Tuesday, March 31, 2020
तातडीची प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीस मनाई.-जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सढळ हाताने मदत करावी-जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन
बेशिस्ती म्हणजे संकटाला निमंत्रण; सावध व्हा, गर्दी टाळा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील जनतेला विनम्र आवाहन
कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना बाधिताचा स्वानुभव!
कोरोनाच्या चाचण्यांची महाराष्ट्रात सर्वाधिक सुविधा; दिवसाला होऊ शकतात साडेपाच हजार चाचण्या - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपये
मुख्यमंत्र्यांसोबत राज्यपालांनी घेतला कोरोना आव्हान तयारीचा आढावा
Monday, March 30, 2020
ज्येष्ठ नागरिकांमधील कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अध्यापन प्रक्रिया - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश

जीवघेणा कोरोना व्हायरस हैदोस घालत आहे. जगभरातील 170 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत जगभरात साडेसहा हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत 31 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक लाख 42 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत.कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. इटलीमधील मृतांचा आकडा दहा हजारांवर पोहोचला आहे. तर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 92 हजार 472 आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत 5 हजार 992 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण संसर्ग झालेल्यांचा आकडा 73 हजार 235 वर पोहोचला.
दरम्यान, अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसमुळे 1 लाख 23 हजार 750 बाधित आहेत. ज्यापैकी 2227 लोकांता मृत्यू झाला आहे. चीनमध्ये निर्माण झालेल्या या व्हायरसने आतापर्यंत 3300 लोकांचा बळी घेतला आहे. तर 81439 लोकांना संसर्ग झाला आहे. दरम्यान, चीनमध्ये आता नव्या रूग्णांची संख्या घटली असून 40 ते 50 रूग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.
व्हायरल असलेला फॉर्म बनावट ; अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून खुलासा
कोरोना विरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचा टप्पा सुरू; अजूनही गर्दी कमी करा अन्यथा आणखी कठोर पावले टाकावी लागतील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या आदिवासी बांधवांसाठी अन्न व निवाऱ्याची सोय करा - आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
8 महत्वाच्या बाबी कोरोना विषाणू संबंधित किती दिवस शरीरात राहील
3) कोरोना विषाणूमुळे पीडित असलेल्या व्यक्तीमध्ये २२ ते 24 दिवस त्याचा प्रसार करण्याची क्षमता असते यानंतर त्यांच्या प्रसार होण्याची
शक्यता फारच कमी आहे.
4) एका अभ्यासानुसार कोरोना विषाणू मानवी शरीरात फक्त २२ दिवस जगू शकतो तथापि काही दुर्मिळ घटनांमध्ये हा कालावधी 37 दिवस असल्याचे आढळले आहे.
5) तुमच्या लक्षात आले असेल की कोरोना संशयितांना 14 दिवसांच्या कोठडीचा सल्ला देण्यात आला आहे याचे कारण असे आहे की त्याची लक्षणे दर्शविण्यास 6 दिवस लागतात तर पुढील 8 दिवस एखाद्या व्यक्तीस विषाणूचा धोकादायक प्रसार होऊ शकतो म्हणूनच 6 + 8 = 14 दिवसांच्या अलग ठेवण्याची शिफारस केली जाते.मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.
6) जेव्हा जेव्हा एखादा व्हायरस शरीरात प्रवेश करतो तेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती त्याच्या पातळीवर व्हायरस नष्ट करण्याचा प्रयत्न करते तथापि हे करण्यासाठी शरीराला 6 ते 12 दिवसांची आवश्यकता आहे त्याच वेळी ते विषाणूंविरूद्ध प्रतिपिंडे तयार करण्यास सुरवात करतात. या एन्टीबॉडीजमुळे संक्रमित व्यक्तीला कमी न होणाया इतरांपर्यंत हा संसर्ग पसरतो.जर या विषाणूची लागण झालेली व्यक्ती एकदा बरे झाली तर पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता खूपच कमी आहे. चीनमध्ये केवळ काही निवडक प्रकरणे उघडकीस आली आहेत. अशा संसर्गाची लागण होण्याचे प्रमाण एकूण संख्येच्या केवळ 0.2% आहे.
7)पॉझिटिव्हच्या टक्के घटनांमध्ये हे आढळले की संसर्ग २ डिग्री ते १० डिग्री सेल्सिअस तापमानात खूप वेगाने पसरतो म्हणूनच थंड ठिकाणी त्याच्या संसर्गाची शक्यता आणखीनच वाढते म्हणून अशी आशा आहे की उन्हाळ्याचा हंगाम जसजसा तीव्र होतो तसतसे या विषाणूचा प्रसार कमी होऊ शकतो.
पालघर जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची आकडेवारी (29.03.2020 रोजीची)
कोरोनाबाधेची शंका आल्यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तींची संख्या 2 ने वाढून 39 झाली आहे. त्यातील 20 जण हे विदेशवारी केलेले असून, अन्य विदेशवारी न केलेल्या 19 जणांमध्ये तीव्र श्वसन विकाराची लक्षणे आढळली असल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोरोना बाधीत रुग्णांच्या 11 निकटवर्तीयांसह (20+19+11) एकूण 50 जणांच्या घशाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
त्यातील 43 नमुन्यांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त अहवालांपैकी 38 अहवाल निगेटिव्ह आले असून 5 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेले सर्व 5 रुग्ण वसई विरार महानगर क्षेत्रातील असून त्यांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
• डहाणू: तालुक्यात 39 जण देखरेखीखाली असून त्यातील 3 जण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व आजाराचा पूर्वेतिहास असलेले आहेत. 21 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. 2 प्रवाशांमध्ये लक्षणे आढळल्यामुळे त्यांच्या घशाचे नमुने तपासले होते व रिपोर्ट निगेटिव्ह आले.
• पालघर: तालुक्यात 107 जण देखरेखीखाली असून त्यातील 10 जण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व आजाराचा पूर्वेतिहास असलेले आहेत. 62 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. 13 प्रवाशांमध्ये लक्षणे आढळल्यामुळे त्यांच्या घशाचे नमुने तपासले असता, 10 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 3 रिपोर्ट प्राप्त होणे बाकी आहे.
• वाडा: तालुक्यात 21 जण देखरेखीखाली असून त्यातील 14 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. 1 प्रवाशामध्ये लक्षणे आढळल्यामुळे त्याच्या घशाचे नमुने तपासले असता, रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
• जव्हार: तालुक्यात श्वसन विकाराचा एक नवा रुग्ण आढळला असून त्याच्या घशाचा नमुना तपासणीसाठी पाठवला आहे. अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. या आधी 1 जण देखरेखीखाली होता. त्याचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला आहे.
• मोखाडा: येथेही तीव्र श्वसनविकाराचा 1 रुग्ण आढळून आला असून त्याच्या घशाचा नमुना तपासणीसाठी पाठवला आहे. अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.
• विक्रमगड: तालुक्यात 3 जण देखरेखीखाली होते. त्यांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे.
• तलासरी: तालुक्यात 15 जण देखरेखीखाली असून त्यातील 1 जणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. 2 प्रवाशामध्ये लक्षणे आढळल्यामुळे त्याच्या घशाचे नमुने तपासले असता, रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
• वसई: शहरीकरण झालेल्या या तालुक्यात (ग्रामीण भागात 135 + महानगर क्षेत्रात 416) 551 जण देखरेखीखाली असून त्यातील 12 जण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व आजाराचा पूर्वेतिहास असलेले आहेत. त्यातील 192 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. कोरोनाची लक्षणे आढळलेले 10, तीव्र श्वसन विकाराचे 9 व कोरोना बाधीत रुग्णांचे निकटवर्ती 11 असे 30 जणांच्या घशाचे नमुने तपासले असता, त्यापैकी 23 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 5 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेले रुग्ण आधीच मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल झालेले आहेत. अन्य 2 जणांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहेत.
आज रोजी (दिनांक: 29 मार्च 2020) सरकारी संकेतस्थळावरील माहिती अशी आहे.
देशभरातील विमानतळांवर एकूण 15,24,266 प्रवाशांची तपासणी करण्यात आली. एकूण 1117 जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील 90 जण पूर्णत: बरे झाले असून 1010 जणांवर उपचार सुरु आहेत. 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 203 झाली असून त्यामध्ये 3 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. 25 जण पूर्णत: बरे झाले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
नजीकच्या गुजरात राज्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 63 झाली असून 1 जण पूर्णत: बरा झाला असून 5 जणाचा मृत्यू झाला आहे.
Sunday, March 29, 2020
गरजू, गरीब आणि कामगार यांच्यासाठी निवास व भोजन व्यवस्था करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना राज्य शासनाचे निर्देश
कोरोनाचा गुणाकाराचा काळ सुरु झालाय | जिथे आहात तिथेच रहा | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी ऑनलाईन ई-पासची सुविधा उपलब्ध
करोनाशी लढा; शेतकऱ्यांना १५ हजार कोटी
| राज्य | लाभार्थी शेतकरी |
| उत्तर प्रदेश | १ कोटी ८४ लाख |
| महाराष्ट्र | ७७ लाख |
| तामिळनाडु | ३५ लाख |
| तेलंगणा | ३४ लाख ७० हजार |
| आंध्र प्रदेश | ५० लाख |
| बिहार | ५३ लाख ४० हजार |
| राजस्थान | ५० लाख |
| मध्य प्रदेश | ४९ लाख ३० हजार |
कोरोना वायरसाविषयी माहिती
Real Time Information

जगातील नकाशा वरुन बोट ठेवा आणि पहा कोणत्या देशात कोरोना वायरस रुग्णांची संख्या. Fantastic Concept
http://www.covidvisualizer.com
प्रश्न 1. Corona (कोरोना) शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर = Corona हा शब्द इंग्लिश नसुन लॅटिन भाषेतला आहे. याचा लॅटिन भाषेत अर्थ होतो crown (मुकुट). कारण या विषाणूला मुकुटासारखे टोकदार आवरण असते.
प्रश्न 2. Corona हे आजाराचे नाव आहे की विषाणूचे?
उत्तर = Corona हे विषाणूचे नाव आहे.याचे वैज्ञानिक नाव आहे Severe Acute Respiratory Syndrome novel Corona Virus-2 (SARS nCoV-2). novel म्हणजे नवीन.
या विषाणूपासून होणार्या आजाराला Covid-19 (corona virus disease-2019) असे म्हणतात.
प्रश्न 3. याचा उगम (origin) कुठे झाला?
उत्तर = हा विषाणू सर्वप्रथम वुहान (Wuhan),चिन मध्ये पाहण्यात आला.हा विषाणू वटवाघूळामधून माणसांमधे आला व नंतर पसरत राहिला.हा विषाणू कोणत्या प्रयोगशाळेत तयार केला नाही तो निसर्गतःच तयार झाला आहे.
प्रश्न 4. हा विषाणू कोणत्या-कोणत्या प्रदेशात पसरु शकतो ?
उत्तर = ज्या ज्या प्रदेशात लोक रहातात अश्या सर्वच ठिकानी हा विषाणू पसरू शकतो. थंड असो अथवा उष्ण (भारतात सुद्धा).
प्रश्न 5. भारतातील उन्हाळ्यात हा विषाणू जिवंत राहील का?
उत्तर = या विषाणूला मारण्यासाठी 55° C पेक्षा जास्त तापमान लागते. भारतातील आत्तापर्यंतचे कमाल तापमान 51°C (फालोडी,राजस्थान-2016) आहे.म्हणून अफवांवर विश्वास ठेऊ नका. उलट हवेची आर्द्रता(Humidity) कमी झाल्यामुळे हा वेगाने संक्रमित होवू शकतो.
प्रश्न 6. हा आजार कोणत्या व्यक्तींना होवू शकतो?
उत्तर = सर्वच. पण विशेषतः लहान मुलांना (10 वर्षाच्या आतील) व वयस्क व्यक्तींना (60 वर्षाच्या वरील) होण्याची शक्यता जास्त आहे. आणि जे व्यक्ति अगोदरच आजारी आहेत अश्यांनी विशेष काळजी घ्यावी. तुम्ही तरुण व ताकदवान असलात तरीही याची बाधा तुम्हाला होऊ शकते आणि तुम्ही तो घरात पसरवू शकता.
प्रश्न 7. दारु पिणाऱ्या लोकांना हा आजार होत नाही का?
उत्तर = दारूने (Ethyl alcohol/Isopropyl alcohol) हा विषाणू मरतो पण जर ती 70% असेल तर. पण पिण्याची दारू ही 8 ते 40 % असते, त्यामुळे ही अफवा देखील चुकीची आहे.उलट दारू पिनाऱ्यांची रोगपरतिकारकशक्ती कमी होते आणि ते सहज आजारी पडू शकतात.
प्रश्न 8. मांसाहार करणार्या व्यक्तींना हा आजार होतो का?
उत्तर = जर जेवण करण्यापुर्वी हात साबणाने स्वच्छ धुतले आणि मांस अथवा अंडी स्वच्छ धुऊन व्यवस्थित उकडून घेतले तर हा विषाणू मरतो. (पण किमान 15 दिवस मांसाहार टाळलेला बरा)
प्रश्न 9. या आजाराची लक्षणे काय आहेत?
उत्तर = 1. ताप
2. सर्दी
3. श्वास घेताना अडचण होणे
4. थकवा
5. कोरडा खोकला
प्रश्न 10. लक्षण दिसण्यास किती दिवस लागतात?
उत्तर = 2 ते 16 दिवस. पण काही जणांमधे तर लक्षणच दिसत नाहित(Asymptomatic Patients). त्यामुळेच तर हा आजार इतका विचित्र आहे, कोणाला झाला आहे हे सांगणे फारच कठीण आहे. त्या व्यक्तीची चाचणी केल्याशिवाय काहीच सांगता येत नाही. अगदी आपल्यासोबत असलेल्या व्यक्तीला देखील याची लागण झालेली असू शकते.लक्षण दिसण्या अगोदरच तो व्यक्ती व्हायरस पसरवतो(Carrier). म्हणुन तर वैज्ञानिक सांगत आहेत की एकमेकांपासून दुर रहा.
प्रश्न 11. माझ्यात जर लक्षणे जाणवली तर ?
उत्तर = काळजी करू नका. अगोदर डॉक्टर ला कळवा आणि त्यांचा सल्ला घ्या,तुमच्या प्रकृतीनुसार ते टेस्ट करायची की नाही हे ठरवतील.
प्रश्न 12. हा आजार कसा पसरतो?
उत्तर = जो व्यक्ती आजारी आहे अश्या व्यक्ती जवळ गेल्यास, त्याने बोलल्यास, खोकल्यास,शिंकल्यास त्यातून बाहेर पडणार्या द्रवबिंदू (droplet) मधून पसरतो. नवीन अभ्यासातून स्पष्ट झाले आहे की कोरोणा ग्रस्त व्यक्ती त्याच्या बोलण्यातून देखील (aerosol) हा विषाणू पसरवू शकतो.
प्रश्न 13. कारोणा बाधित व्यक्ती किती लोकांना बाधित करू शकतो?
उत्तर = या आजाराचा प्रजनन क्रमांक (Reproduction Number R0) हा 2.7 आहे म्हणजे एक बाधित व्यक्ती इतर 2 ते 3 जणांना बाधित करू शकतो.
प्रश्न. 14. कोरोना झाल्यास व्यक्ती मरतो का?
उत्तर = जर चिंता नाही केली आणि वेळेवर औषध घेतले तर हा आजार 100 % बरा होतो. असे खूप उदाहरण आहेत ज्यात खूप लोक बरे(recover) होताना दिसत आहेत.
प्रश्न 15. हा विषाणू किती वेळ जिवंत राहतो?
उत्तर = या विषाणूचा जीवनकाळ खालील प्रमाणे आहे
1. हवा = 3 तास
2. तांबे = 4 तास
3. कागद (नोटा,वह्या,पुस्तक) = 1 दिवस
4. स्टील = 2 ते 3 दिवस
5. प्लास्टिक(मोबाईल,कॉम्प्युटर,पेन,कीबोर्ड)=3ते4 दिवस
प्रश्न 16. या आजारावर कोणते औषध किंवा लस नाही का?
उत्तर. सध्यातरी कोणतीच लस(Vaccine) उपलब्ध नाही.लस तयार होण्यास व उपलब्ध होण्यास किमान एक ते दीड वर्ष लागू शकतात. हा विषाणू स्वतःचा आकार बदलू शकतो(Mutation) म्हणून लस शोधणे अवघड आणि किचकट काम आहे. आणि आत्तापर्यंत तरी कोणतेच औषध यावर नाही.
प्रश्न 17. गोमूत्र,लसूण,काळी मिरची,लवंग काम करते का ?
उत्तर. वरील वस्तू या आरोग्यासाठी हितकर असतात.पण यापैकी कोणतीच वस्तू कोरोना विषाणूला मारत नाही. यावर कोणतेच संशोधन झाले नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका.
प्रश्न 18.Social Distancing म्हणजे काय?याचा काय उपयोग ?
उत्तर = Social distancing (सामाजिक अंतरता) म्हणजे एकमेकांपासून किमान 5 ते 6 फूट अंतरावर राहणे जेणेकरून आपण आजारी व्यक्तींच्या संपर्कात येणार नाहीत आणि आपण जर आजारी असलात तर इतरांना संक्रमित करणार नाहीत.
जर असे आपण किमान 2 ते 3 हफ्ते केलात(जे इटलीने किंवा चीनने केले नाही) तर आपण रुग्णांची संख्या कमी करू शकतो(Flattening the curve) व आपल्या दवाखान्यातील क्षमता अगोदरच कमी आहे त्यामुळे वैद्यकीय व्यवस्था देखील सुरळीत राहील.
प्रश्न 19. मी कसे सुरक्षित राहू ? प्रतिबंध काय ?
उत्तर. = तुम्ही सुरक्षित राहण्यासाठी खालील प्रतिबंध करू शकता
1.वारंवार हात धुणे.(किमान 30 सेकंद) दर 2 ते 3 तास.
बाहेरून आल्यास सर्वात अगोदर हात-पाय धुवा.
2.तोंडाला,नाकाला,डोळ्याला न धुतलेले हात न लावणे
3.गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
- अनोळखी व्यक्तिंपासून सुरक्षित अंतर बाळगा.
- खोकलनाऱ्या,शिकणाऱ्या व्यक्तींपासून दुर रहा.
- वारंवार वापरातल्या वस्तूंना स्वच्छ पुसून घ्या.
प्रश्न 20. हात कश्याने व कसे धुवावेत ?
उत्तर = हात साबणाने किंवा हॅण्डवॉशने स्वच्छ धुवावेत. किमान 30 सेकंद तरी हात धुवावेत (100 % रोगाणू मरतात).हात धुण्याची वैज्ञानिक पद्धत खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.https://youtu.be/IisgnbMfKvI
प्रश्न 21. फेस मास्क वापरावेत का ?
उत्तर = योग्य पद्धतीने वापरले तर काहीच हरकत नाही. पण नाक किंवा तोंड कुठून उघडे आहे का ? याची काळजी घ्यावी. रुमाल देखील चालतो पण तो रोज किमान दोनदा धुवा.
प्रश्न 22. प्रवास करावा की नाही ?
उत्तर = नाही अजिबात नाही…………कितीही अडचण असेल (दवाखाना व्यतिरिक्त) तरी प्रवास टाळा. आपण स्वतः तर बळी पडताल आणि सोबत इतरांना देखील घेऊन जाताल.
प्रश्न 23. जनता कर्फ्यु ने खरंच कोरोना व्हायरस मरेल का ?
उत्तर = काही प्रमाणात. पण जेंव्हा लोकं एकत्र येतील तेंव्हा हा पुन्हा वाढेल म्हणून आपले सर्वच कामे (जिवापेक्षा कमीच महत्वाची) टाळावी.उगाच मला काही होणार नाही म्हणून बाहेर पडून इतरांचा जीव धोक्यात घालू नका. कृपा करून सरकारला त्यांचे काम करुद्या.
प्रश्न 24. खरा कर्फ्यु लागण्याच्या अगोदर सर्व आवश्यक वस्तू जमा कराव्यात का ?
उत्तर = नाही. कितीही झाले तरी आवश्यक दुकानं बंद होणार नाहीत(उदा. किराणा,मेडिकल,दवाखाना).म्हणून उगीच घाई करू नका आणि वस्तूंची जमवा जमवी करू नये.
लक्षात ठेवा : प्रतिबंध हाच उपाय



