Saturday, February 26, 2022

इयत्ता बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल; ५ आणि ७ मार्च रोजी होणाऱ्या परीक्षा आता ५ आणि ७ एप्रिल २०२२ रोजी होणार


HSC Exam timetable revised Maharashtra 





काल नगर पुणे मार्गावर झालेल्या अपघाताच्या पार्शवभूमीवर शिक्षण मंडळाला परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची वेळ नामुष्की ओढवली आहे, 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) मार्च-एप्रिल 2022 ( HSC Exam Maharashtra 2022 ) च्या सर्वसाधारण व द्विलक्षी (जनरल आणि बायफोकल) आणि व्यावसायिक (एमसीव्हीसी) वेळापत्रकातील दि. 05 मार्च आणि दि. 07 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या विषयांच्या परीक्षा अपरिहार्य तांत्रिक कारणास्तव नियोजित तारखांऐवजी अनुक्रमे दि. 05 एप्रिल आणि दि. 07 एप्रिल 2022 रोजी आयोजित करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा ( HSC Exam Maharashtra 2022 )  दि. 04 मार्च ते 30 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये बदल करण्यात येत आहे.

यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार शनिवार दि. 05 मार्च 2022 रोजी प्रथम सत्रात होणारी हिंदी विषयाची तसेच द्वितीय सत्रात होणारी जर्मन, जपानी, चिनी, पर्शियन विषयांची परीक्षा आता मंगळवार दिनांक 05 एप्रिल 2022 रोजी नियोजित वेळेत होईल.

तर, सोमवार दि. 07 मार्च 2022 रोजी प्रथम सत्रात होणारी मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, (अरेबिक/देवनागरी) मल्याळम, तमिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली विषयांची तसेच द्वितीय सत्रात होणारी उर्दू, फ्रेंच, स्पॅनिश आणि पाली विषयांची परीक्षा आता 07 एप्रिल 2022 रोजी नियोजित वेळेत होईल.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) च्या लेखी परीक्षा व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकात इतर कोणताही बदल नाही. त्याचप्रमाणे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तरी वेळापत्रकातील उपरोक्त अंशत: बदलाची सर्व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/ प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे. 

Friday, November 19, 2021

राज्यात ग्रामपंचायत पोट निवडणूका जाहीर ! | Grampanchayat Election Maharashtra 2021

राज्यात ग्रामपंचायत पोट निवडणूका  जाहीर ! 

Grampanchayat Election Maharashtra 2021 

राज्यातील  विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींमधील एकूण ७ हजार १३० सदस्य पदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार असल्याची मोठी घोषणा महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.

या जांगाची २२ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

याचबरोबर राज्यातील ११३ नगरपंचायतींमधील सदस्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या देखील प्रसिद्ध करण्यात येतील ज्यावर २६ नोव्हेंबरपर्यंत हरकती-सूचना दाखल करता येतील,तर ३० नोव्हेंबरला प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध होतील,अशी माहिती देखील राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी दिली आहे.

राज्यातील ११३ नगरपंचायतींसाठी २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या

  1. ठाणे- मुरबाड व शहापूर, 
  2. पालघर- तलासरी, विक्रमगड, मोखाडा, 
  3. रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित), 
  4. रत्नागिरी- मंडणगड, दापोली, 
  5. सिंधुदुर्ग- कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ, देवगड- जामसंडे, 
  6. पुणे- देहू (नवनिर्मित), माळेगांव (ब्रुद्रुक) (नवनिर्मित), 
  7. सातारा- लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी, 
  8. सांगली- कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ, 
  9. सोलापूर- माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित), 
  10. नाशिक- निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, 
  11. धुळे- साक्री, 
  12. नंदुरबार- धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ, 
  13. अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी, 
  14. जळगाव- बोदवड, 
  15. औरंगाबाद- सोयगाव, 
  16. जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित), 
  17. परभणी- पालम, 
  18. बीड- केज, शिरूर- कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी, 
  19. लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ, 
  20. उस्मानाबाद- वाशी, लोहारा बु., 
  21. नांदेड- हिमायतनगर, नायगाव, अर्धापूर, माहूर, 
  22. हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ, 
  23. अमरावती- भातकुली, तिवसा, धारणी, नांदगाव-खंडेश्वर, 
  24. बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा, 
  25. यवतमाळ- महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी जामणी, 
  26. वाशीम- मानोरा, मालेगाव, 
  27. नागपूर- हिंगणा, कुही, भिवापूर, 
  28. वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर, 
  29. भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर, 
  30. गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, गोरेगाव, देवरी, 
  31. चंद्रपूर- सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही, 
  32. गडचिरोली- मुलचेरा, एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड. 
एकूण- 113.
आहे.