महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, प्रवर्गातील विद्यार्यािंना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा शुलक या योजनेचा लाभ दिला जातो . सन २०१८-१९ ते २०२१-२२ या वर्षात विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती साठी अर्ज केले होते. मात्र, यावेळी काही पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ॲटो रिजेक्ट झाले होते त्यामुळे ते शिष्यवृत्ती पासून वंचित राहिले होते. या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अता प्रलंबित अर्ज ऑफलाईन पध्दतीने निकाली काढले जाणार आहेत.
पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या विविध अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्याचे विहीत मुदतीत अर्ज भरता न येणे, अर्ज ॲटो रिजेक्ट होणे, एखाद्या वर्षी अर्ज भरता न आल्यास त्यावर्षी गॅप ईयर असे पोर्टलवर नमूद होऊन पुढच्या वर्षीचा अर्ज भरताना अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नाही.
अशा विध्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज १५ जून २०२३ पर्यंत महाविद्यालयाकडे जमा करावा तसेच महाविद्यालयाने २० जून पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण, या कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त समाधान यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment