दि. 09.04.2020: पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी आजपासून खाजगी वाहनांना पेट्रोल व डिझेल विक्री करण्यास मनाई केली आहे. तसे आदेश पेट्रोलपंप चालकांना देण्यात आलेले आहेत. आज सकाळी 9 वाजतापासून या आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी Lock Down च्या काळात, लोकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, यासाठी करण्यात आलेली ही उपाययोजना आहे. या आदेशातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना मात्र वगळण्यात आलेले आहे
Thursday, April 9, 2020
Wednesday, April 8, 2020
तलासरी पोलिस ठाणे हद्दितील जनतेला आवाहन
उद्यापासून डहाणू शहरात वेळेचे निर्बंध; स. 7 ते दु. 12 या वेळेतच दुकाने उघडी
डहाणू शहरातील भाजी बाजारातील गर्दी कमी करुन सोशल डिस्टन्सींग राखण्यात नगरपालिका प्रशासनाला अपयश आल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या सर्वच दुकानदारांना सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंतच दुकाने उघडी ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. दुपारी 12 नंतर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाणार आहे. लोकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी दुपारी 12 पर्यंत करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
डहाणूतील रेल्वे स्थानक परिसरात नाशिक येथून येणाऱ्या भाजीपाल्याचा घाऊक बाजार भरतो. याच परिसरात किरकोळ भाजी विक्रेत्यांची देखील दुकाने आहेत. लोक भाजीपाला खरेदी करण्याच्या सबबीखाली या परिसरात येतात. तारपा चौक येथे पोलिसांतर्फे नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र तरीही भाजी बाजारात सोशल डिस्टन्सींग पाळले जात नाही. भाजी बाजार सोमवार बाजार जेथे भरतो, त्या ठिकाणी भरवण्याचा निर्णय झाला होता. मात्र भाजीपाला विक्रेते तयार झाले नाहीत. अखेर आज अचानक डहाणू नगरपालिकेतर्फे रेल्वे स्थानक परिसरातील दुकाने 12 वाजेनंतर बंद करण्यात आली. इतर भागातील दुकाने खुली आणि रेल्वे स्थानक परिसरातील दुकाने बंद, अशा धोरणातून व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. अखेर डहाणू शहरातील सर्वच जिवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंतच खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर लोकांना विनाकारण रस्त्यावर फिरण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
पालघर जिल्ह्यात Corona +Ve ची संख्या 4 ने वाढून 30
(08.04.2020; सायं. 6 वा.) पालघर जिल्ह्यात आज कोरोना बाधीतांची संख्या 4 ने वाढली असून, एकूण संख्या 30 झाली आहे. त्यामध्ये 4 मृतांचा समावेश आहे. पालघर तालुक्याची आतापर्यंत 2 कोरोना पॉझिटीव्ह व त्यातील 1 जणाचा मृत्यू ही आकडेवारी स्थिर राहिली आहे. वसई तालुक्यात 28 कोरोना पॉझिटीव्ह असून, त्यातील 3 जण वसई ग्रामीण भागातील आहेत व 25 जण महानगर क्षेत्रातील आहेत. महानगर क्षेत्रातील 25 पैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे. महानगर क्षेत्रातील कोरोनाचे नियंत्रण करण्यात यश येत नसल्याचे पाहून, सरकारने महापालिकेच्या आयुक्तपदावर गंगाधरन डी. (IAS) यांची नियुक्ती केली आहे. ते धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांच्याकडे महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला होता. मात्र आता महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळाला आहे.
246 तपासणी अहवालांमध्ये 216 -Ve व 30 +Ve(71 तपासणी अहवाल प्राप्त होणे बाकी)
