Friday, October 7, 2022

इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजना व श्रावणबाळ योजनेसाठी निधी वितरीत

 इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजना व श्रावणबाळ योजनेसाठी निधी वितरीत l Niradhar Yojana Maharashtra

संजय गांधी निराधार योजनेसाठी ६२५ कोटी, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतनसाठी १ हजार १९४ कोटी रुपयांचा निधी

Niradhar Yojana Maharashtra


Niradhar Yojana Maharashtra

आज राज्य शासनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत ६२५ कोटी रुपये तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत १ हजार १९४ कोटी रुपये निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना माहे ऑक्टोबर २०२२ मध्ये वितरीत करण्यात आला आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतर्गत किमान १८ ते ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतू, पोटगी न मिळालेल्या अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षावरील अविवाहित स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो.

या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१ हजार पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. या योजनेखाली पात्र लाभार्थींना रुपये १ हजार दरमहा इतके अर्थसहाय्य दिले जाते. तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून दारिद्रय रेषेखालील यादीच्या कुटूंबात नांव असलेल्या व रु.२१,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या ६५ व ६५ वर्षावरील पात्र लाभार्थीस दरमहा रु. १,०००/- अर्थसहाय्य देण्यात येते.

माहे सप्टेंबर २०२२ अखेरपर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत रु.५९५ कोटी तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत रु. १०५३ कोटी निधी खर्च झालेला आहे. या दोन्हीही योजनांमधून लाभार्थींना दरमहा नियमित अनुदान देता यावे, ही बाब विचारात घेऊन संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत रु.६२५ कोटी तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत रु. १ हजार १९४ कोटी निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना माहे ऑक्टोबर २०२२ मध्ये वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रसिद्धीस देण्यात आली आहे.

Wednesday, October 5, 2022

एकात्मिक बाल विकास सेवा योजना


Ekatmik Bal Vikas Seva Yojana 2022 –

 – महाराष्ट्र राज्यातील 6 वर्षांखालील बालकांच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी करणे हे आयसीडीएस आयुक्तालयाचे दायित्व आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा लहान बालकांना पोषण आहार, आरोग्य निगा आणि शाला-पूर्व शिक्षण यांची संकलित सेवा पुरवू इच्छिते. लहान बालकांच्या आरोग्य आणि पोषणाच्या समस्या त्याच्या किंवा तिच्या मातेचा विचार न करता सोडविता येणे शक्य नाही आणि म्हणूनच हा उपक्रम किशोरावस्थेतील मुली, गरोदर महिला तसेच स्तनदा माता यांच्यापर्यंत विस्तारीत करण्यात आला आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालयाची प्रमुख उद्दिष्टे :

  • 6 वर्षा खालील गरीब लहान मुलांच्या आरोग्य आणि पोषणचा दर्जा वृध्दीगंत करणे.
  • लहान मुलांच्या सुयोग्य संतुलित मानसिक, शाररिक आणि सामाजिक विकासाचा पाया तयार करणे.
  • लहान मुलांमधील आकस्मिक मुत्यूचे प्रमाण कमी करणे, कुपोषण आणि शाळा बाह्यतेला प्रतिबंध करणे.
  • राज्यातील मुलांच्या विकासाच्या उद्देशाने विविध शासकीय उपक्रम आणि योजना राबविणाऱ्या विविध शासकीय विभागामध्ये धोरण सुनिश्चिती आणि अंमलबजावणी करण्याकरिता समन्वय साधणे.
  • राज्यातील लहान मुलांच्या मातांना आरोग्य आणि पोषण मुल्यांची माहिती आणि प्रशिक्षण देणे जेणे करून मुलांचे संगोपन करण्याच्या त्यांच्या क्षमता वृध्दीगंत होतील. [Ekatmik Bal Vikas Seva Yojana ]
  • लहान मुलांच्या मातांना आणि गर्भवती महिलांना देखील पोष्टिक आहार पुरविणे.
  • योग्य पोषण आहार व आरोग्य शिक्षण याद्वारे बालकांचे आरोग्य पोषणयुक्त राहिल याबाबतच्या आवश्यकते बाबतची काळजी घेण्यासाठी मातांना सक्षम व योग्य बनविणे.

