अंगणवाडी भरती २०२४ या नवीन बदलासह होणार आहे. यामध्ये सेविका व मदनीस पदांच्या पात्रता जवळपास सर्व सारखे आहेत त्यामुळे यामध्ये आपण एकत्र बघणार आहे.
1.कागदपत्रे
2. अटी व शर्ती
3. पात्रता
4. वय
5. अर्ज कसा करावा
6. मानधन
7. निवड कशी होते
8. भरती प्रक्रिया
9. गुण कसे दिले जातात
#1. कागदपत्रे
आधार कार्ड
पासपोर्ट फोटो
रहिवासी दाखला
डोमिसाइल प्रमाणपत्र
शाळा सोडण्याचा दाखला / LC
जातीचा दाखला – विवाह झाला असेल तर विवाह अगोदर चे जातीचे प्रमाणपत्र चालेल.
12 वी मार्कशीट
विवाह प्रमाणपत्र – लग्न झाले असल्यास
विधवा असल्यास प्रमाणपत्र
#2. अटी व शर्ती
- Maharashtra Anganwadi Bharti 2024:उमेदवार स्थानिक रहिवासी असावा . ज्या गावातील उमेदवार रहिवासी असेल त्या गावातील उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
- अंगणवाडी कर्मचारी कोणत्याही परीस्थितीत बदली दिली जाणार नाही. ज्या गावामध्ये अंगणवाडी मध्ये कर्मचारी म्हणून नेमणूक झाली असेल त्याच ठिकाणी राहील.
- उमेदवार जर या अगोदर अंगणवाडी सेविका / मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका म्हणून काम केले असल्यास २ वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक.
- नियुक्ती झाल्यापासून ३० दिवसात रुजू होणे आवश्यक अन्यथा अपात्र करण्यात येईल.
- पदाची संख्या किंवा ठिकाणे यामध्ये बदल होऊ शकतो.
#3. पात्रता
- लहान कुटुंब प्रमाणपत्र लागेल . उमेदवारास दोन पेक्षा जास्त हयात अपत्ये / मुल नसावे अन्यथा त्यास अपात्र केले जाईल. दत्तक अपत्य असल्यास तरी सुधा उमेद्वासार अपात्र केले जाईल
- उमेदवारास मराठी भाषा येणे आवश्यक.
- उमेदवावारस १० वी ला मराठी भाषासह उतीर्ण असणे आवश्यक.
- स्थानिक रहिवासी असेन गरजेचे.
- उमेदवार कमीत कमी 12 वी उतीर्ण असेन आवश्यक आहे.
- विवाह झाला असेल तर विवाह प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे .
- जर विवाह प्रमाणपत्र नसेल तर राजपत्र असणे आवश्यक.
#4. वय
- जाहिरात प्रसिद्ध झाल्या पासून किमान १८ वर्ष तर कमाल ३५ वर्ष दरम्यान वय असणे आवश्यक आहे .
- जर उमेदवार विधवा महिला असेल तर वयामध्ये ५ वर्ष सुट देण्यात आली आहे. म्हणजे त्या महिलेला वयाच्या ४० वर्ष पर्यंत अर्ज करता येईल.
#5. अर्ज कसा करावा
- अर्ज हा तुमच्या जिल्हातील किंवा तालुक्यातील जाहिरात प्रसिद्ध झाल्या नंतर करता येईल.
- जाहिरात तुमच्या जिल्हाच्या वेबसाईट वर प्रसिद्ध केली जाते.
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ( जेव्हा अर्ज online सुरु होईल तेंव्हा कळवण्यात येईल )
- अर्ज तुम्हाला जाहिराती मध्ये दिला जाईल
- .अर्ज व्यवस्थित भरून कार्यालयात जमा करायचा आहे. पत्ता जाहिराती मध्ये दिला जातो.
- नंतर अर्जाची छाननी केली जाते.
#6. मानधन
- मदनीस पदासाठी सर्व एकत्रित मानधन दरमहा ४४२५ रुपये दिले जाते.
- अंगणवाडी मदतनीस ला ४५०० पेक्षा जास्त मानधन दिले जाते.
#7. निवड कशी होते

- Maharashtra Anganwadi Bharti 2024:अंगणवाडी सेविका किंवा मदनीस यांची निवड हि त्यांच्या मार्क नुसार होते . यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतली जात नाही.
#8. भरती प्रकिया
- निवड प्रक्रिया हि सरळसेवा सारखी होते. सरळ नियुक्ती केली जाते.
- फॉर्म हे सध्या तरी ऑफलाईन आहे.
- ज्या उमेदवारास जास्त गुण असेल त्या उमेदवारास नियुक्ती दिली जाते.
- नियुक्ती झाल्या पासून ३० दिवसात रुजू होणे आवश्यक आहे. जर रुजू झाला नाही तर प्रतीक्षा यादी तील गुणानुसार नियुक्ती दिली जाते . जी प्रतीक्षा यादी जाहीर केली जाते टी एक वर्ष पर्यंत वैध असते केंवा पण एका वर्षात प्रतीक्षा यादीतील उमेदवार पात्र होऊ शकतो.
#9. गुण कसे दिले जातात
- Maharashtra Anganwadi Bharti 2024:उमेदवारास गुण हे शैक्षणिक गुणपत्रिका नुसार दिले जातात. गुणपत्रिका मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे ७५ गुण हे दिले जातात . जसे जास्त गुण तसे मार्क .
- आणखी २५ गुण असतात . ते गुण तुम्हाला तुमच्या पुढील शिक्षणानुसार दिले जातात. तुमचे जास्त शिक्षण असेल तर ५ गुण तुम्हाला जास्तीचे दिले जातात . या पद्धतीने गुण दिले जातात.