Sunday, June 30, 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
Monday, March 20, 2023
मृत्युपत्र नेमक काय असते?
Wednesday, November 23, 2022
मतदान कार्ड काढा वयाच्या 17 वर्षी
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदविण्याची तरतूद होती. मात्र आता 17 वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.
मात्र वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच त्यांचे नाव मतदार यादीत येईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही नवीन सुविधा या वर्षापासून उपलब्ध केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी भोसले यांनी ही माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील उपस्थित होते.
भोसले म्हणाले, “मतदारांना नावनोंदणी ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीनी करता येईल. मात्र अर्ज भरून दिल्यानंतर जर पत्ता बदलला असेल, तर त्याची माहिती कळवावी लागेल. {Voter ID Card Online Apply}
अर्जदाराच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मतदान कर्मचारी त्याच्या नावनोंदणीचा अर्ज नमुना-6 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसील कार्यालयात जमा करतील. मतदार यादीतील दुरुस्तीसाठी अर्ज नमुना 8 भरून द्यावा, मृत दुबार व स्थलांतरितांची नावे मतदार यादीतून वगळली जातील. त्यासाठी अर्जनमुना 7 भरून द्यायचा आहे.
मतदान कार्ड काढा वयाच्या 17 वर्षी
मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांतून जनजागृती केली जात आहे. याशिवाय 19, 20 नोव्हेंबर, 3 व 4 डिसेंबरला विशेष पडताळणी केली जाईल. निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2023 “Voter ID Card Online Apply”
पर्यंत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. हा कार्यक्रम 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत राबविला जाईल. प्रारूप यादी प्रसिद्ध केली आहे. हरकती व दावे 8 डिसेंबरपर्यंत स्वीकारले जातील. 26 डिसेंबरला ते निकाली काढले जातील. अंतिम मतदार यादी 5 जानेवारीला प्रसिद्ध होईल
Friday, September 9, 2022
मतदान कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया
मतदान कार्ड ला आधार कार्ड मोबाईल द्वारे लिंक करणे
चला तर मग मतदान कार्ड आणि आधार कार्ड मोबाईल द्वारे एकमेकांशी कसे लिंक करायचे
स्टेप 1:
मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हला तुमच्या गुगल मध्ये जाऊन NVSP सर्च करायचे आहे, जो पहिला रिझल्ट येईल त्यावर क्लिक करायचे आहे किंवा तुम्ही या लिंकला www.nvsp.in क्लिक करून थेट NVSP चे पोर्टल ओपन करू शकता.

स्टेप 2:
NVSP चे पोर्टल ओपन झाल्यावर तुम्हाला Login/Register या बटन वर क्लीक करायचे आहे.
अधिक माहिती – तुम्हाला या पेज वर जी फॉर्म ची लिस्ट दाखवली जात आहे याचा अर्थ म्हणजे तुम्ही या पोर्टलवर पुढील फॉर्म ऑनलाईन भरू शकता. जो फॉर्म मतदान कार्ड आणि आधार कार्ड लिंक करून देतो त्याचे नाव आहे Form 6B-Information of Aadhaar Number by Existing Electors
स्टेप 3:
तुमचे जर NVSP पोर्टल वर आधीपासून अकाउंट असेल तर तुम्ही तुमचे Username व Password टाकून लॉग इन करा. पण जर तुमचे अकाउंट नसेल तर खाली एक ऑपशन दिला आहे, Don’t have account, Register as a new user या ऑपशन वर क्लीक करायचे आहे.

स्टेप 4:
आता या पोर्टल वर नवीन अकाउंट उघडण्याची प्रक्रिया बघू: आता नवीन पेज वर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून दिलेला कॅपचा (Captcha) टाकायचा आहे, व Send OTP या बटन वर क्लिक करायचे आहे. ओटीपी आल्यानंतर तो दिलेल्या बॉक्स मध्ये टाकायचा आहे व नंतर Verify OTP या बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 5:
आता नवीन पेज उघडेल त्यावर तुम्हाला दोन ऑपशन दिसतील
- I have EPIC number
- I don’t have EPIC number
या दोघांपैकी तुम्हाला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. व खाली दिलेल्या बॉक्स मध्ये तुमचा EPIC नंबर म्हणजेच तुमचा मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा ई-मेल आयडी टाकायचा आहे व नंतर पासवर्ड क्रिएट करायचा व पुन्हा तोच पासवर्ड टाकून कन्फर्म करायचा आहे. व नंतर Register या बटन वर क्लीक करायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला You are Register Successfully असा मेसेज येईल व तुमचा अकाउंट तयार होऊन जाईल.
नोट – तुम्ही आता भरलेली माहिती तुम्हाला पुढच्या वेळी या पोर्टल वर लॉगिन करताना उपयोगी पडणार आहे.
स्टेप 6:
आता पोर्टल तुमचे अकॉउंट ऑटोमॅटिक लॉगिन करेल आणि तुम्हाला नवीन पेज वर घेऊन जाईल (संदर्भासाठी खालचा फोटो बघा), जर असे झाले नाही तर स्टेप 3: मध्ये सांगितल्या प्रमाणे तुम्हाला पोर्टल वर Username व Password टाकून लॉगिन करायचे आहे.
आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यातील तीन नंबर चा ऑपशन (Information of Aadhaar Number by Existing Electors) वर क्लिक करायचा आहे.

स्टेप 7:
त्यानंतर तुमच्या समोर काही फॉर्म ओपन होतील, त्यातील Form 6B चा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. त्या फॉर्म वर क्लिक करा.

स्टेप 8:
या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमचं नाव, आडनाव, मतदान कार्ड नंबर, वगैरे माहिती दिसेल ही सर्व माहिती बरोबर आहे का ते चेक करायचे आहे.
स्टेप 9:
आता वेळ आली आहे ती तुमचा आधार कार्ड नंबर लिंक करण्याची. तुमची माहिती चेक करून झाल्यानंतर थोडे खाली स्क्रोल करा, तुम्हाला दोन ऑपशन दिसतील
- I have Aadhaar Number
- I am not able to furnish my Aadhaar Number…
यातील तुम्हाला पहिला ऑपशन निवडायचा आहे (I have Aadhaar Number) याचा अर्थ तुमच्याकडे तुमचा आधार नंबर आहे. आता तुमचा मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, आधार नंबर आणि त्याखाली Place या ऑपशन मध्ये तुमच्या गावाचं नाव टाकायचे आहे. व नंतर खाली दिलेला कॅपचा टाकायचा आहे व नंतर Preview या बटन वर क्लीक करायचे आहे.

जर तुम्ही आधार कार्ड तयार केले नसेल तर दुसरा ऑपशन (I am not able to furnish my Aadhaar Number… ) निवडावा लागेल आणि खाली सांगितलेले कागदपत्रे (लायसन्स, पॅन कार्ड, वगैरे…) अपलोड करावी लागतील.
स्टेप 10:
मित्रांनो, Preview बटन वर क्लीक केल्यानंतर तुम्ही टाकलेली माहिती दिसेल ती सगळी माहिती चेक करून घ्या. बरोबर असेल तर वरती Print चा ऑपशन दिसेल त्यावर क्लीक करून त्याची प्रिंट काढू शकता किंवा त्याचा स्क्रिन शॉट पण काढू शकता.
आता ही माहिती आपल्याला सबमिट करायची आहे. त्यासाठी खाली दिलेल्या Submit या ऑपशन वर क्लीक करायचे आहे.
स्टेप 11:
नंतर तुम्हाला इथे एक Reference ID दिला जाईल. तो तुम्ही Save करून ठेवायचा आहे. कारण तो Reference ID तुम्हाला नंतर स्टेटस चेक करण्यासाठी लागणार आहे (म्हणजेच तुमचे लिंकिंचे काम कुठेपर्यंत आले आहे ते तपासण्यासाठी).

स्टेप 12:
तुमचे मतदान कार्ड व आधार कार्ड लिंक झाले की नाही ते पाहण्यासाठी तुम्ही Track status मध्ये तुमचा Reference ID टाकून तुम्ही तुमच स्टेटस चेक करू शकता.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण मतदान कार्ड व आधार कार्ड एकमेकांशी लिंक करण्याची पूर्ण प्रोसेस म्हणजेच माहिती बघितली.
Monday, August 8, 2022
मतदार नोंदणी संधर्भात निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय | voter registration 2022
मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी युवावर्गाला अधिक संधी
नाव नोंदणीकरता वर्षातून चार वेळा संधी उपलब्ध, एक जानेवारी या पात्रता तारखेसाठी प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही.
17+वयोगटातील तरुणांना आगाऊ नोंदणीची सुविधा
17 वर्ष पूर्ण झालेल्या युवकांना आता त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवण्यासाठी आगाऊ नोंदणीची सुविधा उपलब्ध असून त्यासाठी त्यांना 1 जानेवारी रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण असण्याच्या पात्रतेसाठी प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी, सहायक निवडणूक नोंदणी अधिकारी यांना यासंदर्भातील निर्देश दिले आहेत.
युवकांना, त्यांचे नाव नोंदणीचे अर्ज एक एप्रिल, एक जुलै आणि एक ऑक्टोबर या पात्रता तारखांच्या कालावधीत दाखल करता यावेत, त्यासाठी त्यांना एक जानेवारीची प्रतीक्षा करायला लागू नये यादृष्टीने तंत्रज्ञानावर आधारित आवश्यक उपाय योजावेत असे निर्देश देण्यात आले आहेत.
यापुढे दर तिमाहीत मतदारयाद्या अद्ययावत केल्या जातील. त्यामुळे पात्र युवक-युवतींची नाव नोंदणी त्या वर्षाच्या पुढील तिमाहीत केली जाऊ शकते ज्यामध्ये त्याने/तिने 18 वर्षे पात्रता पूर्ण केली आहे.नाव नोंदणी केल्यानंतर त्याला / तिला एक मतदार ओळखपत्र दिले जाईल.
सन 2023च्या मतदार यादीच्या वार्षिक पुनरिक्षणाच्या सध्याच्या फेरीसाठी, एक एप्रिल, एक जुलै आणि एक ऑक्टोबर 2023 पर्यंत 18 वर्षे पूर्ण करणारा कोणताही नागरिक मतदार यादीचे प्रारूप प्रकाशन प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून मतदार म्हणून नोंदणीसाठी आगाऊ अर्ज सादर करू शकतो.
भारतीय निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायदा 1950 च्या कलम 14(b) मधील कायदेशीर सुधारणांच्या अनुषंगाने आणि पर्यायाने मतदार नोंदणी नियम, 1960 मध्ये आवश्यक ते बदल करून विधानसभा किंवा संसदीय मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या तयारी/पुनरिक्षणासाठी आवश्यक बदल करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या धोरणानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये,आगामी वर्षाच्या एक जानेवारी या पात्रता तारखेच्या संदर्भात मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण किंवा पुनरीक्षण प्रत्येक वर्षाच्या उत्तरार्धात (साधारणपणे वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत) केले जात होते. जेणेकरून मतदार याद्यांचे अंतिम प्रकाशन येणाऱ्या वर्षाच्या जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात केले जात असे.
आयोगाने आता मतदार नोंदणी अर्ज अधिक सोपा आणि सुलभ केला आहे. हा नवीन सुधारित अर्ज 1 ऑगस्ट 2022 पासून लागू होईल, 1 ऑगस्ट 2022 पूर्वी प्राप्त झालेल्या जुन्या स्वरूपातील सर्व अर्ज (दावे आणि हरकती) प्रक्रिया करून त्यांचा निपटारा केला जाईल आणि अशा प्रकरणांमध्ये नव्याने अर्ज दाखल करण्याची आवश्यकता असणार नाही.
मतदार केंद्र सुसूत्रीकरण
वार्षिक आढावा सराव पद्धतीनुसार, दिलेल्या वेळापत्रकानुसार आणि मतदान केंद्रावरील मॅन्युअल, 2020 मध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे 1500 पेक्षाजा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रात प्रारूप मतदार याद्यांच्या प्रकाशनापूर्वी सुधारणा केली जाईल.
इलेक्ट्रॉनिक मतदार ओळखपत्र – आधार जोडणी
मतदार यादीतील माहिती आणि मतदाराचा आधार क्रमांक लिंक करण्यासाठी, सुधारित नोंदणी अर्जात मतदारांच्या आधार कार्डाचे तपशील नमूद करण्यासाठी माहिती विचारण्यात आली आहे. तसेच सध्याच्या मतदारांचा आधार क्रमांक कळावा या उद्देशाने 6बी हा एक नवीन अर्ज देखील सादर करण्यात आला आहे. मात्र आधार क्रमांक सादर करणे अशक्य झाल्यास किंवा तशी माहिती पुरवण्यास असमर्थ ठरलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार नाहीत किंवा आधार क्रमांकाअभावी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठीचा कोणताही अर्ज नाकारला जाणार नाही.
अचूक मतदार याद्यांसाठी क्षेत्र पडताळणी आणि अधिक काळजीपूर्वक तपासणी
अचूक आणि अद्ययावत मतदारयादी तयार करण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने बूथस्तरीय अधिकाऱ्यांकडून मतदार क्षेत्र पडताळणी करण्यावर भर दिला आहे.



