Tuesday, April 28, 2020

पालघर जिल्ह्यात दिवसभरात 4 कोरोना रुग्णाचे वाढ


पालघर जिल्ह्यात आजच्या दिवसांत कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 3 ने वाढून 154 झाली आहे. हे 3 रुग्ण वसई महापालिका क्षेत्रातील आहेत.

उद्यापासून 4 दिवस पालघर शहरात पूर्ण Lock Down ची अंमलबजावणी.
पालघर शहरामध्ये काल कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर आता नगरपरिषदेने 29 एप्रिल पासून 2 मे पर्यंत शहरामध्ये औषध विक्री व्यतिरिक्त सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. काल सायन येथे स्टाफ नर्स म्हणून काम करणाऱ्या पालघर येथील 56 वर्षीय महिलेला कोरोना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते.

29 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बंद.
जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे संपूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी 29 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज लोकांसाठी उपलब्ध रहाणार नाही.

सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी रहावे! जिल्हाधिकारी यांच्या सूचना
काही सरकारी अधिकारी व कर्मचारी हे पालघर जिल्ह्याबाहेर सेवेत असतात व येथून ये – जा करतात आणि काही जिल्ह्यात नेमणूकीला असताना जिल्ह्याबाहेरुन ये- जा करतात. यापुढे अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयात राहून सेवा देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. जिल्ह्याबाहेरुन येण्यास व जाण्यास आता मनाई करण्यात आली आहे.

मास्क न वापरणे, थुंकणे, सोशल डिस्टन्सींग न पाळणे याविरोधात आता दंडात्मक कारवाई.
कोव्हिड 19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नियमांचे पालन न करणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले आहे. दंडाची तरतूद पुढीलप्रमाणे:-
सार्वजनिक स्थळी मास्क न वापरणे – रु. 200
सार्वजनिक स्थळी थुंकणे – रु. 500
दुकानदारांनी सोशल डिस्टन्सींग न पाळणे :-
दुकानदाराकडून – रु. 2,000
ग्राहकाकडून – रु. 200
जीवनावश्यक वस्तुंचे दरपत्रक न लावणे – रु. 2,000

No comments: