Friday, June 12, 2020

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात, एका दिवसांत नवे 66 पॉझिटिव्ह



 पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे निष्पन्न होत असून 11 जून रोजी पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एका दिवसांत 66 नवे कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. विक्रमगड तालुक्यात सर्वाधिक 33, वाडा तालुका 21, वसई तालुका 8, पालघर तालुका 3 व डहाणू तालुका 1 अशी नव्या कोरोना बाधीतांची तालुकानिहाय संख्या आहे.

आजमितीस पालघर जिल्ह्यात 1585 कोरोना पॉझिटीव्ह व्यक्ती आढळल्या आहेत. त्यातील 809 व्यक्ती संसर्गमुक्त झाल्या असून 724 रुग्णांवर उपचार चालू आहेत. 52 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गित व्यक्तींची तालुकानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:-
 • वसई विरार महानगरपालिका क्षेत्र – 1288 (46 मृत्यू)
 • वसई ग्रामीण तालुका – 64 (3 मृत्यू)
 • पालघर तालुका – 105 (3 मृत्यू)
 • विक्रमगड तालुका – 43
 • डहाणू तालुका – 41
 • वाडा तालुका – 41 
 • जव्हार तालुका – 3

पालघर जिल्ह्यातील 809 कोरोनासंसर्गीत व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. अशा कोरोनामुक्त झालेक्या व्यक्तींची तालुकानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:-
 • वसई विरार महानगरपालिका क्षेत्र – 708
 • वसई ग्रामीण तालुका – 34 
 • पालघर तालुका – 42
 • डहाणू तालुका – 19
 • वाडा तालुका – 5
 • जव्हार तालुका – 1

Thursday, June 11, 2020

पुनरर्चित हवामान आधारित फळपीक विमा योजना 2020-2021

पुनरर्चित हवामान आधारित फळपीक विमा योजना 2020-2021

बेरोजगार तरुण-तरुणींसाठी नोकरीची संधी; ऑनलाईन रोजगार मेळाव्यात व्हा सहभागी!

पुणे जिल्ह्यातील नामांकित आस्थापना, कंपन्यांमधील विविध प्रकारच्या रिक्तपदाद्वारे मोठी सुवर्णसंधी देऊ केली आहे.

example

पुणे : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने नोकरीकरीता बेरोजगार युवक युवतींसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातून जिल्ह्यात सुमारे अडीच हजाराहून अधिक रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे परप्रांतीय कामगारांचे जिल्ह्यातून इतर राज्यात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे औद्योगिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील नामांकित आस्थापना, कंपन्यांमधील विविध प्रकारच्या रिक्तपदाद्वारे मोठी सुवर्णसंधी देऊ केली आहे.


या ऑनलाईन रोजगार मेळाव्यांतर्गत जिल्ह्यातील विविध उद्योजकांकडे मशीन ऑपरेटर, वेल्डर, फिटर, पेंटर, शीटमेटल वर्कर, डिझेल मेकॅनिक, ऑटो मेकॅनिक, मेसन, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, कारपेंटर, ग्राइंडर, टर्नर, मशिनिस्ट, इंजिनिअरिंग डिप्लोमा, प्रोग्रॅमर, बीडीई, पायथॉन डेव्हलपर, सॉफ्टवेअर, हार्डवेअर इंजिनिअर, अकाउंटंट, टीग वेल्डर या पदांसाठी आवश्यक पात्रताधारक तसेच, इयत्ता सातवी ते नववी, दहावी, बारावी, पदवीधर उमेदवारांसाठी एकूण अडीच हजार पेक्षा अधिक रिक्त पदे उपलब्ध करुन दिली आहेत.


हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आपल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाद्वारे लॉगइन करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्त पदासाठी आपला पसंतीक्रम ऑनलाईन पध्दतीने नोंदवावेत. पसंतीक्रम नोंदविताना शक्यतो आपण वास्तव्यास असलेल्या ठिकाणाच्या आसपासच्या कंपन्यांची तसेच आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घ्यावी. 


उमेदवारांना त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक आणि वेळ एसएमएस अलर्टद्वारे कळविण्यात येईल. ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल. इच्छुक युवक युवतींनी 22 जूनपर्यंत आपापले पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.

Wednesday, June 10, 2020

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी 31 जुलै पर्यंत नोंदणी करणाऱ्या मिळणार लाभ पीक विमा 2020


मोदी सरकारच्या पंतप्रधान पीकविमा योजनेचा (PMFBY)लाभ घ्यायचा असेल तर खरीप पिकांच्या विम्याच्या शेवटची तारीख 31 जुलै 2020 आहे. ज्या कर्जदार शेतकऱ्यांना विमा सुविधा नको असेल त्यांनी शेवटच्या तारखेच्या 7 दिवस आधी त्यांच्या बँक शाख्यात लेखी कळवावे. कर्ज न घेतलेले शेतकरी सीएससी सेंटर, बँक, एजेंट मार्फत किंवा विमा पोर्टलवर पीक विमा स्वतः करू शकतात. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांची नुकसान भरपाई मिळते. हवामानातील अचानक बदल किंवा पावसाळ्याच्या वेळी बऱ्याच शेतकऱ्यांची मेहनतीची कमाई ही काही क्षणातच वाया जाते. शेतकऱ्याची ही समस्या विचारात घेऊन भारत सरकारने 13 जानेवारी 2016 रोजी या योजनेची सुरुवात केली.

पीक विमा योजनेत कोणत्या कारणांसाठी नुकसानभरपाई मिळते?

पीक विमा योजनेतंर्गत गारपीट, जमिन धसने,पाणी साचणे, ढगफुटी व नैसर्गिक आगीमुळे होणाऱ्या शेतीनिहाय नुकसानाचे मूल्यांकन करून नुकसान भरपाई दिले जाते. नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यावर केन्द्र सरकाराने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी फेब्रुवारी2016 मध्ये अत्यंत महत्वकांक्षी 'पंतप्रधान पीक विमा योजना ' सुरू केली.

पीक विमा योजनेमध्ये(PMFBY) कशी नुकसानभरपाई मिळते?

पेरणीच्या 10 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना पीएमएफबीवायचा अर्ज भरावा लागतो. नैसर्गिक आपत्तीमुळे तुमचे पीक खराब झाले असेल, तरच विमा रकमेचा लाभ मिळतो. पेरणीपासून तर काढणी दरम्यान उभ्या पिकांचे जर नैसर्गिक आपत्ती, रोग आणि कीटकांच्या प्रादुर्भावमुळे नुकसान झाले असेल
तर या विम्याचा लाभ मिळतो. तसेच उभ्या पिकाचे जर स्थानिक आपत्ती,गारपीट,दरड कोसळणे, ढग फुटी, वीज पडल्यामुळे नुकसान झाले तर याचा लाभ मिळतो, तसेच पीक काढल्यानंतर पुढील 14 दिवसापर्यंत शेतात सुकवण्यास ठेवलेल्या पिकांवर जर अवेळी मौसमी चक्रीवादळ, गारा व वादळाचा प्रादुर्भाव झाला तर नुकसान भरपाई दिली जाते. तसेच प्रतिकूल हंगामी परिस्थितीमुळे पिकांची पेरणी झाली नसेल तर देखील या विम्यापासून लाभ मिळतो.

किती प्रिमीयम भरावा लागतो?
खरीप पिकांसाठी प्रत्येकी 2% प्रीमियम आणि रब्बी पिकांसाठी प्रत्येकी 1.5% प्रिमियम भरावा लागतो.  पीएमएफबीवाय योजनेचा व्यावसायिक आणि बागाईत पिकांसाठी विमा संरक्षण देखील प्रदान करते. यात शेतकऱ्यांना 5% प्रीमियम भरावा लागतो.

लाभ मिळण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागतात?

शेतकऱ्यांना एक फोटो, ओळखपत्र, निवासाचा पत्ता म्हणून पुरावा, 7/12 उतारा, शेतातील पुरावा द्यावा लागतो. दाव्यासाठी शेतकऱ्यांचा पीक विमा कंपनीच्या टोल फ्री नंबर किंवा विमा कंपनी व कृषी विभागाच्या संपर्क साधू शकतात. यात 72 तासाचा कालावधी निश्चित केला आहे. नुकसान झाल्यास शेतीनिहाय नुकसानाचे मूल्यांकन करून पैसे दिले जातात.

मनरेगा योजनेतंर्गत 2548 कामे सुरु असून त्यावर 60,461 मजूर उपस्थित.जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे

पालघर जिल्ह्यात मनरेगा योजनेतंर्गत एकूण 2548 कामे सुरु असून त्यावर एकूण 60,461 मजूर उपस्थिती आहे. रोजगार :- मनरेगा योजनेतंर्गत पालघर जिल्ह्यात सन 2020-21 या वर्षात 1 एप्रिल 2020 पासून आतापर्यंत 39, 541 कुटुंबातील 80,050 मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यापैकी 36,736 आदिवासी कुटुंब असून सर्वाधिक आदिवासी कुटुंबाना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. पालघर जिल्हा राज्यात प्रथम स्थानी आहे. शेल्फ वरील कामे :- पालघर जिल्ह्यात शेल्फवर 12,288 कामे उपलब्ध आहेत. या पैकी 9009 कामे ग्राम पंचायत स्तरावर उपलब्ध असून 3279 कामे यंत्रणा स्तरावर उपलब्ध आहेत. मनुष्यदिन निर्मिती :- सन 2020- 21 या वर्षात 1 एप्रिल 2020 पासून आतापर्यंत 8,29,726 इतकी मनुष्यदिन निर्मिती झालेली असून मनुष्यदिन निर्मिती मध्ये पालघर जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक आहे. तर योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यात 2019-20 या वर्षात मार्च 2019 अखेर एकुण 24.61 लक्ष इतकी मनुष्य दिवस निर्मिती झाली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
मनरेगा योजनेअंतर्गत 2020-21 या वर्षात 1 एप्रिल 2020 पासून आतापर्यंत 1900.08 लक्ष इतका निधि मजुरांच्या मजुरीवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. 2019-20 या मागील वर्षात पालघर जिल्ह्यात एकूण रु. 6636.76 लाख इतका खर्च झालेला असून, त्यापैकी रु.5117.63 लाख इतकी रक्कम अकुशल मजुरीकरिता खर्च झालेली आहे. मजुरीचा दर 1 एप्रिल 2020 पासून केंद्र शासनाने मजुरीच्या दरामध्ये वाढ केली असून महाराष्ट्र राज्यासाठी हा दर 238 रुपये इतका निश्चित करण्यात आलेला आहे. तर मागील वर्षी हा दर महाराष्ट्र राज्यासाठी 206 इतका होता. तरी महाराष्ट्र राज्याकरिता मजुरीच्या दरात 32 रुपये वाढ झालेली आहे. वेळेत मजुरी प्रदान करण्यात येत आहे. मनरेगा योजनेअंतर्गत नियमानुसार मजुरांना मजुरी 15 दिवसाच्या आत प्रदान करने बंधनकारक असून, पालघर जिल्ह्यात मजुरांना मजुरी 8 दिवसाच्या आत प्रदान करण्याचे प्रमाण 100 % असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.