Friday, February 6, 2026
भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी अर्जाचा नमूना | varg 2 jamin
Sunday, December 21, 2025
NA, N.A.-R, N.A.-Commercial या तीन शब्दात किती लोक अडकतात
Sunday, May 7, 2023
नॉनस्टॉप दस्तनोंदणी सुरू राहणार
Saturday, April 1, 2023
वारस हक्क लावण्यासाठी हेअरशिप सर्टिफिकेट आवश्यक
आपण वारसा हक्क प्रमाणपत्र जंगम मिळकतींसाठी लागणाऱ्या सक्सेशन सर्टिफिकेटबद्दल माहिती घेतली. या लेखाद्वारे आता स्थावर मिळकतींबाबत लागणारे हेअरशिप सर्टिफिकेटबद्दल थोडक्यात माहिती घेऊ.
सर्टिफिकेटचा उपयोग
कोटाने दिलेले हेअरशिप सर्टिफिकेट हे संबंध भारतभर बंधनकारक असते आणि ते कोणीही नाकारू शकत नाही. ज्या व्यक्तीच्या नावाने सर्टिफिकेट असते त्या व्यक्तीस संबंधित मिळकतीबाबतीत सर्व प्रकारचे व्यवहार करता येतात. मात्र, अशा सर्टिफिकेटमुळे मालकी हक्क मिळाला असे म्हणता येत नाही.
सर्टिफिकेट रद्द होऊ शकते
असे सर्टिफिकेट हे अर्जदाराने खोटेपणा करून, कोर्टाची फसवणूक करून प्राप्त करून घेतल्याचे सिद्ध झाल्यास कोटला ते रद करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यासाठी सक्सेशन सर्टिफिकेटपटलच्या इंडियन सक्सेशन ऍक्ट १९२५ च्या (उदा. कलम ३७२ ते ३९०) तरतुदीचा वापर केला जातो.
पब्लिक नोटीस आवश्यक
अर्ज केल्यावर कोर्ट इतर वारसांना नोटिसा काढते, तसेच सायटेशन/प्रोक्लमेशन नामक नोटीसदेखील कोर्टाकडून प्रसिद्ध केली जाते आणि कोर्टाच्या आवारात किया मृत व्यक्तीच्या पत्याच्या जागी ती चिटकविली जाते. तसेच वर्तमानपत्रामध्ये पब्लिक नोटीस देखील दिली जाते जेणेकरून कोणाला काही हरकत असल्यास त्याची नोंद व्हावी, जर कुठलीही हरकत आली नाही तर कायद्याप्रमाणे पुरावे, कागदपत्रे, आदी सिद्ध आल्यावर कोर्ट हेअरशीप सर्टिफिकेट अर्जदाराच्या नावाने योग्य त्या अटी-शर्तीसह रुजू करते. जर का कोणी हरकत घेतली. तर मात्र असा अर्ज हा एखाद्या दाव्याप्रमाणेच गुणदोषांवर चालतो.
सर्टिफिकेटसाठी कोर्ट फी
कुठलेही दावे दाखल करताना दाव्याची संपूर्ण कोर्ट फी ही दाव्याच्या व्हॅल्यूएशनप्रमाणे सुरुवातीलाच भरावी लागते, दाव्याचा निकाल मग काहीही लागो. मात्र, 'हेअरशीप सर्टिफिकेट बाबतीत अंतिम ऑर्डर झाल्याच्या दिवशी त्या मिळकतीची जी
बाजारभावाप्रमाणे किंमत असेल, त्यावर कोर्ट फी भरावी लागते आणि सध्या राज्यापुरते बोलायचे झाल्यास जास्तीत जास्त ७५ हजार रुपये इतकी कोर्ट फी भरावी लागू शकते.
इतर कोर्ट प्रकरणामध्ये मूळ प्रत कोटांत राहते आणि त्याची सही शिक्क्यांची प्रमाणित प्रत अर्जदाराला मिळते. मात्र, हेअरशीप सर्टिफिकेट हे स्टॅम्पवर टाईप होऊन मूळ प्रत अर्जदाराला दिली जाते.
समजा एखाद्या व्यक्तीला कोणीही वारस नसतील, तर कोटला अशा व्यक्तीच्या मिळकतीसंदर्भात सक्षम प्रशासकाची (अँडमिनिस्ट्रेटर) योग्य त्या अटी आणि शर्तीवर नेमणूक करण्याचा अधिकार या कायद्याखाली आहे.
Monday, March 20, 2023
मृत्युपत्र नेमक काय असते?
Friday, March 17, 2023
पालघर जिल्हयातील द्रुतगती महामार्ग भूसंपादन गैरव्यवहार
Friday, March 3, 2023
महाडीबीटीवर मोफत सोलर पंप योजना
Sunday, December 25, 2022
वडिलोपार्जित जमीनीचे वाटप करायचंय? दुय्यम निबंधक कार्यालयात जायची गरज नाही
Friday, December 16, 2022
जमीनीची शासकीय मोजणी
Tuesday, November 15, 2022
अल्प भूधारक, अत्यल्प भूधारक आणि बहु भूधारक याविषयी सविस्तर माहिती
अल्प भूधारक, अत्यल्प भूधारक की बहु भूधारक ? farmer categorization
मात्र आपल्याला याबद्दल माहिती नसल्याने आपण गोंधळून जातो. आपणास माहिती नसल्याने चुकीचा प्रवर्ग नोंदविला जातो म्हणून आज ही माहिती समजून घेऊयात.
देशात शेती ( Operational holdings ) तीन सामाजिक गटामध्ये वर्गीकृत आहे. उदाहरणार्थ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व इतर. Scheduled Castes, Scheduled Tribes and Others.
या वर्गातील शेतीचेही शासनाने २०१५ – १६ च्या ताज्या कृषी जनगणणेनुसार देशातील परिचालन ( provisional ) होल्डिंगचा राज्यवार सरासरी आकार निश्चित केला आहे. Categorisation of farmers मध्ये जमीन धारणा ( jamin dharna – land holdings) पाच प्रकारामध्ये विभागली आहे.
Marginal farmers अत्यल्प भूधारक शेतकरी marginal farmers land holding
अत्यल्प भूधारक शेतकरी – ज्या शेतकऱ्यांकडे १ हेक्टर अर्थात २.५ एकर पेक्षा कमी क्षेत्र आहे, अशे शेतकरी या गटात मोडतात. Below 1.00 hectare
Small farmers अल्प भूधारक शेतकरी
अल्प भूधारक शेतकरी – ज्या शेतकऱ्यांकडे १ हेक्टर पेक्षा जास्त मात्र २ हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे अर्थात २.५ एकर पासून ५ एकर पर्यंत क्षेत्र असलेले शेतकरी या गटात मोडतात. 1.00-2.00 hectare
Semi- Medium farmers अर्ध मध्यम भूधारक शेतकरी
अर्ध मध्यम भूधारक शेतकरी – ज्या शेतकऱ्यांकडे २ हेक्टर पेक्षा जास्त मात्र ४ हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे अर्थात ५ एकर पासून १० एकर पर्यंत क्षेत्र असलेले शेतकरी या गटात मोडतात. 2.00-4.00 hectare
Medium farmers मध्यम भूधारक शेतकरी
मध्यम भूधारक शेतकरी – ज्या शेतकऱ्यांकडे ४ हेक्टर पेक्षा जास्त मात्र १० हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे अर्थात १० एकर पासून २५ एकर पर्यंत क्षेत्र असलेले शेतकरी या गटात मोडतात. 4.00-10.00 hectare
Large farmers बहु भूधारक शेतकरी
बहु भूधारक शेतकरी – ज्या शेतकऱ्यांकडे १० हेक्टर पेक्षा जास्त जमीन आहे अर्थात २५ एकर पर्यंत क्षेत्र असलेले शेतकरी या गटात मोडतात. 10.00 hectare and above
या पाच प्रकारातील तीन प्रकार मुख्यत्वे वापरले जातात ज्यात अत्यल्प भूधारक शेतकरी, अल्प भूधारक शेतकरी, बहु भूधारक शेतकरी.
अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने, केंद्र सरकार उत्पादन-केंद्रित दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या उत्पन्न-केंद्रित उपक्रमांकडे, चांगल्या आणि नवीन तांत्रिक उपायांवर लक्ष केंद्रित करून हस्तक्षेप करत आहे.
यामध्ये, या शेतकऱ्यांकरीता सिंचनासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (PMKSY), परंपरागत कृषी विकास योजना (PKVY), मृदा आरोग्य कार्ड ( Soil health card ), नीम कोटेड युरिया, राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियान (NMSA) अंतर्गत पर्जन्य क्षेत्र विकास ( koradvahu kshetr vikas ), प्रधानमंत्री फसल विमा योजना ( PMFBY) यासारख्या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे.
pm kisan, Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana (PMKSY), Paramparagat Krishi Vikas Yojana (PKVY), Soil Health Card, Neem Coated Urea, Rainfed Area Development under National Mission for Sustainable Agriculture (NMSA), Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY), National Agriculture Market scheme (e-NAM), National Food Security Mission (NFSM), National Mission on Oilseeds & Oilpalm (NMOOP),
याचबरोबर राष्ट्रीय कृषी बाजार योजना (e-NAM), राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM), राष्ट्रीय तेलबिया आणि तेलपाम (NMOOP), फलोत्पादनाच्या एकात्मिक विकासासाठी मिशन (MIDH), राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY), नॅशनल मिशन ऑन अॅग्रिकल्चर एक्स्टेंशन अँड टेक्नॉलॉजी (NMAET) इ. योजना ही राबविल्या जात आहेत.
या व्यतिरिक्त, शेतकऱ्यांना केंद्रीत प्रचार मोहीम, किसान कॉल सेंटर्स (KCC), अॅग्री-क्लिनिक आणि उद्योजकांचे अॅग्री-बिझनेस सेंटर्स (ACABC), कृषी मेळे आणि प्रदर्शने, यांद्वारे शेती विषयक माहिती दिली जात आहे. National Mission on Agriculture Extension & Technology (NMAET) etc. In addition, farmers are provided information through Focused Publicity Campaigns
शेतकऱ्यांसाठी महत्वाचे किसान एसएमएस पोर्टल ( Kisan SMS Portalhttps://mkisan.gov.in/ ) सुध्धा राबविले जात आहे
Tuesday, November 8, 2022
सातबारा उतारा आणि 8 अ उतारा यांची ऑनलाईन सेवा उपलब्धता
- 1st आपल्याला bhulekh.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर जाव लागेल.
- मुख्यपृष्ठावर आल्यानंतर तुम्हाला “विभाग निवडा” या वरून तुमचा विभाग निवडून क्लिक करा.
![]() |
| 7/12 Utara in Marathi online |
- आता तुम्हाला ७/१२ काढायचा असेल तिथे पर्याय निवडा ८अ काढायचा असेल तर तिथे दोन पर्याय आहेत त्यपैकी एक पर्याय निवडा मी पुणे घेतला आहे.
- तुमचा जिल्हा, तालुका, व गावचे नाव निवडून घ्या, महाभुलेख ७/१२ उतारा पुणे खाली दर्शविला आहे ते पाहू शकता.
- 7/12 Utara in Marathi online Mahabhumilekh
- 7/12 Utara in Marathi online
- त्यानंतर तुम्ही तुमचे नाव किवा गट नंबर टाकून शोधा बटनावर क्लिक करा.
- नंतर तुम्हाला खूप नवे दिसतील त्यामधले तुमचे नाव तुम्ही निवडा व तुमचा मोबाईल नंबर टाकून पुढे तुम्हाला एक सुरक्षा अक्षरी आहे तसा खाली टाका.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा सात बारा किवा ८अ दिसेल.
- CONCLUSION
- भूलेख महाभूमी म्हणजेच महाराष्ट्र भूमि अभिलेख हे महाराष्ट्र राज्यातील एक भूमी अभिलेख वेबसाइट आहे जी नागरिकांना 7/12 उतारा, 8 ए आणि मालमत्ता कार्ड (property card) मराठीत ऑनलाइन प्रदान करते. *7/12 Utara in Marathi Online”
- सर्वात महत्वाचे – या संकेतस्थळ वरील सात बारा व ८अ तुम्ही सरकारी कामासाठी वापरू शकत नाही.
- 7 12 का म्हणतात?
- हे नाव महाराष्ट्र जमीन महसूल नियमावलीतून आले आहे. उतारा क्रमांक सात आणि बारा हे गाव फॉर्म क्रमांक दर्शवतात.
Sunday, November 6, 2022
भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी अर्ज
जो खातेदार फार पूर्वी पासून जमिनीचा कब्जेदार असून त्याला सदर जमिन विकण्याचा पूर्ण अधिकार बहाल केला आहे. अशा जमीनींचा खातेदाराचा वर्ग 1 मध्ये समावेश होतो. या जमिनी विक्री / हस्तांतरण कामी कोणत्याही शासकीय पूर्वपरवानगीची गरज नाही. थोडक्यात, मुळ मालकीची वडलोपार आलेली जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये असते.
ज्या जमिनी खातेदाराला विकण्याचा अधिकार बहाल केला नाही.असा खातेदार म्हणजेच भोगवटादार वर्ग 2 होय. उदा. देवस्थान इमानी जमीन,हैद्राबाद अतियात जमिनी, वतन जमीन, वन जमीन, गायरान, पुन पुनर्वसनाच्या जमीनी व शासनाने दिलेल्या जमिनींचा समावेश होतो.अशा जमीनी विक्री साठी शासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते.
Wednesday, April 13, 2022
ड्रोनद्वारे गावठाण भूमापन
पालघर दि. 13 :- राज्यातील सर्व गावांच्या गावठाणामधील जमीनींचे GIS आधारीत सर्वेक्षण व भूमापन करणेबाबतचा गावठाण जमाबंदी प्रकल्प ग्रामविकास विभाग, जमाबंदी आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय व भारतीय सर्वेक्षण विभाग, भारत सरकार यांच्या संयुक्त सहभागाने राबविण्यास महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील दि.२२/०२/२०१९ चे शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. ड्रोनद्वारे गावठाण भूमापन हा प्रकल्प महत्वकांक्षी व जनताभिमुख प्रकल्प असुन सदर प्रकल्पामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन अचुक व जलद गतीने मोजणी काम होणार आहे.
ड्रोन गावठाण प्रकल्पाची वैशिष्टे व फायदे
ड्रोन द्वारे गावठाण भूमापन योजनेमुळे गावठाणातील मालमत्तांचे जी. आय.एस. आधारित रेखांकन व मुल्यांकन करणेत येणार असून गावठाणातील प्रत्येत घराचा नकाशा तयार केला जाणार आहे. गावठाणातील प्रत्येक घर, खुली जागा, रस्ता. गल्ली, नाला यांना नगर भूमापन क्रमांक देण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ च्या तरतुदीनुसार गावठाणातील प्रत्येक मिळकतींच्या मिळकत पत्रिका तयार केल्या जाणार असून त्यांचे वाटप केले जाणार आहे. सदर योजनेमुळे गावातील ग्रामपंचायतींचे व शासनाचे अॅसेट रजिस्टर तयार करणेत येणार आहे.
महास्वामित्व ड्रोन गावठाण योजनेमुळे शासनाच्या मिळकतींचे संरक्षण होणार असून ग्रामस्थांना त्यांचे मालकी हक्काचा नकाशा व अभिलेख मिळकत पत्रिका (Property Card) मिळणेस मदत होणार आहे. मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे ग्रामस्थांना घरावर कर्ज घेणेची सुविधा उपलब्ध होणार असून मिळकतींना बाजारपेठेमध्ये तरलता आल्यामुळे गावाची आर्थिक पत उंचवणेस मदत होणार आहे. ग्रामपंचायतींना गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मुलन करणे यासाठी अचुक अभिलेख व नकाशा उपलब्ध होणेस सदर योजनेमुळे मदत होणार आहे.
सदर योजना ही ग्रामविकास विभाग, भूमि अभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण विभाग यांचे संयुक्त सहभागाने राबविण्यात येत असुन सदर योजनेच्या यशस्वीतेकरीता ग्रामसहभाग व जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे.
महास्वामित्व योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यामध्ये ड्रोन सव्र्व्हसाठी एकुण ७७० गावे उपलब्ध असून त्यापैकी वसई | तालुक्यातील ४५ गावांचे ड्रोन फ्लाइंग मागील महामध्ये पुर्ण झाले असून पुढील काम प्रगतीपथावर आहे. उपअधीक्षक भूमि अभिलेख, पालघर यांनी त्यांचेकडील १२४ गावांचा ड्रोन फ्लाइंग कार्यक्रम दिनांक ११/०४/२०२२ पासुन निश्चित केला असून सदर दौरा कार्यक्रमानुसर भारतीय सर्वेक्षण विभाग यांचेकडून सदर १२४ गावांमध्ये ड्रोन फ्लाइंग केले जाणार असून जनतेने याबाबत भारतीय सर्वेक्षण विभाग यांचेकडील प्रतिनिधींना व प्रशासकीय कर्मचा-यांना सहकार्य करावे.असे आवाहन महेश इंगळे , जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, यांनी केले.



