Wednesday, September 13, 2023

तत्काळ केवायसी करा; अन्यथा सहा हजार कायमचे विसरा



पालघर जिल्ह्यात १५ हजार २३३ ई-केवायसीसाठी प्रलंबित
पालघर : पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थीना ई- केवायसी आणि आधार सिडिंग करणे अनिवार्य आहे. वारंवार सांगूनही सर्वच जिल्ह्यात है न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात ई-केवायसी आणि आधार सिडिंगसाठी अखेरची मुदत दिली आहे. यानंतर पीएम किसानच्या सहा हजार रुपयांच्या यादीतून ही नावे वगळली जाणार आहेत. दरम्यान, पालघर जिल्ह्यात सद्यस्थितीत जवळपास १३ हजार ९३४ बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी, तर १५ हजार २३३ ई-केवायसी करणे प्रलंबित आहेत.

ज्या शेतकरी लाभार्थीच्या या बाबी प्रलंबित आहेत, त्यांना या योजनेच्या सहा हजार रुपयांच्या १४व्या हप्त्याला तसेच राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहा हजार रुपयांच्या लाभालासुद्धा मुकावे लागणार आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान योजना ( अंतर्गत १५व्या हप्त्याचे वितरण ऑक्टोबर महिन्यात प्रस्तावित आहे. केंद्र शासनाने योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थीचे बँक खाते आधार संलग्न करणे, ई-केवायसी प्रमाणीकरण करणे आणि लॅण्डसिडिंग या बाबी बंधनकारक केलेल्या आहेत. असे असतानाही हजारो शेतकऱ्यांना अनेक आवाहने करूनही लाभार्थी गंभीरता दाखवत नसल्याचे दिसून आले आहे.

पीएम किसान सम्मान निधि योजना

बँक खाते आधार संलग्न करून घ्या

संबंधित लाभार्थीला जर बँक खाते आधार संलग्न करायचे असेल, तर 'बँकेच्या शाखेतून खात्यास आधार संलग्न करावा किंवा नजीकच्या पोस्टमास्तर याच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बैंक खाते उघडावे. लाभार्थीचे जर भूमिअभिलेख नोदीप्रमाणे अद्यावतीकरण करायचे असेल

या तारखेपर्यंत केवायसी, आधार सीडिंग आवश्यक

पी.एम. किसान योजनेचे लॉगइन आयडी कृषी विभागाला प्राप्त झालेले असून, त्याच्यामार्फत अपात्र तसेच मयत लाभार्थी मार्क केले जाणार आहेत. अपात्र मार्क केलेल्या लाभार्थीकडून महसूल विभाग परतावा वसुली करणार आहे.

किती शेतकऱ्यांचे काय बाकी?

१५ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी

पालघर जिल्ह्यात सद्यस्थितीत जवळपास १५ हजार २३३ ई- केवायसी करणे प्रलंबित आहेत.

१३ हजार शेतकऱ्यांचे आधार सीडिंग

पालघर जिल्ह्यात सद्यस्थितीत जवळपास १३ हजार ९३४ बँक खाती आधार सलग्न करणे बाकी आहे.

ई केवायसी, आधार सीडिंग नसलेले शेतकरी

तालुका ई-केवायसी आधार सीडिंग नसलेले शेतकरी

डहाणू  ४३२८   ६८

जव्हार १६६५ २०

मोखाडा ९२९ 191

पालघर ४२११ 130

तलासरी १७२५ 01

 वाडा २४८९ ५६

वसई ३२१ 1033

विक्रमगड १५०२ 1380

या तारखेनंतर यादीतून नाव वगळणार

वारंवार संपर्ककरूनही जे लाभार्थी प्रतिसाद देत नाहीत, त्यांनाही अपात्र मार्क करून वगळले जाणार आहे.

पीएम किसानचे जिल्ह्यात १ लाख ५८ हजार लाभार्थी

जिल्ह्यात २ लाख ५८ हजार ४२५ पीएम किसानचे लाभार्थी आहेत


त्याने आवश्यक त्या कागदपत्राच्या आधारे गावचे तलाठी अथवा संबंधित तहसील कार्यालयास संपर्क साधून सर्व बाबींची पूर्तता करावी व पीएम किसानच्या १५व्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घ्यावा. - नीलेश भागेश्वर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पालघर


No comments: