Tuesday, September 28, 2021
गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अतिमुसळधार पावसाची शक्यता
Monday, September 13, 2021
Monday, June 7, 2021
पालघर जिल्ह्यात 9 ते 12 जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा
मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात 9 ते 12 जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने या चार दिवसाच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणार्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. या काळात कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेतांना धोकादायक इमारती, दरडग्रस्त भाग आणि लोलाईन एरियातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षितस्थळी हलवावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
अतिवृष्टीच्या या काळात आवश्यक तिथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात कराव्यात, ओएनजीसी सह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणार्या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात यावे असेही ते यावेळी म्हणाले.
हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशार्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, बहृन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व महापालिकांचे आयुक्त, कोकण विभागातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधिक्षक, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
- पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घ्यावी!
या अतिवृष्टी काळात गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षकदल, नौदलाला तयार राहण्याची सुचना कळवण्यात यावी असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, किनारपट्टी भागात होणार्या या अतिवृष्टीची माहिती स्थानिक प्रशासनाने नागरिकांनाही द्यावी, या काळात नद्यांचा प्रवाह बदलतो आणि त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरते हे लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांची काळजी घ्यावी. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेऊन जिल्ह्यातीलआपत्ती व्यवस्थापनाच्या कामांचा तातडीने आढावा घ्यावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.
दरडग्रस्त भागातील लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे!
दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचे जे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाले आहेत त्याला तातडीने मंजुरी द्यावी अशा सुचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, या गावांच्या पुनर्वसनाला लागणारा दीर्घ काळ विचारात घेता आता तातडीची गरज म्हणून या भागातील लोकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे.
- अनपेक्षिरित्या घडणार्या गोष्टी गृहित धरुन तयारी करा!
अतिवृष्टीच्या काळात काही नैसर्गिक गोष्टी घडणे अपेक्षित असते तर काही गोष्टी या अनपेक्षितपणे घडतात. आपण अपेक्षित गोष्टी गृहित धरून तयारी करतो परंतू ज्या अनपेक्षित गोष्टी घडू शकतात त्या गृहित धरून प्रशासनाने त्याचीही तयारी करावी असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या काळात मुंबई महानगर प्रदेशात जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हे लक्षात घेऊन झाडे पडणे, पाणी साचणे, मॅनहोल उघडे राहणार नाहीत याची काळजी घेणे महत्वाचे आहे. धोकादायक इमारतीमधील नागरिकांना संक्रमण शिबिरात हलवणे गरजेचे आहे. मुंबई शहरात अनेक ठिकाणी विकास कामे सुरु आहेत, या कामाचे डेब्रीज रस्त्यावर आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी, अशा विकास कामांच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी संबंधित यंत्रणेने घ्यावी.
- रुग्णसेवेत अडथळा नको!
अतिवृष्टी झाल्यास वीज पुरवठा खंडित होऊ शकतो हे लक्षात घेऊन रुग्णालयांनी पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी, जनरेटर्स, डिझेलचा साठा, ऑक्सीजनचा साठा करून ठेवावा. वीजेचे बॅकअप कशा पद्धतीने घेता येईल याची पर्यायी व्यवस्था करून रुग्णसेवेत कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच अतिवृष्टीमुळे कोविड केअर सेंटर्समधील रुग्णांना अडचण होणार नाही, येथे पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याची गरज ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
- पावसाळी आजारांकडे दुर्लक्ष नको!
कोविड काळात कोविड आणि पावसाळी आजार एकत्र आले तर परिस्थिती गंभीर होऊ शकते याकडे मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले तसेच पावसाळी आजार उद्भवू शकणार्या परिस्थितीवर विशेषत: मलेरियावर नियंत्रण मिळवण्याच्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.
- पाणी साचणारी ठिकाणे लक्षात घेऊन प्रभावी उपाययोजना राबवाव्यात!
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात पाणी साचणार्या स्थळांचा शोध घ्यावा, पंपींग स्टेशन्स आणि झडपा यांची व्यवस्थित पाहणी करावी, ही यंत्रणा व्यवस्थित सुरु आहे याची काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हिंदमाता परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्यावी, यातील अडथळे दूर करावेत, लो लाईन एरियात विशेष काळजी घ्यावी, गरज पडल्यास या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना द्याव्यात, धोकादायक इमारतींमधील नागरिकांना धोक्याची कल्पना देऊन संक्रमण शिबिरांमध्ये स्थलांतरीत होण्यास सांगावे असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
Monday, August 31, 2020
डहाणू व पालघर तालुक्याने 100% सरासरी ओलांडली आणि जिल्ह्यात 89.4% पाऊस!
पालघर जिल्ह्यात आतापर्यंत 216 सेमी पाऊस पडला असून तो सरासरीच्या 89.4% इतका आहे. संपूर्ण पावसाळ्याचा जिल्ह्यात सरासरी 242 सेमी पाऊस पडतो. 30 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात 196.5 सेमी सरासरी पाऊस पडतो. त्या तुलनेत 110% पाऊस पडला आहे. डहाणू व पालघर तालुक्याने मात्र एकूण पावसाळ्याची 100% सरासरी ओलांडली आहे.
पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे (मागील 24 तासांत पाऊस)[आतापर्यंत पडलेला एकूण पाऊस] सरासरी % :–
• वसई – (5.3 सेमी) [231.6 सेमी] 85.7%
• वाडा – (4.7 सेमी) [203.7 सेमी] 78.1 %
• डहाणू – (6.5 सेमी) [203.7 सेमी] 107.2%
• पालघर – (7.7 सेमी) [249 सेमी] 102.4%
• जव्हार – (5.1 सेमी) [205.4 सेमी] 75.8%
• मोखाडा – (3.3 सेमी) [156.2 सेमी] 68.9%
• तलासरी – (11.7 सेमी) [204.1 सेमी] 95.7%
• विक्रमगड – (5.4 सेमी) [210.5 सेमी] 81.8%
Thursday, August 27, 2020
डहाणू तालुक्यात सरासरीच्या 97% पाऊस – मोखाडा तालुक्यात सर्वात कमी 65% पाऊस
Wednesday, August 5, 2020
5 व 6 रोजी मुसळधार पावसाचा अंदाज
Tuesday, June 9, 2020
पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत चिकू पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन
Tuesday, June 2, 2020
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी महावितरण सज्ज ; 3 व 4 जून रोजी वीज पुरवठा खंडीत होणे शक्य! - अधीक्षक अभियंता किरण नागावकर

दि. 2 जून: निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरणचे खांब व तारा यांना हानी पोहोचून 3 व 4 जून रोजी पालघर जिल्ह्यातील वीजपुरवठा दीर्घ कालावधीसाठी खंडीत होऊ शकतो. वीजपुरवठा पूर्वरत करण्यास अधिक वेळ जाऊ शकतो. असे असले तरी, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांची टीम हे आव्हान पेलण्यासाठी सज्ज असून लोकांनी पॅनिक होऊन दुरध्वनीद्वारे वारंवार विचारणा करुन मनोबल खच्ची करु नये व सहकार्य द्यावे असे आवाहन महावितरणच्या अधिक्षक अभियंता किरण नागावकर यांनी केले आहे. रुग्णालयांनी पर्यायी व्यवस्था करुन ठेवावी अशी सूचनादेखील नागावकर यांनी केली आहे.
महावितरणची आखणी:
हवेचा वेग बघून, अति उच्च दाब वाहिन्या तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे संपूर्ण पालघर जिल्ह्याचा विद्युत पुरवठा खंडीत होईल. आणि विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यास खालील प्रमाणे प्राधान्य देण्यात येईल.
- अती-उच्च दाब वाहिन्या सर्व प्रथम चालू केल्या जातील.
- त्यानंतर उपकेंद्रे चालू केली जातील.
- त्यानंतर टप्प्या टप्प्या ने उच्च दाब वाहिन्या (11 kV ) सुरू होतील. साहजिकच या वाहिन्या सर्व शहरातून फिरलेल्या असल्यामुळे, त्या दुरुस्ती करून, झाडे काढून, संरक्षित करून चालू केल्या जातील.
- उच्च दाब वाहिन्या सुरू करताना सर्व प्रथम प्राधान्य पाणीपुरवठा योजना /दवाखाने असणाऱ्या वाहिन्यांना देण्यात येईल.
- त्यानंतर लघुदाब वाहिन्या टप्प्या टप्प्या ने सुरू करण्यात येतील.
विद्युत पुरवठा वाहिन्यांना झालेल्या नुकसानावर अवलंबून असेल. वरील सर्वं कामे एकत्रितपणे सर्व भागात करण्यात येतील. त्यामुळे काही भागात लवकर, तर काही ठिकाणी उशिराने वीज पुरवठा सुरळीत होईल.
निसर्ग चक्रीवादळाचा सामना करण्यास जिल्हा प्रशासन सज्ज
दि. 2 जून: निसर्ग चक्रीवादळाचा धोका ज्या गावांना होण्याची शक्यता आहे अश्या गावातील लोकांसाठी निवारा छावण्यांची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांच्या संरक्षणासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी नियंत्रण कशाची स्थापना करण्यात आली आहे. NDRF च्या टिम जिल्ह्यामध्ये तैनात करण्यात आल्या असुन, निसर्ग चक्रीवादळाशी सामना करण्यास जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
दिनांक 01 ते 04 जुन 2020 या कालावधीत पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ येत असल्याबाबत भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे.सदर कालावधीत वाऱ्याचा वेग खुप जास्त असुन मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात ग्रामस्थांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.
दिनांक 03 जुन 2020 रोजी आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित रहावे. घराच्या बाहेर पडू नये.
आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरुपाचे असेल तर तात्काळ उंचीवरील ठिकाणी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेवून स्थलांतरीत व्हावे.
घराच्या अवतीभवती वादळामुळे कोणत्या वस्तु, विजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तुंपासुन लांब रहावे.
सोबत आवश्यक पिण्याचे पाणी, औषधे ठेवावे. आपला जिव आपल्या मिळकतीपेक्षा महत्वाचा असल्यामुळे प्रथम जिवीतास प्राधान्य द्यावे.
मदत आवश्यक असल्यास नागरिकांनी पुढे नमुद केलेल्या नियंत्रण कक्षाच्या नंबरवर संपर्क साधावा.
जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, पालघर – 02525297474,
वसई विरार महानगरपालिका – 02502529885,
पालघर तहसिल नियंत्रण कक्ष – 02525254930,
डहाणू तहसिल नियंत्रण कक्ष-02528-221182,
तलासरी तहसिल नियंत्रण कक्ष – 02521220018 / 9637692102/ 9637692127,
वसई तहसिल नियंत्रण कक्ष – 02502322007,
मोखाडा तहसिल नियंत्रण कक्ष – 2520222426 /7769901260,
विक्रमगड तहसिल नियंत्रण कक्ष – 02520240925,
जव्हार तहसिल नियंत्रण कक्ष – 02520222426 / 77769901260,
वाडा तहसिल नियंत्रण कक्ष – 02526271431
नागरिकांच्या मदतीसाठी NDRF च्या टिम जिल्ह्यामध्ये नियुक्तकरण्यात आल्या असुन, नागरिकांनी त्यांच्या सुचनांचे पालन करुन त्यांना सहकार्य करावे.
पालघर जिल्ह्यातील 22 गावांना धोक्याचा इशारा
दि. 3: पालघर जिल्ह्यातील 22 गावांना संभाव्य चक्रीवादळापासून हानी पोहोचू शकते असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. धोक्याचा इशारा देण्यात आलेली गावे पुढीलप्रमाणे आहेत. डहाणू :डहाणू, नरपड, आंबेवाडी, चिखले ; तलासरी : झाई ; पालघर : सातपाटी, जलसार, मुरबे, उच्छेळी, दांडी ; वसई : चांदिप, पाचूबंदर, सायवन, कामण, ससूनवघर, अर्नाळा, अर्नाळा किल्ला, रानगाव, सत्पाळा, कळंब, राजोळी, भईगाव बुद्रूक.
पालघर जिल्ह्यात चक्रीवादळाच्या शक्यतेने 3 जून रोजी कारखाने / दुकाने बंद
निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन विभाग सज्ज
एनडीआरएफ तुकड्याही तैनात
मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांसमवेत व्हिसीद्वारे बैठक
मुंबई, दि १ : निसर्ग चक्रीवादळ ३ जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळास तोंड देण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे. मच्छिमारांनाही समुद्रातून बोलावून घेण्यात आले असून जीवित हानी होणार नाही हे पाहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आज गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हीसीद्वारे चर्चा करून या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. वेळ पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी आजूबाजूच्या काही राज्यातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्याही तयार ठेवण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या व्यक्ती कच्च्या घरांत राहत आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबत दवंडी व लाऊडस्पीकर द्वारे सांगण्यात आले आहे. यासाठी पक्की निवारा गृहे देखील तयार ठेवण्यात आली आहेत. मच्छीमारांना समुद्रातून बोलविण्यात आले असून तटरक्षक दलाला देखील सुचना देण्यात आली आहे. वादळामुळे झाडे पडणे, भूसख्खलन, जोरदार पाऊस यामुळे हानी होण्याची शक्यता घेऊन प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील विशेषत: सखल भागातील झोपडपट्टीवासियांना देखील स्थलांतरित करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
नॉनकोविड रुग्णालये उपलब्ध
मदत व बचाव कार्य करताना कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच नॉनकोविड रुग्णालये उपलब्ध करण्याचे निर्देश दिल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले. कोविडसाठी तात्पुरते उभारण्यात आलेल्या रुग्णालयांतील रुग्णांना देखील सुरक्षित स्थळी कसे हलविता येईल ते पाहण्यास सांगण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास अधिक रुग्णालये उपलब्ध करणे व त्याठिकाणी जनरेटर्सची सुविधा करण्यासही सांगण्यात आले आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
एनडीआरएफ, एसडीआरएफ तैनात
या चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या १६ तुकड्यांपैकी १० तुकड्या तैनात करण्यात आल्या असून एसडीआरएफच्या ६ तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
विशेषत: वीज पुरवठा खंडीत होणार नाही तसेच पालघर आणि रायगड मधील रासायनिक कारखाने, अणू ऊर्जा प्रकल्प याठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे. मंत्रालयात देखील २४ तास नियंत्रण कक्ष सुरु असून लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्र्यांसमवेत या व्हीसीसाठी मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव मदत व पुनर्वसन किशोर राजे निंबाळकर तसेच इतर सचिव उपस्थित होते.
Thursday, May 28, 2020
पिकांचे नुकसान करणाऱ्या टोळधाडी पासून शेतकरी बांधवानी सावध राहावे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन
Wednesday, May 6, 2020
यंदा पावसाळ्यातील २० दिवस महत्त्वाचे!
करोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यात सर्व शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा मग्न असतानाच आता महिन्याभरावर पाऊस येऊन ठेपला आहे.
दिवस वेळ पाण्याची उंची
१) गुरुवार ४ जून सकाळी १०-५७ पाण्याची उंची ४.५६ मीटर
२) शुक्रवार ५ जून सकाळी ११-४५ पाण्याची उंची ४.७५ मीटर
३) शनिवार ६ जून दुपारी १२-३३ पाण्याची उंची ४.८२ मीटर
४) रविवार ७ जून दुपारी १-१९ पाण्याची उंची ४.७८ मीटर
५) सोमवार ८ जून दुपारी २-०४ पाण्याची उंची ४.६७ मीटर
६) मंगळवार ९ जून दुपारी २-४८ पाण्याची उंची ४.५० मीटर
७) मंगळवार २३ जून दुपारी १-४३ पाण्याची उंची ४.५२ मीटर
८) बुधवार २४ जून दुपारी २-२५ पाण्याची उंची ४.५१ मीटर
९) शनिवार ४ जुलै सकाळी ११-३८ पाण्याची उंची ४.५७ मीटर
१०) रविवार ५ जुलै दुपारी १२-२३ पाण्याची उंची ४.६३ मीटर
११) सोमवार ६ जुलै दुपारी १-०६ पाण्याची उंची ४.६२ मीटर
१२) मंगळवार ७ जुलै दुपारी १-४६ पाण्याची उंची ४.५४ मीटर
१३) मंगळवार २१ जुलै दुपारी १२-४३ पाण्याची उंची ४.५४ मीटर
१४) बुधवार २२ जुलै दुपारी १-२२ पाण्याची उंची ४.६३ मीटर
१५) गुरुवार २३ जुलै दुपारी २-०३ पाण्याची उंची ४.६६ मीटर
१६) शुक्रवार २४ जुलै दुपारी २-४५ पाण्याची उंची ४.६१ मीटर
१८) गुरुवार २० ऑगस्ट दुपारी १२-५५ पाण्याची उंची ४.७३ मीटर
१९) शुक्रवार २१ ऑगस्ट दुपारी १-३३ पाण्याची उंची ४.७५ मीटर
२०) शनिवार २२ ऑगस्ट दुपारी २-१४ पाण्याची उंची ४.६७ मीटर
