Sunday, December 21, 2025

NA, N.A.-R, N.A.-Commercial या तीन शब्दात किती लोक अडकतात

NA, N.A.-R, N.A.-Commercial या तीन शब्दात किती लोक अडकतात
1. NA म्हणजे काय?

'Non-Agricultural" म्हणजे त्या जमिनीवर तुम्ही शेतीशिवाय इतर वापर करू शकता.

पण लक्षात ठेवा सर्व NA जमीन घर बांधायला योग्य नसते

2. NA म्हणजे एक मोठा शब्द, त्याचे उपप्रकार असतात.

➤ N.A.-R = Residential

➤ N.A.-C = Commercial

➤ N.A.-I = Industrial

➤ N.A.-IT = IT/Corporate Zone

3. N.A.-R म्हणजे 'घर बांधायला परवानगी असलेली जमीन पण त्यासाठी लेआउट अप्रूवल, रस्ते, ड्रेनेज, झोनिंसगळं बघावं लागतं फक्त NA-R लिहिलंय म्हणून 'घर लगेच बांधता येतं" असं नाही

4. N.A.-Commercial म्हणजे 'व्यापारी वापरासाठी परवानगी म्हणजे शोरूम, गोदाम, दुकान, हॉटेल, ऑफिस वगैरे पण घर बांधायचं असेल तर कन्वर्जन लागतो

5. फार लोक फसतात 'NA झालं म्हणजे सगळं क्लिअर" या भ्रमात पण NA हा फक्त पहिला टप्पा आहे. त्यानंतर लेआउट अप्रूवल, सब-डिव्हिजन, टाउन-प्लॅनिंग सर्टिफिकेट हे सगळं बघावं लागतं.

6. 'फार्म हाऊस" नावाखाली विकल्या जाणाऱ्या अनेक NA जमिनी अजूनही कृषी झोनमध्ये येतात. म्हणजे कायदेशीर घर बांधायचं नाही फक्त तात्पुरत्या रचनेला परवानगी

7. NA मिळालं म्हणजे 'मालकी हक्क" मिळाला असं नाही अनेक वेळा ती जमीन कलेक्टर लीजर असते म्हणजे वापराचा हक्क तुमचा, पण मालकी सरकारी.

8. NA साठी बघायच्या कागदपत्रंः

7/12 उतारा

टाउन प्लॅन झोनिंग मॅप

1.1K

कलेक्टरचा ऑर्डर कॉपी

फॉर्म 1, फॉर्म 6 (परवानगीची कागदपत्रं)

9. 'NA in process" हा शब्द दिसला की सावध व्हा.

याचा अर्थ तो अजून कृषी जमीनच आहे, आणि पुढे काही अडचण आली तर फसवणूक ठरते.

10. रिअल इस्टेटचा पहिला नियमः

'NA" लिहिलंय म्हणून गुंतवणूक करू नका,

'NOC + Layout Approval + Title Clear" ही तिन्ही गोष्टी एकत्र असतील तरच करा.

Sunday, December 14, 2025

e-KYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

e-KYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत.

सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे, म्हणूनच या महिलांना e-KYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन e-KYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात येत आहे.

या सोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावी, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे.

Sunday, December 7, 2025

पीएम किसान लाभार्थीचे हफ्ते बंद होणार | Pm Kisan Ineligibility new Update

Pm Kisan Ineligibility प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आता पुढील हप्ता मिळविण्यासाठी लाभार्थ्यांना Farmer ID असणे बंधनकारक 

Pm Kisan Ineligibility new Update

Pm kisan प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता अर्थात २२ वा हप्ता हा फक्त Agristack scheme Farmer ID असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.

यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप Farmer ID काढलेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपले Farmer Id काढून घ्यावेत असे आवाहन शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.

एकंदरीत pm kisan 20th installment वितरीत करत असताना Farmer ID बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तशा शासन स्तरावर हालचाली सुरू देखील करण्यात आल्या होत्या.

मात्र यामध्ये काही वेळ सूट देण्यात आली.

आता pm kisan 22th installment वितरण होत असताना मात्र Farmer ID बंधनकारक करण्यात येत आहे.

Pm kisan योजनेत पात्र असलेले लाभार्थी हे नमो शेतकरी महासमान निधी योजनेत पात्र होतात पर्यायाने या दोन्ही योजनाचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांकडे Farmer ID असणे गरजेचे असणार आहे.

शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या जवळच्या CSC केंद्रावर भेटून किंवा Agristack maharashtra च्या पोर्टल वरून Farmer ID साठी नोंदणी करावी.

Saturday, December 6, 2025

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 3.0 || PMUY 3.0 || ऑनलाईन अर्ज सुरु

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 3.0 (PMUY 3.0) ही केंद्र सरकारची दारिद्र्यरेषेखालील (BPL) महिलांना स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन (LPG) पुरवण्यासाठीची योजना आहे, ज्यामध्ये मोफत गॅस कनेक्शन, स्टोव्ह (हॉट प्लेट) आणि पहिले रिफिल दिले जाते, ज्याचा मुख्य उद्देश धुरामुळे होणाऱ्या आरोग्य समस्या टाळणे आहे आणि आता यात ₹300 अनुदान ३ वर्षांसाठी चालू ठेवण्यास मंजुरी मिळाली आहे. 

योजनेचे मुख्य उद्दिष्ट:

गरीब कुटुंबांतील महिलांना धुरापासून मुक्ती देणे.
स्वच्छ इंधन (LPG) उपलब्ध करून देणे.
आरोग्य सुधारणे आणि लाकूड गोळा करण्याचा त्रास कमी करणे.

योजनेचा लाभ (PMUY 3.0 नुसार):

मोफत गॅस कनेक्शन: BPL कुटुंबातील महिलांना.
मोफत LPG स्टोव्ह (हॉट प्लेट): गॅस कनेक्शनसोबत.
पहिले रिफिल मोफत: पहिल्यांदा गॅस भरताना.
सबसिडी: १४.२ किलोच्या सिलेंडरवर प्रति वर्ष १२ रिफिलसाठी ₹300 अनुदान चालू ठेवण्यास मंजुरी

पात्रता निकष (अंदाजे):

भारतीय नागरिक असावे.
१८ वर्षांपेक्षा जास्त वय असावे.
दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबातील महिला असावी.
त्यांच्याकडे LPG कनेक्शन नसावे. 

अर्ज कसा करावा:
अधिकृत PMUY पोर्टल (pmuy.gov.in) ला भेट द्या.
जवळच्या एलपीजी वितरकाशी संपर्क साधा.
आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरा. 

महत्त्वाचे:

ही योजना महिला सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.
2024-25 या आर्थिक वर्षासाठी ₹12,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.