Sunday, June 30, 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
Saturday, March 23, 2024
शेतकऱ्यांना बांबू लागवडी करिता अनुदान देणारी अटल बांबू समृध्दी योजना ( atal bamboo samruddhi scheme )
Sunday, October 8, 2023
जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
Sunday, May 14, 2023
कृषि विभागाने जाहिर सुचना
MahaDBT Online Portal वर शेतकरी योजनाचे लाभ घ्यावे.
विविध योजने अंतर्गत शेतकऱ्यानी ऑनलाईन अर्ज भरणे बाबत दिनांक 15/05/2023 पर्यंत ऑनलाईन सोडत असणार आहे. तरी शेतकऱ्यानी सदरील योजनेच्या घटकासाठी ऑनलाईन अर्ज करावे व शासकीय योजनेचा लाभ घ्यावा.
खालीलप्रमाणे घटक
ट्रैक्टर, रोटाव्हेटर, कल्टीवेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेततळे, प्लास्टीक मल्चींग, रोपवाटिका, फळबाग लागवड, फुल शेती, विदयुत मोटार पंप संच ...
15 मे 2023 नंतर जवळपास 2 ते 3 महिने ऑनलाईन शेतकरी निवड सोडत होणार नाही याची नोंद घ्यावी.
Monday, March 6, 2023
पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकडासह अवकाळी पावसाची हजेरी पिकांना फटका
पालघर विजांच्या कडकडासह अवकाळी पावसाची हजेरी पिकांना फटका

Friday, March 3, 2023
महाडीबीटीवर मोफत सोलर पंप योजना
Sunday, January 1, 2023
प्लास्टिक मल्चींग अनुदान योजना, असा करा अर्ज
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत भाजीपाला, फळपिकाच्या प्लॅस्टिक मल्चिंगसाठी मिळणार अनुदान
प्रतिहेक्टर 16 हजार रुपयांपर्यंत अनुदान देय
कृषी विभागाचे महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
तीन ते चार महिन्याच्या (भाजीपाला) पिकासाठी प्लॅस्टिक मल्चिंग पेपरची जाडी किमान 25 मायक्रॉन असावी. तसेच बारा महिन्याच्या (उदा. पपई) या फळपिकासाठी मल्चिंग पेपरची जाडी किमान 50 मायक्रॉन असावी. तसेच बारा महिन्याच्या वरील (जास्त कालावधीचे फळ पिके) फळपिकासाठी मल्चिंग पेपरची जाडी किमान 100 किंवा 200 मायक्रॉनपेक्षा कमी असू नये.
भाजीपाला व फळ पिकाला प्लॅस्टिक मल्चिंग करण्यासाठी शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत प्रतिहेक्टरी खर्चाच्या पन्नास टक्के म्हणजेच 16 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
प्लॅस्टिक मल्चिंगसाठी प्रति हेक्टरी 32 हजार खर्च अपेक्षित असून, या खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच 16 हजार रुपये प्रतिहेक्टर इतके अनुदान देण्यात येते.
प्लॅस्टिक मल्चिंगसाठी मिळालेला लक्षांक पाहता अर्ज केलेल्या प्रत्येक लाभार्थ्यास योजनेचा लाभ देणे शक्य आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने केले आहे.
Monday, December 26, 2022
अर्ज सुरु आहे ९०% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर
अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वंयसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व उपसाधनासाठी अर्ज करावेतस सहाय्यक आयुक्त समाज कल्याण
अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वंयसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व उपसाधने देण्याकरिता पूढील बाबींची पुर्तता करणाऱ्या स्वंयसहाय्यता बचत गटाकडून दिनांक 15 जानेवारी, 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. स्वंयसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नववैध्द घटकातील असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबैध्द घटकातील असावेत.
मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा 3 लाख 50 हजार लाख इतकी राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरिल कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष किंमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या 90 टक्के (कमाल रू 3 लाख 15 हजार) शासकिय अनुदान अनुज्ञेय राहील.
लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटांनी या योजने अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या किमान 9 ते 18 अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येईल मात्र त्याची या योजने अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदान (रू 3.15 लाख) पेक्षा जास्तीची रक्कम संबंधित बचत गटाने स्वतः खर्च करावी. स्वयंसहाय्यता बचत गटाने राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे व सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे अधार क्रमांशी संलग्न करावे. स्वयंसहाय्यता बचत गटाचे उद्दिष्टापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास निवड लॉटरी पध्दतीने करण्यात येईल.
स्वयंसहाय्यता बचत गटाने मिनी ट्रॅक्टर व खरेदी केल्याचे पावती सादर केल्यानंतर व त्याची खातरजमा करून लाभार्थी बचत गटाला शासकिय अनुदान 50 टक्के हप्ता त्याच्या बचत गटाच्या आधार सलग्न खात्यावर जमा करण्यात येईल.
उर्वरीत 50 टक्के अनुदान मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची आर.टी.ओ. कार्यालयाकडे नोंद झाल्यानंतर बचत गटाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. किंवा स्वयंसहाय्यता बचत गटाने मिनी ट्रॅक व त्याची उपसाधने याची आर.टी.ओ. कार्यालयाकडे पुरावे साधर केल्यास 100 टक्के अनुदान स्वयंसहाय्यता बचत गटाच्या खात्यावर जमा करण्यास येईल. तसेच ज्या बचत गटानी या पूर्वी कार्यालयास अर्ज सादर केलेला आहे. आशा बचत गटानी पुनश्च: अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
या कागदपत्रासह अर्ज परिपूर्ण भरून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुनी डालडा फॅक्ट्री, गूळ मार्केट, लातूर येथे सादर करावेत. 1 एप्रिल 2021 पुर्वी ज्या बचत गटानी अर्ज सादर केलेले आहेत अशा बचतगटानी पुनश्चः अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तरी अनुसूचित जातीच्या जास्तीत जास्त बचत गटानी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण लातूर, यांनी केलेले आहे.
योजनेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे
अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत,
स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत.
स्वयंसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती नवबौध्द घटकांतील असावेत,
मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रु. 3.50 लाख इतकी राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या 10 टक्के स्वयहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या 90 टक्के (कमाल रु.3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील, लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटानी या योजनेतंर्गत अनुज्ञेय असलेल्या किमान 9 ते 18 अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येईल मात्र त्याची या योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदाना ( रु. 3.15 लाख) पेक्षा जास्तची रक्कम संबंधित बचत गटाने स्वत: खर्च करावी.
स्वयंसहाय्यता बचत गटाने राष्ट्रीयकृत बॅकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे व सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी संलग्न करावे,
निवड झालेल्या बचत गटाला निवड झाल्याचे लेखी कळविण्यात येईल. ज्या स्वयंसहाय्यतांना बचत गटांची निवड करण्यात आलेली आहे त्यांनी सदहू यंत्र चालविण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेणे ( परिवहन अधिकारी) व त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
निवड झालेल्या स्वयंसहाय्यता बचत गटाने मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी केल्याची पावती सादर केल्या नंतर व खातर जमा करुन लाभार्थी बचत गटाला शासकीय अनुदानाचा 50 टक्के हप्ता त्यांच्या बचत गटाच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येईल. उर्वरित 50 टक्के अनुदान मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची आरटीओ कार्यालयाकडे नोंद झाल्यानंतर बचत गटाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल किंवा स्वयंसहाय्यता बचत गटाने मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची आरटीओ कार्यालयाकडे नोंद केल्याचे पुरावे सादर केल्यावर 100 टक्के अनुदान स्वयंसहाय्यता बचतगटाचे बँक खात्यात जमा करण्यात येईल.
बचतगटाने खरेदी केलेल्या मिनी ट्रॅक्ट्रच्या दर्शनी भागावर महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत अर्थसहाय्य असे ठळकपणे लिहिण्यात यावे.
या योजनेअंतर्गत बचतगटांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या हेतूने देण्यात आलेला मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने इतर शेतकऱ्यांना भाडेतत्वावर देऊ शकेल मात्र कोणत्याही परिस्थितीत त्या मिनि ट्रॅक्ट्रर व त्याची उपसाधने विकता येणार नाही, अथवा सावकार किंवा अन्य व्यक्तीकडे गहाण ठेवता येणार नाही. लाभार्थ्यांने मिनी टॅक्ट्रस विकल्यास किंवा गहाण ठेवल्यास सदर व्यवहार बेकायदेशीर ठरवून स्वयंसहाय्यता बचत गटांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.
तसेच संबंधित स्वयंसहाय्यता बचत गटांकडून शासनाने मिनी टॅक्ट्रर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीसाठी खर्च केलेली संपूण रक्कम वसूल करण्यात येईल आणि संबंधित बचतगटाला शासनाच्या अन्य योजनांचे लाभ घेण्यास किमान 5 वर्षे अपात्र ठरविले जाईल. अशा आशयाचे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोंदणीकृत हमीपत्र स्वयंसहाय्यता बचत गटांना करुन द्यावे लागेल.
वरील अटी व शर्तीमध्ये जे बचत गट पात्र असतील अशा बचत गटांनी – बचत गट नोंदणी प्रमाणपत्र, नियोजन विभागाच्या 5 डिसेंबर 2016 च्या शासन निर्णयानुसार वस्तु स्वरुपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतरण रोख स्वरुपात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्या बाबतचा निर्णय असल्याने
बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे राष्ट्रीयकृत बँकेचे आधार क्रमांकाशी संलग्न खाते पासबुकाची प्रथम पानाची झेरॉक्स प्रत,
गटातील प्रत्येक सदस्याचे राष्ट्रीयकृत बँकेचे आधार क्रमांकाशी संलग्न खाते पासबुकाची प्रथम पानाची झेरॉक्स प्रत, बचत गटाचे घटनापत्र, बचत गट कार्यकारणी सदस्याची मुळ यादी, सदस्याचा स्वत:चा जातीचा दाखला, कोऱ्या कागदावर फोटोसह बचत गटाची ओळख, मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा अंतर्गत आरटीओ नोंदणी आणि स्थानिक जकात ( लागू असल्यास) आणि विमा उतरविणेचा खर्च बचत गटांना करावयाचा आहे.
Thursday, December 8, 2022
जिल्हास्तरीय योजना - एकदिवशीय सुधारित पक्षांच्या १०० पिल्लांचे वाटप करणे .
योजनेचे नाव - एकदिवशीय सुधारित पक्षांच्या १०० पिल्लांचे वाटप करणे .
टीप :-
१ लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे..
• लाभार्थी निवडीचे निकष - प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )
एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.
अ.क्र.
बाब
एकदिवशीय पक्षांच्या पिल्लांचे गट (१०० पिल्ले)
1
पक्षी किंमत
२,००० /-
2
खाद्यवरील खर्च
१२,४०० /- (८०० किलोग्रॅम)
३
| ३ |
वाहतूक खर्च
१०० /-
४
| ४ |
औषधी
१५० /-
५
| ५ |
रात्रीचा निवारा
१,००० /-
६
| ६ |
खाद्याची भांडी
३५० /-
एकूण किंमत
१६,००० /-
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .
अ.क्र.
प्रवर्ग
एकदिवशीय पक्षांच्या पिल्लांचे गट (१०० पिल्ले)
1
सर्व प्रवर्ग ५० टक्के
८,००० /-
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -
१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
२) * सातबारा (अनिवार्य)
३) * ८ अ उतारा (अनिवार्य)
४) * * अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
५) * आधारकार्ड (अनिवार्य )
६) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
७) * अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय - जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
जिल्हा स्तरीय योजना- तेलंगा गट वाटप करणे
योजनेचे नाव - ८ ते १० आठवडे वयाचा तलंगाच्या २५ माद्या आणि ३ नर वाटप करणे .
टीप :-
१ लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे..
• लाभार्थी निवडीचे निकष - प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )
एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.
अ.क्र. | बाब | जिल्हास्तरीय तलंगा गट(२५ माद्या + ३ नर) |
|---|---|---|
1 | पक्षी किंमत | ३,००० /- |
2 | खाद्यवरील खर्च | १,४०० /- |
| ३ | वाहतूक खर्च | १५० /- |
| ४ | औषधी | ५० /- |
| ५ | रात्रीचा निवारा | १,००० /- |
| ६ | खाद्याची भांडी | ४०० /- |
एकूण किंमत | ६,००० /- |
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .
अ.क्र. | प्रवर्ग | जिल्हास्तरीय तलंगा गट(२५ माद्या + ३ नर) |
|---|---|---|
1 | सर्व प्रवर्ग ५० टक्के | ३,००० /- |
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -
१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
२) * सातबारा (अनिवार्य)
३) * ८ अ उतारा (अनिवार्य)
४) * अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
५) * आधारकार्ड (अनिवार्य )
६) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
७) * अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय - जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
जिल्हास्तरीय योजना - दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे .
योजनेचे नाव - दोन दुधाळ गाई /म्हशीचे अनुसूचीत जाती / जमातीचा लाभार्थींना वाटप करणे .
टीप :-
१ लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे..
• लाभार्थी निवडीचे निकष - प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )
एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.
अ.क्र. | बाब | २ जनावरांचा गट (रक्कम रुपयात ) |
|---|---|---|
1 | संकरित गाई /म्हशी चा गट - प्रति गाय /म्हैस रु. ४०,०००/- प्रमाणे | ८०,००० |
2 | ५.७५ टक्के (अधिक १०.०३ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा विमा | ५,०६१ |
एकूण प्रकल्प किंमत | ८५,०६१ |
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .
अ.क्र. | प्रवर्ग | २ जनावरांचा गट (रक्कम रुपयात) |
|---|---|---|
1 | शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के | ६३,७९६ |
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -
१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
२) * सातबारा (अनिवार्य)
३) * ८ अ उतारा (अनिवार्य)
४) * अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
५) * आधारकार्ड (अनिवार्य )
६) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
७) * अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय - जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
जिल्हास्तरीय योजना - शेळी/ मेंढी गट वाटप करणे
योजनेचे नाव - अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे
टीप :-
1. सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे ह्या जिल्ह्यात मध्ये राबवली जाणार नाही .
2. योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमणेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
3. योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणार्या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
• लाभार्थी निवडीचे निकष - प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )
एका गटातील किंमत खालील प्रमाणे राहील .
अ.क्र. | तपशील | दर(रक्कम रुपयात ) | १० शेळ्या व १ बोकड (रक्कम रुपयात) |
|---|---|---|---|
1 | शेळ्या खरेदी | ८,०००/- प्रति शेळी (ऊस्मानाबाद /संगमनेरी जातीच्या पैदासक्षम ) | ८०,०००/- (१० शेळ्या ) |
2 | बोकड खरेदी | १०,०००/- एक बोकड (ऊस्मानाबाद/संगमनेरी जातीच्या नर ) | १०,०००/- (१ बोकड ) |
3 | शेळ्या व बोकड्याचा विमा (तीन वर्षासाठी ) | १२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर) | रु १३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी ) |
4 | शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च ) | लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित | |
एकूण खर्च | १,०३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी ) |
अ.क्र. | तपशील | दर(रक्कम रुपयात ) | १० मेंढया व १ नरमेंढा (रक्कम रुपयात) |
|---|---|---|---|
1 | मेंढया खरेदी | १०,०००/- प्रति मेंढी (माडग्याळ ) | १,००,०००/- (१० मेंढया ) |
२ | नरमेंढा खरेदी | १२,०००/- एक नरमेंढा (माडग्याळ) | १२,०००/- (१ नरमेंढा ) |
3 | मेंढया व नरमेंढा यांचा विमा (तीन वर्षासाठी ) | १२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर) | रु १६,८५०/- (माडग्याळ जातीसाठी ) |
4 | मेंढ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च ) | लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित | |
एकूण खर्च | १,२८,८५०/- (माडग्याळ जातीसाठी ) |
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .
अ.क्र. | गट | प्रवर्ग | एकूण किंमत | शासनाचे अनुदान | लाभार्थ्याचा स्वहिस्सा |
|---|---|---|---|---|---|
1 | शेळी गट - उस्मानाबादी /संगमनेरी | सर्वसाधारण | १,०३,५४५/- | ५१,७७३/- | ५१,७७२/- |
अनु. जाती व जमाती | १,०३,५४५/- | ७७,६५९/- | २५,८८६/- | ||
2 | शेळी गट - अन्य स्थानिक जाती | सर्वसाधारण | ७८,२३१/- | ३९,११६/- | ३९,११५/- |
अनु. जाती व जमाती | ७८,२३१/- | ५८,६७३/- | १९,५५८/- | ||
3 | मेंढी गट - माडग्याळ | सर्वसाधारण | १,२८,८५०/- | ६४,४२५/- | ६४,४२५/- |
अनु. जाती व जमाती | १,२८,८५०/- | ९६,६३८/- | ३२,२१२/- | ||
४ | दख्खनी व अन्य स्थानिक जाती | सर्वसाधारण | १,०३,५४५/- | ५१,७७३/- | ५१,७७२/- |
अनु. जाती व जमाती | १,०३,५४५/- | ७७,६५९/- | २५,८८६/- |