक आणि खाजगी वैद्यकीय संशोधनाला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर)च्या निवडक प्रयोगशाळांद्वारे सहकार्यात्मक संशोधन आणि नवकल्पनांना चालना दिली जाईल
फार्मास्युटिकल्समधील संशोधनाला चालना देण्यासाठी नवीन कार्यक्रम सुरू केला जाणार आहे.
10 लाख कोटी रूपयांची भांडवली गुंतवणूक, सलग तिसर्‍या वर्षी 33% ची प्रचंड वाढ, वाढीची क्षमता आणि रोजगार निर्मिती, खाजगी गुंतवणुकीला चालना आणि जागतिक समस्यांपासून बचाव करणे.
आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी, जलस्रोत, आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये आवश्यक सरकारी सेवांच्या विस्तारासाठी  500 ब्लॉक्स समाविष्ट करणारा आकांक्षा ब्लॉक कार्यक्रम.


अनुसूचित जमातींसाठी विकास कृती आराखड्यांतर्गत पुढील तीन वर्षांत प्रधानमंत्री विशिष्ट असुरक्षित आदिवासी गट (पीव्हीटीजी विकास अभियानाच्या अंमलबजावणीसाठी 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक. 75,000 कोटी, 15,000 कोटी खाजगी स्त्रोतांकडून. बंदरे, कोळसा, पोलाद, खते आणि अन्नधान्य क्षेत्रांच्या सर्वांगीण दळणवळण- कनेक्टिव्हिटीसाठी शंभर महत्त्वाच्या वाहतूक पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी ही गुंतवणूक.


पायाभूत सुविधांमध्ये खाजगी गुंतवणुकीच्या संधी वाढवण्यासाठी नवीन पायाभूत सुविधा वित्त सचिवालयाची स्थापना.
शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था उत्कृष्ट संस्था म्हणून विकसित केल्या जातील.
भौगोलिकदृष्ट्या, भाषा, शैली आणि स्तरांवर दर्जेदार पुस्तकांची सहज उपलब्धता आणि उपकरणे सुलभतेने मिळण्यासाठी मुलांसाठी राष्ट्रीय डिजिटल बाल आणि किशोर ग्रंथालयाची स्थापना केली जाईल.


शाश्वत सूक्ष्म सिंचन आणि पेयजलाच्या  भूपृष्ठावरील टाक्या भरण्यासाठी अप्पर भद्रा प्रकल्पाला केंद्रीय सहाय्य म्हणून 5,300 कोटी देण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्प्यात एक लाख प्राचीन शिलालेखांच्या डिजिटायझेशनसह डिजिटल एपिग्राफी संग्रहालयात ‘भारत शेअर्ड रिपॉझिटरी ऑफ इंस्क्रिप्शन’ची स्थापना करण्यात येणार आहे.
केंद्राचा ‘प्रभावी भांडवली खर्च’  13.7 लाख कोटी रूपये.
पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आणि त्यांना पूरक धोरणात्मक कृतींसाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारांना आणखी एक वर्षासाठी 50 वर्षांचे बिनव्याजी कर्ज देणे सुरू ठेवले जाणार आहे.
आपली शहरे ‘उद्याच्या शाश्वत शहरांमध्ये’ बदलण्यासाठी शहरी नियोजन सुधारणा आणि कृती करण्यासाठी राज्ये आणि शहरांना प्रोत्साहन.
मॅनहोलमधून मशीन-होल मोडमध्ये संक्रमण. शहरी भागातील सर्व  सेप्टिक टाक्या आणि गटारांचे 100 टक्के यांत्रिक विसर्जन करण्यास सक्षम केले जाणार.
लाखो सरकारी कर्मचार्‍यांना त्यांची कौशल्ये सुधारण्यासाठी आणि लोक-केंद्रित दृष्टीकोन सुलभ करण्यासाठी सतत शिकण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयगॉट कर्मयोगी, एकात्मिक ऑनलाइन प्रशिक्षण मंच  सुरू केले.
व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी 39,000 हून अधिक अनुपालन कमी केले गेले आणि 3,400 हून अधिक कायदेशीर तरतुदी अपराधमुक्त केल्या गेल्या.



42 केंद्रीय कायद्यांमध्ये सुधारणा करणारे जनविश्वास विधेयक अधिक विश्वासावर आधारित प्रशासनासाठी सादर करण्यात आले आहे.
“मेक अर्टिफिशियल इंटेलिजेन्स -कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) इन इंडिया आणि मेक एआय वर्क फॉर इंडिया” ही संकल्पना साकार करण्यासाठी सर्वोच्च शैक्षणिक संस्थांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी तीन उत्कृष्टता केंद्रे स्थापन केली जातील.
स्टार्ट अप उद्योग तसेच शैक्षणिक क्षेत्र यांच्यातर्फे केल्या जाणाऱ्या नवोन्मेष आणि संशोधनाला नवे मार्ग खुले करून देण्यासाठी राष्ट्रीय माहिती प्रशासन धोरणाची सुरुवात करण्यात येईल.
ओळख निश्चिती तसेच पत्ता यांच्यात सुसंगतता आणि अद्ययावतीकरण यासाठी डिजीलॉकर सेवा आणि आधार यांचा वापर करून कार्य करणारी एक केंद्री सुविधा निर्माण करण्यात येईल.



व्यापार करण्यात आणखी सुगमता आणण्याच्या दृष्टीने विहित सरकारी संस्थांच्या सर्व डिजिटल सेवांसाठी सामायिक ओळख निश्चितीचे साधन म्हणून पॅन म्हणजेच स्थायी खाते क्रमांकाचा वापर करण्यात येईल.
कोविड काळात ज्या एमएसएमई उद्योगांना कराराची अंमलबजावणी करणे शक्य झाले नसेल त्या एमएसएमई उद्योगांना तसेच सरकारच्या उपक्रमांना निविदा अथवा कार्याबद्दलची सुरक्षा ठेव म्हणून भरलेल्या रकमेच्या 95%रक्कम परत करण्यात येईल.
स्पर्धात्मक विकासविषयक गरजांसाठी अपुऱ्या साधन संपत्तीचे वितरण करताना परिणामाधारित निधी पुरवठा पद्धत.
न्यायदानाची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ई-न्यायालय प्रकल्पामधील तिसऱ्या टप्प्यातील 7,000 कोटी रुपये खर्चाच्या कामाची सुरुवात करण्यात येईल.  



एलजीडी अर्थात प्रयोगशाळेत विकसित हिऱ्यांच्या बीजखड्यांच्या तसेच संबंधित यंत्रांच्या स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या आयातीवरील  अवलंबित्व कमी करण्यासाठी एलजीडी क्षेत्राला संशोधन तसेच विकास कार्यासाठी अनुदानाची तरतूद.
देशाच्या अर्थव्यवस्थेचे कमी कार्बन तीव्रतेच्या दिशेने स्थित्यंतर घडवून आणण्याची प्रक्रिया सुलभतेने करण्यासाठी तसेच जीवाश्म इंधनांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हरित हायड्रोजन अभियानाअंतर्गत वर्ष 2030 पर्यंत वार्षिक 5 दशलक्ष टन हरित हायड्रोजन निर्मिती करण्याचे लक्ष्य निश्चित.
उर्जा सुरक्षा, उर्जा स्थित्यंतर आणि संपूर्णतः शून्य उत्सर्जन उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद.
अर्थव्यवस्थेला शाश्वत विकासाच्या मार्गाची दिशा देण्यासाठी बॅटरी उर्जा साठवण प्रणालींना प्रोत्साहन देणार.
लडाखमधील पुनर्नवीकरणीय उर्जा ग्रीड समावेशन आणि उर्जा स्थलांतर यासाठी 20,700 कोटी रुपयांची तरतूद.
देशातील राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश यांना पर्यायी खतांच्या वापरासाठी तसेच रासायनिक खतांच्या समतोल वापरासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने “पृथ्वी मातेची पुनर्स्थापना, जागरूकता, पोषण आणि जीर्णोद्धार यासाठीचा पंतप्रधान कार्यक्रम” (पीएम-प्राणम) सुरु करण्यात येईल.
एमजीएनआरईजीएस, सीएएमपीए निधी तसेच इतर स्त्रोतांच्या एकत्रीकरणातून किनारपट्टीच्या लगत आणि मिठागरांच्या जागांवर कांदळवनांच्या लागवडीसाठी ‘किनारपट्टीवरील अधिवास आणि निश्चित उत्पन्नासाठी कांदळवन विषयक उपक्रम’ मिष्टीची सुरुवात करण्यात येणार.
पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत आणि प्रतिसादात्मक घडामोडींसाठी मदत देणे तसेच अतिरिक्त साधनसंपत्तीची तरतूद करणे या उद्देशाने पर्यावरण (संरक्षण) कायद्याच्या अखत्यारीत हरित कर्ज कार्यक्रम सूचित करण्यात येईल.


पाणथळ जागांचा अधिकाधिक वापर, जैव-विविधतेत वाढ, कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण, इको-पर्यटनविषयक संधींची चाचपणी तसेच स्थानिक समुदायांच्या उत्पन्नात वाढ यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने येत्या तीन वर्षांत अमृत धरोहर योजना लागू करण्यात येईल.
मागणीवर आधारित औपचारिक कौशल्य विकसित करण्यास सक्षम होणे, एमएसएमई उद्योगांसह सर्व उद्योगांच्या मालकांशी जोडणी तसेच उद्योजकताविषयक योजनांचा लाभ घेणे सुलभ करण्यासाठी एकत्रित कौशल्यविषयक भारत डिजिटल कार्यक्रम लागू करण्यात येईल.
देशातील 47 लाख युवकांना विद्यावेतन देण्यासाठी अखिल भारतीय  राष्ट्रीय  शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत  थेट लाभ हस्तांतरण  प्रणाली सुरु करण्यात येईल.
किमान 50 पर्यटन स्थळांची निवडण्‍यात येणार असून देशातल्या आणि परदेशातल्या पर्यटकांसाठी संपूर्ण पॅकेज म्हणून त्‍यांचा विकास केला जाईल.



'देखो अपना देश' उपक्रमाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील  विशिष्ट कौशल्य आणि उद्योजकता यांचा विकास  केला जाईल.
‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम’ अंतर्गत सीमावर्ती गावांमध्ये पर्यटनाच्या पायाभूत सोई आणि सुविधा  पुरवल्या जातील
राज्यांनी  ‘युनिटी मॉल’ उभारावेत आणि त्‍याव्दारे “जीआय” उत्‍पादने आणि हस्तशिल्पांची  विक्री करण्‍यासाठी प्रोत्साहन देण्‍यात येईल. तसेच  या मॉलमधून आपल्या राज्यातील तसेच इतर सर्व राज्यांमधील ओडीओपी म्हणजेच  ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ उपलब्ध करून देण्‍यात येईल.  
‘नॅशनल फायनान्शिअल इन्फॉर्मेशन रजिस्ट्री’ ची स्थापना करण्‍यात येईल.  आर्थिक आणि सहायक माहितीचे केंद्रीय भांडार म्हणून हे केंद्र कार्य करेल.   यामुळे कर्जाचा प्रवाह कार्यक्षमतेने आणि   सुलभतेने सुरू राहील. वित्तीय  समावेशनाला चालना मिळेल आणि आर्थिक स्थिरता वाढेल. प‍तविषयक  सार्वजनिक पायाभूत सुविधांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयशी सल्लामसलत करून एक नवीन वैधानिक आराखडा  तयार करण्‍यात येईल.



वित्तीय क्षेत्र नियामक सार्वजनिक आणि नियामक संस्थांशी सल्लामसलत करून विद्यमान नियमांचे सर्वसमावेशक पुनरावलोकन करण्यासाठी विविध नियमांखालील अर्जांवर निर्णय घेण्यासाठी समयसीमा निश्चित करणार .
जीआयएफटी –  आएफएससी म्हणजे आंतरराष्‍ट्रीय वित्तीय सेवा केंद्रामधील व्यावसायिक क्रियाकलाप वाढवण्यासाठी, खालील उपाययोजना करण्‍यात येणार-
दुहेरी नियमन टाळण्यासाठी सेझ  कायद्यांतर्गत अधिकार आयएफएससीए म्हणजेच आंतरराष्‍ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकारणाकडे सोपविणार  
आयएफएससीए, सेझ प्राधिकरण, जीएसटीएन, आरबीआय, सेबी  आणि आयआरडीएआय म्हणजेच विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे  नोंदणी आणि मंजुरीसाठी एकल खिडकी आय.टी.  कार्यपद्धती सुरू करणार.
विदेशी बँकेच्या आयएफएससी  बँकिंग युनिट्सद्वारे  वित्तपुरवठ्याचे संपादन कार्य  करण्यास परवानगी देणार .
व्यापार पुनर्वित्त पुरवठ्यासाठी   ‘एक्झिम’   बँकेची उपकंपनी स्थापन करणार
लवाद कार्यवाही,  सहाय्यक सेवा आणि सेझ कायद्यांतर्गत दुहेरी नियमन टाळण्यासाठी वैधानिक तरतुदींसाठी आयएफएससीए कायद्यात सुधारणा करणार
‘ऑफशोअर डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स’  वैध करार म्हणून ओळखला जाणार .



बँक प्रशासन सुधारण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचे संरक्षण वाढविण्यासाठी बँकिंग नियमन कायदा, बँकिंग कंपनी कायदा आणि रिझर्व्ह ऑफ इंडिया कायद्यामध्ये सुधारणा करण्‍याचा प्रस्‍ताव मांडण्‍यात आला आहे.
डिजिटल निरंतरतासाठी  उपायांच्या शोधात  असलेल्या देशांना जीआयएफटी आयएफएससी मध्ये त्यांच्या डेटा दूतावासाची स्थापना करण्याची सुविधा दिली जाईल.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्समधील शिक्षणासाठी मानदंड आणि मानके तयार  करणे, नियमन करणे, देखरेख करणे आणि लागू करणे, पदवी, पदविका  आणि प्रमाणपत्र  अभ्‍यासक्रम विकसित करण्‍यासाठी सेबीला मान्यता देण्‍यात येणार.
दावा केले गेले नाहीत असे समभाग आणि दिला न गेलेला लाभांश गुंतवणूकदारांना परत मिळावा म्हणून ‘ गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण’कडे एक सक्षम व्यवस्‍था  करण्यासाठी एकात्मिक IT पोर्टलची स्थापना करणार.
स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवाच्या स्मरणार्थ,  एकाचवेळी ठेव ठेवता येणारी नवीन अल्प  बचत योजना, ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’  सुरू करणार. या योजनेतून  आंशिक पैसे काढण्याचा  पर्याय उपलब्ध असून 7.5 टक्के निश्चित व्याज दराने 2 वर्षांच्या कालावधीसाठी  (मार्च 2025 पर्यंत) महिला किंवा मुलींच्या नावावर 2 लाख रुपयांपर्यंत ठेव सुविधा देण्‍यात येईल.
मासिक उत्पन्न खाते योजनेची कमाल ठेव मर्यादा एकल खात्यासाठी रुपये 4.5 लाखांवरून रुपये 9 लाख आणि संयुक्त खात्यासाठी रूपये  9 लाखांवरून रुपये 15 लाखांपर्यंत वाढवली जाईल.


पन्नास वर्षांसाठी असलेले व्याजमुक्त कर्ज राज्यांना 2023-24 मध्ये भांडवली खर्चासाठी वापरावे लागणार. राज्यांनी वास्तविक भांडवली खर्च वाढविण्याची अट त्यासाठी असणार  आहे आणि परिव्ययातील काही भाग राज्यांच्या विशिष्ट कर्जावर अवलंबून असेल. 
जीएसडीपी म्हणजेच सकल राज्यांतर्गत उत्‍पन्नाच्या 3.5% ची राजकोषीय तूट ठेवण्याची परवानगी. त्यातील 0.5%  तुट ऊर्जा क्षेत्रातील सुधारणांवर अवलंबून.

सुधारित अंदाज 2022-23:

कर्जाव्यतिरिक्त एकूण आवक 24.3 लाख कोटी रुपये आहे, त्यापैकी निव्वळ कर प्राप्ती 20.9 लाख कोटी रुपये आहे.
एकूण खर्च 41.9 लाख कोटी रुपये असून त्यातील भांडवली खर्च सुमारे 7.3 लाख कोटी रुपये आहे.
अर्थसंकल्पीय अंदाजानुसार वित्तीय तूट जीडीपीच्या 6.4 टक्के आहे.



अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक 2023-24:

कर्जाव्यतिरिक्त एकूण आवक 27.2 लाख कोटी रुपये आणि एकूण खर्च 45 लाख कोटी रुपये असा अंदाज आहे.
निव्वळ कर प्राप्ती 23.3 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
वित्तीय तूट जीडीपीच्या 5.9 टक्के असण्याचा अंदाज आहे.
2023-24 मध्ये वित्तीय तूट भरून काढण्यासाठी, डेटेड सिक्युरिटीजकडून निव्वळ बाजारातील कर्जे 11.8 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
एकूण बाजारातील कर्जे 15.4 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
 

भाग - ब

प्रत्यक्ष कर

 

प्रत्यक्ष कर प्रस्तावांचे उद्दिष्ट करप्रणालीत सातत्य आणि स्थिरता राखणे, अनुपालन ओझे कमी करण्यासाठी विविध तरतुदी सुलभ आणि तर्कसंगत करणे, उद्योजकतेच्या भावनेला चालना देणे आणि नागरिकांना कर सवलत देणे हे आहे.
अनुपालन सुलभ आणि सुरळीत करून करदात्यांच्या सेवा सुधारण्यासाठी प्राप्तिकर विभागाचा निरंतर प्रयत्न.
करदात्याच्या सेवांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी, तक्रार निवारण यंत्रणा मजबूत करण्याच्या योजनांसह, करदात्याच्या सोयीसाठी भावी कॉमन आयटी रिटर्न फॉर्म (समान प्राप्तिकर विवरणपत्र) आणण्याचा प्रस्ताव.
नवीन कर प्रणालीत वैयक्तिक प्राप्तिकराची सवलत मर्यादा वाढवून सध्याच्या 5 लाख रुपयांवरून 7 लाख रुपये करण्यात आली आहे. अशा प्रकारे, नवीन कर प्रणालीनुसार 7 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना कोणताही कर भरावा लागणार नाही.
उत्पन्नाच्या सहा टप्प्यात विभागलेल्या 2020 मधील वैयक्तिक प्राप्तिकर प्रणालीत नवीन कर रचनेनुसार बदल करून पाच टप्प्यात विभागणी आणि कर सवलत मर्यादा वाढवून 3 लाख रुपये करण्यात आली आहे. नवीन कारप्रणालीत सर्व करदात्यांना मोठा दिलासा देण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.


नवीन कर दर

Total Income (Rs)-Rate (per cent)

Up to 3,00,000-Nil

From 3,00,001 to 6,00,000-5

From 6,00,001 to 9,00,000-10

From 9,00,001 to 12,00,000-15

From 12,00,001 to 15,00,000-20

Above 15,00,000-30

 

नवीन कर प्रणालीनुसार नियमित वजावटीचा लाभ पगारदार व्यक्तीसाठी 50,000 रुपयांपर्यंत आणि कौटुंबिक पेन्शनमधून 15,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव. 
नवीन कर प्रणालीमध्ये सर्वोच्च अधिभार दर 37 टक्क्यांवरून 25 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव. यामुळे जास्तीत जास्त वैयक्तिक प्राप्तिकर दर 39 टक्क्यांपर्यंत कमी होईल.
अशासकीय पगारदार कर्मचार्‍यांच्या निवृत्तीनंतर रजा रोखीकरणावरील कर सवलतीची मर्यादा 25 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल.
नवीन प्राप्तिकर प्रणाली मूलभूत कर प्रणाली बनविली जाईल. मात्र, जुन्या कर प्रणालीचा लाभ घेण्याचा पर्याय नागरिकांना कायम राहील.
सूक्ष्म उपक्रम आणि काही व्यावसायिकांसाठी प्रस्तावित कर आकारणीचा लाभ घेण्यासाठी मर्यादेत वाढ. वर्षभरात रोख स्वरूपात प्राप्त झालेली  रक्कम किंवा एकत्रित रक्कम, एकूण मिळकत /उलाढालीच्या पाच टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तरच वाढीव मर्यादा लागू राहील .

एमएसएमईला केलेल्या  खर्चाची वजावट कंपन्याना तेव्हाच मिळेल जेव्हा एमएसएमईला वेळेवर रक्कम मिळेल. यासाठी प्रत्यक्षात देय रक्कम दिली असेल.

31.3.2024 पर्यंत प्रत्यक्ष उत्पादन सुरू करणार्‍या नवीन सहकारी संस्थांना 15 टक्क्यांच्या कमी कर दराचा लाभ मिळेल, जो सध्या नवीन उत्पादक कंपन्यांना मिळत आहे.

साखर सहकारी संस्थांना 2016-17 च्या मूल्यमापन वर्षाच्या आधीच्या कालावधीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकबाकी म्हणून दिलेल्या रकमेचा दावा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे त्यांना सुमारे 10,000 कोटी रुपये  मिळण्याची शक्यता  आहे.

प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि प्राथमिक सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका कडून रोख ठेवी आणि कर्जासाठी प्रति सदस्य कमाल 2 लाख रुपयांची मर्यादा

सहकारी संस्थांसाठी रोख पैसे काढण्यावरील टीडीएस साठी 3 कोटी रुपयांची कमाल मर्यादा .

स्टार्ट-अप्सना प्राप्तिकर लाभ मिळावा यासाठी स्थापनेची तारीख 31 मार्च 2023 वरून 31 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात येणार

स्टार्ट-अप्सचे भागभांडवल बदलल्यास तोटा पुढे नेण्याचा लाभ स्थापनेपासून सात वर्षे वरून दहा वर्षे  करण्याचा प्रस्ताव.

कर सवलती आणि सूट चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यासाठी कलम 54 आणि 54F अंतर्गत निवासी घरामधील गुंतवणुकीवर भांडवली नफ्यातून वजावटीसाठी मर्यादा  10 कोटी  रुपये

उच्च मूल्याच्या विमा पॉलिसींच्या उत्पन्नातून प्राप्तिकर सूट मर्यादित ठेवण्याचा प्रस्ताव. 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जारी केलेल्या जीवन विमा पॉलिसींसाठी (ULIP व्यतिरिक्त) प्रीमियमची एकूण रक्कम 5 लाख रुपयांहून अधिक असल्यास 5 लाख रुपयांपर्यंत एकूण प्रीमियम असलेल्या पॉलिसींना सूट दिली जाईल.

गृहनिर्माण, शहरे, नगर  आणि खेड्यांचा विकास आणि नियमन, किंवा एखाद्या कामाचे  नियमन आणि विकास करण्याच्या उद्देशाने केंद्र किंवा राज्याच्या कायद्यांद्वारे स्थापित प्राधिकरणे, मंडळे आणि आयोगांच्या उत्पन्नाला प्राप्तिकरातून सूट देण्याचे प्रस्तावित आहे.

टीडीएस साठी 10 हजार रुपयांची किमान मर्यादा  हटवण्यात येईल आणि ऑनलाइन गेमिंगशी संबंधित करपात्रता स्पष्ट केली जाईल. पैसे काढताना किंवा आर्थिक वर्षाच्या शेवटी जिंकलेल्या रकमेवर टीडीएस आणि करपात्रता तरतुदीचा  प्रस्ताव.



सोन्याचे इलेक्ट्रॉनिक सोन्याच्या पावतीमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक सोन्याचे सोन्यात  रूपांतर भांडवली नफा म्हणून गणले जाऊ नये, असे प्रस्तावित आहे.

पॅन नसलेल्या प्रकरणांमध्ये ईपीएफ मधून पैसे काढल्यास  करपात्र रकमेवरील  टीडीएस  दर 30% वरून 20% पर्यंत कमी केला जाईल

मार्केट लिंक्ड डिबेंचरमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकारला जाणार

आयुक्त स्तरावरील प्रलंबित अपीलांची संख्या कमी करावी म्हणून लहान अपील्स निकाली काढण्यासाठी सुमारे 100  सहआयुक्तांची नियुक्ती.



या वर्षी आधीच प्राप्त झालेल्या विवरण पत्रांच्या छाननीसंबंधी प्रकरणे घेताना  अधिक चोखंदळ राहणार

IFSC, GIFT सिटी मध्ये पुनर्स्थापित निधीसाठी कर लाभांचा कालावधी 31.03.2025 पर्यंत वाढवला

आयकर कायद्याच्या कलम 276A अंतर्गत लिक्विडेटर्स कडून नियमाचे पालन न झाल्याप्रकरणी त्याला 1 एप्रिल 2023 पासून गुन्हेगार ठरवण्यात येणार नाही.

आयडीबीआय बँकेसह धोरणात्मक निर्गुंतवणुकीतील तोटा पुढील वर्षात दाखवायला परवानगी

अग्निवीर निधीला EEE दर्जा प्रदान करणार. "अग्निपथ योजना , 2022 मध्ये नोंदणी केलेल्या अग्निवीरांना अग्निवीर कॉर्पस निधीतून मिळालेली रक्कम करमुक्त करण्याचे प्रस्तावित आहे . अग्निवीरला त्याच्या सेवा निधी खात्यात त्याने किंवा केंद्र सरकारने केलेल्या योगदानानुसार एकूण उत्पन्नाच्या गणनेतील वजावट देण्याचे प्रस्तावित आहे.

 

अप्रत्यक्ष कर

कापड आणि शेती माला व्यतिरिक्त इतर वस्तूंवरील मूलभूत सीमाशुल्क दरात कपात करून तो 21 वरून 13 वर आणला.  
खेळणी, सायकली, ऑटोमोबाईल्स आणि नॅप्था यासह काही वस्तूंवरील मूलभूत सीमा शुल्क, उपकर आणि अधिभार यामध्ये किरकोळ बदल.
कॉम्प्रेस्ड (संकुचित) नैसर्गिक वायूमध्ये मिश्रण केलेला जीएसटी शुल्क भरलेल्या कॉम्प्रेस्ड बायो गॅसवर उत्पादन शुल्कात सूट.


विजेवर चालणार्‍या वाहनांच्या (EVs) च्या बॅटरीमध्ये वापरण्यासाठी लिथियम-आयन सेलच्या निर्मितीसाठी निर्दिष्ट भांडवली वस्तू/यंत्रसामग्रीवरील सीमा शुल्क भरण्याची मर्यादा 31.03.2024 पर्यंत वाढविण्यात आली.
अधिसूचित चाचणी संस्थांद्वारे चाचणी आणि/किंवा प्रमाणन करण्याच्या हेतूने, आयात केलेली वाहने, निर्दिष्ट ऑटोमोबाईल भाग/घटक, उप-प्रणाली आणि टायर्सवर, अटींच्या अधीन राहून सीमाशुल्कात सूट.


सेल्युलर मोबाईल फोनच्या कॅमेरा मॉड्युलच्या निर्मितीमध्ये वापरण्यासाठी कॅमेरा लेन्स आणि त्याच्या इनपुट्स/पार्ट्सवरील सीमा शुल्क शून्यावर आणले, आणि बॅटरीसाठी लिथियम-आयन सेलवरील सवलत शुल्काची मर्यादा आणखी एका वर्ष वाढवली.


टीव्ही पॅनलच्या खुल्या सेलच्या भागांवरील मूलभूत सीमाशुल्क कमी करून 2.5 टक्के केले.
इलेक्ट्रिक किचन चिमणीवरील मूलभूत सीमाशुल्क 7.5 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढले.
इलेक्ट्रिक किचन चिमणीच्या निर्मितीसाठीच्या हीट कॉइलवरील मूलभूत सीमा शुल्क कमी करून 20 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर आणले.
रासायनिक उद्योगात वापरल्या जाणार्‍या डीनेचर्ड इथाइल अल्कोहोलला मूलभूत सीमा शुल्कातून सूट देण्यात आली.
आम्ल ग्रेड फ्लोरस्पार (कॅल्शियम फ्लोराईडच्या 97 टक्क्यांहून अधिक वजन असलेले) वरील मूलभूत सीमा शुल्क 5 टक्क्यांवरून कमी करून 2.5 टक्के केले.
एपिकोलोरहायड्रिनच्या निर्मितीमध्ये वापरण्यासाठी क्रूड ग्लिसरीनवरील मूलभूत सीमा शुल्क 7.5 टक्क्यांवरून 2.5 टक्क्यांवर आणले.



कोळंबी खाद्याच्या देशांतर्गत उत्पादनासाठीच्या प्रमुख कच्च्या मालावरील करात कपात केली.
प्रयोगशाळेत तयार केल्या जाणाऱ्या हिऱ्यांच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणार्‍या कच्च्या मालावरील मुलभूत सीमा शुल्क कमी केले.
सोने आणि प्लॅटिनमच्या डोरे आणि बारपासून बनवलेल्या वस्तूंवरील करात वाढ.
चांदीचे डोरे, बार आणि वस्तूंवर आयात शुल्कात वाढ.
सीआरजीओ स्टील, फेरस स्क्रॅप आणि निकेल कॅथोडच्या निर्मितीसाठीच्या कच्च्या मालावरील मूलभूत सीमाशुल्क सूट कायम.
तांब्याच्या स्क्रॅपवर 2.5 टक्के सवलतीचा बीसीडी कायम ठेवण्यात आला.


कंपाउंडेड रबरवरील मूळ सीमाशुल्क दर 10 टक्क्यावरून, अथवा 30 प्रति किलो यापैकी जे कमी असेल ते लागू.
निर्दिष्ट सिगारेट्सवरील राष्ट्रीय आपत्ती आकस्मिक शुल्क (NCCD) सुमारे 16 टक्क्यांनी वाढवण्यात आले.
सीमाशुल्क कायद्यांमधील वैधानिक बदल
सेटलमेंट कमिशनद्वारे अंतिम आदेश पारित करण्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या तारखेपासून नऊ महिन्यांची कालमर्यादा निर्दिष्ट करण्यासाठी सीमाशुल्क कायदा, 1962 मध्ये सुधारणा केली जाणार.



अँटी-डंपिंग ड्यूटी (ADD), काउंटरवेलिंग ड्यूटी (CVD) आणि सुरक्षा उपायांशी संबंधित तरतुदींचा हेतू आणि व्याप्ती स्पष्ट करण्यासाठी सीमाशुल्क कायद्यात सुधारणा केली जाणार.
सीजीएसटी कायद्यात सुधारणा केली जाणार
जीएसटी अंतर्गत खटला चालवण्यासाठी कर रकमेची किमान मर्यादा एक कोटीवरून दोन कोटींपर्यंत वाढवणे.
सध्याच्या कर रकमेच्या 50 ते 150 टक्क्यांच्या श्रेणीतील चक्रवाढ रक्कम 25 ते 100 टक्क्यांपर्यंत कमी करणे.
गुन्हेगारीच्या व्याख्येमधून काही गुन्हे वगळणे
रिटर्न/स्टेटमेंट भरण्याच्या अंतीम मुदतीच्या तारखेपासून जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंत रिटर्न/स्टेटमेंट भरण्याची तारीख मर्यादित करणे; आणि
नोंदणी न केलेले पुरवठादार आणि करदात्यांना ई-कॉमर्स ऑपरेटर (ईसीओ) द्वारे वस्तूंचा राज्यांतर्गत पुरवठा करण्यासाठी सक्षम करणे.