दि. 4 मे: पालघर जिल्हाधिकारी यांनी पेट्रोल व डिझेल विक्रीवरील निर्बंध आजपासून उठवले आहेत. दिनांक 8 एप्रिल रोजीच्या आदेशान्वये अत्यावश्यक सेवांच्या पुरवठा करणाऱ्यांच्या वाहनांव्यतिरिक्त सर्वसामान्य लोकांना पेट्रोल व डिझेल विक्री करण्यास मनाई करण्यात आली होती. हे मनाई आदेश आजपासून मागे घेण्यात आलेले असून आता सर्वसामान्यांसाठी पेट्रोल व डिझेलची विक्री खूली करण्यात आली आहे.
Monday, May 4, 2020
दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.’तर्फे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक कोटींची मदत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धनादेश सुपूर्द
मुंबई, दि. 4 : ‘कोरोना’ विरुद्धच्या लढाईसाठी मदत म्हणून ‘दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.’ तर्फे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड19’साठी एक कोटींच्या मदतीचा धनादेश आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बँकेचे अध्यक्ष राजेंद्र गोपाळ पाटील यांनी सुपूर्द केला.
महाराष्ट्र कोरोनमुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने उपाययोजना सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्यशासनाच्यावतीने उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत या लढ्यासाठी मदत म्हणून ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड19’ साठी 1 कोटी रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आज बँकेचे अध्यक्ष राजेंद्र गोपाळ पाटील यांनी सुपूर्द केला. यावेळी आमदार राजेश पाटील, बँकेचे उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र दोंदे उपस्थित होते.
‘दि.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.’चे संचालक, अधिकारी-कर्मचारी, सभासद यांनी सामाजिक बांधिलकी राखत केलेल्या या मदतीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानले आहेत.
Saturday, May 2, 2020
पालघर जिल्ह्यातून इतर राज्यात व जिल्ह्यात जाण्याकरिता आणि येण्याकरिता ऑनलाइन अर्ज
Thursday, April 30, 2020
पालघर तिहेरी हत्याकांड: आरोपींना पुन्हा 14 दिवसांची पोलिस कोठडी
डहाणू तालुक्यातील कासा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गडचिंचले येथे 16 एप्रिल रोजी झालेल्या 2 साधू व त्यांच्या चालकाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या 101 आरोपींना डहाणू येथील न्यायालयाने आज पुन्हा 14 दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले आहे. त्या सर्वांना 17 एप्रिल रोजी अटक करण्यात आलेली आहे.गडचिंचले हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी 110 जणांना अटक केली होती. त्यातील 9 जण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. उर्वरित 101 जणांना 18 एप्रिल रोजी डहाणू येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, त्यांना 30 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती. ही मुदत संपल्याने आज सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पुढील 14 दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. आज मृतांच्या निकटवर्तीयांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ पी. एन. ओझा यांनी वकीलपत्र दाखल केले.
मृतांच्या निकटवर्तीयांच्या वतीने वकीलपत्र दाखल करणारे ज्येष्ठ विधिज्ञ पी. एन. ओझा प्रसार माध्यमांशी बोलतानापोलिसांनी 101 आरोपींना 18 एप्रिल रोजी खूनाच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्या प्रकरणी 12 दिवसांची पोलिस कोठडीची मुदत संपत असताना आज पोलिसांनी याच प्रकरणात दाखल केलेल्या अन्य गुन्ह्यात तपासासाठी 14 दिवसांची पुन्हा पोलिस कोठडी मागितली व न्यायालयाने मागणी मंजूर केली. पोलिसांनी गडचिंचले प्रकरणी एकूण 3 गुन्हे दाखल केले आहेत.
आज डहाणू न्यायालय परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालयाकडे जाणारे रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्यात आले होते. केवळ पोलिस, वकील व पत्रकारांना परिसरात प्रवेश देण्यात आला. पत्रकारांना न्यायालयाच्या आवारात थेट प्रवेश नाकारण्यात आला. 101 आरोपींना विविध पोलिस स्टेशनच्या कोठड्यांमध्ये 15/20 च्या गटात विभागणी करुन ठेवण्यात आलेले आहे.
Wednesday, April 29, 2020
महाराष्ट्र- आदिवासी विकास विभागाची महत्वाची सूचना विविध भागात अडकलेल्या लोकांना मदतीचे नियोजन
महाराष्ट्र- आदिवासी विकास विभागाची महत्वाची सूचना विविध भागात अडकलेल्या लोकांना मदतीचे नियोजन
संपर्क- 8888631442
2. अमोल चव्हाण
संपर्क- 9404449218



