Wednesday, October 14, 2020
क्रांतिकारी आदिवासी योद्धा कोमाराम भीम के शहिद दिवस पर जोहार
Monday, October 12, 2020
Monday, October 5, 2020
शेतकऱ्यांनो खुशखबर: आता डिजीटल सातबारा, ८-अ उताऱ्यासोबतच 5 मिनिटात शेतजमिनीचा डिजीटल नकाशाही मिळणार
घर बसल्या ५ मिनिटांत काढा शेत जमिनीचा ऑनलाईन नकाशा
डिजीटल सातबारा, ८- अ उतारा यांच्यासोबतच आता शेतकऱ्यांना शेतजमिनीचा डिजीटल नकाशाही मिळणार आहे.
ग्लोबल न्यूज – सातबारा, ८-अ प्रमाणेच शासनाने आता शेत जमिनीचा ऑनलाईन नकाशा देण्यास सुरूवात केली आहे. आपल्या शेताच्या हद्दी जाणून घ्यायच्या असतील किंवा आपल्या शेतातून रस्ता काढायचा असेल तर तुमच्याकडे शेत जमिनीचा नकाशा असणे आवश्यक आहे. mahabhunakasha.mahabhumi.gov.in या संकेत स्थळावरून शेत जमिनीचा नकाशा आता तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईलवरून काढू शकता. यासाठी सरकारने ई- नकाशा प्रणाली आणली आहे.

ई – प्रणाली म्हणजे काय? –
भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे जतन केलेले आहेत. शेत जमिनीच्या हद्दी कायम करण्यासाठी या नकाशांचा उपयोग केला जातो. हे सर्व नकाशे १८८० पासून तयार केले आहेत. त्यामुळे हे नकाशे जिर्ण झाले आहेत. त्यामुळे या नकाशांचे डिजीटायजेशन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या प्रणालीलाच सरकारने ई- नकाशा असे नाव दिले आहे. या प्रणाली अंतर्गत सरकार तालुका स्तरावरील भूमी अभिलेख कार्यालयातील बिनशेती नकाशे, भूसंपादन नकाशे, फाळणी नकाशे यांचे डिजीटायजेशन करत आहे. त्यामुळे डिजीटल सातबारा, ८- अ उतारा यांच्यासोबतच शेतकऱ्यांना शेतजमिनीचा डिजीटल नकाशाही मिळणार आहे.
ई- नकाशा कसा काढायचा –
तुम्हाला जर शेतजमिनाचा नकाशा काढयाचा असेल तर तुम्हाला गुगलवर भू- नक्शा (bhunaksha) असे सर्च करायचे आहे. यानंतर तुमच्यासमोर भू-नक्शा नावाची लिंक दिसेल. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नविन पेज उघडेल. संगणकाच्या पडद्यावर तुम्हाला ही लिंक दिसेल. या पेजवर डाव्या बाजूला लोकेशन म्हणजे ज्या ठिकाणचा नकाशा काढायचा आहे, तो रखाना दिसेल.
या रखान्यात ज्या राज्यातल्या शेतजमिनीचा नकाशा काढायचा आहे, त्याचे नाव टाकायचे आहे. यानंतर दुसऱ्या रखान्यात कॅटेगिरीमध्ये रुरल आणि अर्बन म्हणजेच शहरी आणि ग्रामीण असे पर्याय दिसतील. यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे आहे. शेवटी व्हिलेज मॅप या पर्यायावर क्लिक करायचे आहे. ही सगळी माहिती अचुक भरल्यानंतर शेजारी उजव्या बाजूला गावाचा नकाशा उघडला जाईल. तुमची शेतजमिन ज्या गावात आहे, त्या गावाचा नकाशा तुम्ही बघू शकता. हा नकाशा तुम्ही होम या बटणाशेजारील अधिक आणि वजाबाकीचे चिन्हावर क्लिककरून झूम इन किंवा झूम आऊट करून पाहू शकता.
आता जमिनीचा नकाशा कसा काढायचा हे पाहूया. याच पेजवर खालच्या बाजूला सर्च बाय प्लॉट नंबर अशा नावाचा रखाना आहे. याठिकाणी तुम्हाला तुमच्या जमिनीच्या सातबाऱ्यावरचा गट क्रमांक टाकायचा आहे. यानंतर तुमच्या शेतजमिनाचा गट नकाशा ओपन होतो. आता स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या गावाच्या नकाशात तुमच्या शेतजमिनीचा नकाशा निळ्या रंगात रंगवलेला दिसेल. तसेच तुमच्या जमिनीच्या शेजारील इतर जमिनींचे गट नंबर दिसतील. यानंतर डावीकडील बाजुला प्लॉट इन्फो या रखान्यात ही जमिन कोणाच्या नावावर आहे त्याचे नाव, तसेच या शेतकऱ्याच्या नावावर किती शेत जमिन आहे, याची माहिती दिलेली असेल. तुम्ही दिलेल्या गट क्रमांत ज्या ज्या शेतकऱ्यांची जमिन आहे, त्याचीही माहिती तुम्हाला त्याठिकाणी दिसते.
या माहितीच्या सर्वात शेवटी मॅप रिपोर्ट हा पर्याय दिसतो. यावर क्लिक केल्यावर जमिनीचा प्लॉट रिपोर्ट तुमच्या समोर दिसतो. यानंतर उजवीकडील वरिल बाजूला खालच्या दिशेने असलेल्या बाणावर क्लिक करून तुम्ही जमिनीचा प्लॉट रिपोर्ट डाऊनलोड करू शकता. यावर तुमच्या जमिनीच्या शेजारी असलेल्या जमिनीचे गट क्रमांक दिलेले असतात. तसेच खालच्या बाजूला या नकाशात ही जमिन कोणत्या शेतकऱ्याची आहे, त्याचे नाव आणि त्याच्या नावावर किती शेतजमिन आहे याची माहिती दिलेली असते.
आपल्या रेशन कार्डवर किती धान्य मिळायला हवे आणि ते खरोखर आपल्याया किती मिळते ? मिळत नसेल तर तक्रार कशी दाखल करणार याबद्दल सविस्तर माहिती
मित्रांनो आज आपण आपण जाणून घेणार आहोत कि आपल्या रेशन कार्डवर किती धान्य मिळायला हवे आणि ते खरोखर आपल्याया मिळत का हे आपण मोबाइल मध्ये चेक करू शकतो. आपल्याला जे अन्नधान्य गव्हर्मेंट ने जेवढ मंजूर करून ठेवला आहे तेवढ मिळत कि त्याचा पेक्षा कमी मिळत किंवा आपल्याला डाळ, गहू, रॅकेल यांच्यापैकी काही गोष्टी मिळत आहेत आणि काही नाही हे आपण अन्नधान्य पुरवठा यांचा वेबसाइट वर जाऊन कशा प्रकारे चेक करू शकतो याची माहिती बघणार आहे.
अन्नधान्य नागरी विभागाची वेबसाइट आहे mahafood.gov.in . हा ऍड्रेस गूगल मध्ये टाकल्यावर ती वेबसाइट ओपन होते. त्यानंतर त्या वेबसाइट वर उजव्या साईड ला online seva हा पर्याय दिसेल. त्यामध्ये ऑनलाईन रास्तभाव दुकाने हा option सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला स्क्रीन वर AePDS-सर्व जिल्हे हा ऑपशन दिसेल. यामध्ये आपल्याला किती धान्य मिळते याची माहिती मिळेल.
या ऑपशन वर सिलेक्ट केल्यावर दुसरी वेबसाइट ओपन होते. त्या वेबसाइट वर डाव्या बाजूला RC Details हा ऑपशन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर पुढे एक विंडो ओपन होईल ज्यावर आपल्याला रेशन कार्ड वर असलेला १२ अंकी नंबर टाकायचा आहे. आणि submit करायचा आहे. त्यानंतर तुमचे details लोड होतात. प्रथम कुटुंब प्रमुखाचा नाव असता व नंतर घरातील बाकीचा सदस्यांची नाव असतात.
आणि दुसऱ्या विंडो मध्ये त्या कुटुंबाला किती धान्य मिळणार आहे त्याची माहिती असते. सरकारने ३० kg सामान मंजूर केलेला असता त्यापैकी आपल्याला किती मिळाला त्याची माहिती खाली असते. अशा पद्धतीने आपण धान्य आपल्याला बरोबर मिळत आहे कि नाही चेक करू शकतो.
तसेच आज आपण जरा नवीन माहिती जाणून घेणार आहोत. माहिती अधिकाराचा वापर करून आपण वेगवेगळ्या विभागामध्ये कसा अर्ज करू शकतो, तिथे चाललेला कारभार हा सुरळीत चालला आहे कि नाही या विषयाची माहिती आपण घेणार आहोत. रेशनिंग व्यवस्था आज खूप गरिबांचा जवळची मानली जाते. किंवा जे काही गरीब वर्ग आहे हे दुकान खूप महत्वाचा मानला जात.
पण खूप वेळा अशा तक्रारी येतात कि महिन्याचा जे राशन आहे ते ८ च दिवस वाटलं जाणार किंवा आठवड्यातून २ दिवस दिला जाणार, इतर दिवशी दिला जाणार नाही, यावेळी स्टॉक खूप कमी आला आहे म्हणून तुम्हाला पण कमी दिला जाईल, अशा तक्रारी नागरिकांकडून येतात. मित्रांनो आपण रेशन दुकान मध्ये जो भ्रष्टाचार होतो, तिथे कोणत्या प्रकारचा कारभार चालतो, तो नीट चालतो कि नाही या विषयीची माहिती आपण माहिती अधिकारांमध्ये अर्ज करून कशी मागू शकतो हे बघू.
आपण जी माहिती मागवणार आहोत ती केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अनुसार हा अर्ज करनार आहोत. माहिती अधिकाराच्या अर्जामध्ये ३ प्रकार येतात: अ, ब, क
अ : हा जनमाहिती अधिकारी आहे त्यांना द्यायचा असतो
ब : हा अपीली अधिकारी यांना द्यायचा असतो.
क : हा माहिती आयुक्त असतात त्यांना द्यायचा असतो.
हा अर्ज आपण सध्या कागदावर पण करू शकतो फक्त त्यावर आपल्याला केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अनुसार अर्ज (जोडपत्र “अ ” नियम ३ ) हे लिहावा लागत.
प्रति,
जनमाहिती अधिकारी,
शिधावाटप नियंत्रण अधिकारी पुरवठा अधिकारी
तहसील कार्यालय/शिधावाटप कार्यालय
जर तुमचा रेशन दुकान हे महानगरपालिकेच्या, नगरपालिकेच्या हद्दी मध्ये येत असेल तर तुम्ही तिथल्या पुरवठा अधिकाऱ्यांना प्रति मध्ये ठेऊ शकता. व खाली कार्यालयाचा पत्ता टाकू शकता.
१) अर्जदाराचे नाव: इथे अर्जदाराचे नाव टाकायचे आहे.
२) अर्जदाराचा पूर्ण पत्ता:
३) माहितीचा विषय: शिधावाटप कार्यालय यांच्याकडून खालील माहिती मिळणेबाबत.
अ) आपल्या कार्यालय अंतर्गत किती स्वस्त धान्य दुकाने आहेत व त्यांचे नाव आणि पत्ते द्यावेत ?
ब) आपल्या कार्यालय अंतर्गत असलेल्या दुकान नंबर …….. स्वस्त धान्य दुकानांमध्ये आलेला माहे ……. सन २०११ आलेला अन्नधान्य व तेल व रॅकेलचा विक्री झालेला कोटा या पुढील महिन्यात समायोजित झालेला कोटा आदि नोंदी असणाऱ्या रजिस्टरची सत्यप्रत द्यावी. विक्री पावती बुकाची सत्यप्रत द्यावी.
क) सन २०१० मध्ये या तक्रार वह्या मधून किती तक्रारी प्राप्त झाल्या? तक्रार आलेल्या स्वस्तधान्य दुकानदारांविरुद्ध काय कारवाई करण्यात आली ? केलेल्या कारवाईचा तपशील तक्रारदारास लेखी कळविला काय? असल्यास संबंधीत पत्रव्यवहाराच्या सत्य प्रती मिळाव्यात.
ड) सन २०१० आणि २०११ च्या आज तारखेपर्यंत आपल्या अधिकारांतर्गत येणाऱ्या सर्व शिधावाटप दुकानदाराकडील तक्रारवहीत आलेल्या तक्रारीच्या सत्यप्रती घ्याव्यात.
ई) आपल्या कार्यालयांतर्गत असणाऱ्या घाऊक रॅकेल विकेऱ्यांची संख्या किती? प्रत्येक दुकानाच्या दर्शनी भागावर दुकानाचे नाव आणि पत्ता, विक्रीदर, स्थानिक दक्षता समिती सदस्याचे नाव व पत्ते, लोकसंख्या व युनिट, वितरणाचे प्रमाण, तसेच तक्रार करावयाच्या अधिकाऱ्याचे नाव पत्ता व फोन नंबर असा विस्तृत व परिपूर्ण माहिती असल्याचा फलक लावला आहेका? असल्यास असे बोर्ड प्रत्येक दुकानात लावले असल्याचे सक्षम अधिकाऱ्यांच्या निरीक्षण अहवालाची प्रत द्यावी.
५) माहिती टपालाने हवी की व्यक्तीशः माहिती मी व्यक्तिशः घेऊन जाईन /टपालाने पाठवावी.
६) अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे/नाही (१० रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प जोडला आहे )
अर्जदाराची सही
ठिकाण: ……
दिनांक :
मोबाईल :
Saturday, October 3, 2020
बेरोजगारांसाठी खूषखबर! TCS ची पात्रता परीक्षा सर्वांसाठी झाली खुली
TCS Eligibility Test Open For All
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा आता सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे आता आपल्या कौशल्याच्या आधारावर नोकरी मिळविणे सोपे झाले आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. त्याचबरोबर चांगल्या कर्मचाऱ्यांच्या शोधात असणाऱ्या कार्पोरेट इंडस्ट्रीज ना चांगले कर्मचारीही मिळू शकणार आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या “आयओएन” विभागाची ही राष्ट्रीय पात्रता परीक्षा आहे. त्यामुळे यात सहभागी होणाऱ्या कार्पोरेटसना त्यांच्याकडील नवीन कर्मचारी भरतीसाठी सामाईक परीक्षा म्हणून ही परीक्षा पाहता येणार आहे. TCS National Qualifier Test.
या परीक्षेसाठी दोन वर्षापर्यंतचा कामाचा अनुभव असलेले युवा कर्मचारी, सध्या शिक्षण घेत असणारेकोणत्याही शाखेतले विद्यार्थी तसेच पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी पात्र असणार आहेत. माहिती तंत्रज्ञान(आयटी), बीएफएसआय, उत्पादन, फार्मा, एफएमसीजी क्षेत्रे यातील कंपन्या आणि टीसीएस या क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध आहे. या सर्वांसाठी ही सामाईक परीक्षा असणार आहे. विशेष म्हणजे घरी बसून ही परीक्षा देता येणार आहे. आणि ज्यांच्याकडे आवश्यक पायाभूत सुविधा नसतील ते नजीकच्या “टीसीएस आयओएन सेंटर” मध्ये जावून परीक्षा देवू शकतात. TCS National Qualifier Tes.
दर तिमाही ला ही परीक्षा होणार असून यामध्ये तोंडी, संख्यात्मक आणि तर्क क्षमतांच्या आधारवर गुणांकन केले जाणार आहे. उमेदवारांच्या आकलन क्षमतांचे निदर्शक म्हणून हे गुणांकन कार्पोरेटस ना सादर केले जाणार आहेत. TCS National Qualifier Test आपले गुणांकन सुधारण्यासाठी उमेदवार अनेक वेळा परीक्षा देवू शकतात. प्रत्येक तिमाहीत होणाऱ्या परीक्षेतील गुणांकन हे पुढील दोन वर्षांसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. परीक्षा २४ त २६ ऑक्टोबर या कालावधीत होणार असून १७ ऑक्टोबर पर्यंत नोंदणी करायची आहे. https://learning.tcsionhub.in/hub/national-qualifire-test/ या संकेत स्थळावर नोंदणी करता येणार आहे.
सोर्स: हॅलो महाराष्ट्र