Showing posts with label Cyber Crime. Show all posts
Showing posts with label Cyber Crime. Show all posts

Saturday, October 31, 2020

व्हाट्सअप स्टेटस ठेऊन 500 रुपये कमवण्याच्या नादात असाल तर हे वाचाच

मागील काही दिवसांपासून व्हॉटस्अॅप स्टेट्सवर एक लिंक मोठ्या प्रमाणावर अपडेट होत आहे. त्यात व्हॉटस्अॅपवर स्टेट्स ठेवून पैसे कमविण्याचे आमिष दाखविण्यात आले आहे. त्यासाठी व्यक्तिगत काही माहिती या लिंकव्दारे भरून घेतली जात आहे. विशेष म्हणजे अनेक जणांनी या लिंकवर माहिती भरून व्हॉटस्अॅप स्टेट्स ठेवल्याचे प्रकार हि समोर आले आहेत. मात्र, या बाबत सायबर सेल मात्र अनभिज्ञ आहे असल्याचे हि दिसून आले आहे.


बेरोजगारी आणि शॉटकटने पैसे कमविण्याच्या नादात नागरिकांना इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने आमिष दाखवले जाते त्यांना अनेक जण त्याला बळी पडतात त्यातच अनेकांची लूट होते. 


हल्ली प्रत्येक जण आपल्या मोबाइलवरून ऑनलाइन पेमेंट ट्रांसफर करण्यासाठी बॅंक लिंक असलेल्या मोबाइल नंबरशी विविध अॅपची जोडणी करतात. तसेच तोच नंबर नियमित वापरात असल्याने त्यावर व्हॉटस्अॅप ही सुरू करतात. यातून आपली व्हाट्सअप सह आपली वैयक्तिक माहिती लीक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


काय आहे या लिंक मध्ये- 


"मराठी ऑनलाईन वर्क" या नावाने हि बनावट वेब साईट आहे. ही लिंक ओपन केल्यानंतर व्हॉटस्अॅप स्टेटसमधून पैसे कमवू शकता अशी जाहीरात देत स्वतःची व्यक्तिगत माहिती भरण्यासाठी सांगितले जाते. या लिंकमध्ये महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांची नावे दिलेली आहेत. स्वतःचा मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी भरल्यानंतर जिल्हा सिलेक्ट करण्यास सांगितले जाते. त्यानंतर व्हॉटस्अॅप स्टेटस शेअर करण्यासाठी एक आयकॉन येतो. शेअर केलेले स्टेटस जर तीस पेक्षा अधिक जणांनी पाहिले तर ५०० रुपयांपर्यंत कमाई करता येईल असे त्या लिंकवर नमूद केले आहे. या प्रलोभनाला आतापर्यंत हजारो जण बळी पडले आहेत. त्यामुळे हा सायबर क्राईमाची नवी पद्धती तर नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, या संदर्भात सायबर सेलच अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा लिंकवर व्यक्तिगत माहिती भरताना खात्री करा, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता अधिक आहे.


या बाबतील सत्य जाणून घेण्यासाठी "महाराष्ट्र जनभूमी"ने कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, अशा कोणत्याही गोष्टीवर कुणी विश्वास ठेऊ नये या भूलथापा असतात, अशा पद्धतीने कुणालाही पैसे मिळणार नाही. यातून तुमची बदनामी तसेच तुम्हाला ब्लॅकमिल केले जाऊ शकते. या माहिती वरून तुमच्या नावाने कर्ज काढले जाऊ शकते किंवा तुमचे बँक खाते हॅक केले जाऊ शकते यासाठी त्या माहितीचा वापर केला जाऊ शकतो, त्यामुळे कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती कुठेही देऊ नये असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

Saturday, July 25, 2020

ई-सीमचा वापर करणाऱ्यांना महाराष्ट्र सायबरचे आवाहन


मुंबई, दि.२२ :-  ई  सिम धारकांनी सायबर गुन्हेगारांपासून सावध राहावे. त्यांच्या फसव्या फोनला बळी पडू नये. यासाठी काळजी घ्यावी,असे आवाहन महाराष्ट्र सायबर तर्फे  करण्यात येत आहे.

सध्या बाजारात नवीन प्रकारचे फोन आले आहेत त्यामध्येच e -सिम किंवा embedded सिमकार्ड असते. हे e -सिमवाले फोन जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला physical सिमकार्डची गरज नसते व तुम्ही e -सिम activate करून पाहिजे ते मोबाईल नेटवर्क योग्य शुल्क भरून वापरू शकता. सध्या सायबर गुन्हेगार या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग विशेषतः airtel मोबाईल कंपनीच्या ग्राहकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी करत आहेत.

फसवणूक

सायबर गुन्हेगार #१२१ या airtel च्या नंबरवर स्वतःचा ई-मेल id हा ग्राहकांच्या नावाने अपडेट करतात व सदर ग्राहकाच्या नावाने e -सिमकार्ड issue करून घेतात. तसेच QR कोडचा वापर करून ते e -सिम activate करून घेतात. त्यानंतर त्या ग्राहकाला एक sms येतो व लिंक असते ज्यावर क्लिक केल्यास एक फॉर्म उघडतो व त्यात तुमची सर्व आर्थिक माहिती जसे की बँक खात्याचा नंबर क्रेडिट/डेबिट कार्ड नंबर पिन नंबर सर्व विचारले जातात. सायबर भामटे त्यांच्या फोन मध्ये तुमच्या नावाचे e -सिम वापरून मग तुमची सर्व बँक खात्यातील रक्कम ट्रान्सफर करून तुमची फसवणूक करतात.

