Tuesday, January 17, 2023

रूफटॉप सोलर योजना solar rooftop online application

रूफटॉप सोलर योजना किती मिळते सबसिडी
रूफटॉप सोलर योजनेसाठी जी सबसिडी दिली जाते ती प्लांट वर आधारित असते. खालील टेबल बघितल्यास तुम्हाला सिबसिडीचे स्वरूप अगदी चांगल्या प्रकारे समजू शकते.
प्लांट क्षमता मिळणारे अनुदान
३ किलोवॅट पर्यंत १४५८८ प्रती किलोवॅट
३ किलोवॅटच्या पुढे पण १० किलोवॅटच्या आत पहिल्या तीन किलोवॅटसाठी १४५८८ प्रती किलोवॅट त्यानंतरच्या किलोवॅटसाठी ७२९४ प्रती किलोवॅट.
१० किलोवॅटच्या पुढील प्लांटसाठी ९४८२२ फिक्स अनुदान
तुम्ही खाजगी विक्रेत्याकडून रूफटॉप सोलर प्लांट लावू शकता आणि वरील प्रमाणे अनुदान मिळवू शकता. अट मात्र अशी आहे कि जो रूफटॉप सोलर विक्रेता आहे तो DISCOM मध्ये नोंदणीकृत असायला हवा.
रूफटॉप सोलर प्लांट लावण्यासाठी विक्रेता आणि ग्राहक यांच्यामध्ये करार करणे आवश्यक आहे. हा करार ५० रुपयांच्या बॉंड पेपरवर करवा लागतो.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे.
तुम्हाला जर रूफटॉप सोलर प्लांट उभारायचा असेल तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात तर आपण माहिती जाणून घेतली आहे. आता जाणून घेवूयात कि यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात.

DISCOM कडून ऑनलाइन पूर्णता अहवाल प्राप्त झाल्यानंतर, अर्जदाराला सबसिडी/CFA दावा करण्यासाठी खालील कागदपत्रे
• लाभार्थीचे नाव
• खाते क्रमांक
• बँकेचे नाव
• IFS कोड
• रद्द केलेल्या चेकची प्रत पोर्टलवर अपलोड करायची आहे.
योजनेचे नाव रूफटॉप सोलर योजना
योजना कोण राबविते केंद्र सरकार
सबसिडी किती मिळणार प्रती किलोवॅटनुसार
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज करण्याची वेबसाईट https://solarrooftop.gov.in/
अशा पद्धतीने आपण या लेखामध्ये जाणून घेतले आहे कि रूफटॉप सोलर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो. त्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात व किती सबसिडी मिळते.
अर्ज करण्यासंदर्भातील एक व्हिडीओ देखील या लेखामध्ये दिलेला आहे जेणे करून अर्ज सादर करतांना तुम्हाला कोणतीही अडचण येवू नये.

अधिक माहितीसाठी तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

रूफटॉप सोलर प्लांटसाठी किती अनुदान मिळते?
प्रती किलोवॅट नुसार हे अनुदान दिले जाते. अधिक माहितीसाठी लेख वाचा.
योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा.
ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. शिवाय व्हिडीओ देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही स्वतः रूफटॉप सोलर योजनेचा ऑनलाईन अर्ज सदर करू शकता.

कागदपत्रे कोणकोणती लागतात?
ऑनलाईन अर्ज सादर करतांना सुरुवातील लाईट बिल व रहिवासी पुरावा आणि तर कागदपत्रे अपलोड करावी लागतात. अर्ज मंजूर झाल्यावर मात्र इतर कागदपत्रे अपलोड करावी लागतात. त्या कागदपत्रांविषयी या लेखामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे.
सौरऊर्जेच्या वापरला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासन तसेच राज्य शासन नेहमीच विविध योजना राबवत असते. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांनी सौरऊर्जेचा वापर करावा असा सरकारचा नेहमीच प्रयत्न असतो. आता या कामी हातभार लावण्यासाठी महावितरणनेही यात उडी घेतली आहे. महावितरणने देखील छतावरील (रूफटॉप) सौरऊर्जा योजना आणली आहे.

या योजनेअंतर्गत महावितरणच्या ग्राहकांना छतावरील (रूफटॉप) सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसवण्यासाठी केंद्र शासनाकडून 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळत आहे. सौरऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीज बिल देण्यापासून सुटका तर मिळेलच सोबत नेटमीटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षअखेर शिल्लक वीज देखील विकत घेतली जाते. असा या योजनेचा दुहेरी फायदा आहे.
महावितरणच्या अनेक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी केंद्र शासनाने नॅशनल पोर्टल फॉर सोलर रूफटॉपचे अनावरण जुलै 2022 मध्ये केले असून या पोर्टलवर ग्राहक भारतामधून कुठूनही सोलर रूफटॉपसाठी अर्ज करू शकतो.

सदर योजना ग्राहकांसाठी अत्यंत फायद्याची असून, या योजनेमुळे रोहित्रावरचा ताणही कमी होण्यास मदत होत आहे. या योजनेला जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मंडळ, विभागीय, उपविभागीय कार्यालय तसेच एजन्सी देखील प्रयत्न करत आहेत.
या योजनेमधून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील (रूफटॉप) सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसवण्यासाठी केंद्र शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येत आहे. रूफटॉप सौर योजनेमधून घरगुती ग्राहकांसाठी अटी व शर्तीसह 1 ते 3 किलोवॅटपर्यंत 40% आणि 3 किलोवॅट ते 10 किलोवॅटपर्यंत 20% अनुदान देण्यात येत आहे.
तसेच सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅटपर्यंत अनुदान देण्यात येते. मात्र यामध्ये प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट या मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना 20% अनुदान देण्यात येते.


महावितरण रूफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्जाची सोय महावितरणच्या अधिकृत www. mahadiscom.in या वेबसाईटवर करण्यात आली आहे

No comments: