कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपली वैयक्तिक स्वच्छता ठेवावी तसेच गरज नसताना घराबाहेर जाऊ नये घराबाहेर जाण्याचे गरजेचे असल्यास किंवा महत्वाच्या कामासाठी घराबाहेर जाऊन परत घरी परतल्यावर संपूर्ण शरीर निर्जंतूकीकरण करून घ्यावे, कोणत्याही वस्तूला स्पर्श केल्यावर किमान वीस सेकंद हात धुवावे, सामाजिक अंतर राखावे या बाबत नागरिकांमध्ये जनजागृती असणे आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जिल्ह्यातील विद्यार्थी, प्राध्यापक, यांना केले.
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील एनसीसी, एमसीसी विद्यार्थी, प्राध्यापक यांच्याशी जिल्हाधिकारी यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा प्रशासन कोव्हीड-19 विरूद्ध लढा देत असून या युद्धात विद्यार्थी यांनी प्रशासनाला सहकार्य करावे. आपला वॉर्ड, गाव कोरोना संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा तसेच आपले कुटंबीयांना या पासून सुरक्षित ठेवण्यासाठी तरुणांनी आपली स्वतःची वैयक्तिक स्वच्छता ठेवणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
आपल्या परिसरात कोणाला लक्षणे आळल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा तसेच
ग्रामीण भागात अशा वर्कर, अंगणवाडी ताई यांच्या माध्यमातून आरोग्य सर्वे करण्यात येणार असून त्यांना या कामात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
No comments:
Post a Comment