आयसीडीएसच्या सुविधा आयसीडीएसच्या केंद्रांच्या मार्फत पुरविण्यात येतात, ज्यास “अंगणवाडी” म्हणून ओळखले जाते. लहान मुलांची चांगली देखभाल आणि विकासाचे केंद्र, जे कमीत कमी खर्चात स्थानिकपातळीवरील उपलब्ध साधन सामुग्रीतून अगदी अंगणातच चालविता येते अशी अंगणवाडीची संकल्पना आहे.
अंगणवाडी केंद्र हे “अंगणवाडी कर्मचारी” (AWW) आणि “अंगणवाडी सहायिका” (AWH) चालवितात. स्थानिक पातळीवरील अंगणवाडी केंद्र हा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा प्रमुख आधारभूत उपक्रम आहे.

आय सी डी एस, हा भारत सरकारने पुढाकार घेऊन सुरु केलेल्या उपक्रमापैकी एक असून राज्यातील महिला व बाल विकास विभागामार्फत कार्यान्वित करण्यात येतो.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना

आय सी डी एस लहान बालकांना पोषण आहार, आरोग्य निगा आणि शालापूर्व शिक्षण सेवा संकलित स्वरुपात पुरवू इच्छिते.
लहान बालकांच्या आरोग्य आणि पोषणाच्या समस्या त्याच्या किंवा तिच्या मातेचा विचार न करता सोडविता येणे शक्य नाही आणि म्हणूनच या उपक्रमाची व्याप्ती किशोरावस्थेतील मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्यापर्यंत विस्तारण्यात आली आहे.

आय सी डी एस उपक्रम मुलांना आणि मातांना त्यांच्या गावात किंवा वार्डात सर्व पायाभूत आवश्यक सेवा एकत्रितपणे पुरवू इच्छिते. ही योजना शहरी झोपडपट्ट्यामधून आणि ग्रामीण तसेच आदिवासी विभागातून टप्याटप्याने विस्तारली आहे.
राज्यात आय सी डी एस उपक्रमाचे एकूण 553 प्रकल्प कार्यरत असून 364 ग्रामीण, 85 आदिवासी विभागात आणि 104 शहरी झोपडपट्ट्यांमध्ये आहेत.


या योजनेतंर्गत लाभार्थींना पुरविण्यात येणाऱ्या काही प्रमुख सेवा :

  • पुरक पोषण आहार
  • लसीकरण
  • आरोग्य तपासणी
  • संदर्भ आरोग्य सेवा
  • अनौपचारीक शाला-पूर्व शिक्षण
  • पोषण आणि आरोग्य शिक्षण


आदित्य बिर्ला स्कॉलरशिप


आदित्य बिर्ला कॅपिटल कोविड शिष्यवृत्ती कार्यक्रम हा आदित्य बिर्ला कॅपिटल फाऊंडेशनचा एक उपक्रम आहे, जो आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड आणि त्याच्या उपकंपन्यांच्या CSR उपक्रमांमध्ये गुंतलेली एक गैर-नफा कंपनी आहे.

हा कार्यक्रम कोविड-19 मुळे त्यांचे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात सातत्य राखण्यासाठी आर्थिक सहाय्य आणि शिक्षण सहाय्य सेवा प्रदान करण्यासाठी आहे.

Aditya Birla Scholarship Apply online

या शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत, इयत्ता 1 ते 12 आणि पदवीपूर्व अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा शैक्षणिक खर्च आणि मानसिक आरोग्य प्रशिक्षण, करिअर यासारख्या अतिरिक्त मूल्यवर्धित सेवांसाठी INR 60,000 (एक वेळ) पर्यंतची शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र असेल. Buddy4Study या शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी अंमलबजावणी भागीदार आहे.

आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड (ABCL), ही आदित्य बिर्ला समूहाच्या सर्व वित्तीय सेवा व्यवसायांची होल्डिंग कंपनी आहे. आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड (“ABFL”), आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडची उपकंपनी, भारतातील आघाडीच्या सु-विविध नॉन-बँकिंग वित्तीय सेवा कंपन्यांपैकी एक आहे, ही शिष्यवृत्ती त्यांच्या CSR (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) उपक्रमाचा भाग म्हणून देत आहे. (Aditya Birla Scholarship Apply online)

पात्रता

  • अर्जदार इयत्ता 1 ते 12 मध्ये शिकत असावेत.
  • अर्जदारांनी नोंदणी केली पाहिजे आणि त्यांचे शिक्षण चालू ठेवले पाहिजे.
  • अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून INR 6 लाख पेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक आहे.
  • कोविड-19 महामारीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले पालक गमावले आहेत ते पात्र आहेत.
  • फक्त भारतीय नागरिकांसाठी खुले. ‘Aditya Birla Scholarship Apply online’
  • आदित्य बिर्ला कॅपिटल आणि तिच्या उपकंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची मुले अर्ज करण्यास पात्र नाहीत. 

टीप : ही एक-वेळ निश्चित शिष्यवृत्तीची रक्कम आहे. हे केवळ शैक्षणिक हेतूंसाठी वापरले जाऊ शकते ज्यात शिक्षण शुल्क, वसतिगृह शुल्क, भोजन, इंटरनेट, उपकरण, पुस्तके, स्टेशनरी, ऑनलाइन शिक्षण इ.

फायदे 

इयत्ता 1 ते 8 च्या विद्यार्थ्यांसाठी – INR 24,000

इयत्ता 9 ते 12 च्या विद्यार्थ्यांसाठी – INR 30,000

सामान्य UG अभ्यासक्रमांसाठी – INR 36,000 व्यावसायिक UG अभ्यासक्रमांसाठी – INR 60,000

टीप : ही एक-वेळ निश्चित शिष्यवृत्तीची रक्कम आहे. हे केवळ शैक्षणिक हेतूंसाठी वापरले जाऊ शकते ज्यात शिक्षण शुल्क, वसतिगृह शुल्क, भोजन, इंटरनेट, उपकरण, पुस्तके, स्टेशनरी, ऑनलाइन शिक्षण इ. [Aditya Birla Scholarship Apply online]

कागदपत्रे

  1. मागील वर्गाची मार्कशीट
  2. सरकारने जारी केलेला ओळख पुरावा (आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स/पॅन कार्ड)
  3. चालू वर्षाचा प्रवेश पुरावा (शुल्क पावती/प्रवेश पत्र/संस्थेचे ओळखपत्र/बोनाफाईड प्रमाणपत्र)
  4. पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र
  5. COVID-19 मुळे मृत्यू झाल्याचा पुरावा (रुग्णालयातील पावत्या, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, कोविड चाचणी अहवाल, कोविड औषधांची वैद्यकीय बिले, हॉस्पिटलमधून डिस्चार्जचा सारांश इ.)
  6. अर्जदाराचे (किंवा पालक) बँक खाते तपशील
  7. उत्पन्नाचा पुरावा
  8. अर्जदाराचे छायाचित्र {Aditya Birla Scholarship Apply online}

तुम्ही अर्ज कसा करू शकता?

  • खालील ‘आता अर्ज करा’ बटणावर क्लिक करा.
  • तुमच्या नोंदणीकृत आयडीसह Buddy4Study वर लॉग इन करा आणि ‘अर्ज फॉर्म पेज’ वर जा.
  • नोंदणीकृत नसल्यास – Buddy4Study येथे तुमच्या ईमेल/मोबाइल/Gmail खात्यासह नोंदणी करा.
  • तुम्हाला आता ‘आदित्य बिर्ला कॅपिटल कोविड स्कॉलरशिप प्रोग्राम’ अर्ज फॉर्म पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.
  • अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी ‘Start Application’ बटणावर क्लिक करा.
  • ऑनलाइन अर्जामध्ये आवश्यक तपशील भरा.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
  • ‘अटी आणि नियम’ स्वीकारा आणि ‘पूर्वावलोकन’ वर क्लिक करा.
  • अर्जदाराने भरलेले सर्व तपशील पूर्वावलोकन स्क्रीनवर योग्यरित्या दिसत असल्यास, अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा. “Aditya Birla Scholarship Apply online”

राज्यातील शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट

शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट

Mantrimandal baithak 2022

Mantrimandal baithak 2022

अन्न व नागरी पुरवठा
शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट

दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ १०० रुपयांत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रति १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल याचा समावेश असेल. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे ७ कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्वारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण 513 कोटी 24 लाख खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

सदरहू शिधावस्तूंचा संच दिवाळीपूर्वी वाटप व्हावा, त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.


Saturday, October 1, 2022

महिला बाल विकास विभाग योजनेअंतर्गत शासन देत आहे महिलांना पिठाच्या गिरणी वरती 100% अनुदान . अर्ज प्रक्रिया सुरु !


सर्व नागरिकांना नमस्कार, मित्र-मैत्रिणींनो आज आपण शासनाने राबवलेल्या एका महत्त्वाच्या योजनेविषयी माहिती घेणार आहोत. ती योजना आहे मोफत पिठाची गिरण घेण्यासाठी शासन देत आहे अनुदान, आणि महत्वाचे म्हणजे ह्या योजनेसाठी सध्या अर्ज सुरू झालेले आहेत. मोफत पिठाची गिरण अनुदान या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागतो, तो अर्ज कोठे करावा? यासोबत हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने? अर्ज करत असताना कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागतील आणि या योजनेचा लाभण नक्की कोण कोण घेऊ शकेल? या संदर्भातील संपूर्ण माहिती म्हणजेच या योजनेची संपूर्ण माहिती आज आपण अगदी डिटेल्स मध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचावा आणि आपल्या सर्व मित्र-मैत्रिणी पर्यंत शेअर करावा.

मोफत पिठाची गिरण अनुदान या योजनेअंतर्गत शासन शंभर टक्के अनुदानावरती मोफत पिठाची गिरणी देत आहे. म्हणजेच पिठाच्या गिरणीवरती 100% अनुदान शासन देत आहे. राज्यामध्ये खेडेगावातील महिलांना, यासोबतच रोजगार करणाऱ्या महिलांना चांगला रोजगार मिळावा यासाठी सरकारने ही योजना ही मोहीम राबवण्याचे हाती घेतले आहे. चला तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

या योजनेसाठी पात्रता काय असेल यासोबतच इतर माहिती

१) महिला बाल विकास विभागाच्या अंतर्गत मोफत पिठाची गिरण ही योजना राबवली जात आहे .या योजनेच्या माध्यमातून गरीब वर्गातील कुटुंबातील महिलांना लाभ दिला जातो.

२) या योजनेच्या माध्यमातून ज्या कोणी महिला लाभार्थी असतील त्यांना पिठाच्या गिरणीवर शंभर टक्के अनुदान दिले जाणार आहे.

३) यासाठी तुम्ही व्यवस्थितपणे शासनाकडे अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

४) या योजनेअंतर्गत लाभार्थी महिला घरबसल्या पिठाची गिरण चालवून चांगला रोजगार मिळू शकतात व आपली आर्थिक प्रगती साधू शकतात.

५) या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 59 वयोगटातील महिला अर्ज करू शकतात.

मोफत पिठाची गिरण या योजनेचा महत्वाचा उद्देश

  • राज्यांमधील ज्या काही महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत, त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोफत पिठाची गिरण देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा या योजनेमागचा महत्त्वाचा उद्देश आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून महिला वर्गाला एक रोजगाराची संधी उपलब्ध होईल व ते कोणतेही धावपळ न करता घरबसल्या गिरण चालवून चांगली कमाई करू शकतील.
  • तुमच्या जवळच्या पंचायत समितीमध्ये ज्या काही अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील महिला असतील त्यांना या योजनेचा लाभ प्राधान्याने दिला जाईल.
  • आणि त्यांना शंभर टक्के अनुदानावरती मोफत पिठाची गिरण दिली जाणार आहे.
  • त्यासाठी अर्जाची प्रक्रिया चालू आहे. विहित नमुन्यातील अर्ज हा पंचायत समितीमध्ये भरून जमा करायचा आहे.
  • अर्ज नमुना कसा असतो याची पीडीएफ आपण खाली दिलेली आहे, खालील दिलेल्या पीडीएफ फाईल वरती क्लिक करून तुम्ही अर्जाचा नमुना डाऊनलोड करू शकता. त्याची प्रिंट काढून तो अर्ज व्यवस्थितपणे भरायचा आहे आणि हा विहित नमुन्यातील अर्ज पंचायत समितीमध्ये जमा करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल

योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

१) ज्या महिला अर्ज करणार असतील त्या बारावी पास असाव्यात आणि त्याच्या पुरावा अर्ज सोबत जोडलेला असावा

२) अर्जदार महिलेचे आधार कार्ड

३) अर्जदार महिलेचा विहित नमुन्यातील अर्ज

४) घराचा आठ अ उतारा

५) अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न आहे वार्षिक एक लाख वीस हजार पेक्षा कमी असावे याचा पुरावा तलाठी किंवा तहसीलदार यांच्याकडून घेतलेला असावा

६) बँक पासबुक मधील पहिल्या पानाची झेरॉक्स

७) लाईट बिल चे झेरॉक्स

वरील सर्व कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे अर्ज सोबत जोडायचे आहेत आणि अर्ज हा च व्यवस्थितपणे वाचून त्यामध्ये संपूर्ण माहिती भरायचे आहे. माहिती भरून झाल्यानंतर व कागदपत्रे अर्जाला जोडल्यानंतर हा विहित नमुन्यातील अर्ज पंचायत समितीमध्ये दाखल करायचा आहे.

अर्ज नमुना