शेती करताना शेतकऱ्याला अपघाती मृत्यू येतो त्याची करणे वेगवेगळी असू शकतात . जसे कि अंगावर वीज पडून मृत्यू येणे, नैसर्गिक आपत्ती , पूर, सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात, विजेचा शॉक लागून मृत्यू अश्या वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्याला अपंगत्व किंवा मृत्यू ओढवला जातो. आणि शेतकरी कुटुंबाचा आधार जातो.
२००९-१० मध्ये या योजनेसाठी १ लाख एवढा विमा संरक्षित केला गेला होता परंतु ह्या योजनेचे कल्याणकारी स्वरूप लक्ष्यात घेता २०१५-१६ मध्ये हि रक्कम वाढवून २ लाख एवढी करण्यात आली व योजनेला ‘गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात योजना’ अश नाव देण्यात आले.
राज्यातील सर्व सातबाराधारक शेतकऱ्यांचा विमा हफ्ता शासनामार्फत भरण्यात आला असून दोन लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. विम्याचा लाभ हा 10 ते 75 वयोगटातील शेतकऱ्यालाच मिळणार आहे. यापुर्वी ज्याचा अपघात झाला आहे त्या शेतकऱ्याचा सातबारा असणे आवश्यक होते. मात्र, यामध्ये बदल करुन जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे शेतजमिन असली तरी सहभागी होता येणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितिधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य (आई,वडिल, शेतकर्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकुण दोन जण.
आवश्यक कागदपत्र
१)७/१२
२)६क
३)६ड(फेरफार)
४)एफ. आय. आर.
५)पंचनामा
६)पोष्ट मार्टेम रिपोर्ट
७)व्हिसेरा रिपोर्ट
८)दोषारोप
१०)दावा अर्ज
११)वारसदाराचे राष्ट्रीयकृत बँक खाते पुस्तक
१२)घोषणा पत्र अ व घोषणा पत्र ब (अर्जदाराच्या फोटोसह) १३)वयाचा दाखला
१४)तालुका कृषि अधिकार पत्र
१५)अकस्मात मृत्यूची खबर
१६)घटनास्थळ पंचनामा
१७)इंनक्वेस्ट पंचनामा
१८)वाहन चालविण्याचा वैध परवाना
१९)अपंगत्वाचा दाखला व फोटो
२०)औषधोपचारा चेकागदपत्र
२१)अपघात नोंदणी ४५ दिवसाचे आत करणे
विमा दाव्याच्या अनुषंगाने पुर्व सुचना अर्ज विहित कागद पत्रांसह ज्या दिनांकास तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दाखल/प्राप्त होइल व संगणक प्रणालीमध्ये अपलोड होइल त्या दिनांकासच तो विमा कंपनीस प्राप्त झाला आहे असे समजण्यात येइल.
शिवाय योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्या नंतर 90 दिवसां पर्यंत संगणक प्रणाली मध्ये नोंद झालेल्या पुर्व सुचना अर्जान्वये तालुका कृषी अधिकारी यांचे कडे प्राप्त होणारे विमा प्रस्तावसुद्धा विमा पॉलिसी चा कालावधी संपल्याच्या दिवसापासून 365 दिवसां पर्यंत स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील. मात्र सदर कालावधी नंतर कोणताही प्रस्ताव स्विकारला जाणार नाही. तसेच या संदर्भात ग्राहक मंच किंवा इतर निर्णय/आदेश शासनावर बंधनकारक राहणार नाहीत.
No comments:
Post a Comment