Tuesday, April 14, 2020
परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतलेला नाही
पोलिसाने स्वतःच गाठले हॉस्पिटल; डहाणू : वरिष्ठ अधिकाऱ्याला झाली कोरोना बाधा
डहाणू तालुक्यातील बापुगाव येथील एक पोलिस, पालघर जिल्ह्याबाहेर नेमणूकीस होता. तो ज्या पोलिस स्टेशनमध्ये नेमणूकीस होता, तेथील पोलिस अधिकाऱ्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिस गावी परतला व रुग्णालयात जाऊन स्वतःची कोरोना तपासणी करण्याची विनंती केली. कोरोनाबाधीताच्या संपर्कात आल्याने हा पोलिस व त्याच्या पत्नीला, डहाणू येथील उप जिल्हा रुग्णालयात क्वारन्टाईन केले असून, त्यांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. अहवाल अजून प्राप्त होणे बाकी आहे.
Monday, April 13, 2020
पालघर जिल्ह्यातील पहिली कारवाईची WhatsApp Group Admin वर गुन्हा दाखल
पालघर जिल्ह्यातील बोईसर पोलिस स्टेशनच्या हद्दीत, WhatsApp Group वर वादग्रस्त पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी, पोस्ट टाकणारा व संबंधित Group चा Admin अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यातील सर्व Group Admins नी Group ची Setting, फक्त Admin पोस्ट करु शकेल, अशी बदलावी आणि कुठलीही चुकीची, वादग्रस्त अथवा खोटी पोस्ट प्रसारित होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन, पोलिस अधिक्षक गौरव सिंग यांनी केले असून अन्यथा वादग्रस्त पोस्ट टाकणारा व Admin अशा दोघांवर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
क्वारन्टाईन करणार झाई व आशागड येथील आश्रमशाळांमध्ये

मच्छीमारीसाठी गुजरात हद्दीत असलेले व लॉक डाऊनमुळे तेथेच अडकलेले मच्छीमार खलाशी महाराष्ट्रात परत आणण्यास सुरुवात झाली आहे. हे खलाशी वेरावळ येथे होते व काही दिवसांपूर्वी समुद्रमार्गे उंबरगांव पर्यंत आले होते. मात्र तेथे त्यांना गुजरात पोलिसांनी व स्थानिकांनी खाली उतरण्यास मज्जाव केला होता. त्यांना परत आणण्याचे महाराष्ट्र प्रशासनाचे प्रयत्न असफल ठरले होते. उंबरगांव येथून त्यांची रवानगी पुन्हा वेरावळ बंदरात करण्यात आली होती. अखेर आज पासून त्यांना महाराष्ट्रात परत आणण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. आज जवळपास 150 खलाशी परतले असून त्यांना झाई येथील आश्रमशाळेत विलगीकरण करुन ठेवण्यात येणार आहे. या खलाशांसाठी आशागड आश्रमशाळांमध्ये देखील विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत.
