Friday, October 24, 2025
आयुष्मान भारत योजना I आयुष्मान भारत कार्ड यांची परिपूर्ण माहिती
Sunday, June 30, 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
Monday, May 15, 2023
रात्री दहापर्यंत चालेल आपला दवाखाना; पैसे न घेता तपासणी
राज्य सरकारने मुंबईसह राज्यभरात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सातशे दवाखाने सुरू केले जाणार असून, पालघर जिल्ह्यात आतापर्यंत आठ तालुक्यांत हे दवाखाने सुरू झालेले आहेत. मुंबईसह राज्यभरातील महापालिका आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी दिसून येते. अगदी ताप, सर्दी अशा आजारांसाठीही रुग्णांना उपचार आणि वैद्यकीय टेस्ट करण्यासाठी घरापासून दूर हॉस्पिटल गाठावे लागते. यावर उपाय म्हणून दर २५ ते ३० हजार वस्तींमागे आपला दवाखाना सुरू करण्यात आलेला आहे.
- मोफत तपासणी व मोफत उपचार
- विनामूल्य उपचार
- "आपला दवाखाना पालघरमध्ये आठ 'आपला दवाखाना'
Friday, November 25, 2022
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील रहिवाशांसाठी राबविण्यात येणारी एक आरोग्य विमा योजना आहे. राज्यात यापूर्वी सुरू असलेली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेला विराम देऊन आणि त्यात आवश्यक ते सुधार करून नव्या रीतीने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना दिनांक 2 ऑक्टोबर 2016 पासून राबविण्यात आली. या योजनेद्वारे राज्यातील नागरिकांना शाश्वत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे शासनाचे धोरण आहे.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनाशी संलग्न करून दोन्ही योजना दिनांक 01 एप्रिल 2020 पासून राज्यात राबविण्यात येत आहेत. या योजने अंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष रुपये 150000/-( दीड लाख ) पर्यंत मेडिकल व सर्जिकल उपचार तसेच किडनी प्रत्यारोपणासाठी रुपये 250000/- (अडीच लाख ) पर्यंत उपचाराचा लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्ष रुपये 500000/- ( पाच लक्ष ) पर्यंत उपचाराचा लाभ मिळेल. या लेखाद्वारे आम्ही आपणास या योजने बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत जसे की योजनेचे उद्देश, लाभ घेण्यास पात्र लाभार्थी, लागणारी महत्त्वाची कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, रुग्णालयांची यादी आणि समाविष्ट केलेले आजार इत्यादी.

योजनेचे उद्दिष्ट
एकत्रित ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत राज्यातील दारिद्र्य रेषेखालील तसेच दारिद्र्य रेषेवरील कुटुंबांना विविध गंभीर आजारांवर मोफत उपचार प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केलेली आहे. राज्यातील जास्तीत जास्त रुग्णालयांचा समावेश या योजनेत करून अधिकतर रुग्णांना जवळच्याच रूग्णालयात उपचार मिळावा हे शासनाचे उद्देश्य आहे. त्याकरिता शासनाने शासकीय रुग्णालयां सोबतच खाजगी रुग्णालयांचाही यामध्ये समावेश केलेला आहे. कोविंड-19 तसेच म्युकरमायकोसीस या साथ रोगाच्या आजारावरील उपचारही या योजनेअंतर्गत समाविष्ट करून राज्यातील सर्व नागरिकांना याचा लाभ घेता यावा आणि उपचाराचा आर्थिक भार नागरिकांवर पडू नये हे शासनाचे उद्देश्य आहे.
Xxxxxxxxxxxxxxxxxxccccccxxxxxx
लाभ घेण्यास पात्र लाभार्थी
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे ज्यांच्याकडे पिवळ्या रंगाची शिधापत्रिका ( रेशन कार्ड ) आहे.
- दारिद्र्य रेषेवरील कुटुंबे ज्यांच्याकडे केशरी रंगाची शिधापत्रिका ( रेशन कार्ड ) आहे.
- अन्नपूर्णा योजना तसेच अंत्योदया अन्न योजना शिधापत्रिका धारक कुटुंबे.
- बांधकाम कर्मचारी व त्यांची कुटुंबे.
- औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा असे एकूण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका असणारे शेतकऱ्यांची कुटुंबे.
- शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी.
- महिला आश्रमातील महिला.
- वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक.
- अनाथालयातील मुले.
लागणारी महत्त्वाची कागदपत्रे
- पासपोर्ट साईज फोटो.
- आधार कार्ड.
- पत्त्याचा पुरावा.
- शिधापत्रिका (राशन कार्ड).
- विभागाने दिलेले ओळखपत्र.
- उत्पन्नाचा दाखला.
- शासकीय किंवा खाजगी डॉक्टर कडून रोग निदान प्रमाणपत्र.
योजनेअंतर्गत महत्त्वाच्या बाबी
- या योजनेअंतर्गत शासकीय तथा खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या एकुण 973 रुग्णालयांचा समावेश करण्यात आलेला आहे.
- ही योजना पूर्णपणे रोकड विरहित ( Cashless ) आहे.
- आरोग्यमित्र : योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या रूग्णालयात शासनातर्फे आरोग्य मित्राची नेमणूक करण्यात येईल. आरोग्य मित्र हे रुग्णांचे वेळोवेळी मार्गदर्शन करतील. रुग्णांकडे असलेल्या रेशन कार्डच्या मदतीने रुग्णांची नोंद करण्याची जबाबदारी आरोग्य मित्रावर असेल. रुग्णालयाला नियमितपणे भेट देणे आणि रुग्णाला योजनेचा सर्व लाभ मिळत असल्याचे सुनिश्चित करणे ही जबाबदारी आरोग्य मित्राची राहील. रूग्णालयात दाखला मिळाल्यापासून तर रुग्ण घरी जाईपर्यंत आरोग्यमित्र हे रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांना संपूर्ण सहकार्य करतील.
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत 1100 पद्धतींचे रोग उपचार आणि शस्त्रक्रिया समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.
- या 1100 पद्धतीमधील 111 उपचार पद्धती / शस्त्रक्रिया पद्धती शासकीय रुग्णालय यांच्यासाठी राखीव असतील.
- या 1100 रोग उपचार शस्त्रक्रिया पद्धतीमधील 127 पाठपुरावा सेवा देखील (सर्जिकल आणि मेडिकल) रुग्णालयात मार्फत देण्यात येतील.
- योजनेत समाविष्ट रुग्णालयांनी उपचारास नकार दिला किंवा हलक्या दर्जाच्या सेवा पुरवल्या तर त्याबाबत शासनाकडून त्या रुग्णालयावर पॅकेज रकमेच्या पाचपट दंड आकारण्याची तरतूद शासनाने केलेली आहे.
योजनेअंतर्गत देण्यात येणारे उपचार
- सर्वसाधारण शस्त्रक्रिया
- हृदय शस्त्रक्रिया व उपचार
- बालरोग शस्त्रक्रिया व उपचार
- स्त्रीरोग शस्त्रक्रिया
- नेत्र शस्त्रक्रिया
- हाडांची शस्त्रक्रिया
- मेंदू व मज्जासंस्था यांच्यावरील शस्त्रक्रिया व उपचार
- प्लास्टिक सर्जरी
- जळालेल्या रुग्णांवरील उपचार
- जठर व आतडे यांच्या शस्त्रक्रिया व उपचार
- कृत्रिम अवयव
- त्वचेच्या, सांध्याच्या व फुफ्फुसाच्या आजारावरील उपचार
- एंडोक्राइन
- लहान मुलांचे कर्करोग
- मानसिक आजार इत्यादी
योजनेचा लाभ घेण्याची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
या योजनेअंतर्गत रुग्णांची ऑनलाईन नोंदणीची जबाबदारी आरोग्य मित्रांची असेल. योजनेअंतर्गत समावेश करण्यात आलेल्या सर्व रूग्णालयात आरोग्यमित्र उपलब्ध असतील. रुग्णाच्या नोंदणी प्रसंगी रुग्णाला ओळखपत्र म्हणून खालील पैकी कुठलेही एक कागदपत्र द्यावे लागेल. तसेच रुग्णाकडे असलेली वैध शिधापत्रिका / राशन कार्ड सोबत द्यावी लागेल.
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड
- नॅशनलाईज बँक पासबुक फोटोसह
- अपंग असल्याचे प्रमाणपत्र
- शाळा / कॉलेज ओळखपत्र
- वरिष्ठ नागरिक कार्ड
- स्वतंत्र सेनानी ओळखपत्र
- माजी सैनिक कार्ड
- राजीव गांधी जन आरोग्य योजना कार्ड
- वरीलपैकी कुठलेही ओळखपत्र नसल्यास तहसीलदार यांचे प्रमाणपत्र स्वीकृत करण्यात येईल.
योजनेअंतर्गत उपचार पूर्व मान्यता मिळण्याची पद्धत
सर्वप्रथम आपण दिलेल्या कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी केली जाईल पडताळणी यशस्वी झाल्यास उपचाराला मान्यता देण्यात येईल. मान्यता नाकारण्यात आलेले अर्ज हे तांत्रिक समितीकडे पाठविले जाईल. तांत्रिक समिती मध्ये विमा कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी व राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य वैद्यकीय सल्लागार निर्णय देतात. जर त्यांच्या निर्णयांमध्ये तफावत असेल असे अर्ज अंतिम मान्यतेसाठी राज्य आरोग्य हमी सोसायटी चे सहाय्यक संचालक यांच्याकडे पाठविण्यात येतात.
Xxxxxxxxxxxxxxxxxxccccccxxxxxx
योजनेअंतर्गत रुग्णालयांची यादी शोधण्याची पद्धत
सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकारीक संकेतस्थळावर (वेबसाईट वर) जावे लागेल.
वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे खालील होम पेज / मुख्यपृष्ठ उघडेल.

या पेजवर वरील उजव्या बाजूला मराठी / English भाषेची निवड तुम्हाला करता येईल . मराठी भाषेची निवड केल्यानंतर तुमच्या पुढे खालील पेज उघडेल

या पेज वर तुम्हाला “अंगीकृत रुग्णालये” वर क्लिक करून तुमच्या उपचारा संबंधित, आजार संबंधित किंवा तुमच्या जिल्हयात उपलब्ध रुग्णालयांची यादी बघता येईल.
Xxxxxxxxxxxxxxxxxxccccccxxxxxx
एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत पॅकेज आधारित आजार आणि त्याला लागणाऱ्या खर्चाचे PDF डाउनलोड करण्याची पद्धत
सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकारीक संकेतस्थळावर (वेबसाईट वर) जावे लागेल.
मराठी भाषेची निवड केल्यानंतर तुम्हाला “Operational Guidelines” वर जाऊन खाली आलेल्या “Package Costs” वर क्लिक करून फाईल डाउनलोड करता येईल किंवा खाली तीच फाईल आम्ही तुम्हाला PDF च्या रूपात देत आहोत तिथे ही तुम्ही बघू अथवा डाउनलोड करू शकता.

Saturday, August 6, 2022
Palghar : पालघर जिल्ह्याला साथीच्या आजारांचा विळखा; ७० हजारांहून अधिक रुग्णाची तपासणी
पालघर : सध्या पालघर जिल्ह्याला सर्दी, ताप, खोकला, डेंगू सर्दी, पडसे आदी साथीच्या आजाराने (Infection Diseases Reported in Palghar District) विळखा घातल्याचे चित्र दिसत आहे. अचानक झालेल्या हवामान बदल यासह तापमान बदल यामुळे साथ रोग झपाट्याने वाढू लागले आहेत, असे काही तज्ञांचे म्हणणे आहे. सरकारी व खाजगी रुग्णालयात सध्या साथीच्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात तापाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते आहे. सुमारे ७० हजारांहून अधिक रुग्णाची तपासणी (Examination of more than 70 thousand patients) केली असता, त्यात बहुतांश रुग्ण हे सर्दी, खोकला, ताप, पडसे, आदी साथ रोगाचे आहेत. पालघर जिल्ह्यातील पाणी साठवणूक होणाऱ्या ग्रामीण व सागरी किनारपट्टी भागात तसेच शहराच्या काही ठराविक भागांत डासजन्य आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. डेंगू, मलेरिया, स्वाईन फ्लू, चिकनगुनिया, अशा तापजन गंभीर आजाराबरोबर लेप्टोस्पायरोसिस सारखे रुग्णही पावसाळ्यात दरम्यान आढळून येत आहेत. मलेरिया रुग्णाची संख्या कमी असली तरी डासांच्या प्रादुर्भावामुळे तो वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
अलीकडेच तलासरी तालुक्यात आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसह ते इतर परिसरातही स्वाइन फ्लूचे जवळपास 30 रुग्ण आढळून आले होते. मात्र योग्य उपचारामुळे ते वेळीच बरे झाले. साथीजन्य आजारांबरोबर इतर गंभीर तापजन्य आजार पुढे आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून आरोग्य विभाग सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहे. तसेच वारंवार तपासण्या करणे, कोरडा दिवस पाळणे, औषधोपचार नियमित घेणे, जोखमीच्या व्यक्तींना देखरेखीखाली ठेवणे, यासह इतर उपाययोजना आरोग्य विभागामार्फत सुरू आहेत. नागरिकांनी स्वतःची नैतिक जबाबदारी म्हणून काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.साथरोगासाठी जिल्ह्यात आवश्यक पुरेल इतका औषधसाठा उपलब्ध असल्याचे, आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे. सध्या आरोग्य विभागाकडून संशयित नागरिकाची आरोग्य तपासणी करून, प्रतिबंधात्मक उपाय योजनेचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. साथीचेरोग असलेले रुग्ण याची तपासणी व त्यातून निदान केले जात आहे. साथ रोगाला आळा घालण्यासाठी पालघर नगरपालिका प्रशासनाकडून कीटकनाशक फवारणी, धूर करणे, पिण्याच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकने, आदी उपायोजना करण्यात येत आहेत.
सध्या साथीचारोग वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, तापमान व हवामान बदलाचा परिणाम आहे. या दरम्यान संसर्गातून साथ रोग होतो. मात्र त्यामुळे भीतीचे कोणतेही कारण नाही. साथीचारोग सामान्य प्रकारचा व लवकर बरा होणारा आजार आहे, असे आरोग्य यंत्रणेने म्हटले आहे. पालघर जिल्ह्यातील साथरोग रुग्ण संख्या वाढीबद्दल जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सागर पाटील यांना विचारणा केली असता, सध्या साथरोग रुग्ण वाढत असले तरी; सामान्य उपचारामुळे ते बरे होत आहेत. त्यात भीतीचे कारण नाही. डासजन्य आजारासाठी आरोग्य विभाग, योग्य त्या उपाययोजना करत आहे. नागरिकांची तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांची तितकीच जबाबदारी आहे. त्यांनीही खबरदारी घेणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान सध्या पालघर जिल्ह्याला सर्दी ताप, खोकला, मलेरिया, डेंगू चिकन, गुनिया, आदी साथीच्या रोगाच्या आजाराने विळखा घातल्याचे चित्र दिसत आहे. यासाठी आरोग्य विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
डेंग्यूचा रुग्णांचा तक्ता (२०२२)
महिना - रक्त तपासणी - पॉझिटिव्ह रुग्ण
जानेवारी - २३ -३
फेब्रुवारी - ५१ - ८
मार्च - ११९ - ९
एप्रिल - ११३ - ५
मे - ११६ - ९
जून - ९८ - १४
जुलै - १३१ - ९
एकूण - ६५१ - ५७
--------/--------------------------
चिकनगुनिया रुग्णांचा तक्ता (२०२२)
महिना - रक्त तपासणी - पॉझिटिव्ह रुग्ण
मार्च - ७ - ६
एप्रिल - ११ - ४
जुलै - ७ - १
एकूण - २७ - ११
-------------–------------------
लेप्टोस्पायरोसिस रुग्णांचा तक्ता (२०२२)
महिना - रक्त तपासणी - पॉझिटिव्ह रुग्ण
जानेवारी - ५ - १
फेब्रुवारी - ५ - २
मे - ३ -१
एकूण - १५ - ४
----------------------/-------
मलेरिया रुग्ण
ग्रामीण
रुग्ण रक्त तपासणी - १९२२७२
पॉझिटिव्ह - ८
मनपा व न.प
रुग्ण रक्त तपासणी - ७८५९४
पॉझिटिव्ह - ३३
तीन महिन्यात 144964 रुग्णांनी केली तपासणी : उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात गेल्या तीन महिन्यात बाह्य रुग्ण तपासणी करणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील बारा आरोग्य संस्थांमधून 41,746 रुग्णांनी तपासणी केली. मे मध्ये हा आकडा सुमारे पाच हजार रुग्णांनी वाढला. मे महिन्यात 46,118 रुग्णांनी बाह्यरुग्ण सामान्य तपासणी केल्या आहेत. तर जून मध्ये या आकड्यांमध्ये जवळपास नऊ हजार रुग्णांची भर पडली. जूनमध्ये 57 हजार 70 रुग्णांनी बाह्य रुग्ण विभागात आपली सामान्य तपासणी केली आहे.
Thursday, April 2, 2020
कोरोना विषाणूपासून लढण्याची शक्ती
कोरोना’ बस नाम ही काफी है..! अशी सध्याची परिस्थिती झालेली आहे..
बिचारे नेहमीच सर्दी खोकला असलेले लोक सुद्धा तिरक्या, संशयास्पद नजरेचे शिकार होतायत..
जरा कोणी शिंकले की आसपासची लोकं लांब पळून जातायत.. हजारो मेसेज, व्हाट्सएप फॉरवर्ड, न्यूज वरची माहिती सगळ्यानी उच्छाद मांडलाय.. त्यामुळे सगळीकडे कोरोना ह्या नावाची सुद्धा दहशत आहे..
पण मध्येच एखादी सुखद बातमी येतेय की भारतातील, इटलीतील कोरोना बाधित मस्त बरे होऊन घरी गेलेत..
एवढेच काय तर चक्क चायनातील वूहान शहर जे कोरोनाचे जन्मस्थान म्हणता येईल तिथले कोरोना बाधित सुद्धा स्वस्थ झालेत..
कोरोनाबद्दल भीती आणि नकारात्मकता एका कारणाने जास्ती वाढली कारण ह्या नवीन विषाणू वर एकही औषध कोणत्याही देशामध्ये नाहीये..
किंबहुना त्यावर लस किंवा औषधी गोळ्या बनलेल्याच नाहीत.. हेच घबराटीचे मुख्य कारण..
सगळ्यांना वाटते आता कोरोना झालाय आणि औषधच नाहीये तर आपल्या जगण्याची शाश्वती संपली.. आयुष्य संपले..
आणि मग कोरोना बाधित बरे झाल्याच्या बातम्या ऐकून फारच आश्चर्य वाटते.. अरेच्चा.!! औषधाविना बरे होणे म्हणजे केवळ अशक्य.. नाही का..??
तो होऊ नये म्हणून काळजी कशी घ्यायची तेही तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहेच.. सगळ्या देशात त्यांचे सरकार देखील योग्य त्या खबरदाऱ्या घेत आहेत..
जे कोरोना बाधित आहेत त्यांना वेगळ्या परिस्थितीत ठेवले जाते.. आणि खरे सांगायचे तर कोरोना मुळे बाधा व्हायची टक्केवारी जरी झपाट्याने वाढत असली तरी मृत्यू चा दर फक्त ३% आहे..
म्हणजे गणिती भाषेत सांगायचं झालं तर १०० जणांना बाधा झाली तर त्यातले ३ जणच मारतात.. अर्थात तेही वाचू शकतात.. आणि हो बिना लस किंवा औषधांचे..!! कसे??
जाणून घेऊयात..
व्हायरल इन्फेक्शन होणे हे आपल्या सगळ्यांना परिचित आहे.. हे व्हायरल इन्फेक्शन देणारे विषाणू कधी खूप शक्तीवान तर कधी खूप अशक्त असतात..
आपल्याला सर्दी होते, ताप येतो आणि मग आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी लगेच युद्धाला सुरुवात करतात.. ह्या पांढऱ्या पेशी आपले संरक्षक सैनिक असतात जणू..
जेव्हा आपल्याला ताप येतो.. आजारी असल्यासारखे वाटते.. कधी काही साधी औषधे घेतली की लगेच बरे वाटते तर कधी औषधाशिवाय देखील आपण बरेही होतो..
कोरोना ह्या व्हायरस मुळे आपल्याला जो आजार होतोय त्याचे नाव आहे COVID 19 आणि ह्या विषाणूला टक्कर देईल असे औषध अजून तरी बनवले गेले नाहीये..
ह्याला झुनॉटिक व्हायरस असेही म्हणतात.. सोप्या भाषेत सांगायचे तर हा विषाणू प्राण्यांकडून माणसांकडे आलेला आहे.. आणि एकदम ब्रॅण्ड न्यू आहे..
म्हणूनच माणसांना होणाऱ्या इतर व्हायरल विष्णूंसारखा नसल्याने कदाचित आपल्या पांढऱ्या सैनिक पेशींनाही ह्यांच्याशी युद्ध कसे करावे समजत नसावे..
त्या पेशी ह्या व्हायरस समोर कमजोर पडत आहेत.. म्हणूनच हा कोरोना कोणत्याही माणसाला पटकन पकडतो आणि पार आजारी पाडतो..
इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती आपल्या सगळ्यांकडे असते.. रोजच्या होण्याच्या वेगवेगळ्या विषाणूंच्या हल्ल्यांशी लढणे हे तिचे काम..
आणि वर वाचल्याप्रमाणे पांढऱ्या पेशी हे तिचे खंदे सैनिक..!! ही रोग प्रतिकारक शक्ती ज्यांची भन्नाट आहे तेच, कोरोनाची लागण होऊन सुद्धा ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत..
थोडक्यात काय तर कोरोनावर स्पेशल कोणते औषध असे नसतानाही इतर औषधांच्या मदतीने, चांगल्या रोगप्रतिकारक शक्तीने आणि मनात असलेल्या सकारात्मकतेचा, इच्छाशक्तीच्या साहाय्याने हे रोगी, मोठ्या रोगाशी सामना करून, जिंकून, पुन्हा आपल्या स्वस्थ निरोगी जीवनशैलीत परतले आहेत..
म्हणजे बघा या आपत्तीला इष्टापत्ती समजून आपल्या सवयी बदलून निरोगी जीवन शैली जर आपण आत्मसात केली तर हा कोरोनाच काय यापुढे आणखी कुठलाही महाभयंकर विषाणू आपल्यावर चाल करून आला तरी आपले काहीही वाकडे करू शकणार नाही.
म्हणून सगळ्या प्रकारची काळजी घेत, शारीरिक रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढवण्याकडेही आपण लक्ष देऊ..
कारण अशक्त व्यक्ती, लठ्ठ व्यक्ती, मधुमेही, इतर आजार असणारे, वयोवृद्ध ज्यांची शारीरिक रोगप्रतिकारक शक्ती वयामुळे कमी होत जाते ह्या सगळ्यांना कोरोनाची लागण होण्याचे जास्त चान्सेस आहेत..
तसेच सगळ्यात भेसळ आणि प्रदूषण हे रोजचेच शत्रू.. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच इम्युनिटी वाढवणे हे सुदृढ आयुष्य जगण्यासाठी कायमच महत्वाचे आहे..
जर आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढली तर आपल्या पांढऱ्या पेशींना देखील बळ मिळेल.. आणि कोणत्याही रोगाचा सामना करायला त्या सज्ज होतील..
इम्युनिटी कशी वाढवाची ते खाली दिलेल्या काही मुद्द्यांवरून तुमच्या लक्षात येईल:
१. फळे रोज खा.
२. सगळ्या प्रकारच्या भाज्या खाणे उत्तम.. हिरव्या भाज्या अगदी मस्ट..!!
३. संतुलित आहार घ्या
४. मांसाहार वर्ज्य करणे शक्य नसल्यास ते पूर्णतः शिजवूनच खाणे योग्य
५. व्यायाम करणे खूप गरजेचे आहे.. योग करणे त्यातल्यात्यात अनुलोम विलोम, प्राणायाम, कपालभाती हे अतिशय उपयोगी आसनं आहेत. फिरायला जाणे आणि जिम करून फिट राहणे हे इम्युनिटी बूस्टर आहेतच..
६. पुरेशी झोप अतिशय महत्त्वाची. झोप पूर्ण न झाल्याने शरीर थकते आणि त्यावर विषाणूंना हल्ला करणे अतिशय सोप्पे जाते..
७. ताण तणावांपासून दूर राहा.
हे सध्याच्या फास्ट युगात सांगणे अगदीच बेसिक झाले आहे.. कारण झपाट्याने प्रगतीकडे जाताना मानसिक आणि शारीरिक आरोग्य दुर्लक्षिले जात आहे..
ताण असलेली माणसे बऱ्याच रोगांना बळी पडताना आपण पहात आहोत.. म्हणून ताण बाजूला ठेवणे हे कोरोना पासून लांब राहण्यासाठी सुद्धा गरजेचे आहे..
वरच्या टिप्स ह्या सगळ्यांसाठीच अतिशय महत्त्वाच्या आहेत.. नैसर्गिक रित्या आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर ह्याला पर्याय नाही.. हे सगळेच मुद्दे आचरणात आणावे लागतील..
मुलांनाही त्याचे महत्व सांगा म्हणजे त्यांची रोग प्रतिकारक शक्ती आत्तापासूनच नवनवीन विषाणूंना तोंड द्यायला सज्ज होईल.. घरातल्या वृद्धांना जपा.. त्यांना खास आहार द्या..
स्वतःची देखील काळजी घ्या.. नुसते कोरोनाचे टेन्शन घेऊन काहीही साध्य होणार नाही.. सगळे मिळून त्याला हरवून टाकूयात..
स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून सगळ्याच विषाणूंना मात देऊयात.. मग औषध असो व नसो..!!
स्वस्थ खा, स्वस्थ जगा..!!
कलिंगड खाण्याचे जबरदस्त फायदे
तुम्हाला जर किडनी स्टोनचा त्रास असल्यास जरूर खा कलिंगड – ज्या लोकांना किडनी स्टोनचा त्रास आहे अशा लोकांनी तर हौसेने कलिंगड खायला हवे. कारण कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे कि डनी साफ होण्याड कलिंगडाची मोठी मदत होते. त्यामुळे कलिंगड हे खाणे फायदेशीर ठरते.
वजन कमी करण्यासाठी – वजन कमी करण्यासाठी कलिंगडाचा डाएटमध्ये जरूर समावेश करावा. कलिंगडामध्ये कॅल रीज कमी असतात. मात्र अधिक काळापर्यंत पोट भरलेले ठेवण्यास मदत करतात. १०० ग्रॅम कलिंगडामध्ये केवळ ३० ग्रॅम कॅलरीज असतात. यात १ मिलिग्रॅम सोडियम, कार्बोहायड्रेट ८ ग्रॅम, फायबर ०.४ ग्रॅम, साखर ६ ग्रॅम, व्हिटामिन ए ११ टक्के, व्हिटामिन सी १३ टक्के, प्रोटीन ०.६ ग्रॅम असते.
इम्युनिटी सिस्टीम मजबूत करण्यासाठी तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी – कलिंगडामध्ये व्हिटामिन सी आणि ए आढळते. या व्हिटामिन्समुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठीही चांगले आहे.
डोके थंड राहण्यास मदत – कलिंगडाची प्रवृत्ती ही थंड असते. कलिंगड खाल्ल्याने केवळ पोटच नाही तर डोकेही थंड राहण्यास मदत होते. याच्या बिया वाटून डोक्यावर लावल्या तर डोकेदुखी बरी होते.
उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास – ज्या लोकांना उच्च र क्तदा बाचा त्रास आहे त्या लोकांनी तर कलिंगड जरूर खावे. कलिंगडामध्ये फार कमी प्रमाणात सोडियम असते तसेच हे थंड असते.
या लोकांनी खाऊ नये कलिंगड
अस्थमा अथवा ऍ लर्जीचा त्रास असणाऱ्या लोकांनी कलिंगड खाऊ नये आहे. कारण कलिंगडची प्रवृत्ती थंड असते. यामुळे नलिकेत सूज निर्माण होते. यासोबतच शिंका येण्याची समस्याही वाढू शकते.
जर तुम्ही भात आणि दही खाल्ले असेल तर त्यावर कलिंगड खाऊ नये. कारण कलिंगड खाल्ल्याने फायदे होण्याच्या जागी नुकसानच होऊ शकते.
रिकाम्या पोटी कधीही कलिंगड खाऊ नये.सकाळी उठून जर तुम्ही रिकाम्या पोटी कलिंगड खात असाल तर ती सवय बदला. रिकाम्या पोटी कलिंगड खात असाल तर उलटी तसेच पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.
कलिंगड खाल्ल्याने कधीही पाणी पिऊ नये. लगेच पाणी प्यायल्याने उलटी होऊ शकते. रात्रीच्या वेळेस कलिंगड खाऊ नये. कारण यामुळे कफ वाढू शकतो आणि समस्या अधिक वाढू शकते.
टीप: प्रस्तुत लेखात सुचविण्यात आलेल्या टिप्स आणि सल्ले हे केवळ प्राथमिक माहितीसाठी देण्यात आलेलं आहे. या टिप्स काही व्यावसायिक चिकित्सकाचा सल्ला नाही.