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि,

१) कृपया गरज नसल्यास हे e -सिम activate करू नका .

२) कोणताही ई-मेल id तुमचा ई-मेल id म्हणून देऊ नका .

३)शक्यतो सोशल मीडियावर तुमचा मोबाईल फोन नंबर ठेवू नका .

४) जर तुम्हाला असे e -सिम बद्दल काही फोन आले, तर कृपया लगेच कंपनीच्या कॉल सेंटरला फोन करून त्याची खातरजमा करून घ्या.

५) इंटरनेटवरील कोणत्याही फॉर्मवर तुमच्या बँक खात्याची माहिती डेबिट/क्रेडिट कार्ड नंबर,पिन नंबर देऊ नका . 

केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. कृपया घरीच थांबावे व कारण नसल्यास घराच्या बाहेर पडू नये.                 

असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभाग विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे मार्फत करण्यात आले आहे.

Tuesday, April 7, 2020

लॉकडाऊन काळात समाज माध्यमाद्वारे खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध ११३ गुन्हे दाखल




महाराष्ट्र सायबरची कारवाई

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनच्या असताना राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र सायबर विभागाने कडक पावले उचलली असून राज्यात समाज माध्यमांमध्ये खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध 113 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनी समाज माध्यम बाबत अधिक सतर्क राहून महाराष्ट्र सायबर विभागाला सहकार्य करावे असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक सायबर विभाग यांच्यावतीने करण्यात येत आहे.

या गुन्हेगारांना व समाजकंटकांवर  गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासाठी सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाबरोबर  सायबर विभाग समन्वय साधून काम करत आहे. या करिता विभाग  टिकटॉक,फेसबुकट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांवर अचूक लक्ष ठेवून आहे. 

राज्यातील गुन्ह्यांची आकडेवारी
महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये  6 एप्रिल 2020 पर्यंत 113  गुन्हे दाखल झाले आहेत .त्यामध्ये बीड 15पुणे ग्रामीण 11मुंबई 9सातारा 7जळगाव 7 , नाशिक ग्रामीण 6 , नागपूर शहर 4 ,नाशिक शहर 4ठाणे शहर 4नांदेड 4गोंदिया 3भंडारा 3 , रत्नागिरी 3जालना 3परभणी 2अमरावती 2नंदुरबार 2लातूर 1नवीमुंबई 1 यांचा प्रामुख्याने समावेश आहे .

बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल  गुन्ह्यांमध्ये आरोपींनी फेसबुक किंवा व्हाट्सअँप वर पोस्ट टाकून किंवा शेअर करून त्याद्वारे कोरोना महामारीला जातीय रंग देऊनत्या द्वारे धार्मिक तेढ व समाजात अस्थिरता पसरविण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे.अशाच प्रकारच्या  एका गुन्ह्याची नोंद लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात देखील करण्यात आली. सदर आरोपी ने आपल्या फेसबुक प्रोफाइलवर कोरोना महामारीला धार्मिक रंग देऊन आक्षेपार्ह पोस्ट टाकलीज्यामुळे त्या परिसरात अशांतंता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो .

धार्मिक भावना दुखावणारे मजकूर फॉरवर्ड न करण्याचे आवाहन
महाराष्ट्र सायबर मार्फत असे आवाहन करण्यात येते कीजर आपणास कोणी अपरिचित व्यक्तीने किंवा आपण ज्या व्हाट्सॲप ग्रुपवर आहात त्यावर कोणी परिचित , अपरिचित व्यक्तीने असे व्हिडिओफोटोजमेसेजेस किंवा अन्य काही पोस्ट्स ज्यामुळे धार्मिक भावना दुखावून समाजात तेढ निर्माण होऊ शकतेअसे मेसेज पाठवत असेल , तर लगेच त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये द्यावी .तसेच आपण असे व्हिडिओफोटोजमेसेजेस किंवा अन्य काही पोस्ट्स कोणालाही पाठवू नयेत व त्वरित काढून टाकावी.

आपण जर  व्हाट्सॲप ग्रुपचे निर्माते , ॲडमिन असाल तर चुकीच्या पोस्ट्स अथवा अफवा पसरवणारे मेसेजेस व व्हिडिओ ग्रुपवर येणार नाहीत याची खबरदारी घेणे तुमचे कर्तव्य आहे. तसे न केल्यास तुमच्यावर पण गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्यासाठी आपण group सेटिंग मध्ये only admin असे setting करावे.

सायबर गुन्ह्यांविरुद्धच्या तक्रारी संपर्क साधावा

महाराष्ट्र सायबर सर्व नागिरकांना आवाहन करते की कृपया कोणीही अफवा व खोट्या बातम्या व्हॉटसअप किंवा अन्य समाज माध्यमांवर (social media) पसरवू नयेत. तसेच त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. काही मदत लागल्यास जवळच्या पोलीस स्टेशन कडे संपर्क साधावा. सायबर गुन्ह्यांबाबतची  माहिती www.cybercrime.gov.in वर पाठवावी. केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करावे व महाराष्ट्र सायबर विभागाला सहकार्य करावे.