Wednesday, April 1, 2020

अत्यावश्यक खाजगी सेवा, आस्थापना आवश्यकतेनुसार सुरु राहणार-178 परदेशी प्रवाशी निरीक्षणासाठीअप्पर निवासी उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले

 
कोरोना विषांणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पालघर जिल्ह्यात विविध खाजगी आस्थापना, दुकाने, इत्यादी बाबींवर निर्बध घालण्यात आले आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी काही अत्यावश्यक खाजगी सेवा आस्थापना आवश्यकतेनुसार सुरु राहणार आहेत असे अप्पर निवासी उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी श्री. नवले बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. सागर पाटील उपस्थित होते.
सुरु राहणारे अत्यावश्यक, खाजगी सेवा, आस्थापना, शासकीय, निमाशाकीय सेवा पुढील प्रमाणे:
शासकीय, निमशासकीय कार्यालये,सरकारी महामंडळाचे उपक्रम, आस्थापना, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रुग्णालये, पॅथोलॉजी, लॅबोरेटरी, दवाखाने,सर्व प्रकारचे वैद्यकीय (ॲलोपथी, आयुर्वेदिक, होमिओपथी इत्यादि.) नर्सिंग कॉलेज, रेल्वे स्टेशन, एस.टी.स्टँड, महानगर परीवहन थांबे व स्थानके, रिक्षा थांबे इत्यादि, अंत्यविधी, पिठाची गिरणी, अत्यावश्यक किराणा सामान, दुध/दुग्धोपादने, फळे व भाजीपाला, औषधालये, चिकन, मटण, मासे, स्विट मार्ट, बेकरी, इ. जीवनावश्यक वस्तू वितरीत विक्री करण्यास परवानगी राहील, उपहार गृह 5 ग्राहकांच्या क्षमतेपर्यंत तसेच पार्सल सुविधेसह (Take away) चालू राहतील, तसेचविद्यार्थ्यांसाठी खानावळ तसेच महाविद्यालये, वस्तीगृह यामधील कॅन्टींग, मेस (केवळ परीक्षार्थीसाठी) चालू राहतील, इयत्ता दहावी व इयत्ता बारावी तसेच राज्य शासन व केंद्र शासनाकडून घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा, विद्यापिठ, विश्व विद्यालयाच्या परीक्षा देणारे विद्यार्थी व संबंधित शैक्षणिक काम पाहणारी व्यक्ती, ज्या आस्थापना (उदा.माहिती व तंत्रज्ञान उद्योग) ज्यांच्याकडे देश व परदेशातील अतिमहत्त्वाच्या (Critical-National & International Infrastructure) उपकेंद्रांची जबाबदारी आहे व सदर आस्थापना बंद राहील्याने अशा उपक्रमांच्या प्रक्रियेला बाधा येऊ शकते असे सर्व संबंधित उपक्रम कार्यान्वित राहू शकतील (परंतू या दृष्टीने सदर आस्थापना कार्यरत ठेवण्याच्या आवश्यकते बाबत कामगार उपायुक्त, पालघर यांचेकडे विशेषरित्या कळविणे बंधनकारक आहे, प्रसारमाध्यमांचे (सर्व प्रकारचे दैनिक, नियतकालिके, टिव्ही न्युज चॅनेल इ.) कार्यालये चालू राहतील, पालघर जिल्हयातील सर्व बँकांचे एटीएम केंद्रे, वीज वितरण कंपन्यांचे बील भरणा केंद्रे, मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज स्टेशन, झेरॉक्स सेंटर हे सुरळीत चालू राहतील, असा विश्वास श्री. नवले यांनी व्यक्त केला.
सदर ठिकाणी हँड सॅनिटायझर (Hand Sacnitizers) ची योग्य ती व्यवस्था सर्व संबंधित आस्थापनांनी करावी.
उक्त आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील 51 (b) व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय/कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे अधिसूचनेत नमुद करण्यात आले आहे, असे अप्पर निवासी उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले यांनी सांगितले.
जिल्ह्यात सध्या 178 परदेशी प्रवासी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून दोन परदेशी प्रवासी यांच्या घशातील नमुने तपासणीसाठी कस्तुरबा गांधी रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे. त्याचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. तसेच 14 दिवासाचा निरिक्षण कालावधी 33 प्रवासांनी पुर्ण केला या दरम्यान कोरोना संसर्ग झाल्याचे कोणतेही लक्षण त्यांचा मध्ये दिसले नसुन सध्या स्थितीत जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव रुग्ण नाही असे श्री. नवले यांनी सांगितले.
नागरिकांना आवाहन
जर आपल्याला हातावर ‘Home Quarentine Proud to Protect Palgharkar’ असा शिक्का असलेली व्यक्ती घराबाहेर फिरताना दिसली तर घाबरुन वा गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही. अशा व्यक्तींना नम्रपणे व आदरपूर्वक घरी राहण्याची विनंती करा.
त्यांना कोरोनाची बाधा झालेली नसून ते कोरोना बाधित देशातून प्रवास करुन आले असल्याने व कोरोनाची लक्षणे दिसायला 14 दिवस लागत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना पुढील 14 दिवस घरात विलगीकरण करुन राहावे लागणार आहे. असे विलगीकरण करणे नक्कीच सोपे नाही परंतु आपल्या सर्वांच्या आरोग्यरक्षाणाच्या दृष्टीने त्यांना स्वत:ला घरात बंदिस्त ठेवणार आहेत.इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेणे व घरीच राहणे ही गोष्ट नक्कीच अभिमानास्पद आहे. त्यामुळे अशा व्यक्तींकडे संशयित कोरोना रुग्ण या दृष्टीने न पाहता आपण त्यांना मदत व सहकार्य करणे अपेक्षित आहे. 

No comments: