कोविड 19 विषाणू प्रसारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांमध्ये संस्था आणि नागरिक यांना सहभागी होता येणार आहे. जे नागरिक, उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वयंसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19″ या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.
खात्याची सविस्तर माहिती:
Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank A/C no. 39239591720
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300
State Bank of India, Mumbai Main Branch, Fort Mumbai 400023
No comments:
Post a Comment